परकाया भाग ५९
क्रमश: भाग ५८
जय ला वाटले पोलिसांची मदत तर आपल्याला लागणारच आहे .. हा माणूस जरा बरा दिसतोय .. ह्याच्याशी मैत्री करू न ठेवावी
जय " चला सर .. बायकोच्या हातचा चहा तर पियुन बघा .. फक्त चौकशी साठी आलात हे सांगू नका .. ,माझा मित्र म्हणून सांगा "
जय ने त्याला आग्रह करून आणलेच वरती ..
जय " वसू अग .. हा बघ माझा मित्र आलाय .. अरे ये ना .. बस .. बस "
वसू किचन मधेच होती ..
जय किचन मध्ये गेला आणि स्वतः पाणी घेऊन आला
जय " वसू चहा बनवशिल का ? ये ना बाहेर ओळख करून देतो "
वसू हात पुसत बाहेर आली .. पोलिसांचा ड्रेस बघितल्यावर जरा चमकलीच
वसू " नमस्कार !"
पोलीस " नमस्कार "
जय ला तिने लगेच आत बोलावले " पोलीस कधी पासून तुझे मित्र झाले ? कोण आहे ? "
जय " तू चहा टाक .. मग बोलू "
पोलीस " मिस्टर जय .. या तुमच्या वाईफ काय करतात .. ?"
जय " ती अमुक अमुक कॉलेज ला प्रोफेसर होती .. आता घरीच असते "
पोलीस " तरीच मी म्हणतोय मी यांना कुठे पहिले ? माझी बहीण त्याच कॉलेज ला आहे तिला सोडायला मी जात असतो कॉलेजला .. तेव्हा पहिले असणार .. "
जय " अरे वाह .. "
पोलीस " मिस्टर जय .. तुम्हाला झालेल्या त्रास बद्दल सॉरी .. काय करणार माझे कामच आहे हो ते .. त्या वॉचमन ने तक्रार केली म्हटल्यावर काय करणार आम्ही "
जय " इट्स ओके .. म्हणूनच मी तुम्हाला माझ्या बायकोला भेटवले .. तो वॉचमन असताना नाही भेटवले कारण तो मला असे लुक्स देत होता कि बघा तुमची कशी जिरवली "
पोलीस " जाऊ दे असतात असे काही महाभाग .. मला म्हणाला त्या बाईंनी मला मानेला पकडले आणि एका हाताने उचलले होते .. मी म्हटले काय बाई आहे का सुपरमॅन आहे .. अशी एका हाताने कोणती बाई त्या ला उचलेल "
जय " काही नाही हो .. बघितलेत ना व ड्युटी दारू पित होता तो .. आणि मग नशेत काहीतरी दिसले असेल त्याला .. "
पोलीस " त्यात तुमची बायको केवढी नाजूक आहे .. आय मिन त्या असे करूच शकणार नाहीत .. नाही का ?"
जय " हमम.. "
तेवढयात वसू चहा घेऊन आली
पोलीस " मॅडम तुम्हाला प्रिया बोरकर माहितेय का ?"
वसू " हो .. माझी एक स्टुडंट आहे ती .. "
पोलीस " मी तिचा मोठा भाऊ आहे "
वसू " हो का .. ग्रेट .. मग तुम्ही जय ला कसे ओळखता?"
इथे पोलिसांचीच उलट तपासणी सुरु झाली होती .. जय गालातल्या गालात हसू लागला .. मनात म्हणाला " घे साल्या दे आता उत्तर दे .. माझ्या बायको ची तपासणी करतोस काय ? "
तसा तो पोलीस गडबडला .. आणि जय कडे बघू लागला
पोलीस " ते मी यांच्या ऑफिस ला गेलो होतो एकदा .. तिकडे भेट झाली होती .. "
वसू " मग आज इथे कसे ? आय मिन या सोसायटी मध्ये काही काम निघाले का ?"
जय ला हसू कंट्रोल होत नव्हते .. "बायकोची तपासणी एकदा मागे लागली तर कोणताच पोलीस टिकणार नाही .. नाही का सर ?" अन जय हसू लागला
पोलीस पण उसने हसू तोंडावर आणून " हो ना .. मिस्टर जय "
वसू " बर .. चालू द्या तुमच्या गप्पा मी आता जाते .. "
पोलीस " मॅडम .. वॉचमन चे आणि तुमचे काही झालेलं का ?"
जय मनातून घाबरला आता वसू काय बोलतेय "
वसू " कोणता वॉचमन ?"
पोलीस " तो तुमच्या सोसायटीतला वॉचमन जो बायकांना त्रास देत होता त्याचे आणि तुमचे काही झालेले का ?"
वसू " हो .. तुम्हाला कोण बोलले ?"
पोलीस " तुम्ही मला उलट प्रश्न विचारु नका हो .. मी तुमचा स्टुडंट नाही .."
जय " अहो .. बोरकर .. तू काय आमची तपासणी करायला आलास कि काय ? काय विचारायचे ते मला विचारा ?"
