परकाया भाग ६७
क्रमश: भाग ६६
जय स्वप्नांतून जागा झाला आणि झोपलेल्या वसुला घट्ट मिठीत घेऊन " कम ऑन वसू .. आपल्याला हरून चालणार नाही .. मी आता खूप छान स्वप्न पाहिलंय .. व्युई have टू फाईट .. मी बघितलेलं स्वप्नं आपल्याला पूर्ण करायचंय .. आता नक्कीच थाम्बुन चालणार नाही .. "
तेवढयात दा रा ची बेल वाजली .. बाहेर राघव आला होता .. तो टेन्शन मध्ये होता
राघव " जय न्यूज पाहिलीस का ?"
जय ने न्यूज लावल्या
राजीव खाली पडला आणि मेला .. तो नशेत असल्यामुळे पडला असे सांगत आहेत . पण राजीव च्या मोबाइल मध्ये बऱ्याच मॉडेल्स चे फोटोज मिळालेत .. पोलिसांनी त्याच्या मोबाइल मधला सर्व डेटा काढून घेतला त्यात त्यांना नताशा नावाच्या मॉडेल चे पण फोटो मिळालेत .. आता पोलीस प्रत्येक मॉडेल ला कॉल करून राजीव ची माहिती काढणार आहेत ..
आणि दुसरी महत्वाची बातमी अशी आहे कि अरमान इकडे आलाय .. त्याला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळालाय .. राजीव त्याचा खास मित्र होता म्हणून त्याच्या वर अंतिम संस्कार तो करणार आहे ..
जय ने त्या बातम्या बघून घेतल्या आणि राघव ला म्हणाला
जय " राघव .. मी एक निर्णय घेतलाय .. वसू ला जी काय ट्रीटमेंट दयायची ती घरीच दयायची .. हॉस्पिटल मध्ये नाही ऍडमिट करायची .
राघव " अरे पण का ? घरात काय काय फॅसिलिटी देणार आहेस तू ? तुला नर्स चे काम करत बसावे लागेल "
जय " चालेल मला .. मी करेन सर्व काही .. वसू खूप घाबरतेय हॉस्पिटल ला जायला आणि ती म्हणतेय ते खरच आहे .. एकदा का हॉस्पिटल च्या अधिकारात गेली कि ते मला सुद्धा भेटायला अपॉंईंटमेन्ट घ्यायला लावतील "
राघव " अरे ते नियम तर असणारच ना हॉस्पिटल चे आणि एक माणूस ऑलव करतात ते .. "
जय " बर ठीक आहे .. सध्या तरी नकोच ते .. तिला राहू दे माझ्या जवळ ती जास्त सेफ आहे आणि सेफ फील पण करते "
राघव " ठीक आहे .. खरं सांगू .. तू ना खरेच ग्रेट आहेस .. एवढं सगळं होतंय तुझ्या आयुष्यात पण जराही मागे हटत नाहीस.. एखादा असता ना तर पैसे फेकून हॉस्पिटल ला ऍडमिट करून मोकळा झाला असता .. "
वीरू " अरे आहेच तो तसा जीवाला जीव देणारा .. खरं तर दोघेही तसेच आहेत .. "
राघव " बरं ऐक .. मी काल सरांना फोन करून सांगितलेय .. ते लवकरच येतील .. आता मंजिल बहोत करीब हैं "
राघव " हा कोण ? हा पण तुझ्या गाव वरून आलाय का ?"
जय ने रितेश ची ओळख राघव ला करून दिली .
राघव " जय सगळे चांगले संकेत मिळत आहेत .. तुझं म्हणतोस तसा देव आपल्या बरोबर आहे "
जय " राघव ते आपण वसूचे सेशन मोबाईल वर रेकॉर्ड केले होते ना ते रितेश ला ऐकव ना ..
तेवढयात पुन्हा दाराची बेल वाजली
जय ने दार उघडले तर बाहेर इन्स्पेकटर बोरकर आलेले
जय " अरे मिस्टर बोरकर .. या ना .. याना .. "
बोरकर मुद्दामून युनिफॉर्म मध्ये नव्हता आला तरी पण घरात असलेल्या बाकीच्या मंडळींना कळावे कि हा पोलीस आहे म्हणून जय ने त्याला इन्स्पेकटर या नावाने संबोधित केले
बोरकर " आज बरेच पाहुणे आलेत घरात "
जय " हो ते माझे गाव वरून मित्र आलेत "
बोरकर न बोलताच सोफ्यावर येऊन बसला
बोरकर " मॅडम नाहीयेत का ? "
जय ला एकदम कसे रिऍक्ट करावे कळले नाही ..
जय ने त्याला पाणी आणून दिले .. आणि विषय बदलला
जय " मिस्टर बोरकर हा माझा मित्र राघव .. तो पण त्याच कॉलेज प्रोफेसर ला आहे .. "
बोरकर " अरे वाह .. नमस्कार सर "
राघव " नमस्कार सर "
बोरकर " मिस्टर जय .. काल संध्याकाळी तुम्ही दोघे म्हणजे तुमची वाईफ आणि तुम्ही कुणीकडे होतात ?"
जय " एनी प्रॉब्लेम सर "
बोरकर " मिस्टर जय .. मला प्रश्नाला उप प्रश्न वि चा रलले आवडत नाही .. उगाच संशय यायला लागतो "
जय " ते मी माझी मैत्रीण चा आणि मित्राचा ऍक्सीडेन्ट झालाय ना त्यांना भेटायला आम्ही हॉस्पिटल ला गेले होतो .. नंतर मग घरीच '
बोरकर " मिस समीरा आणि राघव चा ना "
जय एकदम दचकलाच .. ह्याला कसे कळले एवढे सगळे "
जय " हो .. ते दोघे माझ्या ऑफिस मध्ये आहेत "
बोरकर " कोणती गाडी होती त्यांची .. गाडीच्या इन्शुरन्स क्लेम करायला त्यांनी पोलीस स्टेशन ला अजून नोंद केली नाहीये ना म्हणून विचारले "
जय " काय माहित .. म्हणजे त्याच्या बऱ्याच गाड्या आहेत .. मी विचारले नाही त्याला .. "
बोरकर घ रा चे निरीक्षण करू लागला
बोरकर " अरे .. हि गॅलरी ची काच कशी काय तुटली .. काय घरात क्रिकेट खेळता कि कुस्ती काय नवरा बायको " आणि हसायला लागला
जय ला राग आला होता .. पण पोलिसांवर रागवणार कसा ? त्याला आठवले वसू म्हणालीच होती .. पोलिसांशी मैत्री पण नको आणि दुष्मनी पण नको ते का त्याला आता कळलेच
बोरकर " मिस्टर जय .. सिक्युरिटी ऑफिस मधल्या cctv फुटेज मध्ये तुम्ही घोळ केलाय ना .. तो कसा केला ते सांगा ? आणि का केलात ते सांगा ? म्हणजे मी जातो "
जय सोफ्यावर बसला .. कपाळावर अंगठा आणि पहिल्या बोटाने एकदा दोनदा हात फिरवला
जय “बोरकर जे काय आहे ते स्पष्ठ बोला .. मग मी सांगतो नीट .. "
बोरकर ने त्याच्याकडे पहिले आणि त्याला डोळ्यानेच विचारले या सगळ्यां समोर बोलायला तो तयार आहे का ?"
