पारो भाग-४ अंतिम( जलद ब्लॉग लेखन)

पारो
पोलीस पारोच्या घरच्यांचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते.काही दिवसातच मिसिंग केस वरून पार्वती नावाची मुलगी बोरीवलीतून गायब झाल्याचं पोलिसांना समजलं.त्यानंतर गुजरात पोलिसांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला.पारोला मुंबईत आणलं गेलं.घरच्यांना तिची अवस्था सांगितली.पण ह्यावेळी मात्र घरच्यांनी तिला स्वीकारायला नकार दिला.आणि पोलीस स्टेशन मधून निघून गेले.आता पोलिसांसमोर पेच-प्रसंग उभा राहिला होता की पारोचं काय करायचं.पोलिसांनी तिला एका अनाथ आश्रमामध्ये आणून सोडलं.पारो तिथे राहू लागली.दिवसा मागून दिवस जात होते.एका सकाळी पारोने एका मुलीला जन्म दिला.मुलगी खूपच सुंदर होती. पण पारोचं मानसिक संतुलन बिघडलं असल्यामुळे तिने कधीच मुलीला जवळ घेतलं नाही की स्वतःच दूध पाजलं नाही.आज एकाच आश्रमामध्ये मायलेकी राहतात.एकमेकींसाठी अनोळखी आहेत.

(खरंतर पारोची कथा इथेच संपली.पण ह्या कथेतून एक प्रश्न उभा राहतो.हे सगळं घडलं यात दोष कुणाचा होता?ज्यावेळेस मी या केसची स्टडी केली.त्यावेळेस एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली या घटनेत पारोसहित सर्वजण आपापल्या परीने
दोषी आहेत.पण याची सजा मात्र त्या निरागस बाळाला भोगावी लागत आहे.आज पारोची मुलगी दहा महिन्यांची झाली असून.तिला पुढे डॉक्टर करायच आहे.)
ही सत्य घटना असल्यामुळे सगळे प्रसंग जशास तसे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे कुठल्या
वाचकांना कुठल्या गोष्टी खटकू शकतात.कारण, सत्य हे कल्पनेपेक्षा ही भयानक असते
©®खुशी कांबळे

🎭 Series Post

View all