परकाया भाग ६१

th this part vasu attcks on samira and rahul and jay also

परकाया भाग ६१

क्रमश : भाग ६०

राहुल समीरा कडे एकटक बघत होता पण काहीच बोलत  नव्हता ..  राहुल ने थोडा पुढाकार घेऊन समीरा ला प्रपोझ करायला पाहिजे होते पण राहूल कमिटमेन्ट ला घाबरत होता .. त्याला समीरा आवडतेय हे त्यालाही माहितेय पण कमिटमेन्ट करायाला धजावत नव्हता "

राघव " समीरा .. तुला कदाचित मी बोलतोय ते पटणार नाही .. पण सांगतो जे होते ते चांगल्या साठीच होते .. तेरा वाला अभितक सामने आया  नहीं हैं.. "

राहुल " मेरी वाली भी नहीं आई है .. पण मी ओळखणार कसा कि हि मेरी वालीच आहे .. " राहुल मुद्दाम राघव ला छेडतो

राघव " कळेल तुला बरोबर .. श्वास अडकतो .. कारण हृदय त्याचा ठोके देण्याचा ताल चुकवतो मग बरोबर कळते "

जय " माझा तर ठोका लहानपणीच चुकला होता .. हे मला खूप उशिरा कळले " आणि हसायला लागला ..

समीरा " जय म्हणजे बरं झाले आपला ब्रेक अप झाला .. कारण तुला बघून मला असे काही झाले नव्हते .. हा पण बुद्धीला पटले होते .. यु आर दयाट काइंड ऑफ गाय कि आय विल बी हैप्पी .. सो आय अकॅसेप्टेड युअर प्रोपोझल "

जय " पण तुझा ड्रीम पार्टनर कसा असावा असे तुला वाटते ?"

समीरा " आय डोन्ट नो ..मी कधी विचार केला नाही .. एवढं आहे ..लुक्स , पैसा, प्रेस्टिज , या पेक्षा तो केअरिंग असला पाहिजे .. मी काही मागायच्या आत त्याला कळले पाहिजे कि मला काय पाहिजे आणि .. त्याच्या बरोबर असताना मला सेफ वाटले पाहिजे .. "

राघव " मी केअरिंग आहे ग .. यु कॅन थिंक अबाऊट मी " आणि हसायला लागतो

समीरा " हो पण तू खूप बोअरिंग आहेस .. तुला मी झेपणार नाही .. पब , डान्स , पार्टीस , फॅशन यात कशातच इंटरेस्ट नाहीये .. बरोबर ना .. आय डोन्ट वॉन्ट फादर " आणि ती पण हसायला लागते

राहुल " अरे यार समु .. तू ना एवढं का बोलतेस .. एखाद्याला खूप लागून जाते वाक्य .. "

समीरा " सॉरी राघव .. यु आर गुड पर्सन विथ गोल्डन हार्ट .. हुशार आहेस .. पण मेरे टाईप के   नहीं हो यार तुम .. "

राघव " अरे .. मी पण मज्जा केली .. मी आता जय च्या गावालाच जाणार आहे सुरु ला भेटायला .. कदाचित माझी सोलमेंट असेल ती ... बाकी काही नसले तरी वसू ची सावली तिच्यावर पडलीय ना म्हणजे ती चांगलीच  असेल  "

राहुल " अरे जय .. हा बघ .. वसू हा  पॅरामीटर लावलाय ह्याने "

जय " त्याची विकेट तर वसू ला बघून पडलीच होती .. हे माहितेय मला .. तरी त्याला सहन करतोय मी .. कारण तो खरच गोल्डन हार्ट आहे "

राघव " थँक यु .. तशीही आता वसू  मला बहिणी सारखी आहे .. पर  स्त्री माता /बहीण या विचारांचा आहे मी "

राहुल ने कोपरा पासून हात जोडले त्याला

जय " अरे वसू  ने सगळ्यां ना आईस क्रिम आणायला सांगितले होते .. चला आपण खाली जाऊन आइस क्रीम घेऊन येऊ "

समीरा " मी थांबते इथे .. तुम्ही तिघे जाऊन घेऊन या "

राहुल " तुला बटर स्कॉच ना "

समीरा " एस "

राघव " अरे वाह .. न सांगता कळले राहुल तुला  "

राहुल " राघव .. चल .. खाली ..तुला कोणता फ्लेवर हवाय .. "

बोलत बोलत तिघे खाली गेले .

