Login

परकाया ६२

in this part jay had bad dream

परकाया ६२

क्रमश: भाग ६१

जय ला परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात आले .. वसू ने आज समीरा वर हमला केल्यामुळे तो मनातून खूप डिस्टरब झाला होता ..  एक नाही तिघे तिघे  जखमी झाले होते .. त्यात समीरा ला तर जीवे च मारले असते तिने ..  त्यात वाईट  याचे वाटत होते कि तिने जय ला भिरकावले होते .. राग , संताप , भीती  आणि काळजी खूप काही होत होते .. बेचैनी आली होती त्याला .. यातून लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे ..

जय विचार करू लागला वसू ला घरात ठेवणे हे धोक्याचे काम आहे आता .. हळू हळू ती व्हायलंट होऊ लागली आहे . राघव म्हणतो तसा तिला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करूनच ठेवावी .. तिच्यावर एखाद्या प्राण्यावर लक्ष ठेवतात तसे cctv लावून लक्षच ठेवले पाहिजे ..

जय चे दुसरे मन .. नाही नाही वसू चा ह्यात काय दोष तिला तर बिचारीला माहित पण नाहीये कि ती काय करतेय .. मगाशी तर समीरा च्या काळजीने किती रडत होती .. अशी आहे माझी वसू  .. कधीच दुसऱ्याला मनात सुद्धा त्रास देणार नाही ..

समीरा .. समु  सॉरी यार .. तुला खूप लागलंय  आणि मी एक मित्र म्हणून पण आता तुझ्या बरोबर नाहीये .. समु  प्लिज मला माफ कर..

मला तुला तोंड दाखवायला पण लाज वाटतेय आता .. माझ्या बायकोमुळे तुला हे सगळे सहन करावे लागलंय ..

राहुल ने पुढच्या सीट वर समीरा ला ठेवले .. त्यानेच तिला सीट बेल्ट  लावला ..  तिच्या डोक्यावरून हात फिरवला .. समीरा ला थोडीशी शुद्ध होती .. तो काय काय करतोय हे तिला जाणवत होते पण डोळे उघडून बघण्या इतले पण तिच्यात त्राण  नव्हते . राहुल ने  मोठ्या हॉस्पिटल मध्ये समीरा  ला ऍडमिट केले .नर्स ने एकेक करून तिच्या पायातल्या .. हातातल्या .. कपाळाच्या इथल्या काचा काढल्या .. डोक्याला दोन टाके पडले .. मुका मर खूप लागला होता .. पायाला क्रेप बँडेज लावले .. सगळ्या चेहरा डेटॉल ने साफ करून इंजेक्शन देऊन  तिला एक सलाइन लावून दिली ..

तिला शांत झोपलेली बघितल्यावरच त्याने स्वतःवर ट्रीटमेंट घेतली .. त्याला पण मुका मार लागला होता .. डोक्याला खोप पडली होती ..  दंडात खोलवर काचा घुसल्या होत्या त्या नर्स ने काढल्या .. त्याच्या दंडाला दोन टाके पडले .. त्याला पण डॉक्टरने इंजेक्शन दिले .. तो हि तिच्याच रूम  मध्ये दुसऱ्या बेड वर आडवा पडला .. त्याचे सगळे लक्ष समीरा कडे होते ..

आज त्याला जेव्हा तिने कॉल केला पण कॉल उचलायच्या आधी मोबाइल खाली पडला .. तेव्हा तिच्याशी न बोलता आल्यामुळे.. तिच्या रडण्याच्या आणि किंचाळल्याच्या आवाजाने त्याला धस्स झाले होते .. ती त्याच्या साठी किती महत्वाची आहे हे त्याला कळून चुकले होते .. प्रेम बीम छोडो यु आर माय लाईफ .. हे त्याला कळले होते ..

जय ने अर्ध्या एक तासाने राहुल ला कॉल करून दोघांची विचारपूस केली . जय ने  शंभरदा त्याला सॉरी बोलले .

राहुल " जय अरे वेडा झालास का तू ?  आता बाकीचा काही विचार करू नकोस .. वसू  कडे लक्ष दे .... शी नीड्स यु .. उद्या बोलू आपण .. यावर लवकरत लवकर ऍक्शन घेणे जरुरी आहे .. तू तिला ऍडमिट कर .. ऍट लिस्ट डॉक्टरांच्या देख रेखी खाली राहील ..  जय तुला पण लागले होते .. उद्या येउन ट्रीटमेंट करून घे .. "

जय " ठीक आहे .. तू समीराची काळजी घे .. आणि तुझीही .. बोलू नंतर "

राहुल " ओके ठीक आहे "

जय ने भल्या सकाळी वीरू ला कॉल केला आणि काल काय झाले ते सांगितले .. वीरू म्हणाला " मी येतो .. आजच  निघतो "

राघव ने सरांना मेल पाठवून घडलेला सगळा प्रकार सांगितला .. त्यांनी पण ते लवकरच येत आहेत असे आश्वासन दिले

जय ने राची शर्मा च्या  आई ला फोन करून बोलावून घेतले .. "लवकरात लवकर निघा .. इथे तुमची गरज आहे .. आणि त्या पण यायला तयार झाल्या .."

थोड्या वेळाने वसू  झोपेतून उठली .. जय ने हॉल एकदम साफ करून ठेवला होता .. जेणे करून तिला काही लगेच दिसणार नाही .. कारण मग तिच्या प्रश्नांची उत्तर देणे त्याला कठीण झाले असते .  झोपून गेला .

वसू  नेहमी प्रमाणे घर आवरत होती केर कढताना तिला सोफ्याखाली एक काचेच तुकडा दिसला ..  मग लगेचच गॅलरी च्या दाराची काच फुटलीय हे पण कळले .. तिने धावत जाऊन जय ला उठवायला गेली

वसू " जय .. उठ जय .. आपल्या गॅलरीचे दार तुटलंय "

जय " झोपेतच .. झोपू दे ना वसू .. मला खुप झोप येतेय .. तू पण झोप आराम कर .. उगाच सकाळी लवकर उठून काम करत बसतेस "

वसू " अरे पण .. गॅलरीचे दार .. आणि तुझ्या डोक्याला काय झाले ..? आणि हाताला पण काळा  डाग आहे ? "

जय " तू .. मारलंस मला झोपेत .. आठवतंय का ? " आणि हसायला लागला

वसू " गप रे .. दार पण मीच तोडले का मग ?"

जय " हो .. तू नाही तर कोणी मी ..?? "

वसू  रडवेली होऊन " सांगतोस का आता का अप्पांना फोन लावू "

जय " डायरेक्ट धमकी .. "

वसू " मग काय उगाच माझ्यावर आरोप करतोयस "

जय " ये इकडे झोप .. ते काल आपोआप दार निखळले .. कदाचित त्याला गॅलरीतली चेअर आदळली आणि ते अचानक फुटले .. मी सगळ्या काचा भरून टाकल्यात ..  झोपेत काम करत होतो तर माझेच डोके आपटले दाराला आणि खांद्याला पण लागले मला "

वसू " काय जय .. मला उठ्वायचीस ना .. बघ आता डोक्याला किती लागलंय ..चल मग उठ आपण डॉक्टरकडे जाऊन येऊ "

जय " नको यार वसू  मला झोपू दे आता .. "

वसू " ठीक आहे झोप .. नाश्त्याला काय बनवू ?"

जय " कांदा पोहे विथ शेंगदाणा "

वसू " पुन्हा पुन्हा त्या दाराकडे बघत काम करत होती ..

जय पुन्हा झोपून गेला ..

वसू ने तिचे आवरले .. नाश्ता तयार केला .. समीराला कॉल केला तर तिने कॉल उचलला नाही .. नंतर तिने राहुल ला कॉल केला  तर राहुल नेमका वॉशरूम मध्ये होता त्याने पण उचलला नाही

वसू " जय .. उठतोस का आता ? "

जय " काय झालेय ? तुझे पाय दुखायचे थाम्बले का आता ?"

वसू " जय .. समीरा कशी आहे ? ती रागावली नाहीये ना ?"

जय  समीराचे नाव ऐकताच हळूच उठून बसला

वसू " अरे ती माझा कॉल पण उचलत नाहीये .. तिला कसे वाटले असेल .. मी तिला घरी बोलवले आणि मीच झोपून गेले "

जय " नाही.. तसे काही नाही .. ती ओके आहे .. म्हणजे  असेल .. तुझे पाय दुखत होते ना .. "

वसू " हो ना .. किती पाय दुखत होते काय सांगू तुला ... या आधी असे कधीच दुखले नाहीत .."

जय उठला फ्रेश होऊन आला .. दोघे नाश्त्याला बसले ..

जय " आज कदाचित वीरू येणार आहे "

वसू " काय ? अरे वाह .. सही .. चल आपण बाजारात जाऊ .. त्याच्या आवडीची भाजी आणू "

जय " अग  हो .. तू मला लिस्ट दे .. मी खालच्या दुकान दाराला पाठवतो .. तो आणून देईल "

वसू " जय .. आपण जाऊ ना गावाला .. मला कधी एकदा नंदू ला भेटते असे झालेय .. अप्पांना पण नाही भेटले .. आई मामी . पंकज .. चल ना जय  फक्त दोन दिवस तरी जाऊ  "

जय " वसू  मला वाटते नोकरी सोडून देतो .. आपण गावालाचं कायमचे शिफ्ट होऊ "

वसू " एवढे काय लगेच टोकाची भूमिका घ्यायची गरज नाहीये .. सॉरी .. तुला नसले जायचे तर नको जाऊया "

जय " आता सध्या तरी नको .. मी खुप थकलोय वसू .. खरंच आता थकलोय "

वसू " ठीक आहे .. तू  आराम कर .. तुला डोक्याला तेल लावून  देऊ का ?"

जय " चालेल ..  तू पण अराम कर जरा .. तो वीरू आला तर ओरडेल मला म्हणेल वसू  कडॆ लक्ष देतोस कि नाही ?"

वसू " मी ठीक आहे रे ..

जय ने तिला जबरदस्तीने झोपायला घेऊन गेला .. तिने आराम करणे गरजेचे आहे ते त्याला माहित होते .. शेवटी तिला त्याने कुशीत घेऊन झोपवलीच .. तिचेही शरीर खूप थकलेले च होते .. जय च्या कुशीत लगेच झोपली

अचानक बाथरूम चा नळ  चालू झाला .. जय पाणी फुकट जातंय म्हणून नळ  बंद करायला उठला तर किचन चा पण नळ  चालू झाला .. बाथरूम चा नळ  बंद होतच नव्हता .. बराच वेळ त्याने बंद करायचा ट्राय केला तरी पाणी वाहतच होते .. शॉवर चालू .. नळ चालू .. जय भिजून गेला .. बाथरूम च्या बाहेर जाऊन किचन च्या   गॅलरी मध्ये  मेन  नॉब बंद करायला गेला तर गॅलरीचे दार बाहेरून लॉक झाले होते .. ते दार पण उघडे ना .. सोसायटीच्या मॅनेजर ला फोन करायला गेला तर फोन लागेना .. काय होतंय त्याला कळेच  ना .. वसू  ला मात्र चांगली झोप लागली होती .. एवढा पाण्याचा आवाज येत होता पण त्यानेही तिला जाग येत नव्हती .. त्याने  एकदा दोनदा तिला आवाज पण दिला तरी ती गाढ झोपली होती

पाणी घरात वाढू लागले .. बोल बोलता पाणी जय च्या ढोपरा  पर्यंत आले .. पाणी वाढत च गेले .. अचानक सुनामी आल्या सारखे पाणी वाढले आणि जय बेडरूम मध्ये लिटरली पाण्याखाली गेला .. तो पाण्याखाली हात पाय मारत सुटला .. वरती वरती पोहत होता .. तसे तसे पाणी वर येत होते .. थोड्या वेळाने त्याच्या  लक्षात आले .. वसू  बेड वरच आहे .. तो पटकन सूर मारून खाली गेला .. तर वसू बेड वर नव्हती .. कुठे गेली .. वसू  कुठे गेली .. पाण्या खाली श्वास धरून ठेवलेला त्याचा संपायला आला .. त्याने खालून वर पहिले तर वसू  पाण्यावर तरंगत होती .. पाण्यावर तरंगते म्हणजे .. म्हणजे काय झाले .. म्हणून तो वर गेला ..  तिला हात लावून उठवत होता तर तिने डोळे उघडले तर तिचे  डोळे लाल झालेले .. ती .. जय वर  अटॅक करू लागली .. जय दचकून एक हात लांब झाला .. वसू  त्याला पकडायला त्याच्या मागे  होती .. एका क्षणाला तिने जय चा गळा पकडला आणि जय आधीच पाण्यात श्वास घ्यायला धडपडत असताना वसू  ने गळा पकडल्याने तो हि आता बंद होईल लागला ..  जय एकदम शान्त झाला .. जगण्यासाठीची त्याची धडपड  एका क्षणाला थाम्बली . मृत्यूच्या अतिशय जवळ  जय होता .. त्याचे शरीर त्या पाण्यावर तरंगत  होते .. त्याचे डोळे उघडे होते त्याला पाण्यात कोणीतरी टॉर्च मारावी असा प्रकाश दिसला .. त्या प्रकाशा  कडे  तो पाहू लागला .. अंधुक अंधुक उजेडात त्याला एक आंब्याचे मोठे झाड दिसले .. त्या झाडाला एक लाल कपडा गुंडाळला आहे .. त्या अंब्याच्या झाडाच्या मागे एक विहीर दिसली .. जय  ने त्या अंधुक प्रकाशात विहरीत वाकून बघितले तर एक छोटुसे बेबी जय कडे बघून रडत होते  .. त्या बाळाला पाण्यात बघून जय घाबरला आणि तो ओरडू लागला .. " बाळ आहे तिथे .. बाळाला कोणी टाकले आत .. बाळाला बाहेर काढा .. असे तो जोरात जोरात ओरडत होता ..

“जय .. जय .. जय ...... काय होतय .. ज... य... का... य... हो...त ... य .. जय काय होतंय " अशा मागून हाका ऐकू येऊ लागल्या आणि जय ने डोळे पटकन  उघडले .. तर तो घामाघूम झाला होता आणि .. वसू  रडत रडत .. त्याला हलवून  उठवत  होती

जय ने डोळे उघडल्यावर वसू ने त्याला घट्ट मिठी मारली .. जय मात्र अजूनही त्या धक्कयातच होता .. काय होते हे .. स्वप्न .. छे .. हे असले स्वप्न मला कधीच नाही पडले .. मी नक्कीच मरणाच्या  दारातून परत आलोय .. माझा आत्मा माझे शरीर सोडता सोडता राहिलाय .. असेच काहीसे त्याला वाटू लागले होते ..

वसू  ने त्याला प्यायाला पाणी दिले ..

वसू " जय .. काय होतंय .. चल आपण डॉक्टरकडे जाऊ या .. चल .. अरे तू किती जोरात पाय मारत  होतास  बेड वर .. जसे कोणीतरी तुझा गळा पकडलाय असेच काहीसे करत होतास तू .. "

वसू  त्याच्या डोक्याचा घाम पुसू लागली .. त्याचे अंग पाण्यात बराच वेळ भिजल्या सारखे थंड  होते .. जय ची हि अवस्था बघून वसू  मात्र घाबरून गेली होती .. त्याच्याकडे  पाणीदार डोळ्यांनी एकटक पाहत होती ..

जय ला घट्ट मिठीत घेतले होते तिने .. ढसा ढसा  रडत होती ..

वसू –“जय आपल्या दोघांना काही तरी झालेय .. आपल्या संसाराला नजर लागलीय .. जय काय काय होतय घरात .. अचानक दार काय तुटतंय ,, माझे पाय काय दुखायला लागतात .. आता तुला हे असले स्वप्न ? आणि बाळ ? बाळाचे काय ? काय स्वप्न बघितलेस .. जय तू खूप घाबरला होतास .. बघताना मला असे वाटत होते कोणीतरी तुला माझ्या पासून हिरावून नेतय  .. एकेक श्वास घ्यायला तू तडफडत होतास .. किती वेळ ची मी तुला आवाज देत होते .. गदागदा हलवून उठवण्याचा प्रयन्त करत होते ..”

🎭 Series Post

View all