पोलीस " मला मॅडम ला या साठी विचारयचेय कि त्याने मॅडम ला काही त्रास दिला असेल तर त्याला आतच टाकतो "
वसू " नाही मला नाही .. पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय .. एका बाईला त्याने मुद्दामून धक्का देताना "
पोलीस " ठीक आहे .. मी निघतो .. थँक्स फॉर द टी "
जय त्याला बाहेर पर्यंत सोडायला गेला
पोलीस " जरा अलर्टच रहा काय ? मॅडम ची काळजी घ्या .. तशा त्या एकदम साध्या आहेत "
जय " तेच तर मी सांगत होतो तुम्हला .. उगाच माझ्या बायको चे नाव घेतले त्याने "
पोलीस " ठीक आहे मी जातो आता .. काही मदत लागली तर माझा नंबर घेऊन ठेवा .." दोघांनी नंबर एकेमकांना दिले आणि पोलीस गेला .
जय आत आला आणि सुटकेचा श्वास त्याने टाकला .. वसू ने त्या वॉचमन ला मारायचा प्रयत्न केला त्याच्या दुसऱ्या दिवशीच जय ने सकाळी cctv फुटेज डिलीट करून तिथे त्याचा आधीचा फुटेज कॉपी करून ठेवेले होते .. त्यामुळे cctv फुटेज मध्ये काहीच मिळाले नाही आणि त्यात वसू त्याच्या बहिणीच्या कॉलेज ची प्रोफेसर निघाली त्यामुळे पोलीस ची शंका दूर झाली होती
जय घरात आला .
जय " अरे वाह ! काय मग मॅडम .. आता या शहरात पण लोक तुम्हला ओळखतात .
वसू " काहीही काय ? मी काही या माणसाला पहिले नव्हते .. तसेही आप्पा म्हणतात पोलिसांशी ना मैत्री चांगली ना दुष्मनी .. तू कशाला घरात आणलेस "
जय " अरे मुद्दामून आणला .. उद्या नताशा प्रकरणात आपल्याला पोलिसांची मदत लागणारच आहे "
वसू " जय एकदा फोन करून बघ हे लोक अजून का आले नाहीत ते "
जय " हो रे एव्हाना यायला पाहिजे होते "
तेवढयात राघव आला ..
जय " अरे ये राघव बरं झाले तू आलास ते "
वसू ने त्याला पाणी दिले .
राघव " जय माझ्या सरांचा मेल आलाय .. पुढल्या आठवड्यात ते याच शहरात येणार आहेत .. तेव्हा त्यांना आपण भेटू "
जय " थँक गॉड .. गॉड इज विथ अस .. वसू .. देव आपल्या पाठीशी आहे .. तू ना वसू आता थोडी साथ दे .. एकदा का हे प्रकरण मिटले कि संपले सगळे .. "
जय तिथे राघव आहे हे विसरून गेला आणि तिथेच वसूला त्याने उचलून घेतले .
वसू " जय .. काय हे .. जरा आजू बाजूचे भान ठेव ना .. शी बाबा .. तू असे करतो ना .. " आणि तिने डोळ्यानेच त्याला सांगितले राघव आहे इथेच
जय पण जरा ओशाळला " सॉरी राघव .. सॉरी .. मी जरा फ्रेश होऊन आलोच " आणि आतमध्ये पळाला
वसू किचन मध्ये पळाली
आणि राघव गॅलरीत जाऊन बसला
जय पाच एक मिनिटाने बाहेर आला .. राघव गॅलरी मध्ये एकदम शान्त बसला होता
जय " अरे .. राघव तू इकडे का बसलास ?" ये ना आत "
राघव " जय .. मी वसू ची पत्रिका काढली .. मी पत्रिका चेक पण केलीय .. वसू च्या आयुष्यातले हे वर्ष खूप क्रिटिकल आहे .. ह्यातून निभावली ना ती तर कधीच मागे वळून पाहणार नाही "
जय " निभावली म्हणजे ..? निभावणारच ? आपण काय सगळे करतोय ? हे सगळे कशा साठी आहे ? इतक्यात हार मानून चालणार नाही "
राघव " हो रे .. पण तू वसू चा चेहरा बघितल्यास का आज ? आज किती निस्तेज दिसतेय ती .. डोळ्यांखाली काळे .. झालेय .. ओठ सुकलेत .. किती बारीक झालीय "
जय " कुठे ? तुला ती कुरूप दिसतेय का ? मला तर ती नेहमी सुंदरच दिसते .. मला कधी हे जाणवले नाही ? तुला असे का म्हणतोय ?"
