परकाया भाग ७७

rahul samira and raghv visits to the village

परकाया भाग ७७

क्रमश : भाग ७६

दुसऱ्या दिवशी जय जेव्हा ठणठणीत जागा झाला तेव्हा त्याला कळले कि तो आता गावी आहे .. त्याच्या समोर वीरू ,पंकज, नंदिनी ,आप्पा ,  आई , आत्या होत्या ..

आई त्याच्या डोक्या जवळ बसली होती .. आप्पा त्याच्या पाया जवळ बसले होते .. ५ महिन्याची गरोदर नंदिनी डोळ्यात अश्रू घेऊन त्याच्या कडे बघत होती .. पंकज तिच्या बाजूला होता ..  वीरू त्याच्या बाजूला होता .. आत्या त्याच्या शेजारी बेड वर बसली होती ..

त्याने हळूच डोळे  हळूच उघडले तर एवढे सगळे असताना त्याची नजर इकडे तिकडे शोधत होती ..

वीरू " जय .. वसू  ठीक आहे .. ती त्या रूम मध्ये झोपलीय .. खूप थकवा आहे तिला आणि हात पायाची जखम पण अजून बरी नाही झालीय "

आप्पा " कसे वाटतंय पोरा आता .. "

आई " रडतच .. जय अरे इतकं कोणी अंधारात ठेवत का ? आम्हाला कळवायचंस  ना .. आम्ही सगळे आलो असतो तुझ्या मदतीला "

आत्या " स्वतःच्या जीवा  वर उधार होऊन माझ्या लेकीचा जीव वाचवलास रे .. बाळा .. कुठून एवढी ताकद आणलीस "

नंदिनी " दादा .. आणि जोरात रडू लागली

जय  तिच्या पोटाकडे बघून  एकदम गोड  हसला ..

पंकज " अरे ए आता रडारडी थाम्बवा .. आता सगळे ठीक झालय .. अजिबात कोणी अश्रू काढायचे नाहीत आधीच सांगून ठेवतो .. आणि नंदू तू तर अजिबात रडायचे नाहीस .. तुझ्या रडण्याने माझे बाळ पण रडके होईल नाहीतर

तसे सगळे थोडेसे हसले

तेवढ्यात वसू  चालत चालत जय च्या  रूम मध्ये आली ..

वीरू " अग .. तू कशाला इकडे आलीस ? आम्ही येतच होतो तिकडे .. हिला तरी दम आहे का ?"

वसू " जय .. उठल्यास का ? किती झोपतोस ? मी केव्हा पासून वाट बघत होते तुझी "

जय च्या डोक्याला मार लागल्यामुळे त्याला मान हलवता येत नव्हते ..

त्याने किंचित मान हलवण्याचा प्रयत्न केला तर त्याला खूप त्रास होतोय हे त्याला जाणवले .. जाईल तेवढी नजर तिरकी करून तो वसू कडे बघत होता .. एक दोन जखमांचे व्रण तिच्या चेहऱ्यावर हातावर पायावर दिसत होते ..

तोपर्यंत वीरू ने तिला हाताला धरून पुढे जय च्या  समोर आणले .. लगेच आत्या  उठल्या आणि तिला तिथे त्यांनी बसवले ..

जय डोळ्यांनीच तिला विचारत होता " कशी आहेस .. ? त्याच्या डोळ्यात एक  अश्रू पापणी तुन खाली पडला ..

वसू  त्याला डोळ्यांनीच सांगत होती .. तू होतास म्हणून आहे .. आणि तिच्या डोळ्यातून पण एक अश्रू ओघळला

आप्पा " चला आपण जरा जाऊ बाहेर .. दोघांना बोलू दे जरा .. "

सगळे बाहेर निघून गेले ..

वीरू ने जाताना दार ओढून घेतले

वसू  जय च्या शेजारी बेडवर आडवी पडली .. त्याने पण एक हात तिच्या भोवती टाकून तिला कुशीत घेतले .. बराच  वेळ दोघे मौनात होते .. पण आता आनंदात होते ..

पुढे एक महिना कंप्लिट आराम केल्यावर जय आणि वसू दोघे शारीरक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या पण छान झाले ... राहुल समीरा मध्ये मध्ये चौकशी करत असत .. राहुल ने जय ला सांगितले तू कामाचे काही टेन्शन घेऊ नकोस .. तू संपूर्ण बरा झालास कि ऑफिस मध्ये आहे त्या पोसिशन वर तू रुजू होशील .. मी बॉस शी बोललोय ..

जय " अरे तुम्ही दोघे आणि राघव पुढल्या महिन्यात माझ्या बहिणीच्या ओटी भरणाच्या कार्यक्रमाला या .. त्या निमित्ताने याल.. मग आपण इकडे माझे गाव फिरू .. "

राहुल " हो चालेल .. तसेही समु ला पण तुम्हा दोघांना भेटायचंय "

जय " मग तुम्ही दोघे कधी लग्न करताय ?"

राहुल " लग्न नाही रे .. जे आता आहे ते बरे आहे .. मला लग्नाची भीती वाटते .. "

जय " इज समीरा  ओके विथ दयाट ?"

राहुल " नाही म्हणजे .. ती आता माझ्या बरोबर नाही राहत .. पण आमचे एकमेक्नावर प्रेम आहे हे नक्की .. ती मला म्हणाली लिव्ह इन मध्ये तिला राहायचे नाहीये .. तिच्या घरच्यांना हे मान्य नाहीये .. आणि मी म्हटले मला लग्न करायचे नाहीये .. मला भीती वाटते .. सो आता आम्ही एकत्र आहोत पण एकत्र नाहीये "

जय " राहुल .. काय वेडे पण आहे तुझा .. लग्नला काय घाबरतोस .. "

राहुल " अरे ती केवढी मोठी जवाबदारी आहे .. एका बापासारखी मी तिची जवाबदारी नाही घेऊ शकत .. तो रोल कठीण आहे "

जय " वेडाच आहे तू .. अरे जेव्हा तिला लागले होते तेव्हा तू न सांगता सगळी जवाबदारी घेतलीच होतीस कि .. तेव्हा कुठे घाबरलास .. याच्या पेक्षा काय वेगळी जवाबदारी असते .. आणि सांभाळायचे म्हटले ना तर समीरा तुला सांभाळेल .. "

राहुल " जाऊ दे रे ... मला विचार केला कीच अंगावर काटा येतो .. "

जय " बरं .. ठीक आहे .. काळजी घे तिची पण आणि स्वतःची पण "

बोल बोलता एक महिना गेला .. नंदू च्या ओटी भरणाचा दिवस दोन दिवसांवर आला ..

अप्पांनी वीरू सांगून अंगणात मंडप बांधून घेतला होता ..

तेवढयात वीरू  आलाच त्याच्या याबरोबर एक मुलगी होती

अप्प्पा " ये वीरू .. ये .. हि कोण .. त्या अनाथ आश्रमात आपण गेलो होतो तिथली संचालिका आहे का रे हि ?"

वीरू " हो अप्पा .. बरोबर ओळखलंत ..

तिने पुढे होऊन आप्पा ना वाकून नमस्कार केला

आप्पा " काय नाव तुझे पोरी .. ?

वीरू "मंजिरी"

अप्पा हसायला लागले ..

अप्पा " मग कधी करायचे लग्न ?'

तसा वीरू आणि मंजिरी एकमेकांकडे बघून हसू लागले ..

तेवढ्यात जय आला बाहेर " कोण करतंय लग्न "

अप्पा " जय आता मांडव घातलाच आहे तर माझ्या दुसऱ्या लेकाचे लग्न लावून देऊ .. "

जय ने मंजिरी शी ओळख करून  दिली

जय " कॉंग्र्ट्स .. नमस्कार वाहिनी .. वेलकम आमच्या फॅमिली मध्ये तुमचे स्वागत आहे "

मंजिरी " थँक यु जय दादा "

अप्पा "जय लग्नाची तयारी करा "

वीरू " अप्पा .. लग्न आम्ही कोर्ट मॅरेज करणार आहोत .. आपण इकडे सत्य नारायणाची पूजा ठेवू .. "

जय " चालेल कि .. काही हरकत नाही .. "

जय च्या आईनी मंजिरीची कुंकू लावून ओटी भरली .. आणि सुनेला मंजुरी दिली ..

वीरू " जय कुणीकडे चाललाय  का ?"

जय " हो अरे वसू  तिकडे माहेरी गेलीय ना .. तिला घेऊन येतो .. पर्वा नंदू चे ओटी भरण  आहे ना .. "

जय तिला आणायला गेला .. वीरू मंजिरीला सोडायला गेला

अजूनही आत्या जावई घरी येणार म्हणून गोडाचे जेवण खास जय साठी करायची .. आज जेवणाची मदत करायला सुरु म्हणजे वसू  ची बाल मैत्रीण सरस्वती आली होती .

सुरु ला बघितल्यावर जय ला राघव ची आठवण आली

जय ने तिथूनच राघव ला कॉल केला

जय " राघव .. कसा आहेस रे .. काय चाललंय सध्या ?"

राघव " काही नाही रे .. काल पर्यंत खूप गडबड होती .. कालच माझे phd चे रिसर्च पेपर्स सबमिट झाले .. त्यामुळे आता रिलॅक्स आहे .. "

जय " अरे वाह .. काँग्रट्स .. बरं ऐक ना .. उद्या राहुल आणि समीरा येत आहेत माझ्या गावी .. तू येतोय ना .. "

राघव " अरे येणार होतो रे .. तुम्हा दोघांना भेटायची इच्छा आहेच .. पण आता तू येतोय ना .. घरचा  कार्यक्र्म झाल्यावर  ?"

जय " अरे ये ना .. तुला सुरु आठवतेय का ? ती वाट बघतेय तुझी ? तू वसू  इतकी सुन्दर नसली तरी वसू सारखीच आहे .. बघ हा म्हणजे माझा फोर्स नाही .. तुला गावातली मुलगी चालणार असेल तर "

राघव " तिचा फोटो पाठव ना .. म्हणजे मला नाही रे .. आई ला दाखवतो आधी .. तिला पसंत पडली म्हणजे झाले .. मला काय .. तिला मी आवडेल कि नाही हीच शन्का .. लोकांना मी बोअर वाटतो .. आणि हे सत्य मलाही माहितेय "

जय " चल मी तुला तिचा फोटो पाठवतो .. आवडली तर ये .. नाही आवडलाय तरी ये .. अप्पांना तुला भेटायचंय .. आणि आपला वीरू लग्न करतोय तर त्याच्या लग्न करूनच आपण जाऊ "

राघव " च्यायला .. सगळ्यांची लग्न होतील .. मी बहुतेक कुवारच मरणार "

जय " म्हणूनच सांगतो .. सुरु इज बेस्ट ऑप्शन .. तिला तू नक्की आवडशील .. छान आहे .. मला वाहिनी म्हणून आवडेल ती .. नाजूक आहे सुशील आहे आणि मुख्य म्हणजे वसू ची बहीण दिसावी अशी दिसते .. बाकी तू तुझा निर्णय घ्यायला मोकळा आहेस "

राघव " ठीक आहे मग आता येतोच .. जमले तर वीरू बरोबर माझा पण बार उडवू "

जय हसायला लागला " लगेच लग्न .. "

राघव " आता वेळ कशाला घालवायचा .. नाही का ? "आणि हसायला लागला

ओटी भरणाची तयारी जोरात सुरु झाली ..

बाहेर काही नंदू चे काम असले कि पंकज सरळ तिला उचलून बाहेर आणायचा

जय " अरे पंकज तिला उचलतोस कशाला .. ? मला खूप भीती वाटते .. पाडशील बीडशील तिला "

पंकज " अरे .. हिला धड चालत कुठे येतंय .. वरती आकाशात बघून चालते .. आता त्यात पोटा मुळे जमीन दिसत नाही .. मग तर बघायलाच नको .. ती पडू नये म्हणून तिला उचलून आणतो .. "

नंदू " आता सोड खाली .. मी जाईन इथून " पंकज ने तिला खाली सोडले आणि ती तिच्या मैत्रिणी बरोबर वॉक ला गेली ..

पंकज ने नंदू च्या कपाळावर किस केले .. " हळू जा .. आणि जास्त लांब नको जाऊ .. तिकडे ग्राउंड वर जा म्हणजे प्लेन आहे सगळे "

जय ने पंकज ला मिठीच मारली " यु आर स्वीट यार .. "

पंकज " साले साहेब .. तुम्ही नंबर कधी लावताय .. मग बघतो तुम्हला .. तुम्ही तर नऊ महिने जमिनीवर पायच ठेवून  देणार नाही याची खात्री आहे मला "

जय चक्क लाजला ..

संध्याकाळी राहुल समीरा  आणि राघव आले .. आणि घरात नुसता गोंधळ .. बाहेर सर्व मित्रांची मैफिल सजली .. वसू  एकेक खाण्याचे पदार्थ करून आणत .. आणि हे सगळे त्यावर ताव मारत होते ..

समीरा वसू  बरॊबर आणि नंदू बरोबर गप्पा मारण्यात रमली ..

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी  ओटी भरण होते ..

जय आणि वीरू ने राघव आणि राहुल  समीराला ला त्यांचा गावं दाखवला .. त्याच्या वडाच्या झाडाचा अड्डा दाखवला .. वसू  च्या नावाचा प्लॉट दाखवला ..

राहुल ला तो प्लॉट आवडला

राहुल " जय या एवढ्या मोक्याच्या ठिकाणच्या प्लॉट ला नुसता पडून का ठेवलाय तुम्ही ?"

जय " ते मला नको विचारू ? तो त्याच्या मालकीण बाईला विचार ? मी त्यात लक्ष घालत नाही "

वसू " जय .. काही पण बोलतोस हा .. माहितेय तुला इंटरेस्ट नाहीये त्यात ते .. पण मी मालकीण वगैरे काय ?"

राहुल " माझ्या कडे एक बिझनेस प्रपोजल आहे .. "

जय " म्हणजे ?"

राहुल " हे बघ काळ परवा मी बॉस जवळ बोलत होतो .. तर ते मला म्हणले त्यांना एक प्लांट सुरु करायचंय पण सिटी मध्ये नाही .. थोडा गावाकडे .. बेसिक पाणी लाईट आणि जायला यायला रस्ता  असला म्हणजे खूप झाले .. तर माझ्या दृष्टीने हा प्लॉट मोठा पण आहे आणि बॉस ला जसा पाहिजे ना तसा आहे .. जर तुम्ही हा रेंट वर दिलात तर महिना ५००००/- तर सहज मिळतील .. नाहीतर असा पडूनच आहे ना "

जय " वसू  तू या बद्दल विचार करायला हरकत नाही "

🎭 Series Post

View all