जय " हो .. हे माझ्या घरातलेच मेम्बर आहेत "
बोरकर " त्या दिवशी तुम्ही cctv फुटेज मध्ये काहीतरी चेंजेस केलेत हे मला तेव्हाच कळले होते .. पण त्यावेळी तो वॉचमन पण काही धुतल्या तांदळाचा नव्हता .. तुमच्या कडे यायच्या आधीच आम्ही त्या वॉचमन ची सर्व तपास केला होता .. तो आहेच लोचट हे मला माहित होते म्हणून आणि तुमच्याशी बोलल्यावर मला असे वाटले कि तुम्ही काहीतरी लपवताय पण माणूस म्हणून जेन्यून आहात .. त्यात मी घरी प्रिया ला विचारले तर ती म्हणाली वसुंधरा मॅडम खूप छान आहेत ... खूप छान शिकवतात .. हुशार आहेत .. पण काय माहित सध्या त्यांनी अचानक नोकरी सोडली .. आणि कंप्लेंट वसुंधरा मॅडम च्या विरोधात होती म्हणून संशयाची सुई माझ्या डोक्यात येऊ लागली .. अचानक जॉब का सोडला असावा .. मग काय मी ठरलो पोलीस माणूस .. एक शिपाई लावला कामाला .. तुमच्या कडे कोण कोण येतंय .. कोण जातंय .. हे सगळे आम्ही लांबून पाहत होतो "
तेव्हा मला कळले कि हे मिस्टर राघव जे मानसशात्राचे प्राध्यापक आहेत ते सारखे तुमच्या घरी येतात .. आता मानस शात्राचे प्राध्यापक मित्र असूच शकतात पण मिस्टर जय तुम्ही खाली जाता येता बघितले तुम्ही काहीतरी सिरिअस चर्चा करतानाच दिसले .. परवाच्या दिवशी रात्री तुम्ही तिघे अचानक धावत का आले ?
ते मात्र कळले नाही मला "
त्या नंतर राहुल आणि समीरा घरातूनच जखमी होऊन गाडीतून गेले .. हो ना मिस्टर जय "
जय " हो .. यातले सगळे १०० टक्के खरे आहे . आता जर तुम्ही तुमचे इन्स्पेकटर चे डोके बाजूला ठेवून ऐकणार असाल तर सगळे सांगतो .. त्या दिवशी तुम्हाला घरी आणले या मागचे कारण हेच होते कि आज उद्या एक दिवस मला पोलिसांची मदत लागणारच होती .. मदत यासाठी म्हणतोय प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक गोष्ट कायद्यात बसत नाही . "
बोरकर " मला पण तुमच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे म्हणून तर मी माझ्या सुट्टीच्या दिवशी पण तुम्हाला भेटायला आलोय .. जास्त उशीर केलात तर मोठ्या प्रॉब्लेम मध्ये फसाल "
जय " काही दिवसांपूर्वी मी बंगलोर ला गेलो होतो .. आणि माझी बायको इकडे एकटीच होती .. जय ने पहिल्या पासून सर्व हकीकत बोरकर ला सांगितली . "
बोरकर " बापरे !..या अशा घटना अजूनही घडतात ते सुद्धा शहरात हे मानणे जरा कठीणच आहे .. नाही का ?"
राघव “ हे ब घा इन्स्पेकटर .. हे सर्व सत्य आहे .. मी त्यांच्या बरोबर एक सेशन केले होते त्याचे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे .. ते तुम्ही पाहून घ्या पाहिजे तर "
रितेश " आणि हो मी ह्यांच्या बायकोला आता पर्यंत कधीच पाहिलेलं नाही तरी पण काल त्यांनी मला माझ्या नावाने हाक मारली .. चंदीगड ला सुद्धा माझ्या घरी पत्ता माहित नसताना गेल्या होत्या "
जय " आणि तुम्ही तर तिला बघितले आहे .. मला सांगा वॉचमन सारख्या हट्टाकट्टा माणसाला माझी बायको एका हातानें उचलू शकते का ? शक्यच नाही ? "
इन्स्पेक्टर " हो ना .. बर ठीक आहे ? कशा आहेत त्या आता ?"
जय " झोप ली य आता .. आतमध्ये .. तिच्या शरीराला आरामाची गरज आहे .. जेव्हा पण रिचा तिच्या वर हावी होते त्यानंतर तिची सगळी ताकद संपून जाते .. "
इन्स्पेकटर " सॉरी मिस्टर जय .. आय कॅन अंडरस्टॅंड युअर फिलिंग "
जय " तुम्हाला मी फोन करेल ती उठली कि मग या तुम्ही .. तुम्हाला काही विचारायचे असेल तर "
इन्स्पेकटर " खरतर .. काल राजीव नावाच्या माणसा चा मृत्यू पब मध्ये झालाय .. तुम्ही तिकडे होतात हे मला cctv फुटेज मध्ये दिसले .. नंतर अचानक मॅडम गायब झाल्या आणि तुम्ही आणि हे तुमचे मित्र ब राच वेळ तिथेच होतात .. काय मॅटर आहे "
जय " मला काहीच माहित नाही .. राजीव ने बहुदा त्याच्या बॉडीगार्ड ला सांगून वसू ला किडनॅप केले .. मी आणि माझ्या मित्राने तिला खूप शोधले . मी शोधत शोधत लिफ्ट मध्ये गेलो तर तिचा दुपट्टा मला लिफ्ट मध्ये पडलेला दिसला .. मी खूप घाबरलो मी लिफ्ट मध्ये एकेक फ्लोअर वर जायचे ठरवले .. पहिल्यांदा टेरेस वर गेलो तिकडे कोणीच नाही म्हणून चोथ्या मजल्यावर गेलो तर तिथल्या बॉडीगार्ड मला आता सोडत नव्हता .. मी त्याला खूप विनंती केली तरी तो सोडेना आता .. मग माझी आणि त्याची आधी बाचाबाची झाली नंतर मारामारी पण झाली .. मी त्याचीच पिस्तूल त्याच्या डोकयात मारली तर तो बेशुद्ध पडला .. तेव्हड्यात मला बाहेरूनच काचा फुटल्याचा आवाज आला .. मी धावत आत गेलो तर आलरेडी राजीव खाली पडला होता .. आणि वसू सोफ्याच्या मागे घाबरून बसली होती आणि रडत होती .. ती म्हणतेय तिला राजीव ने दोन चार कानाखाली मारल्यात आणि तिच्यावर अत्याचार करण्याच्या विचारात होता .. तेवढयात तिला हा रितेश दिसला .. त्याला तिने कधीच आधी पहिले नव्हते तरी त्याला रितेश .. वाचव मला असे म्हटले म्हणून रितेश तिथेच थांबला .. या दोघांत पण हातापायी होत होती तेवढयात त्याचा तोच दारूच्या नशेत होता तर काचेवर आपटला तर काच फुटली आणि खाली पडला .. त्यामुळे त्याच्या तो त्याच्या कर्माने मेला. वसू ला लागले होते त्यामुळे मला तिला घ री आणणे गरजेचे होते .. मग आम्ही घरी आलो "
इन्स्पेकटर " ठीक आहे .. तुमच्या कडे एक काम होते .. करणार का ?"
जय " मला करण्यासारखे असेल तर नक्की कारेन "
इंस्पेक्स्टर " ते कालचे cctv फुटेज मध्ये पुन्हा घोळ करायचाय .. तुमच्या तिघांचे फुटेज गायब करायचेय "
जय ने जाऊन मिस्टर बोरकर ला एक कडकडून मिठी मारली
तेवढयात वसू बाहेर आली .. इंस्पेटकर ला बघून पुन्हा आत गेली आणि दुपट्टा घेऊन आली ..
जय "तू उठलीस "
वसू " सॉरी .. आज जेवण पण नाही झाले .. मी चहा करते सगळ्यासाठी "
वसू ने सग्ळ्यांनाही चहा केला .. जय ने सगळ्यांना चहा दिला
वसू चा ओझरता चेहरा इन्स्पेकटर ला दिसला .. तिच्या चेहऱ्यावर कालच्या माराच्या व्रण दिसत होत्या ..
इन्स्पेकटर वसू कडे बघत होता आणि जय इन्स्पेकटर कडे बघत होता आणि या तिघांकडे हे तिघे बघत होते ..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा