
परकाया भाग ६६
क्रमश : भाग ६५
जय " ठीक आहे .. मग मी काय बोलणार ? तू आणि तुझी आई का ती बाई बघून घे .. "
रितेश " मी जातोय .. माझ्या बहिणीला शोधायला .. मला बोलवतेय ती .. मी गेले कित्येक रात्र झोपलो नाहीये .. ती बोलवतेय मला .. या वर्षी माझ्या बर्थ डे ला मला भेटली नाही "
रितेश बोलत होता तर वसू आपोआप बाहेर आली आणि रितेश ला घट्ट मिठी मारून जोरात रडायला लागली
वसू " रितेश .. रितेश .. ओये .. कैसा है .. भाई .. तू कसा आहेस ? सॉरी तुझ्या बर्थ डे ला नाही भेटू शकले .. पण मी ना तुझ्या साठी एक गिफ्ट तयार केलंय .. ते ना माझ्या रूम मध्ये आहे .. रितेश .. मम्मा एकटी आहे .. तू मम्म्मा को अकेला मत छोड .. समजा क्या .. . "
रितेश ला कसे रिऍक्ट व्हावे ते कळतच नाही .. वसूचे शरीर .. चेहरा तो ओळखत नाहीये पण तिच्या आत्म्याला ओळखतोय .. तिला मिठी मारल्यावर एक क्षण त्याला रिचा ला भेटल्या सारखेच वाटले .
रितेश एकदम खालीच बसला ..
वसू ने त्याच्या गालावरून हात फिरवला
वसू " रितेश .. क्या भाई .. तू आज कल कुछ खाता है कि नही .. और येह क्या तेरे सर पर क्या लगा है .. "
रितेश च्या डोळ्यांतून पाणी येत होते .. वसू च्या डोळ्यातून पण पाणी येत होते .. वीरू आणि जय चे पण डोळे पाणावले ..
रितेश तिथेच सोफ्यावर बसला .. वसू बेशुद्ध होऊन कोसळणार तर जय ने तिला पकडले आणि बेडरूम मध्ये नेले ..
वीरू " काय यार जय .. काय होतंय हे सगळे आपल्या वसू बरोबर ? मला तर वेड लागेल .. कसे हे सगळे मॅनेज करतोय तू .. तुला खरच मानले पाहिजे "
जय तिला बेडरुम मध्ये सोडून आला
रितेश च्या डोक्यावरून मायेने हात फिरवला त्याने ..
जय " आता तरी विश्वास बसला ना .. हे बघ आता हारून चालणार नाही . नताशा आणि रिचा यांचा काय संबंध माहित नाही पण नताशा इथे आमच्या वर दोन मजले राहते .. ती बऱ्याच दिवसात दिसली नाहीये .. माझ्या वाईफ आणि नताशा मध्ये झालेल्या गोष्टी रिचा ला कशा कळल्या माहित नाही .. कदाचित नताशाने पण रिचाला मारले असावे .. आपण काही सांगू शकत नाही .. "
रितेश " नाही .. तसे नाहीये .. रिचा शर्मा माझी बहीण कॉलेज मध्ये असताना घरातून राजीव बरोबर पळून इकडे आली .. राजीव ने तिला मॉडेलिंग च्या क्षेत्रात उतरवले .. आधी राजीव तिचा नुसता च फ्रेंड होता .. तोच तिला नवीन नवीन काम मिळवून दयायचा ...नंतर तो तिला काम मिळवून देणारा एजन्ट झाला .. सुरुवातीला त्याने तिला खूप कामं मिळवून दिली .. .रिचा फेमस होऊ लागली .. राजीव ने तिचा जसा मेक ओव्हर केला तसा तिचे नाव पण बदलले होते .. रिचा ला हे नंतर कळले कि ती जे काम करतेय पण प्रसिद्धी तिच्या नावाला सुद्धा नाही .. लोक तिला नताशा या नावाने ओळखू लागले .. यावरून तिची आणि राजीव ची भांडणे पण झाली होती ..
राजीव तिला म्हणाला " तुला एवढी मी फेमस बनवली .. तुझ्या सारख्या काकूबाई ला कोणी विचारले असते का ? आणि आता तू माझ्यावर चिडतेस ?"
रिचा रागाने राजीव ला सोडून सेपरेट रहायला लागली .. तोपर्यंत तिच्या कडे पैसे फेम आला होता .. २ वर्षांनी रिचा घरी आम्हाला भेटायला आली तर मम्मा ने तिला घरात घेतलेच नाही .. मी मम्मा कितीदा बोललो मम्मा .. दीदी ला माफ कर ... पण मम्मा ने काहीच ऐकले नाही .. रिचा इकडे आली . मला कधी कधी कॉल करायची .. तेव्हा माझे कॉलेज चालू होते
राजीव शी मैत्री तुटल्यावर तिला काम मिळेना .. तिचा फेम थोडा थोडा कमी होऊ लागला आणि ती नशे च्या आहारी जाऊ लागली .. त्याच दरम्यान तिला अरमान भेटला .. अरमान तेव्हा साधा मॉडेल होता .. तो पण या सिटी मध्ये नवीन होता .. दिसायला हँडसम होता .. चार्मिंग होता .. रिचा ला तो आवडायला लागला .. आणि त्याने फक्त तिचाच उपयोग आणि उपभोग घेतला .. तिचा शिडी सारखा वापर करून तो आज मोठा मॉडेल झाला .. तसा तो रिचाला सोडून गेला .
रिचा अरमान मध्ये खूपच इमोशनली अडकली होती .. " रोज त्याला जाऊन बोलायची .. अरमान मला सोडू नकोस .. अरमान मै तुमसे शादी करना चाहती हूं । पण अरमान ने तिला खूप झुलवले. पाहिजे तेव्हा तिच्या बरोबर राहायचा .. तीला ते कळत होते पण तरीही तिचे त्याच्यावर इतके प्रेम होते कि तोच तिला हवा असायचा .. अरमान ने तिला असे दाखवले माझे पण प्रेम आहे .. मी थोडा सेटल झालो कि पण लग्न करू .. त्याच आशेवर ती जगत होती .. एखाद दुसरे काम मिळाले तर करायची ..
एकदा मम्मा आणि मी रिचा ला भेटायला इकडे आलो तर ती अरमान बरोबर होती .. मम्मा ते सगळे बघितले आणि मम्मा ने रिचा ला खूप मारले .. त्या अरमान ला पण ओरडली आणि तिकडून हाकलून दिले ..
रिचा दुसऱ्या दिवशी होश मध्ये आली तर मम्मा ला कन्व्हिन्स करू लागली कि अरमान अच्छा लडका है .. मुझसे प्यार करता हे .. मै उससे शादी करना चाहती हूं ।
मम्म्मा ने तिला सांगितले .. ठीक है .. तू उसे चंदीगड लेके आजा .. मै 'तेरी शादी वही करवा दूंगी ।
उस बात को दो साल हुए .. रिचा कभी चंदीगड आयी हि नही.. दोन दिन में एक बार मुझे कॉल करती थी .. सिर्फ मेरे बर्थ डे को वो घर आती थी .. लेकिन रात को आती थी और सुबह चली जाती थी "
एक महिना हुआ उसने मुझे कॉल नही किया तो मै मम्मा से झगडा करके उसे ढुंढणे यहां पे आ गया .. अरमान और राजीव के टीम में बॉडीगार्ड करके शामिल हुआ .. पण रिचा ची काही पण खबर नाही मिळाली मला "
रितेश पुन्हा रडु लागला ..
जय ने सगळे पुन्हा रेकॉर्ड करून घेतले .. कारण तिच्या आत्म्याला मुक्ती देण्यासाठी हे सगळे माहित असणे फार महत्वाचे होते .. उद्या जर पोलीस केस झालीच तर याचा पुरावा म्हणून वापर पण करता येऊ शकेल .
जय ने त्याला प्यायला पाणी दिले ..
जय " याचा अर्थ रिचा आणि नताशा या दोन व्यक्ती नसून एकाच व्यक्ती ची दोन नावे आहेत "
रितेश " हो .. "
जय " रितेश .. नताशा चा फ्लॅट वरती आहे .. तू भाऊ म्हणून नताशा च्या फ्लॅट ओपन करू शकतोस .. किंवा आपण पोलिसांची परमिशन घेऊन त्यांना बोलावू आणि मग त्यांच्या देख रेखी खाली तो फ्लॅट ओपन करू .. वसू चा ड्रेस , वसुच्या ओढण्या तिच्याकडे आहेत .. एक प्रकारे ते सर्व सामान ज्या मध्ये नताशा चा जीव होता ते सर्व सामान आपल्याला नष्ट करावे लागेल .. गेले महिना भर मी माझ्या घरातली हि रूम पण लॉक करून ठेवलीय .. त्या रूम मधले सर्व सामान पण मी न नष्ट करणार आहे . "
रितेश " रिचा इतनी बुरी नही है "
जय " मी कहां उसकू बुरा कह रहा हू .. तिला आपली मदत हवीय .. त्या शिवाय ती मुक्त होणार नाही .. आणि हे सगळे लवकरत लवकर होयला पाहिजे .. माय वाईफ इज सफरींग .. प्लिज ट्राय टू अंडरस्टॅंड "
रितेश " ठीक हैं .. मै मम्मा को कॉल करके बुलाता हूं .. फिर हम पोलीस स्टेशन जायेंगे "
जय " ठीक है "
जय वीरू कडे बघून
जय " वीरू आपण दोघे हिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करू .. तू तिथे तिच्या जवळ थांब .. मी याच्या बरोबर जाऊन पोलीस स्टेशन ला जाऊन येईन .. राघव ला फोन करून सांगतो तो तुझ्या बरोबर थांबेल तिकडे "
वीरू " हो चालेल "
जय ने राघव ला फोन केला .. आणि सांगितले कि मी आता वसू ला ऍडमिट करण्यासाठी येतोय .. तू आम्हाला तिकडेच भेट .
वसू आतमध्ये रुम यामध्ये बेड वर झोपली होती .. जय आतमध्ये आला तर वसू रडायला लागली
जय " काय झाले वसू ? का रडतेय ?"
वसू ने जय ला घट्ट मिठी मारली .. तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू गालावर येत होते ..
वसू " जय मला भीती वाटतेय .. हॉस्पिटल मध्ये ते लोक मला सारखे इंजेक्शन देतील .. मला शॉक देतील .. मी बघितलंय पिक्चरमध्ये .. नंतर मला मी वेडी आहे म्हणून मला वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये सोडतील .. जय मला खूप भिती वाटते .. " तिने घाबरून जय चे शर्ट हातात घट्ट पकडून ठेवले होते .. भीती तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती "
जय " अरे बाळा .. असे काहीही मी होऊन देणार नाहीयेत .. मला विचारल्या शिवाय तुला इंजेक्शन पण देणार नाहीत .. आणि मी कुठे जातोय मी तिथेच असणार आहे ना तुझ्या बरोबर .. "
वसू " नको ना .. जय .. आपण गावाला जाऊ त्या पेक्षा .. तिकडे सगळे आपली लोक आहेत .. मला खूप भीती वाटतेय .. हे लोक मला तुझ्या पासून लांब ठेवतील .. मला तुला भेटू देणार नाहीत .. जय .. मला खूप भीती वाटतेय "
वसू खूप रडत होती .. खुप घाबरली होती .. ती च्या सगळ्या शंका खऱ्या होत्या . ती बोलत होती त्या सगळ्या शक्यता नाकारता येणार नव्हत्या .. उद्या जर वसू व्हॉयलेन्ट झालीच तर ते तिला शॉक ट्रीटमेंट पण देऊ शकतात .. शिवाय हॉस्पिटल चे लोक भूत प्रेत मानत नाहीत त्यांना वाटते कि हा एक मानसिक आजार आहे .. आणि त्यांच्या ट्रीटमेंट ने पेशन्ट बरा झाला नाही तर त्याला मेंटल डिक्लेअर करून वेड्यांच्या हॉस्पिटल मध्ये पाठवून देतात .. अशी लोक समाज साठी घातक आहेत या नावाखाली रिलेटिव्ह पण काहीच करू नाही शकत .त्यामुळे वसू ला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करणे हे चुकीचे पण ठरू शकते .
वीरू ने तिचे बोलणे बाहेरून ऐकले .. वीरू ला त्याचे अश्रू अनावर झाले होते .. रितेश ला पण वाईट वाटतं होते .
जय " ठीक आहे .. आपण आज नको जाऊया हॉस्पिटल ला .. थोडा वेळ घेऊन निर्णय घेऊ.. मी थोडा अजून विचार करतो "
जय ने तिला रिलॅक्स करून झोपवले .
राघव ला सांगितले आज नको ऍडमिट .. तुला वेळ मिळाला कि घरी ये असा मेसेज टाकून जय तिच्या शेजारी बेड वर आडवा पडला
जय ला वसूची खूप काळजी वाटत होती आणि खोल मनात कुठेतरी खूप भीती वाटत होती ..
लहान पणा पासूनचे त्याला आठवू लागले .. वसू चा हसरा खेळता चेहरा त्याच्या समोर येऊ लागला .. लहान पणी किती गोंडस रूप होते .. तिचे गाल ओढला कि कसे लाल होयचे .. त्याने जेव्हा तिला पहिल्यांदा पहिले तेव्हा त्याच्या हातात ती पडली होती तेव्हाची वसू .. नंतर जेव्हा खोटे लग्न करून आले तेव्हा वसू नुसता जय तिच्या बरोबर आहे तर कशी आनंदी असायची . त्याच्या आवडीचे जेवण करून ठेवायची आणि सांगायची मी माझ्यासाठी केलेय .. कधी त्याच्याशी भांडायची .. कधी त्याच्या बरोबर खेळायची .. हात हातात घेऊन तिच्या बरोबर केलेला कपल डान्स .. दोघे एकदम खुश होते .. जय ने जेव्हा लग्न एक्सेप्ट केले तेव्हा तिने उशीने त्याला मारले होते आणि त्याच्या कुशीत शिरून कशी रडली होती .. जय तिला चिडली कि कसा मागे पुढे जेवण भरवायचा .. सगळे आठवत होते आणि डोळ्यातून पाणी वाहत होते .. जय चा इमोशनल बस्ट झाला होता .. त्यालाच आज आधाराची गरज होता .. वसू ची अवस्था बघून तो अस्वस्थ झाला होता .. '
काय स्वप्न पहिली होती .. वसू ला घेऊन स्वित्झर्लंड ला जाईन .. सगळे राहून गेले .. आज काय राहिले .. त्यातच त्याला डोळा लागला.
https://www.youtube.com/watch?v=tfSqvusJiFI&ab_channel=YRF
लिंक ओपन करा ..
जय स्वप्नात स्वित्झर्लंड ला पोहचला आणि तिथल्या निसर्गात दोघे बागडत होते .. वसू चा निरागस चेहरा त्याच्या डोळ्या समोर येत होता.