पारो भाग 1(जलद ब्लॉग लेखन)

पारो


राजेन्द्र मेहता मुंबईतले बडे प्रस्थ. कन्ट्रक्शन चा मोठा बिझनेस होता त्यांचा.एकत्रित कुटुंब होतं त्यांचं.सर्वात मोठे राजेंद्र,त्यांची पत्नी मोनिका,मुलगी पारो,लहान भाऊ जयेंद्र,त्याची पत्नी रूपा,पुतने रोनक आणि रोशन वडील सत्येंद्र मेहता.सर्वजण त्यांच्या बोरिवली मधील आलिशान घरामध्ये गुण्या गोविंदाने राहत होते.राजेंद्र ला लग्नानंतर बरीच वर्ष मुलबाळ नव्हतं.लहान भावाचं लग्न होऊन त्याला दोन मुलं झाली तरीही राजेंद्र आणि मोनिकाला मात्र बाळाचं सुख मिळालं नव्हतं.खूप प्रयत्नानंतर लग्नाला 15 वर्ष झाल्यावर शेवटी मोनिकाची कुस उजवली आणि तिला एक सुंदर कन्यारत्न प्राप्त झालं.आजीची आठवण म्हणून पार्वती नाव ठेवलं तिचं.सर्व कुटुंबाची ती छोटीशी लाडकी पारो झाली.घरामध्ये शेंडी फळ म्हणून सर्वजण कोडकौतुक करायचे.दिवसा मागून दिवस जात होते.दोन मोठ्या दादांचा हात धरून पारो आता शाळेत जाऊ लागली.दिसायला सुंदर असलेली पारो अभ्यासातही हुशार होती.लक्ष्मी आणि सरस्वतीच जणू मुक्तहस्ते दानच दिलं होतंं देवाने तिला.आता पारो वयात आली होती.यावर्षीच तिने दहावीची परीक्षा दिली होती.घर आणि शाळेच्या रस्त्यावर एक गॅरेज होतं.गॅरेजवर काम करणारा अरबाज, पारो यायच्या वेळेस रस्त्यावर थांबायचा.सारखा तिच्याकडे बघत राहायचा.हळूहळू पारोही त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागली.वयच होत ते अल्लड.सिनेमा मधला रोमान्स बघितला की हिरोच्या जागी तिला अरबाज दिसायचा आणि हिरोईनच्या जागी ती स्वतःला बघायची.हळूहळू दोघांचं बोलणं व्हायला लागलं.फक्त अरबाजला बोलता यावा म्हणून हट्ट करून तिने वाढदिवसाला घरच्यांकडून मोबाईल घेतला.आता पारो दिवस रात्र,फोनवर बोलायची.एका वेगळ्याच विश्वात ती वावरत होती.

||पहला नशा
पहला खुमार
नया प्यार है
नया इंतजार||
पण नियतीने मात्र तिचे डाव अगोदरच ठरवून ठेवलेले असतात.काय असेल बरं नियतीच्या मनात?बघूया पुढच्या भागात..

🎭 Series Post

View all