परकाया भाग ७८ अंतिम भाग

happy ending

परकाया भाग ७८

क्रमश : भाग ७९

राहुल " जय .. मी काय सांगतो .. तूच यात लक्ष घाल .. हे बघ जर हे काम आपल्या कंपनीने हाती घेतले तर या ऑफीस चा ceo मी सरांना सजेस्ट करेन कि तूच हो .. त्यात असा फायदा होईल कि तुला तिकडे शहरात यायची गरज नाही .. तू इकडे घरी राहुल कंपनीचा भार  सांभाळू शकशील .. फक्त महिन्यातुन एकदा मिटिंग साठी वगैरे यावे लागेल .. अर्थात हा लॉन्ग टर्म प्लॅन आहे .. यात अजून एक वर्ष तरी जाईल .. पण लगेच कामाला लागलो तर तुझ्यावरच सगळी जवाबदारी येईल आणि तू इकडे च तुझ्या घरी राहून काम करू शकतोस .. शिवाय गावातल्या लोकांना रोजगार मिळेल ..एखादी चांगली कंपनी आली कि ऍटोमॅटिक  गावाची डेव्हलोपमेंट पण होते .. बघ तू विचार कर "

जय " ठीक आहे .. तू बॉस शी बोलून बघ .. मी पण थोडा विचार करतो .. "

अशाच गप्पा मारत  सगळे घरात आले .. तसेही मुलांचे काही काम नव्हतेच मुले वरती जाऊन गप्पा मारत  बसले .. वसू  ने आधी नंदू ला तयार केले .. मग समीराला पण छान लाचा दिला घालायला .. तिची मैत्रीण  सुरु आज नंदू च्या  ओटी भरणाला येणार होती ती पण आली होती .. .. संध्याकाळच्या प्रोग्रॅम ला तिघी छान तयार झाल्या .. वीरू ने मंजिरी ला पण बोलावले होते ... ती पण या तिघींच्यात सामील झाली .. चौघी छान लाचे घालून तयार झाल्या .. आज त्या चौघी   एकत्र डान्स करणार होत्या .

नंदू ला बाहेर आणून बसवली .. अंगणात मस्त रांगोळी वसू  ने काढली ..

एकेक बायका येत होत्या वसू  घरातली सून म्हणून तिच्या वर खूप मोठी जवाबदारी होती .. सगळ्यांचे स्वागत करत होती .. चहा पाण्याचे बघत होती .. डान्स तिनेच बसवला होता तर तिला प्रॅक्टिस ची गरज नव्हती .. या तिघी डान्स ची प्रॅक्टिस करत होत्या .. समीराने तर असला डान्स कधीच केला नव्हता .. सुरु एक नंबर लाजवंती .. वसू  मुळे कशी बशी तयार झाली होती .. आणि मंजिरी ला चांगलाच कॉन्फिडन्स होता .. मी छान करेल म्हणून ..

वसू ने नंदिनी ला ओवाळले .. तिची माहेरची म्हणून ओटी पण वसू नेच भरली आणि सासरची म्हणून पण तिनेच भरली .. मग एकेक बायका तिची ओटी भरून तिला आणि होणाऱ्या बाळाला आशीर्वाद देत होते .. कार्यक्रम छान चालू होता ..

जसा डान्स करायची वेळ आली तशी जय ने मुलांना पण डान्स बघायला खाली बोलावले .. हे लोक खुर्च्या टाकून बसले डान्स बघायला.

अजून कोणीही कोणाला बघितले नव्हते ..

त्या चौघी डोक्यावर घुंघट घेऊन आल्या आणि पुढे बसल्या .. कोणत्या घुंघट मध्ये कोण आहे कोणालाच माहित नव्हते

आणि गाणे सुरु झाले

चौघे च्या चौघे डोळे विस्परून बघत होते .. जय चक्क लाजत होता .. आणि कुठे तरी वसू  ला इतके खुश बघून त्याला खूप समाधान मिळत होते ..

राहुल ला समीरा चे हे रूप पहिल्यांदाच दिसले होते .. तिला जमेल तसा डान्स तिने केला पण ट्रॅडिशनल ड्रेस मध्ये सुंदर नाही अप्सरा दिसत होती .. नवरीच्या पेहेराव मध्ये स्त्री चे रूप खुलते म्हणतात ना .. जर मी लग्न केले तर समीरा अशीच दिसेल ना असा विचार त्याच्या मनात चटकन येऊन गेला .. आणि तिला अशी पुन्हा बघण्यासाठी लग्न करणे कदाचित रास्त ठरेल .. असा विचार करत तो तिला पाहत होता ..