राघव " जय .. ती सुंदरच आहे .. प्रश्न तिच्या सुंदरतेचा नाहीये .. प्रश्न तिच्या तब्बेतीचा आहे .. तू दुर्लक्ष नको करुस त्याकडे "
जय " मी दुर्लक्ष करतोय तिच्याकडे .. मी आता फक्त नोकरी सोडून घरी बसायचा बाकी राहिलोय .. २४ तास तिच्या बरोबर असतो .. एक मिनिट तिला एकटीला सोडत नाही .. बघ ती कोण रिचा का कोण आहे ती .. तिला बाहेर येऊनच देत नाही मी इतके तिच्यावर प्रेम करतोय मी "
राघव " मला तीच भीती आहे ? तिला म्हणजे त्या आत्म्याला जर तू आवडायला लागलास ना तर ती कधीच तुम्हला दोघांना सोडणार नाही .. तीला आयता संसार मिळालाय .. तिच्या सगळ्या ईच्छा ती वसुच्या शरीरात राहून पूर्ण करेल .. मग तिला तिचे वेगळे अस्तित्व दाखवायची गरज च नाही .. पण या सगळ्यात वसू च्या शरीराची नासाडी होतेय .. ऱ्हास पावतय ते "
जय " शिट !! मग मी नक्की काय करायला पाहिजे ? यार .. आता ? "
राघव " ती ला आपल्याला हाकलून काढायला लागणार आहे ? काहीतरी लालूच ? किंवा तिची नक्की ईच्छा काय आहे ? हे सगळे वसू शी सेशन घेतल्यावरच कळणार आहे "
जय " यार .. मागच्या वेळेला बघितलेस ना .. वसू कोमात जायची राहिली होती .. सेशन म्हटले कि मलाच भीती वाटते "
राघव " तुझ्या पेक्षा मला .. काही कमी जास्त झाले तर .. वसू च्या जीवाशी खेळ नको "
जय " अजून थोडी माहिती मिळालीय .. जय ने मघाशी चा रेकॉर्ड त्याला ऐकवला "
राघव " जय .. वसू जे हे सगळे सांगते ना ते सगळे नताशाच्या आत्म्याचे असले पाहिजे .. कारण वसू ला जेव्हा पहिल्यांदा त्या शक्तीने ताब्यात घेतले तेव्हा ती तशीच गॅलरीत काठावर उभी राहिली होती .. याचा अर्थ तो आत्मा मी नताशा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत होता .. पण प्रत्यक्षात आत्मा स्वतःचे नाव रिचा असे का सांगतेय मग ?"
जय " तेच तर ना ? हि रिचा आली कुठून ?" मी काय म्हणतो राघव .. नताशा चा फ्लॅट वरतीच आहे आपण त्या फ्लॅट चे लॉक तोडायचे का ? म्हणजे काहीतरी माहिती मिळेल कदाचित "
राघव " एक काम कर .. त्या फ्लॅट चा मालक कोण आहे त्याचा शोध लाव ? आपल्याला फ्लॅट रेंट वर हवाय .. फ्लॅट बघायला मिळेल का ? असे विचार मग तोच आपल्याला फ्लॅट दाखवायला येईल "
जय " ग्रेट .. यार सही आयडिया दिलीस .. उद्याच कामाला लागतो "
राघव " आणि एक उद्या आपण दोघे पब मध्ये जाऊ तिथे राजीव , जॉन किंवा अरमान त्यांच्या शी काही कॉन्टॅक्ट होतोय का ते पाहू "
जय " आणि रितेश .. तो पण भेटला पाहिजे .. "
राघव " आणि एक वसू ला आता ऍडमिट करावे लागेल .. ती खूप ऍनिमिक दिसतेय .. जेवढे रक्त शरीर तयार करतय ते आता पुरत नाहीये .. त्यामुळे तिला रोज एक रक्ताची बाटली देत राहिलो तर ती शारीरिक दृष्टया खालवणार नाही .. "
जय " नको अरे .. हॉस्पिटल मध्ये ती राहणार नाही एकटी "
राघव " अरे .. एकटी कशाला ? आपण आहोतच कि ? आपण तिच्या रूम मध्ये cctv लावायचा .. म्हणजे तिच्या हालचालीवर लक्ष ठेवायचे "
जय " सॉरी पण तुझ्या phd ची केस नाहीये ती असा २४ तास तिच्यावर पहारा ठेवायला ती मेंटल नाहीये "
राघव " जय तू मला असे बोलतोस .. मी ह्यात माझा फायदा घेईन असे वाटते का तुला ? आणि असे वाटत असेल तर सॉरी .. बॉस .. आय थॉट व्युई आर फ्रेंडस "
जय " तसे नाही रे .. राघव .. मला काही सुचत नाहीये आता .. सॉरी तुला राग आला असेल तर .. तुला हर्ट करायचे नव्हते मला.. सॉरी "
राघव " ठीक आहे .. तुला जर पटत नसेल हे तर तिला रोज दवाखान्यात ने आणि एक रक्ताची बाटली लावून आण .. हे काम वाटतंय तितके सोपे नाही .. एक्सटर्नल रक्त सूट होयला वेळ लागतो .. कधी कधी पेशन्ट ला उलटी येणे .. डोके दुखणे.. असे त्रास होऊ शकतात .. म्हणून मी म्हटले "
जय " आपण एक काम करू त्या साठी प्रॉपर डॉक्टर चा सल्ला घेऊ "
राघव " ठीक आहे "
जय " रास्ता तो दिख गया है .. मंजिल भी मिलेगी ।"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा