नमस्कार ! वाचकहो .. कसे आहात सगळे ? तुमच्या कंमेंट्स वाचून खूप आनंद होतोय .. कसे आहे ना हॉरर चित्रपट किंवा सीरिअल बघताना भीती वाटणे साहजिक आहे कारण आपल्या समोर चित्र असते आणि साऊंड इफेक्ट वर पण खूप अवलंबून असते . पण लिहताना तसे इफेक्टस नसतात त्यामुळे वाचताना घाबरायला होणे हे फार कठीण आहे असे मला वाटते .. तुम्ही घाबरता 'य हे वाचून मला आनंद होतोय .. ( सॉरी ) कारण हि स्क्रिप्ट ची डिमांड आहे .. फार नाही .. थोडेच अजून रहस्य आणि भयानक असणार आहे कारण आपली कथा प्रेमाची कथा आहे .. नवरा बायकोच्या पवित्र प्रेमाची कथा आहे .. त्यात आता इथून पुढे थोडा लॉजिकल ,सायंटिफिक आणि अध्यात्माचा आधार घेऊन हा प्रश्न सोडवणार आहे ..
तर मंडळी कंमेंट्स मध्ये .. पुढील भाग ? नेक्स्ट पार्ट ? असे न लिहता .. भाग कसा वाटला हे लिहा .. ते वाचुन जास्त छान वाटते . तुम्ही नाही सांगितले तर पुढचा भाग मी तरी टाकणारच आहे ना .. आता पर्यंत तरी हि खात्री माझ्यावर तुम्हाला आलीच असेल ..
परकाया भाग ६३
क्रमश : भाग ६२
जय ला पण काही सुचत नव्हते .. हे आता आपल्या बरोबर काय घडले ? हे सगळे विचित्रच वाटत होते .. राहुन राहून त्याला ते आंब्याचे झाड आणि त्या झाडाच्या जवळ असलेली विहीर दिसत होती ..
जय उठून बाहेर हॉल मध्ये आला .
तर बाहेर सोफ्यावर एक कागद पण पेन्सिल होती . जय ने तो कागद हातात घेतला आणि दचकलाच
जय -" वसू .. हे चित्र कोणी काढले ? हे इथे कसे आलेय ?"
वसू बाहेर आली " जय .. अरे सकाळी मी उठले ना तर मला अचानक कागद पेन हातात घ्यावासा वाटला आणि मला चित्र काढावेसे वाटू लागले ... मी आपोआप हे चित्र काढले ."
जय " आग हेच झाड मला स्वप्नांत दिसले .. या झाडा जवळ काहि तरी आहे ? आपल्याला काहीतरी मेसेज द्यायचाय कोणाला तरी ? बहुतेक रिचा किंवा नताशाला .. आपल्याला हे लोकेशन नक्की कुठे आहे आणि काय आहे या मागे रहस्य शोधावे लागेल "
वसू " जय आणि बेबी .. बेबी च काय ? तू झोपेत ओरडत होतास ? कोणाचं बेबी असेल ते ? "
जय " बापरे .. वसू काहींतरी लोचा आहे .. विहरीतले बाळ मला बोलवत होते वसू .. नंदू च्या बाळाला तर काही होणार नाही ना ..? "
वसू अजूनच जोरात रडायला लागली
जय " थांब ना ग .. रडू नकोस ना .. मी गावाला फोन करतो काय चाललंय ते विचारतो "
जय ने पंकज ला फोन केला
जय " हॅलो .. पंकज .. कसे आहे रे तुम्ही सगळे तिकडे ? काय चाललंय ?"
पंकज " जय .. एकदम ओके आहे .. आजच नंदू ला डॉक्टरांकडे नेऊन आणली .. बाळ आणि नंदू एकदम ओके आहे .. "
जय " अरे वाह .. ग्रेट .. आणि बाकी काय ? मग बाबा बनायला रेडी का एकदम ?"
पंकज " ते आपोआप होते रे .... काही कठीण नसते .. मग तुम्ही कधी नंबर लावताय ?बाय द वे वसू कशी आहे ? बऱ्याच दिवसात काही कॉल नाही केला तिने "
जय " आहे बरी आहे .. तुझी आठवण काढतेय .. म्हणत होती पंकज आणि नंदू ची आठवण येतेय "
पंकज ' एखादी चक्कर टाक कि "
जय ला तिकडे न्युज चा आवाज येत होता .. एका कार चा अपघात झालाय त्यात तिघे जण होते .. गावा जवळच्या जवळ घाटात एका कार ला अपघात झाला त्यात टी .व्ही स्टार अरमान चा ऍक्सीडेन्ट झालाय .. तो जखमी आहे .. जवळच्या हॉस्पिटल ला तो ऍडमिट आहे "
जय " काय रे कसला आवाज येतोय .. कोणाचं ऍक्सीडेन्ट झाला "
पंकज " अरे तो सिरीयल हिरो आहे .. त्याचा ऍक्सीडेन्ट झालाय .. " कारचा पुढचा पार्ट चा चेंदा मेंदा झालाय तरी पण तो वाचला कसा याचेच आश्यर्य वाटतय .. "
जय " बरं .. ठीक आहे .. ते जाऊ दे .. काळजी घे काय नंदू ची .. आणि तिकडे सोय नसेल कसली तर डिलिव्हरी ला इकडे आणायची का ? इकडे चांगले दवाखाने आहेत "
पंकज " नको अरे .. आता इकडे चांगले सेट झालेय .. एवढा लांबचा प्रवास झेपणार नाही तिला .. .. तशी तब्बेत बरी आहे पण वजन खूप वाढलय .. आताच खालची जमीन दिसत नाही तिला .. मला तिला सारखे उचलून घ्यावे लागते .. "
जय " सो स्वीट ऑफ यु .. पंकज .. तू आहेस तिकडे तर मला कसलीच काळजी नाहीये इकडे .. ना आई अप्पांची ना नंदू ची "
पंकज " आणि तुला कधी मी बोललो नाही पण आज सांगतो .. वसू च्या आयुश्यात तू आहेस म्हणून मी निर्धास्त संसार करतोय "
जय " मी प्रयन्त करतोय अजून चांगला नवरा बनण्याचा .. तुझ्या एवढा एक दिवस नक्की बनेल .. "
पंकज " अरे जय .. तू ला वाटतं असेल कि ती जरा चिडकि आहे ..पण खरं सांगतो तुझ्या वर जाम जीव आहे तिचा .. ती तोंडाने सांगेल कि नाही माहित नाही मला पण तुझी खूप वाट बघितली तिने .. "
जय " हो .. कळतंय हळू हळू मला सगळे .. हल्ली मनमोकळे पणाने बोलायला लागलीय माझ्याशी "
पंकज " वाह .. मग जिंकलस भावा .. "
जय " पंकज तुला काहीतरी सांगायचे होते .. कसे सांगू कळत नाहीये .. सध्या तूझ्यावर मोठी जवाबदारी आहे फक्त आता एवढंच सांगतो .. मी पण वसू वर प्रेम करतो आणि ती मला माझ्या प्राणा पेक्षा प्रिय आहे .. माझ्या वर विश्वास ठेव .. "
पंकज " जय .. तुझ्यावर माझा तुझा स्वतःचा नसेल तितका विश्वास आहे .. मी आधी पासूनच म्हणत होती कि वसू शी तू लग्न कर .. आठवतंय ना ..तुला योग्य वाटेल तेव्हा तू सांग .. काही काळजी करू नकोस .. अप्पा नेहमी म्हणतात तसे हा लक्षात ठेव " हे हि दिवस जातील " चांगले असो व वाईट दिवस तर पालटणारच आहेत .. आपण फक्त कर्म करत राहायचे .. त्याही पेक्षा जय .. संसार सुरु करा .. मग मज्जा येईल .. आणि मला मुलगी झाली तर नवरा लहान कसा चालेल ? .. तर एखाद वर्ष ठीक आहे .. लवकर नंबर लावा " आणि पंकज हसायला लागला
जय पण हसायला लागला
जय " चल बाय टेक केअर .. बोलू मग निवांत”
नंदू आणि नंदू चे बाळ ठीक आहे म्हटल्यावर जय ला जरा रिलेक्स झाले
वसू " जय .. हे बघ हि बातमी बघ .. "
वसूला मोबाइल वर कोणीतरी न्यूज ची लिंक पाठवली होती .. तिने ती लावली तर दोघे हि लिटरली सोफ्यावर शान्त बसलेच .. त्या न्यूज वर तेच लोकेशन दिसत होते .. तेच ते झाड .. त्या झाडाला लागलेले ते लाल कापड आणि त्याच्या मागे विहीर दिसत होती .. आणि न्यूज वाले सांगत होते कि हे लोकेशन कुणीकडे आहे ..
