परकाया भाग ५६
क्रमश : भाग ५५
जय " प्लिज .. स्टॉप क्राइंग .. आप पोलीस स्टेशन गयी थी क्या ?"
रिचा ची आई " हा .. अभि उधर से हि आयी हू .. "
जय " क्या कहा पोलीस ने? "
रिचा ची आई " राजीव को बेल मिल गयी .. पोलीस ने छोड दिया उसे "
जय " क्या .. अपने बोला क्यू नहीं .. आपकी बेटी के बारे में "
रिचा ची आई " जानते हो .. पोलीस स्टेशन से बाहर राजीव मुझे मिला था अकेला कह रहा था .. रिचा इज नो मोअर .. "आणि ती बाई जोर जोरात रडू लागली
जय ला हे माहीतच होते .. ज्या अर्थी तिचा आत्मा वसू च्या शरीरात आहे त्या अर्थी नक्कीच तीच्या बरोबर काहीतरी अघटित घडले आहे
जय " आपने कंप्लेंट कि है क्या ?"
रिचा " मुझे कुछ समजने नही आ राहा .. मै क्या करू ?" काय करू मी ?"
जय " एक काम करा तुम्ही पोलीस स्टेशन ला कंप्लेंट करा .. मी तुम्हला एक ऍड्रेस देतो .. तिथे येऊन मला भेटा .. मी आज रात्रीच्या फ्लाईट ने जाणार आहे .. तिकडेच तो राजीव पण असतो आपण तिकडे शोध लावू "
रिचा ची आई " तझे मालूम है ना .. वो कहा है .. प्लिज मुझसे झूठ ना बोलना "
जय " मै भी प्रॉब्लेम में हूं .. कैसे बाताऊ ? "
रिचा ची आई " जो है वो बता दे बेटा .. अब मै थक गयी हुं "
जय " आपके बेटे को कॉल कर के बुलालो .. मैं दोनो से बात करुंगा "
रिचा ची आई " वो नहीं आयेगा .. मुझसे घुस्सा है "
जय " आपके बेटे का बर्थ डे आजकल में है क्या ?"
रिचा ची आई " हा बेटा .. तुम्हे कैसे पता .. बोलो ना कहा है रिचा .. रितेश के बर्थ डे को रिचा हर साल आती थी .. आज है उसका बर्थ डे .. "
जय " काय ? इसलिये वसू कल रात आपके घर आई थी "
रिचा ची आई " कौन वसू .. तुम्हारी वाईफ का नाम वसू है क्या ?"
जय " हा .. .. "
रिचा ची आई " वही मेरी बेटी है ,, ऐसा क्यू मुझे लग रहा है ? " आणि पुन्हा ती वसू जवळ गेली आणि तिला तिच्या डोक्यावरून कपाळावरून मायेने हात फिरवू लागली
जय ला एका आईचे प्रेम दिसत होते आणि त्यांना कसे सांगावे कि वसू मधेच ती आहे .. त्या तिला जाऊन देतील का ? एका आईची माया त्यांना असे करून देईल का ?"
जय " मला तुमची मदत पाहिजे .. मला मदत कराल का ? "
रिचा ची आई " मला माझी मुलगी मिळणार असेल तर मी काहीही करेन बेटा .. बोलो मुझसे क्या मदत चाहिये तुम्हे "
जय " मेरी वसू में आपके रिचा ने परकाया प्रवेश किया है । उसकी आत्मा मेरे वसू के शरीर में आगयी है । उसे हम सब को मिलकर मुक्ती देना होगा .. तभी हम दोनो जिन्दगी जी सकेंगे "
रिचा ची आई " क्या ? ये क्या बोल रहे हो .. ये क्या हो गया मेरे रिचा के साथ " आणि ती कोलॅप्स झाली . जय ने तिला काळजीने प्यायला पाणी दिले.
रिचा ची आई " रिचा यह क्या हुआ बेटा ? इतनी दूर कैसी चली गयी .. "
जय " उसके साथ क्या हुआ है .. अभि तक कुछ मालूम नहीं है । रिचा अँड़ नताशा ये दोनो की दुसरे से कैसे जुडी है मालूम नही है .. क्युन्की रिचा अँड वसू एक दुसरे को जान ते भी नहीं थे फिर भी रिचा शर्मा ने वसू का शरीर में आना यही एक बडी मुश्किल है ।
रिचा से बात करते करते सब जनकारी निकलनी पडेगी । तभी आपकी जरुरत पडेगी .. आपकी बेटी आपकी बात जरूर सुनेगी । प्लिज आप रिचा कि आत्मा को वसू के शरीर से मुक्त करने में मेरी मदत किजीये प्लिज "
जय च्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याला आताच्या आता काहीतरी चमत्कार व्हावा आणि या सगळ्यातुन वसू बाहेर यावी असच वाटत होते .
ती बाई त्यांच्याच बेडवर वसु च्या चेहऱ्याकडे बघत अश्रू ढाळत बसली होती .. जय तिथल्याच खुर्चीत बसून शांत बसला होता ..
तेवढ्यात वसू उठली. वसू अजूनही साडीतच होती .
वसू " जय .. अरे मला उठवले का नाहीस ? किती वेळची मी झोपली होते .. "
जय - " हमम.. "
वसू " जय या बाई का सारख्या तुला भेटायला येतात ? कोण आहेत या ?"
ती बाई " हा बेटा .. तुमने मुझे नहीं पहचाना ? आज सुबह तुम दोनों मेरे घर में हि थे ?"
वसू उठली आणि जय च्या जवळ गेली ..
रिचा च्या आई ला तिला बघून पुह्ना रडायला येऊ लागले
वसू " जय ह्या का रडत आहेत ? जय बघ ना .. मला कसे तरी होतंय यांना पाहून .. असे वाटतं मी माझा आणि यांचा काहीतरी खूप जवळचा संबंध आहे .. पण काय ते मला आठवत नाही ? जय मला कसे तरी होतंय ?"
जय " अग ते .. त्यांनी तुला साडी गिफ्ट आणलीय बघ .. "
सगळा गोंधळ होऊन बसला होता .. तिला काय सांगावे हेच जय ला कळत नव्हते .. आता वसू मध्ये रिचा जागृत झाली तरी प्रॉब्लेम आहे .. त्यामुळे काय आणि कसे सांगावे हा मोठा प्रश्न होता .
जय " मी त्यांना सोडून येतो .. त्या आपल्याला तिकडे भेटतील .. " आणि जय त्यांना घेऊन रूम च्या बाहेर आला
जय " आप कैसे भी करके रिचा कि मिसिंग रिपोर्ट का पोलीस कंप्लेंट करके .. उसका एक फोटो लेकर यह ऍड्रेस पर आयीयेगा .. तो हम दोनो नताशा के रूम का ताला तोडने कि परमिशन पोलीस से लेंगे .. शायद नताशा के रूम में कुछ बात का पता लग सकती है "
ती बाई " येह नताशा कौन है । ?"
जय " नताशा मेरे बिल्डिंग में उपर रहती है .. वो वसू से मिलने आती थी । आजकाल वह भी मिसिंग है ।"
ती बाई " हे भगवान .. ये काम तो उ स राजीव का हि है .. उसने मेरी बेटी को कुछ किया है ।"
जय " इसलिये तो.. राजीव भी वहा उस शहर में होता है .. मै और वसू एकवार उसे मिले है ।रिचा अँड राजीव दोनो फ्रेंड्स है शायद "
जय ने तिला त्याचा पत्ता दिला आणि पोलीस कंप्लेंट करून त्याची कॉपी आणि रिचा चे फोटोज घेऊन तिकडे थोदे दिवस यायला सांगितले आणि मुलगा रितेश ला पण शोधायला सांगितले . आला तर त्याला पण घेऊन या इकडे "
ती बाई " ठीक हैं बेटा .. भगवान तुम दोनों कि जोडी सही सलामत रखें .. मेरी बेटी कि वजह से तुम दोनों कि लाईफ मुश्किल में आई .. पुढचे वाक्य तिला बोलवेच नाही
जय " आपकी बेटी कि जगह तो मैं और वसू नहीं ले सकता लेकिन आपके बेटे जैसा हि हु "
त्या बाईने मायेने जय च्या डोक्याव रुन हात फिरवला आणि निघून गेली .
जय आणि वसू त्या रात्रीच घरी आले . सकाळी उठून वसू पुन्हा रुटीन कामाला लागली .
जय नाश्ता करताना " वसू मी काय म्हणतो .. थोडे दिवस तू जॉब सोडून दे .. सध्या आपली खूप गडबड आहे . आता ३ महिन्यांनी आपल्याला गावी पण जायला लागेल नंदू ची डिलिव्हरी आहे .. तर थोडे दिवस तिकडे थांबशील .. आई ला मदत पण होईल .. आणि नवीन नोकरीत सारख्या रजा घेता येत नाहीत . "
वसू " पण मी घरात बसून कंटाळा येईल मला .. "
जय ला तिची काळजी वाटत होती .. इथून पुढे तिची तब्बेत थोडी वीक होईला लागली होती .. त्याला ते स्पष्ट दिसत होते .. तिच्या डोळ्याखालीहळू हळू काळे दिसायला लागले होते .. कधी डोके दुखतंय .. कधी पोट दुखतंय अशा गोष्टी होत होत्या . अशक्तपणा ने तिला घरातले काम आणि नोकरी जमणार नाही .. त्या पेक्षा ती घरी राहील तर तेवढा अराम होईल .
वसू थोडी नाराज झाली .. आज पण ती छान तयार होऊन बसली होती कॉलेज ला जायला
जय " ऐक ना .. म्हणून तुंला म्हटले तू घरात नुसते बसण्या पेक्षा Phd ला ऍडमिशन घे .. तेवढाच अभ्यास करायला वेळ मिळेल .. आणि तुझ्या करिअर वर फारसा फरक नाही पडणार "
वसू " का ? तुला मी नोकरी केलेली आवडत नाही का ? "
जय " अग असे नाही ग .. तुझी तब्बेत बघ ना .. आणि तुला माहितेय आपण कोणत्या फेज मध्ये आहोत .. हे संकट वाटतंय तेवढे सोपे नाहीये .. यातून बाहेर पडणं महत्वाचे आहे .. त्यासाठी तुझ्या शरीराची ताकद कमी पडतेय .. राघव बरोबर बरेच सेशन घ्यायचे आहेत .. कदाचित पोलिसांची मदत घ्यावी लागेल ..अजून पुढे काय वाढून ठेवलंय ते माहित नाहीये .. मी पण विचार करतोय मी थोडे दिवस मी " वर्क फ्रॉम होम मिळतंय का ते बघतोय .. म्हणजे मी २४ तास तुझ्या बरोबर राहीन .. "
वसू " जय मी ठीक होईल ना .. आपला संसार चांगला होईल ना .. "
जय " त्यासाठीच हे सगळे चालू आहे .. मला तुझी खूप काळजी वाटते ग .. तू हल्ली खूप नाजूक झालीय .. थोडे तुझ्या तब्बेतीकडे लक्ष द्यायला पाहिजे .. तुझे शरीर आणि आत्मशक्ती कमजोर पडून चालणार नाही .. " बोलता बोलता जय च्या डोळ्यातून पाणी येऊ लागले .. त्याला पण एक हुरहूर लागली होती .. नक्की काय होणार आहे .. कशासाठी मनातून तयारी करायची हेच कळत नाहीये .. फक्त दोघे एकमेकांसाठी वाचले पाहिजेत त्यासाठी काहीही करायचे हे त्याने पक्की ठरवले होते "
वसू त्याच्या मिठीत होती .. त्याचे डोळे पुसत होती .." जय मी मरणार नाही ना .. मला खूप भीती वाटतेय .. "
जय " असे काहीही होणार नाही .. हि आपली परीक्षा आहे असे समज .. काहीही करून यात पास झालोच पाहिजे .. "
दोघे एकमेकांना विश्वास देत होते ... " लेट्स फाईट टुगेदर " पण मनातून दोघेही घाबरले होते ..
ऑफीस मध्ये गेल्यावर जय ने राहुल आणि समीरा ला या गोष्टी सांगितल्या
सुरुवातीला त्या दोघांना पण ह्यावर विश्वास बसत नव्हता ..
समीरा " जय .. हे काय होऊन बसले .. आता कुठे तुमचा नवीन संसार सुरु होत होता आणि हे सगळे होऊन बसले ?"
जय " काय सांगू ? देव कसली परीक्षा बघत आहे काय माहित ? "
राहुल " जय माझ्या पप्पांच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत .. आपण त्यांची मदत घेऊ .. काही मेडिकल इमर्जंसी आली तर आपण तिला मोठ्या हॉस्पिटल ला ऍडमिट करू ?"
समीरा " मी संध्याकाळी घरी येतेय .. तिला भेटायला .. "
राहुल " हो .. मी पण येईन "
राहुल " जय .. तू काळजी करू नकोस आम्ही तुझ्या बरोबर आहोत .. आपण सगळे मिळून बाहेर काढू वसू ला यातून "
जय ला दोघांनी घट्ट मिठी मारली .. जय ला मनातून खूप उभारी आली होती .. मित्रांचा विश्वास मिळाला होता आणि आलेल्या परिस्थिती ला सामना करण्यासाठीची ताकद वाढली होती "
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा