Login

परकाया भाग ६९

samira enters in rahuls room

परकाया भाग ६९

क्रमश : भाग ६८

समीरा " ठीक आहे .. मी असे दुसऱ्या साठी आणलेले ड्रेस नाही घालू शकत .. सॉरी .. टेक धिस कार्ड .. मी लिस्ट देते तुझ्या सर्व्हन्ट ला आणायला सांग "

राहुल च्या आयुष्यात कोण तरी आहे हे समजल्यावर तिचे डोळे डबडबले

राहुल " नो मी माझे कार्ड वापरतो .. प्लिज टेक इट इझी समु "

समीरा " प्लिज मला सोड ना घरी .. मला नाही राहायचंय इथे .. "

राहुल " अरे यार तुला सांगितले ना .. याविषयावर चर्चा नकोय मला "

राहुल ने कोणाला तरी मसेज पाठवला आणि समीराने लिस्ट दिलेले सामान ऑर्डर दिली . आणि कूक ला सांगून जेव णा  ची ही पण तयारी केली

अर्ध्या तासात तिचे सामान आले . मग समीरा फ्रेश झाली .. बेड वर झोपून गेली .. दुसऱ्या बेडरूम मध्ये राहुल त्याचे आवरत होता .. तो पण फ्रेश झाल्यावर समीराच्या बेडरूम मध्ये आला आणि तिला कंपनी म्हणून तिथेच  थांबला

दुपारी राहुल ला जय चा फोन आला त्याने सांगितले कि आम्ही आज संध्याकाळी बीच वर जाणार आहोत .. तु आणि समीरा  रात्री डिनर ला जॉइन कराल का आम्हला ?

राहुल “बघतो समीरा झोपलीय आता .. ती उठली कि तिला विचारतो आणि सांगतो "

जय " समीरा तुझ्या इथे आहे का ?"

राहुल " हो .. अजून रिकव्हर होतेय आणि मी पण एकटाच आहे तर दोघांना एकमेकांची सोबत होईल म्हणून तिला मी इकडेच घेऊन आलोय .. ती नव्हतीच येत पण मला तिला एकटीला सोडवत नव्हते "

जय " गुड डिसिजन .. ठीक आहे .. मग येणार असशील तर कळव .. काळजी घे रे तुझी पण आणि तिची पण .. ठेवतो आता "

राहुल " हो तू पण घे तुझी आणि वसू  ची "

संध्याकाळी वसू  सिम्पल सोबर पंजाबी ड्रेस घालून बाहेर तयार झाली . सिम्पल वेणी घातली आणि निघाली

जय " शाल नहितर स्वेटर घे .. कदाचित गार वारा सहन नाही होणार तुला "

वसू  " घेते .. "

दोघे कार ने संध्याकाळच्या रम्य वातावरणात बीच वर बसले .. अद्भुत नजरा डोळ्यांनी बघत होते .. अनुभवत होते .. दोघांनी हात हातात घेतले होते पण दोघेही शान्त होते .. पाखरे उडत होती .. मस्त गार वारा.. आणि कमालीची शांतता ..

अचानक वसू  ला काय झाले काय माहित चेहऱ्यावर  हात ठेवून ढसा ढसा रडू लागली .

जय ने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला त्याच्या कुशीत घेतले

जय " होणार आहे ता सगळे ठीक .. .. संपणार आहे हे सगळे फार लवकरच .. जसा हा  दिवस मावळून उद्या  नवीन दिवस उगवेल ना तशी नवी पहाट लवकर च उगवणार आहे "

वसू " सॉरी जय .. तुला खूप त्रास देतेय मी .. मला तुझ्या साठी खूप वाईट वाटतंय .. निदान समीरा सोबत होतास तर थोडा तरी खुश होतास .. हे नको तेच मागे लागले "

जय " वसू  तू लहान पणी डोक्यावर पडली होतीस का ?"

वसू " हो .. अरे ते सायकल शिकत होते ना तेव्हा पंकज ने मला न सांगता सायकल सोडून दिली आणि मी पडले होते .. .. हे बघ इथे कपाळाच्या इथे बारीक खूण आहे ती त्याचीच आहे "

जय मुद्दामून .. " बघू ... " आणि त्या तिच्या खुणेला हात लावून बघत " तेव्हाचे अजून दुखतं का ?"

वसू " वेडा आहेस का ? लहान पणी लागलेलं आता कसे दुखेल ? "

जय " पण मग तू अशी वेड्या सारखी का वागतेस .. त्या जखमेचा इफेक्ट अजून राहिलाय का ?"

तेव्हा वसू  मॅडम ची ट्यूब पेटली .. आणि हसत हसत  ती त्याला दंडावर मारू लागली .. जय उठून पळू लागला .. त्याच्या मागे वसू  त्याला मारायला धावत होती .. पळता पळता  तिची शाल केव्हा पडून गेली तिला पण कळली नाही ..

थोडा वेळ का होईना वसू चा मूड  ठीक झाला  होता आणि तीचा मूड ठीक झाला म्हणून जय चा पण ठीक झाला होता . मग दोघांनी बलून्स घेतले .. उंच आकाशात सोडले .. दोघात एक नारळ पाणी प्यायले ..

पुन्हा एका बाकड्यावर  बसले .. आता  समुद्राकडे बघून छान वाटत होते .. भकास नव्हते वाटत

जय " वसू एक विचारू का तुला ? तू खरं उत्तर दे काय ?"

वसू " मी खरंच  बोलते "

जय " तू समीराकडे कोणत्या दृष्टीने बघतेस .. म्हणजे तुझी एक मैत्रीण का माझी एक मैत्रीण का तुझ्या नवऱ्याची एक्स गिर्ल्फ्रेन्ड म्हणून '

वसू "का ? रे मधेच हा विषय का काढलास ?"

जय " प्रश्नाला उप प्रश्न नको विचारू ? उत्तर दे "

वसू  “कठीण आहे .. मी अजून असा विचारच नाही केला कधी ?"

जय " म्हणजे मी मरे पर्यंत मला तिच्यावरून टॉन्ट ऐकायला मिळणार वाटतं .. बघ हा म्हणजे .. आपल्या मुलांचे लग्न असेल.. माझे केस पांढरे झाले असतील आणि तू  पण थोडी जाडी झाली असशील .. आणि आपली भांडण झाले कि म्हणशील " काय हो तुम्हला एवढे साधे काम पण नीट करता येत नाही .. मी काय समीरा आहे का ? तुमचे काही पण सहन करायला ?" आणि हसायला लागला

वसू " काहीही काय ? तेव्हा कशाला मी तिच्या वरून तुला नाव ठेवेन .. ?"

जय " मग आता का ठेवतेस ?" मी विसरलो कि ती माझी गर्ल फ्रेंड होती पण तू विसरूनच देत नाहीस .. सारखे आपले .. तू तिच्या सोबत खुश होतास .. असे बोलतेस "

वसू " मला तसे नव्हते म्हणायचे ?"

जय " वसू हे बघ .. हे जे विचार करतेस ना त्यालाच निगेटिव्ह विचार म्हणतात .. मी तर समीराला माझ्या मनात मैत्रीण म्हणूनच ठेवलीय पण तुझ्या मनात जर दुसरे काही असेल तर ते मी काढूच शकणार नाही .. जे आहे ते सगळे तुझ्या समोर आहे .. आणि आता ते कसे एक्सेप्ट करायचे हे तूझ्यावर आहे .. "

वसू " सॉरी जय .. मी दुखावले ना तुला .. "

जय " नाही …  मला पण वाईट नक्की वाटते यार .. मी पण माणूस आहे यार "

वसू  ने त्याच्या गालावर किस केले " सॉरी .. परत असे नक्की नाही होणार .. "

जय " ओये .. हे काय होते .. गॉट माय  फर्स्ट किस फ्रॉम यु.. आज काही खरं  नाही बुवा .. चल ऐश कर ले .. एस बात पे माफ किया तुझे "

वसू ने चे कान  पकडले .. आणि त्याच्या खान्द्यावर डोके ठेवून शान्त बसली

कधी कधी माणूस स्पष्ट बोलायच्या नादात दुसऱ्याच्या भावनांचा विचार न करता आपले मत मांडतो .. काही वेळेला हा असला स्प्ष्टपणा टाळलेला चांगला कारण समोर च्या व्यक्ती च्या  भावना दुखावल्या जाण्या इतके मोठे पाप नाही

रात्री ठरल्या प्रमाणे सगळे हॉटेल ला सगळे एकत्र भेटले .. छान गप्पा झाल्या .. जरा फ्रेश झाले .. नव्याने आव्हानांना सामोरे जायला तयार झाले .

बऱ्याच दिवसांनी इतकी छान मित्र मैत्रिणींची मैफिल जमली होती . समीरा आणि वसू पण भेटल्या .. एकमेकींची चौकशी केली . जय या वेळेला वसू  कडे खूप लक्ष देत होता .. वसू च्या  आत असलेल्या रिचाला राग येणार नाही हे बघत होता . तिच्या हसणाऱ्या डोळ्यांत हरवून जात होता . मनात विचार करत होता .. काश कि मी हि वेळ .. हा आनंदच क्षण असाच फ्रीझ करू शकलो असतो .. वीरू .. राघव .. जय .. समीरा आणि वसू .. सगळे बेस्टीज एकत्र होते

एक व्यक्ती खूप अस्वस्थ होता आज सकाळ पासून ती म्हणजे समीरा . तिला आज खूप जोर जोरात रडावे असे वाटतं होतें .. राहुल च्या  आयुश्यात कोणी तरी मुलगी आहे .. हि गोष्टच तिला रुचत नव्हती . सहन होत होती .. उगाचच डोळ्यातून अश्रू आपोआप पडत होते . राहुल तिला डोळ्यांनीच विचारायचा .. काही होतंय का ? तर ती डोळ्यांनीच सांगायची काही नाही ..

पार्टी संपल्यावर सगळे घरी निघाले जय वीरू आणि वसू त्यांच्या घरी आले .. राघव त्याच्या घरी गेला .. राहुल आणि समीरा त्याच्या फ्लॅट वर जाऊ लागले

समीरा " राहुल .. मला प्लिज माझ्या फ्लॅट वर सोड .. बस झाले आता मी सकाळ पासून थाम्बले ना तुझ्या फ्लॅटवर .. आय कॅन टेक केअर ऑफ माईन .."

राहुल " नाही .. तुला अजून आरामाची गरज आहे .. एकदा टाके काढले कि सोडतो ना .. का तू नको तो विचार करत बसलीस ?"

समीरा " माझ्या मुळे तुझी पर्सनल लाईफ मध्ये इशू होतील .. " तीचा आवाज भरून आलेला

राहुल " काय मूर्ख आहेस का ? असे काहीही होणार नाहीये "

समीरा " होते तसेच होते .. हे बघ राहुल .. मी आताच जय च्या प्रकरणातून बाहेर आलेय .. मला आता पुन्हा स्वतःच्या भावनांची खेळायचे नाहीये आणि कोणाला खेळू पण द्यायचे नाहीये .. तू मला प्लिज घरी सोड "

राहुल " तुला माहितेय ना  समु .. मी तुला सोडणार नाही ते .. मग का असा विचार करतेस तू "

समीरा " शीट यार राहुल .. व्हाय डोन्ट यु अंडरस्टँड .. माझा जीव घुस्मटतोय त्या रूम  मध्ये असे वाटते .. इथे कोणीतरी आधी राहिलंय .. त्या बेड वर झोपलंय .. त्या  वॉर्डरोब  मध्ये तिचे क्लोथ्स ती ठेवून गेलीय .. तिचे अदृश्य अस्तित्व आहे त्या रूम  मध्ये .. या असल्या विचारांनी मला बेचैनी येतेय .. राहुल प्लिज मला माझ्या फ्लॅट वर सोड .. "

राहुल "  मग तू माझ्या रूम मध्ये शिफ्ट हो .. आय मिन .. तुला पाहिजे तर .. आय मिन तुला काही प्रॉब्लेम नसला तर .. "

समीरा " तेच तर नको ना .. त्या पेक्षा .. मी माझ्या फ्लॅट वर जाते "

राहुल  आता चिडला होता .. अचानक गाडी खूप फास्ट चालवू लागला ..

समीरा " अरे .. राहुल किती फास्ट गाडी चालवतोय .. अजून तुझे पण टाके नाही निघालेत .. जरा हळू ना "

राहुल काही ऐकत नव्हता

समीरा " अरे चिडतोस काय ? राहुल .. मूर्खां तुझ्या रूम  मध्ये झोपले तर तुझ्या तिला काय सांगशील .. इडियट .. समजत नसल्या सारखा वागतोस .. "

राहुल तिला त्याच्या फ्लॅट वर घेऊन आला .. रागारागाने त्याने  लॉक उघडले .. आणि त्याच्या रूम मध्ये गेला ..

समीरा ला काहीच कळे  ना हा काय असा वेड्या सारखा वागतोय .. शेवटी  किचन मध्ये गेली आणि तिने दोघांना कॉफी केली  .. कॉफीमग डायनिंग  टेबल वर ठेवले आणि राहुल च्या डोअर ला नॉक करू लागली .. ब राच वेळा दार वाजवल्या नंतर सुद्धा तो  बाहेर येत नव्हता .. म्हणून तिने दार पुढे ढकलले तर रूम  चे दार ओपन च होते .. ती घाबरत घाबरत रूम च्या आत गेली तर राहुल बेड वर पालथा झोपला होता ..

समीरा त्या रूम  मध्ये गेल्यावर हादरूनच गेली .. त्या रूम मध्ये राहुल आणि समीराचे मोठे मोठे फोटोज वॉल वर होते .. त्यांचे लहान पणा पासूनचे फोटो .. समीराच्या वेग वेगळ्या नजाकत त्या फोटो मध्ये कॅप्चर केल्या होत्या .. त्या रूम च्या चारी बाजूला समीरा तिला स्वतःला पहात होती .. काय बोलावे ते सुचतच नव्हते तिला .

राहुल ला ती आवडते हे आज सुद्धा तो तिला सांगू शकला नव्हता .. समीराला कसे रिऍक्ट करावे ते कळतच नव्हते .. ती त्याला उठवणार होती तर त्याच्या बेड च्या शेजारी अजून एक फोटो फ्रेम दिसली . हा फोटो त्यांच्या ऑफिस मधला होता . त्या फोटोत बॉस .. बॉस ची बायको .. राहुल आणि समीरा चौघेच एकत्र होते ..

बॉस ची बायको राहुल कडे मायेने बघत होती ..  राहुल समीरा कडे बघून हसत होता .

🎭 Series Post

View all