वीरू मंजिरी ला बघून तर तिथेच तिच्या बरोबर नाचायला  जावे असे त्याला झाले होते ..

राघव .. ला जय ने फोटो पाठवला होता तेव्हा त्याला कदाचित एवढी सुंदर दिसली नाही पण आता तिला लाजत डान्स करताना पाहून तो मंत्र मुग्ध झाला होता ..

गाण्याच्या शेवटी मंजिरी आणि सुरू .. आणि वसू  आणि समीरा फुगडी घालत होत्या .. चौघी खूप सुंदर तर दिसतच  होत्याच पण खुश दिसत होत्या ..

जोर जोरात हसत हसत गोल गोल गोल फुगड्या चालू होत्या .. आणि अचानक समीरा आणि वसू  ला चक्कर आली आणि त्या खाली पडणारच तर जय आणि राहुल ने त्यांना सांभाळले ..

दोघी बेशुद्ध पडल्या तशी तिथली परिस्थिती एकदम बदलली

जय " प्लिज कोणी पॅनिक होऊ नका .. वसू  ची तब्बेत अजूनही थोडं नाजूक आहे म्हणून असेल .. आणि समीरा ने बहुदा फुगडीच पाहिल्यान्दा घातली असेल .. त्यामुळे तिला चक्कर आली असेल ..

वीरू ने गाडी काढली आणि त्यात हे चौघे बसून दवाखान्यात गेले .. राहुल आणि जय नाही म्हटले तरी जरा टेन्शन मध्ये दिसत होते ..

दोघींना उचलून वरती नेले .. लगेच तिथल्या डॉक्टरांनी दोघींना ऍडमिट करून घेतले .. आणि चेक अप सुरु झाला

हे तिघे रूम  च्या बाहेर बसले डॉक्टर काय सांगतील यांची वाट बघत होते ..

राहुल " जय .. मी बॉस ला सांगून हेलिकॉप्टर बोलावतो .. आपण दोघींना तिकडे शहरात घेऊन जाऊ .. इकडे काय सगळी मेडिकल सोय असेल नसेल "

जय " थाम्ब रे किती हायपर होतोस लगेच .. आणि बॉस  काय तुझ्या घरचा आहे काय ? लगेच तुझ्या साठी हेलिकॉप्टर पाठवायला "

राहुल ने अजूनही जय ला सांगितले नव्हते कि बॉस म्हणजे त्याचा डॅड आहेत ते "

राहुल " नाही रे पण ते मला मानतात म्हणून म्हटले .. "

जय त्याला बघून हसत होता .. मनात म्हणत होता "येडा .. नुसते चक्कर आली तर हेलिकॉप्टर बोलावतोय .. एवढे प्रेम करतो तिच्यावर पण लग्न करायला घाबरतोय "

तेवढयात नर्स बाहेर आली ..

नर्स " समीरा आणि वसू  बोथ आर प्रेग्नन्ट .. काँग्रॅच्युलेशन्स !! "

राहुल आणि जय दोघे एकमेक्नाकडे बघून " व्हॉट .. " आणि दोघे एकमेकांच्या हातावर टाळी देऊन हसायला लागले  .. वीरू त्याना जॉईन झाला

वीरू " जय तुझे ठीक आहे रे .. या नालायकाला काय म्हणायचे ?" आणि तो हसू लागला

राहुल " अरे जय .. वाचव मला .. मी कसा जाऊ आता तिच्या समोर "

राहुल तिकडे हायपर होऊन फेऱ्या मारू लागला

जय " आता काय लग्न कर. दुसरे काय ?"

राहुल  " जय उद्याच करतो लग्न .. तुझ्या अप्पांना सांगतो वीरू बरोबर माझे पण लग्न लावा .. "

जय " बरं आता जाऊन भेट तरी .. तिला .. मी पण जातो वसू  ला भेटून येतो

राहुल ने जय ला घट्ट मिठी मारली " काँग्रट्स जय .. "

जय " काँग्रट्स राहुल.. डोन्ट वरी .. जेवढा मी तिला ओळखतो ती तुला काहीच बोलणार नाही ..  "

जय आणि राहुल आतमध्ये दोघीना भेटायला गेले .. इकडे वीरू ने पंकज ला फोन करून सांगितले कि " वसू  प्रेग्नंट आहे "

घरात आनंदी आनंद झाला

जय वसू च्या बेड वर शेजारी बसला .. वसू ला नुकतीच शुद्ध आली होती ..

वसू रडतच " जय सॉरी .. मी तुला खूप त्रास देते ना .. मला अचानक आता चक्कर कशी काय आली काय माहित ? जरा आनंदात असले ना कि असे काहीतरी होते मला .. माझ्या मुळे तुझ्या मागे दवाखाना लागलाय .. सॉरी .. नक्की काय झालय मला ..  "

जय तिच्याकडे बघून हसत होता ..

वसू" मला रडायला येतंय आणि तू हसतोय काय ?"

जय ने उठून तिच्या कपाळावर किस केले .. हात होतात घेतला .. आणि " थँक यु " असे म्हणाला

वसू " थँक यु .. कशा बद्दल "

जय " तूला चक्कर आल्या बद्दल "

वसू " काय बोलतोय जय .. चल मी बरी आहे आता .. मला घरी जायचंय .. घरी आज प्रोग्रँम आह" ती पटकन उठायला लागली

जय ने तिला उठून दिले नाही .. स्लो.. हळू .. एवढे पटपट कशाला उठतेस .. तुला कळत नाही का ?"

वसू " जय .. मी बरी  आहे .. बहुदा विकनेस मुळे मला चक्कर आली "

जय " नाही .. चक्कर येण्याचे कारण कळलंय मला .. त्यामुळे आता तू जमिनीवर खाली उत्तरायचेस नाही .. मला आत तुझी काळजी घ्यायला सांगितलंय डॉक्टरनी "

वसू " काय ? काय झालंय मला .. शी बाबा .. "

जय " ऐक तर .. तुला आता कसे सांगू ते च मला कळत नाहीये .. "

तेवढ्यात मागून पंकज आला

पंकज " मी सांगतो .. तू टेन्शन नको घेऊस .. वसू  काँग्रॅच्युलेशन ..आणि थँक यु .. मला मामा बनवल्या बद्दल "

वसू " काय ? " तिने लाजून दोन्ही हाताने तिचा चेहरा झाकला ..  एक बोट बाजूला करून जय कडे पाहत होती .. जय तिच्याकडे बघून हसत होता

तेवढयात राहुल जय च्या इथे धावत आला

राहुल " जय .. समु बघ ना .. मी तिला म्हटले आपण लग्न करूया तर मला म्हणते .. तुझा ह्या बाळाशी काही संबंध नाही .. ती एकटी समर्थ आहे बाळाला सांभाळायला .. तिचे म्हणणे आहे कि आता मी ती प्रेग्नेंट आहे म्हणून जबरदस्ती ने लग्न करायला बघतोय .. तिला मी म्हटले कि मी जबरदस्तीने नाही मना पासून तयार आहे तर ती मानतच नाहीये .. जय तू समजवा न तिला " मला हवीय ती .. मला लग्न करायचंय तिच्याशी .. "

पंकज " राहुल .. तू तो फोर स्टेप्स अहेड  आणि ती तुझ्या पेक्षा अजून चार पाऊले पुढे आहे . तुम्ही दोघे मेड फॉर इच अदर "

वसू " नक्की काय झालंय जय ?"

जय ने तिला सांगितले " समु इज अल्सो प्रेग्नन्ट "

वसू " काय रे देवा .."

जय " ठीक आहे .. आता एक काम कर .. सध्या तिला काही बोलू नकोस .. उद्या तुझ्या आई वडिलांना इकडेच बोलावून घे .. मी समु च्या घरच्यांना बोलावून घेतो .. आपण उद्या तुमचे पण लग्न लावू ..

तेवढयात राघव आणि सुरु ला घेऊन आला ..

राघव "जय माझ्या गरिबा कडे पण बघा नालायकांनो .. मला पण लग्न करायचंय .. अप्पांना सांगून उद्या माझे आणि सुरु चे पण लग्न लावा "

सगळे जोर जोरात हसू लागले

जय " चला वीरू म्हणजे आता आपल्याला जोरात कामाला  लागायला लागेल "

पंकज " वीरू पण नवरदेव च आहे .. आत मी आहे तुझ्या बरोबर "

दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पांनी भटजीला सांगून एकाच मांडवात वीरू - मंजिरी , राघव - सरस्वती , आणि राहुल - समीरा चे लग्न करायची तयारी केली

बाकी तयारी जय आणि पंकज ने केली

तेवढयात कॉलेज च्या ग्राउंड वर परमिशन घेऊन एक हेलिकॉप्टर उतरले ..

त्या मधून जय चा बॉस .. त्याची बायको आणि राघव ची आई आणि समीराचे आई बाबा आले ..

 पंकज त्यांना कार ने आणायला गेला होता

जय " सर तुम्ही इकडे कसे काय ? राहुल काय रे ? तू डॅड ला बोलवायचे सोडून बॉस ला का बोलावलेस ?"

पंकज " अरे जय तेच मॉम डॅड आहेत राहुल चे "

वसू " जय मी तुला म्हटले ना मी ह्यांना कुठे तरी पाहिलंय .. मला आता आठवले " ह्याचा एक फोटो राहुल च्या बेडरूम मध्ये आहे .. मी तुला बोलले ना मी चुकून त्याच्या बेडरूम  गेलेले तेव्हा "

जय " हो ग बाई .. तू बोलली होतीस .. मी म्हटले तुला तेव्हा स्ट्रेस होता म्हणून तुझ्या म्हणण्याकडे लक्ष नाही दिले "

राहुल " डॅड .. थँक्स फॉर कमिंग .. आणि अजून एक सांगायचंय डॅड "

बॉस " बोल आता लग्न तर अचानक करतोय .. ह्या पेक्षा काय वेगळे असेल .. बोल कुठले तिकीट काढायचे हनिमून चे "

राहुल " डॅड  .. ऐका ना .. अजून काही तरी महत्वाचे आहे .. "

बॉस " बोल अरे ..

राहुल " डॅड यु आर गोइंग टू बिकम ग्रँड फादर सून "

राहुल ची आई " काय ? नालायक ? " आणि त्यांनी राहुल चा कान पकडला

राहुल " सॉरी ना मॉम .. इट जस्ट हपनेड ..बट आय एम हैप्पी .. "

राहुल ची आई " कुठे आहे आमची सुनबाई "

राहुल " मॉम .. तेच तर ना .. मी तिला आधी लग्नाला नाही बोललो होतो ना तर ती लग्नाला तयार  नाहीये.. चिडलीय माझ्यावर .. मला म्हणते .. तुला लग्न करायचे नव्हते तर आता जबरदस्तीने जवाबदारी घ्यायची काही गरज नाहीये "

राहुल ची आई " तुला ना तसेच पाहिजे .. समीराचं तुला सरळ करू शकते .. चल मला भेटू दे माझ्या सून बाईला "

राहुलची आई समीराला जाऊन भेटली .. आणि तिने लग्नाला फायनली होकार दिला ..

राघव च्या आई ला पण सुरु आवडली होतीच

एकाच मांडवात लग्न लागली आणि चारही कपलं स्वित्झर्लंड ला हनिमून ला गेली

पंकज " साल्यानो मला सोडून जाताय .. "

जय  " नाराज नको होऊन पंकज .. पुढल्या वर्षी आपण सगळे मिळून आपल्या बाळांना घेऊन परत जाऊ  परत जाऊ .. "

आणि सगळे  हसायला लागले   .

समाप्त !!!

सर्वे सुखिनः भवन्तु !!

 जय आणि वसू च्या लहान पणा पासून च्या प्रेमाची गोष्ट आज इथपर्यंत पोहचली आणि त्यांनी त्यांच्या सांसारिक जवाबदाऱ्या पेलायला सुरुवात केली .. वसू  मध्ये झालेला परकाया प्रवेशामूळे दोघांच्याही आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले .. जय ने खरतर त्याच्या जीवाची पर्वा न करता त्याचे प्रेम सिद्ध केले होते .. तो म्हटल्या प्रमाणे "दुनिया देखेंगी मेरी दिवानगी " ते त्याने सिद्ध केले होते ..  माणूस प्रेमात पडला ना कि तो खूप चांगला होतो .. एकदा तरी माणसाने प्रेमात जरूर पडावे .. आयुष्याचे गणित सोडवण्याचे तेच एकमेव सूत्र आहे ..

तर मंडळी थोडेसे घाबरवले तुम्हाला त्या बद्दल क्षमस्व .. पण तेही तुम्ही खूप एन्जॉय केले .. असे मी कंमेंट्स वरून नक्कीच सांगू शकते ..

परकाया हि कथा कशी वाटली हे कंमेंट्स मध्ये नक्की सांगा .. असेच तुमचे प्रेम माझ्या लिखाणावर राहू द्या ..

वाचकांचे मनापासून ध्यान्यावाद  आणि ईरा ने हे व्यासपीठ दिल्या बद्दल ईराचे पण मन पासून धन्यवाद !!

🎭 Series Post

View all