समीरा एकटीच सोफ्यावर शान्तपणे बसली होती .. विचार करत होती .. कोण असेल माझा लाईफ  पार्टनर .. जय नंतर .. त्याही पेक्षा जय च्या आधी पासून मी राहुल बरोबरच आहे .. त्याला मी न सांगता माझे सगळे कळते .. माझी काही चुकले कि लगेच पॉईंट आऊट पण करतो .. त्याच्या बरोबरच तर नेहमी ..सेफ असते .. राहुल आहे का ? माझा पार्टनर ?पण हृदय चा ठोका चुकणे वगैरे असे का होत नाही दोघांनाही .

तेवढयात वसू चालत हॉल मध्ये आली .. वसू ची नजर शून्यात होती .. तिचे डोळे लाल .. रक्ती लाल होते ..

समीरा तिला बघून एकदम घाबरलीच .. आणि ताडकन सोफ्यावरून उठली ..

वसू ह्या प्रकारे चालत होती ते पाहणे सुद्धा खूप भीती दायक हिते .. एखादी डेड बॉडी चालावी तशी वसू चालत होती .. जय ने तिला मसाज देताना तिची वेणी सोडली होती .. कमरे पर्यंत लांब मोकळे सोडलेले केस वसूचा  अर्धा चेहरा झाकत होते ..

समीरा खूप घाबरली होती .. लिटरली घरात ल्या  घरात  वसू पासून लांब पळत होती .. पण एक ठिकाणी वसू   ने तीला पकडलेच ..

वसू तिच्याकडे लाल डोळ्यांनी पाहत होती

समीरा च्या  डोळ्यात भीती , अश्रू होते .. छातीत धडधड होत होती .. घशाला कोरड पडली .. शब्द निघेना तोंडातून .. तिने थरथरत्या हाताने मोबाइल डायल केला राहुल ला .. कॉल केला पण बोलायच्या आत मोबाइल खाली पडला

वसू  ने तिला  मानेला पकडले

समीरा " सोड मला .. वसू .. प्लिज यु आर हर्टींग मी .. "

वसू  ने तिला फेकून दिले .. ती समोरच्या भिंतीवर जाऊन आपटली .. तिच्या डोक्याला मार लागला

समीरा रडू लागली ..  उठून घरा बाहेर जायला बघत होती .. ती दार उघडायचा प्रयत्न करत होती तर वसू  ने तिला पुन्हा मागून पकडले आणि उचलून पुन्हा आतमध्ये फेकले ..  समीरा गॅलरीच्या काचेवर आपटली आणि काच फुटली आणि तिच्या  अंगात काचा घुसल्या

समीरा " मी काय केलंय .. प्लिज  मला सोड ..” लिटरली थरथरत कापत समीरा बोलत होती

 वसू " जय फक्त वसू चा आहे .. त्याच्या पासून लांब राहायचं .. " कापरा .. भयानक  आवाज .. धमकी असल्या सारखा आवाज .. "

समीराने तो आवाज ऐकून कानावर हात ठेवले .. तिने पुन्हा समीराला उचलले

समीरा ला खूप मार  लागला होता .. हातातून .. पायातून रक्त येत येऊ लागले .. डोक्याला .. जखम झाली होती .. समीरा ची ताकद संपली होती .. नाका तोंडातून रक्त येत होते आणि मुका मार पण खूप लागला होता ,, त्यामुळे उठून पळता हि येत नव्हते  आणि आता तर तिला आपले मरण आलय असेच वाटू लागले ..

वसू  ने समीरा ला हवेत उचलली आणि आता तिला खाली आपटणार तोच हे तिघे दार उघडून धावतच आत आले .. समोरचे चित्र बघून तिघेही घाबरले

जय " काम डाऊन .. वसू .. तिला खाली ठेव .. वसू  मी काय सांगतोय .. तिला खाली ठेव .. " जय लिटरली ओरडलाच

वसू ने तिला खाली टाकले .. राहुल ने तिला पुढे होऊन पकडले .. ती खाली न आपटता राहुलच्या अंगावर फेकली गेली

जय ने मागून वसू ला पकडले ति च्या काना  जवळ " वसू .. वसू  .. काय करतेय .. काय होतय.. तू वसू  आहेस .. वसू .. तू स्वतःला विसरू नकोस .. वसू .. ती आपली समीरा आहे .. वसू .. काय करते हे " "

तर वसु ने जय ला पण जोरात धक्का दिला तर जय समोरच्या दारावर जाऊन आदळला ..

राघव आणि राहुल पण ते दृश्य बघून घाबरले

वसू " तू फक्त वसू चा आहे .... "

जय " वसू .. वसू .. "

राघव त्याची रुद्राक्ष ची माळ शोधू लागला

वसू पुन्हा समीरा कडे गेली आणि तिची मान  पकडणार तर राहुल ने तिला बाजूला केल .. तर वसू ने राहुल ची मान पकडली .. आणि त्याला वर उचलले .. राहुल श्वास घ्यायला तडफडू लागला .. लाल झालेला तो .. पाय झाडत होता ..

जय ला डोक्याला लागले होते .. तसाच उठला आणि बाथरूम मधून गर पाण्याची अक्खी बदली त्याने वसू च्या अंगावर टाकली ..  राघव तिच्या  समोर रुद्राक्ष ची माळ घेऊन उभा राहिला .. वसू  एक मिनिट स्तब्ध झाली . वसू  नखशिकांत भिजली तशी ती कोलॅप्स झाली आणि तिथेच जमिनीवर खाली पडतच होती तर जय ने तिला हातात पकडले.

जय च्या डोळ्यात पाणी होते .. समीरा सिव्हिअरली इन्जुअर्ड .. वसू  ला बघू का ? राहुल ला ? का समीराला ? का स्वतः ला असे झाले होते त्याला ..

राघव ने राहुल ला प्यायला पाणी दिले

समीरा कोपऱ्यात रडत बसली होती .. तिला खूप लागले होते .. राघव ने तिला पण पाणी पाजले .. बिचारी थरथरत .. रडत .. पाणीही पित  होती .. खूप  घाबरली होती .. ती

जय ने वसू  ला उचलून आतमध्ये बेड रूम  मध्ये नेले .. तिचे ओले कपडे बदलून आणि केस पुसून तिला झोपवले

राघव फस्ट एड बॉक्स घेऊन आला

समीरा च्या हाताला डेटॉल ने क्लीन करू लागला .. समीरा जी घाबरली होती ती थरथरतच होती .. जे काही तिने पहिले ते खूपच भयानक होते ..

राहुल चा श्वास जरासा नॉर्मल झाला .. त्याच्या .. हाता पायातून रक्त येत होते .. मानेला वळ आला होता ....

राहुल समीरा जवळ गेला आणि तिला घट्ट मिठी मारली .. " हाऊ आर यु ?" इट्स ओके .. घाबरू नकोस .. काही झालेलं नाहीये .. इट्स ओके .. "

समीरा त्याच्या छातीवर डोके ठेवून खूप जोरात रडत होती .. राहुल ति च्या डोक्यावरून केसां वरून हात फिरवत होता .. तिच्या पायात काचा होत्या .. कपाळावर काचा रुतल्या होत्या .. शरीर पेक्षा मनावर जास्त घाव होता .. ती एकदम घाबरून गेली होती "

राहुल ने तिला दोन्ही हातात उचलले

 राहुल " जय .. आम्ही दोघे निघतो रे .. वसू ची काळजी घे .. आपण बोलू उद्या "

जय " राहुल .. सॉरी यार .. हे काय होऊन बसले .. तुला पण लागलंय .. राघव तू जातोस का त्यांच्या बरोबर दवाखान्यात "

राहुल " नाही नको अरे .. मी जातो हिला घेऊन .. राघव .. तू त्याला थोडी इथे मदत कर .. तो हि इन्जुअर्ड आहे .. "

राघव " हो ठीक आहे .. राहुल .. तू पण इन्जुअर्ड आहेस .. जरा सावकाश गाडी चालव .. तुझ्या दंडात काच आहे .. "

राहुल " हो .. मी पण जातोच डॉक्टरकडे "

समीरा आणि राहुल डॉक्टर कडे गेले ..

राघव " जय .. उद्या जेव्हा वसू ला कळेल कि तिने सगळ्यांना इन्जुअर्ड केलंय तेव्हा ती कोलॅप्स होईल .. उद्या तिच्या कडे खूप लक्ष ठेवायला लागेल "

जय च्या  डोळ्यात नुसते पाणी येत होते .. " हो .. बघतो .. गरज पडली तर तुला कॉल करेन .. "

राघव ने सगळ्या काचा गोळा केल्या .. आणि तो हि जय ला सांगून घरी निघून गेला .

🎭 Series Post

View all