जय ने ते लोकेशन कुठे आहे ते लिहून घेतले ..
वसू " एक गोष्ट अजून लक्षात येतेय का तुझ्या ? हा अरमान कोण आहे हे आपल्याला माहित नव्हते .. हाच तो अरमान असणार त्याचाच ऍक्सीडेन्ट झालाय तिकडे .. वसू हे सगळे वाटतंय तेवढे सोपे नाहीये .. थांब मी राघव ला बोलावून घेतो
वसू " राहुल आणि समीरा पण घेना बोलावून .. मी सगळ्यांना चहा बनवते .. तिला माझ्या हातचा चहा आवडतो "
जय पटकन लक्षात राहत नाही त्याच्या " अग ती कशी येईल आता .. ती तर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे ना ?"
वसू " काय ? कधी ? कशाने ? आणि तू मला आता सांगतोय ? "
जय " शीट .. शिट ..हे कसे काय बोललो मी हिला "
वसू " जय नक्की काल काय झालंय ?मला तिला भेटायला जायचंय ?चल ना जाऊ आपण ?"
जय " अग वसू काही नाही ग राणी ? तू जा आवर वीरू येतोय आता "
वीरू चे नाव ऐकून वसू खूप खुश झाली आणि किचन मध्ये गेली .
तेवढयात जय ने राघव ला कॉल केला आणि झाडा संदर्भातले सगळे सांगितले .
राघव म्हणाला " ठीक आहे .. मला वाटतं पण तिकडे व्हिसिट करायची का ? "
जय " अरे .. नको .. वसू ला घेऊन आपण नाही जाऊ शकत एवढ्या लांब ?"
राघव " अरे यार जय ? मी मगाशी हॉस्पिटल ला जाऊन आलो .. समीरा अजूनही त्या शॉक मधून बाहेर आली नाहीये .. खूप लागले आहे तिला .. राहुल ला पण टाके पडलेत .. तरी पण खूप काळजी घेतोय तिची तो .. "
जय " मी वसू ला घेऊन जाऊ का ? तिला बघायला ? वसू खूप आठवण काढतेय तिची ?"
राघव " जा कि .. त्यात काय ? आपण एक काम करू ? वसू ला सांग कि राहुल आणि समीरा चा काल रात्री घरी जाताना छोटा ऍक्सीडेन्ट झालाय "
जय " ठीक आहे .. माझा एक मित्र पण येतोय गा वा वरून तो घरी आला कि जाऊ मग .. तू राहुल ला याची कल्पना देऊन ठेव "
राघव " ठीक आहे "
जय " त्या अरमान ला गाठायचे का ? का पोलिसांना च सांगूया ? तुला काय वाटत ?"
