परकाया भाग ७२

in this part adhyatmik study of Parkaya Pravesh

परकाया भाग ७२

क्रमश : भाग ७१

(डॉक्टरांनी स्वतः तिचे ब्लड काढून घेतले आणि नर्स ला लिहून  दिले कोणता रिपोर्ट काढायचा ते . ) पासून पुढे

तिला उठून परत  चेअर वर बसायला सांगितले

सर " आपण आज त्यांना ऍडमिट करून घेऊ.. आज मला त्यांच्या बरोबर राघव ने जसे सेशन घेतले होते तसे सेशन घ्यावे  लागतील.. "

जय " सर .. तिच्या शरीराला हे सहन  होईल का   ?  रात्री काही झाले तरी तिला घरी नेणार आहे मी .. “

सर " जर त्यांची तब्बेत बरी असेल तर नक्की च न्या .. माझे काहीच  म्हणणे नाही .. "

सर " हे बघा मिस्टर जय सेशन घ्यायच्या आधी मला तुमच्याशी इनफॅक्ट सर्वांशी बोलायचे आहे .. आपण आधी बाहेर बसू "

बाहेर सरांच्या  केबीन  मध्ये सर्व बसले . तेवढ्यात तिथे रितेश आणि त्याची आई पण आली . ते हि केबिन मध्ये आले . राहुल, समीरा , राघव,वीरू , रितेश ,रितेश ची आई आणि जय आणि वसू एकमेकांच्या हातात हात घेऊन बसले होते . वसू  थोडी घाबरलेली होती .. जय तिला समजून घेत होता .. त्याच्या स्पर्शाने तिला सांगत होता .. घाबरू नकोस .. मी तुझ्या बरोबर आहे .

सर " भुताने पछाडणे हा एक नको असलेला शारीरिक प्रवेश असून बाहेरील चांगली किंवा वाईट व्यक्ती जिवंत शरीराचा ज्यावेळी ताबा घेते त्यावेळी तो एक न झेपण्याजोगी  गोष्ट असते . बाहेरील व्यक्ती हि देवदूत , देवता किंवा वाईट भुते आणि राक्षसहि असू शकतात . मी हे तुम्हाला घाबरवायला नाही सांगत आहे .

भूत मनुष्याला का पछाडते ? तर मनुष्य हा शरीर आणि आत्मा यांनी बनलेला असतो . मृत्यू हा शरीराची अंतिमता असते . परंतु आत्मा हा जीवनामध्ये विचारानं बरोबर , स्मृती बरोबर व भावनांबरोबर राहतो .जो माणूस अचानक मरतो तो पाठीमागे राहून गेलेल्या ईच्छा किंवा आपण म्हणू तीव्र ईच्छा  व न मिटलेले वाद ठेवून मरतो . तरीही खूप वेळा त्याची इच्छाशक्ती त्याला परत येण्याची शक्ती देते . अशी नकारात्मक पृथ्वीवर आलेली व्यक्ती किंवा जिचे शरीर तर नष्ट झालेय पण इच्छा किंवा कोणते तरी काम अर्धवट राहिले आहे ती व्यक्ती दुसऱ्या जिवंत व्यक्तीला धरते व आपल्या इच्छा पूर्ण करण्या साठी त्याचा उपयोग करते .

मृत व्यक्तीवर योग्य पद्धतीने अंतिम संस्कार करणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे आणि हे सर्व धर्मामध्ये मान्य  आहे. प्रत्येक आत्म्याची एक आफ्टर डेथ लाईफ पण असते . म्हणजेच मुक्ती आणि मोक्ष

मुक्ती म्हणजे नुसता शरीर सुटले म्हणजे मृत्यू नसतो . जर आपण बघितले तर आत्मा शरीर सोडतो तेव्हा त्याचे श्वास उश्वास हि प्रकिया बंद असते पण काही तास त्याचे सर्व बॉडी पार्टस चालू असतात .. काही तासांमध्ये ते बॉडी पार्टस काढून आपण ते डोनेट करू शकतो . याचा अर्थ तो मृत्यू झाला तरीही त्याच्या बाकीच्या बॉडी पार्टस मध्ये जीव असतो .. म्हणून असे म्हंटले जाते मृत्य नंतर अचेतन शरीर किंवा आत्म्याची वासना त्याच्या शरीरा भोवती असते . जेव्हा त्याच्या शरीराचे पूर्णतः दहन किंवा दफन होते तेव्हा त्याला मुक्ती मिळते . जो पर्यंत हे होत नाही तोपर्यंत आत्म्याला लालसा असते कि मी पुन्हा त्या शरीरात जाऊ का ? माझे हे राहिलेले काम पूर्ण करू का ?

एखाद आत्मा शरीर सोडायलाच तयार नसतो जसे कि जसे कोणाचा प्रॉपर्टीत , कोणाचा आपल्या मुलांमध्ये किंवा जर कोणावर अन्याय झालाय तर आणि त्यातून आत्म्याला क्लेश लागलाय .. अशी अनेक करणे असू शकतात कि त्या आत्म्याला मुक्ती मिळण्या पासून थांबवत असते .

परमात्मा किंवा सुप्रीम पॉवर त्याला सुप्रीम सोल म्हटले जाते .. त्याला  शरीर नसते ..

यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत I
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम सृज्याहम II

जब भी धार्मिकता में कमी और पाप में वृद्धि होती है !

हे भारत, उस समय मैं स्वयं पृथ्वी पर प्रकट होता हूँ |

इथे परमेश्वर  सुद्धा प्रकट होतो .. तो जन्म नाही घेत .. तो एका शरीराचा आधार घेऊन त्यात परकाया प्रवेश करून ज्ञान सांगतो . शरीर हे नश्वर असल्यामुळे परमात्म्याला शरीराची गरज नसते .. आणि आत्मा हा अमर असतो .. एका नंतर एक अशा अनेक जन्मातून तो कर्म करत असतो पण साधारण आत्म्याला जन्म घेण्यासाठी आई च्या उदरात प्रवेश करावा लागतो ..

परमेश्वराला याची गरज नाही .. तो त्याला योग्य वाटेल त्या शरीरात प्रवेश करून त्याला पाहिजे तिथे जाऊन आपले कार्य करतो .. त्याचे कार्य सिद्धीस नेतो

हा आत्मा त्याच्या कर्माच्या अनुसार त्याला पुढला जन्म मिळतो आणि त्याचे कर्मभोग भोगत असतो . एक वेळ अशी येते कि आता इथून पुढे पुढचा जन्मच नाही .. कर्माची सगळी पाटी कोरी करण्याची वेळ येते .. हि वेळ जेव्हा येते त्यावेळी त्या आत्म्याला  मोक्ष मिळतो ..

साधू संत तपस्या करणारे हटयोगी यांना हा मोक्ष हवा असतो .. जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्यांना मुक्ती हवी असते ..

भूत ज्यावेळी पछाडते तेव्हा माणसाच्या भावना , मन , शरीर ह्यावर परिणाम करतात त्याचे परिणाम पण वेगळेच असतात त्यामुळे कधी कधी त्या व्यक्तीला लोक वेड लागलेय असे समजतात

त्याच्या वागण्याचे परिणाम म्हणजे त्याला डोके दुखणे, भुतांचे आवाज येणे , स्वप्न पडणे, कधीच न बघितलेल्या माणसाशी बोलणे , अति विचार  करणे  , उगाचच निगेटिव्ह विचार करणे  , त्याच्या शक्तीच ह्रास होतो ,, अशक्तपणा , पोटात दुखणे , पाय दुखणे .. अशा शारीरिक व्याधी लागतात .. डोळे निस्तेज होतात .. काही वेळा खूप आक्रमक होतात . हिंसक होतात , भाषा वेगळीच वापरात , अंगावर चट्टे येतात .. "

जसे जसे सर सांगत होते तसे तसे सर्वांना हीच लक्षणे वसू  मध्ये आहेत हे जाणवत होते ..

रिचा ची आई " सर .. कैसे भी करो मेरी बेटी कि आत्मा से इन दोनो को मुक्त करावा दीजिए " आणि त्या रडू लागल्या

रितेश "मम्मा .. आप प्लिज मत रो .. हम सब ऊन दोनो के साथ है .. और मेरी दीदी किसी का इतना भी बुरा नहीं करेगी ..हम दोनो उसके आत्मा से कहेंगे कि दीदी चली जाओ  .. " आणि तो पण रडू लागला

सर " ते तर मला तुमची मदत लागणारच आहे . त्यासाठी  वसू  बरोबर सेशन घेऊन नक्की रिचा सोबत काय झाले यांचा शोध लावावा लागेल .. नंतर तिची बॉडी कुणीकडे असेल तिचा शोध घेऊन तिचा प्रॉपर अंतिम संस्कार करावा लागेल ..

आत्म्याला लागलेला क्लेश सोडवल्या शिवाय तिला मुक्ती मिळणार नाही .. त्यात प्रॉब्लेम असा आहे .. वसू  चे शरीर मुळातच खूप नाजूक आहे .. माझ्या माहिती नुसार ती स्वतः आधीच थोडी डिप्रेस असावी त्यामुळे रिस्क थोडी जास्त आहे . तिच्या मनाने  आणि शरीराने थोडी साथ दिली पाहिजे .. तिच्याशी सेशन घेताना रिचा तिच्यावर हावी होणार त्या वेळेत तिच्या शरीराला हजारो कंपन सुटतात . ब्लड फ्लो १०० पटीने वाढतो .. इतका कि इंटर्नल व्हेन्स फुटू शकतात. हे झाले तर वसू कोमात जाऊ शकते ..  पण हे केल्या शिवाय आपल्या समोर दुसरा पर्याय च नाहीये "

वसू " सर .. मी तयार  आहे .. नताशा माझी मैत्रीण होती .. तिला  न्याय मिळवून देणे हे माझे आद्य कर्तव्य मी समजते ... "

जय " सर त्याही पेक्षा मला माझी वसू  पाहिजे .. त्या साठी  मी काहीही करायला तयार आहे .. "

राहुल " सर काही मेडिकल इमर्जन्सी आली तर आपण हिला बाहेरच्या देशात नेऊ .. त्याची सर्व तयारी मी करून ठेवतो "

वीरू " हा सर .. पैशांकडे मागे पुढे बघू नका .. वसू  वाचणे महत्वाचे आहे "

राघव " सर .. माझा तुमच्या वर आणि देवा वर विश्वास आहे तुम्ही नक्की यातून तिला बाहेर काढाल "

समीरा " एका मुली च्या आयुष्याशी जर कोणी खेळले असेल तर त्याला कायद्याने शिक्षा मिळालीच पाहिजे .. सर फक्त आमच्या वसू ला काही होऊन देऊ नका "

जय " कदाचित आपले बोलणे रिचा इथे आपल्यात बसून ऐकत पण असेल .. रिचा तू जर ऐकत असलीस तर हे लक्षात ठेव आम्ही सगळे तुझ्या बाजूने आहोत .. फक्त माझ्या वसू ला काही होऊ देऊ नकोस .. "

एक हवेचा लोंढा झपकन जय च्या काना  जवळून पास झाला .. बाकी कोणाला नाही पण ती आता वसू  बरोबर जय शी पण संवाद साधत होती . तिचे अस्तित्व दाखवून देत होती .

सर " ठीक आहे .. मग आपण आता तयारी ला लागू .. रूम  मध्ये cctv लावलेले आहेत आणि स्पिकर्स पण लावलेले  आहेत . त्या रूम  मध्ये टाचणी जरी पडली तरी ती रेकॉर्ड होईल  आणि बाहेर बसलेल्यांना ऐकायला येईल . .. मी पोलीस स्टेशन ला फोन करून सांगतो . तिची केसची कॉपी मी पोलिसांना देईन . लगेच च जर आरोपी मिळाला तर ठीक आहे तोपर्यंत रिचा चा आत्मा मुक्त होणार नाही .. "

जय ने लगेच इन्स्पेकटर निलेश ला कॉल केला

निलेश ला त्याने सगळे सांगितले

जय " निलेश . एक मदत लागणार आहे .. अरमान रिचा चा बॉयफ्रेंड होता .. तो शनिवार पर्यंत याच शहरात असला तर बरे पडेल . काहीतरी धागे दोरे त्याच्याशी निगडीत असणारच आहेत "

निलेश " ठीक आहे .. मी बघतो काय करायचे ते .. "

जय "थँक्स निलेश "

निलेश " अरे .. थँक्स काय ? नताशा ची अजून एक गोष्ट कळलीय ?"

जय " काय ?"

निलेश " ती प्रेग्नन्ट होती ?"

जय " व्हॉट ? कशा वरून ?"

निलेश " आज आम्ही तिचा फ्लॅट ओपन केला .. त्यात तिच्या डस्टबिन मध्ये प्रेगन्सी किट सापडले .. "

जय " अरे यार .. आय जस्ट वॉन्ट टू  किल दयाट बा ..*** "

निलेश " जय .. हे वाटतंय तितके सोपे प्रकरण वाटत नाही . खूप मोठी मोठी लोकं यात अडकण्याची शक्यता आहे . राजीव च्या मोबाईल  मधून जेवढ्या मॉडेल्स चे डिटेल्स निघाले त्यात ५ जणी मिसिंग आहे .. अजून किती मिसिंग निघतील काही सांगू शकत नाही .. त्या नताशा उर्फ रिचा च्या आईने पण चंदीगड ला रिचा ची मिसिंग कंप्लेंट केलीय .. त्यांना आज नताशा आणि रिचा एकच आहे हे व्हेरिफाय करायला बोलावले होते .. "

जय " एक काम कर ना .. त्या अरमान वर लक्ष ठेव .. तो कुठे पळाला नाही पाहिजे . "

निलेश " त्याला तर बाहेरच्या देशात जाण्या पासून आपण नाही रोखू शकत . पण मी तो कुणीकडे जातोय या कडे तरी लक्ष ठेवतो "

जय " अरे ऐक ना निलेश जमले ना तर त्याला कुठल्या तरी चौकशी साठी अडकवून ठेवता आले  तर बरं होईल "

निलेश " हो पण तो जे काही करतोय ते स्वतः  करत नाही .. तो ना राजीव सारखी माणसे त्याच्य्या साठी करतात .. "

जय " मला फक्त तो रविवार पर्यंत हवाय .. शनिवारी अमावास्या आहे .. त्या दिवशी काहीतरी मेजर होण्याची शक्यता आहे "

निलेश " ठीक आहे .. मी बघतो सरांशी बोलून काही करता येते का ?"

जय " थँक यु "

समीराने वसू  ला हाताला धरून बेड वर झोपवले .. तिचे केस व्यवस्थित बांधले ..

समीरा " वसू .. मला तुला एक सांगायचंय .. तुझा जय  फक्त तुझाच आहे .. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना .. माझ्या साठी तो फक्त एक मित्र आहे .. आय डोन्ट नो हि वेळ  हे बोलायची आहे कि नाही ..  तुझ्या जय साठी यातून सुखरूप बाहेर यायचं आहे हे लक्षात ठेव "

(अध्यात्म्याच्या गोष्टी मी काही बुक्स .. काही गुगल वरुन  माहिती मिळवून काढल्या आहेत .. साधारण सर्व बरोबरच आहेत असा माझा अंदाज आहे .. कोणाच्याही धार्मिक किंवा अध्यात्मिक गोष्टीला दुखावण्याचा किंवा चुकीच्या गोष्टीला दुजोरा देण्याचा माझा काहीच हेतू नाहीये . तरी एखाद गोष्ट जर कोणाला पटली नसल्यास ती जास्त विचार  न करता लगेच सोडून द्यावी ..

कंमेंट्स करून सांगा हा भाग कसा वाटला .. खूप वेगळा अभ्यास करून लिहला आहे

🎭 Series Post

View all