राघव " अरमान कडे सध्या दुर्लक्ष करू या .. सध्या आपण .. वसू बरोबर एक सेशन घेऊ या ? पाहिजे तर तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमीड करून ठेवू आणि मग करू म्हणजे मागच्या वेळे सारखी इमर्जन्सी येणार नाही "
जय " ते तुझे सर कधी येत आहेत "
राघव " सर .. उद्याच येत आहेत .. ते पण म्हणले कि तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावे लागेल .. स्वतः डॉक्टर आहेत त्यामुळे सायन्स आणि अध्यात्म या दोघांचा अभ्यास करून ते केस सोडवतात .. ते आले ना कि आपले अर्धे काम झाल्यातच जमा आहे .. ते स्वतःच पोलिसांना बोलावून घेतात .. अशा केस त्यांना नवीन नाहीत "
जय " आणि वसू ला सहन होईल ना .. मला तीचि भीती वाटते "
राघव " म्हणून तर तिला ऍडमिट करायचे .. "
जय " ठीक आहे .. त्या रिचा शर्मा ची आई पण दोन दिवसात येतेय "
तेवढयात दाराची बेल वाजली .. जय ने राघव सांगून फोन बंद केला .. दार उघडले तर वीरू आलेला
जय ने त्याला दारातच घट्ट मिठी मारली .. दोघांचेही डोळे पाणावले .. आज वीरू पहिल्यांदा च जय च्या घरी आला होता .. वसू तर त्याला बघून धावतच बाहेर आली .. वसू ने पण त्याला मिठी मारली .. वीरू बहिणीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत होता ..
वीरू " कशी आहेस ग ?"
वसू" मी खूप मजेत आहे वीरू ? तू कसा आहेस ? घरी सगळे कसे आहेत ?"
जय " अरे .. आग त्याला जरा फ्रेश तर होऊ दे .. फ्रेश झाला .. खाऊ पियू घाल मग विचार "
वसू" हो रे .. बस ना .. तुला पाणी आणते .. "
मग काय आज जेवणाचा सगळा मेनू वीरू च्या आवडीचा होता .. जय आणि वसू दोघे मिळून त्याला आग्रहाने जेवण वाढत होते .. "
इकडच्या तिकडच्या गावच्या गप्पा मारून झाल्यावर .. थोडा वेळ आराम झाल्यावर तिघे समी रा ला आणि राहुल ला बघायला हॉस्पिटल ला गेले
ठरल्या प्रमाणे वसू ला सांगितले होते कि राहुल आणि समिराचा ऍक्सीडेन्ट झालाय "
वसू तर समीराला बघून रडायलाच लागली .. " काय ग .. किती लागलंय ? दुखतंय का ? फार त्रास होतोय का ?"
समीरा मात्र तिला बघून घाबरली होती .. आता पण हिच्यात भूत शिरलं तर आता पण हि मला मारेल या भीतीने ती जरा दचकतच होती
वसु " अरे राहुल.... तुझे लक्ष कुठे होते गाडी चालवताना .? नक्कीच मोबाइल वर बोलत असशील "
राहुल " नाही अग .. तो कुत्रा मध्ये आला .. त्याला वाचवायला गेलो तर आमचाच ऍक्सीडेन्ट झाला "
वसू " तू कसा आहेस ? फार दुखत नाहीये ना तुला ?"
जय " वसू बास आता .. सारखे त्याला लागल्याची आठवण करून नको देउस "
वीरू " नमस्कार समीरा वाहिनी .. आपली अशी भेट होईल असे वाटले नव्हते .. काळजी घ्या "
समीरा हसत " नमस्कार भाऊजी "
जय ने त्याची राहुल शी ओळख करून दिली .. ..
जय " हाय समु .. कशी आहेस ? फार त्रास होतोय का ग ?"
जसा जय समिराशी बोलू लागला इकडे वसू मॅडम ला म्हणजे वसू च्या आत असलेल्या रिचा ला त्याचा आणि समीरा चा राग येऊ लागला .. तिला अनईझी होऊ लागले .. पण आज वसू ते बोलत आहेत हे बघितल्यावर त्या रूम मधून मुद्दामून बाहेर पडली ..
वीरू वसू च्या मागे धावला ..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा