परकाया  भाग ५५

in this part vasu slaps rajiv

परकाया  भाग ५५

क्रमश : भाग ५४

जय " अग ते ह्या आंटी ला तुला भेटायचे होते .. तर मी रात्री तू झोपलेलीस तेव्हा आणले इकडे .. चल जाऊ आपण  घरी ?"

वसू त्या बाईकडे एकटक बघत होती ..  ती बाई  पण वसू कडे एक टक बघत होती

ती बाई " क्या तुम जानतो हो उसे ? कैसी हैं वो ?"

जय " शायद मुझे अभी जाना चाहिये .. मुझे आप आपका कॉन्टॅक्ट नंबर देना चाहोगी ?

त्या बाईने जय ला तिचा नंबर दिला

ती बाई " आपकी वाईफ बहुत सुंदर है .. मेरी बेटी भी ऐसी हि है .. इसलिये मुझे पिछेसे मेरी बेटी आयी है ऐसा लगा .." तिने मायेने वसू च्या डोक्यावरून हात फिरवला .. आणि तिच्याकडे बघून एक अश्रू आला .

वसू " चल ना जय .. मी अशी नाईट ड्रेस वर घरातून बाहेर जात नाही तुला माहितेय ना .. मग मला का आणलेस असे ?"

जय " सॉरी .. चल आता निघू "

जय आणि वसू त्याच्या घरातून बाहेर पडले .. वसू निघे निघे पर्यंत त्या बाई कडे बघत होती .. आणि नर्वस होत होती .. वाटेत तेच मंदिर तिला दिसले आणि जय च्या मागे लागली  मला  मंदिरात जायचंय आत्ता

जय " आत्ता ? अग  फ्रेश होऊन येऊ "

वसू "  नको .. आता मला असे वाटतंय तर आत्ताच जाऊ .. शेवटी जय तिला घेऊन त्या मंदिरात गेला .. वसू ने देवी चे प्रसन्न रूप पहिले .. मनापासून डोळे मिटले आणि देवीची प्रार्थना केली " हे देवी माँ ! .. मला आणि जय ला कधीच वेगळं करू नकोस .. आणि तिकडूनच जय कडे तिने पहिले तर जय तिलाच पाहत होता .. तिने त्याला डोळ्याने खुणावले .. मला काय बघतोस ? देवीला नमस्कार कर ?"

जय ने पण तिथूनच नमस्कार केला

आता वसू एकदम नॉर्मल होती .. नॉर्मल बोलत होती  .. ती नॉर्मल असली कि किती खुश असायची .. जय पाशी सगळा  जीव अडकलेला असायचा .. त्याच्या  अवती भवती तिचे विश्व असायचे .

दोघे पुन्हा हॉटेल ला आले ..

जय " आज माझी कॉन्फेरेंस आहे माहितेय ना ? तेवढा वेळ तू काय करशील ? इथे रूम वर थाम्बशील का ? माझ्या बरोबर येशील आणि मग तिथे एक मॉल आहे तिथे बसशील ?"

वसू " तुझ्या बरोबर येते .. आणि तिथेच बसून राहीन ?"

जय " ठीक आहे .. तिथे एक ब्युटी पार्लर आहे .. तुला पाहिजे तर तिथे जा .. हेअर स्पा वगैरे करायचा तर कर .. तेवढाच वेळ पण जाईन आणि तुला फ्रेश वाटेल "

वसू " चालेल .. जय मी हि साडी घालू का आज ? "

जय " काहीही घाल ..तुला जे पाहिजे ते घाल .. सगळ्यातच तू छान दिसतेस .. "

वसु " हमम.. म्हणजे काकूबाई ना .. "

जय " काय होतंय .. मग काल  घेतलेल्या पैकी एखादा ड्रेस घाल .. "

वसू " ते ड्रेस एकदम स्टयलिश आहेत मला लाज वाटते तसले ड्रेस घालायला .. "

जय " मग काय पूजा करायला घेतलेस ते ? एकदा घालून बघ .. सुरुवातीला वाटते ऑड एकदा घातला कि हळू हळू सवय होईल .. आणि इकडे कोण आहे तुला बघायला ? अनोळखी लोकांच्यात घालायचे

वसू " नको मी साडीच घालते ? उगाच कोणी तुझ्या ऑफिस मधल्या लोकांनी बघितले तर तुला ऑकवर्ड होईल "

जय " एक मिनिट .. वसू  तू लोक काय म्हणतील याचा का एवढा विचार करतेस ? आणि मला अजिबात कशानेच ऑकवर्ड होणार नाहीये .. तुला जे पाहिजे ते तू बिनधास्त घाल .. "

जय कॉन्फरन्स ला जायला तयार होत होता आणि ती पटपट तिचे आवरू लागली .. शेवटी तिने समीराने तिला घेऊन दिलेला स्लिव्हज  लेस ब्लॉउज आणि साडी घातली .. ती  वेणी घालत होती

जय तेवढयात बाथ घेऊन बाहेर आला ..

जय तिच्या कडे बघून गालात हसू लागला  .. ती त्याला डोळ्यांनीच विचारत होती " हे कसं दिसतंय "

जय सांगू .. " इकडे ये मग सांगतो .. कानात .. "

वसू " सांग ना .. चालेल का ? "

जय " नाही चालणार .. एवढी ..सूंदर दिसलीस तर लोक मला म्हणतील  माकडाच्या हातात कोलीत कोणी दिले "

वसू " म्हणजे ?"

जय ने तिला मागून मिठीत घेतले आणि कानात हळूच म्हणाला " म्हणजे मी माकड "आणि हसायला लागला

वसू पण हसायला लागली .. " चल .. तुझे आपले काहीतरीच "

जय " कॉन्फरन्स थोडी पोस्टपोन करू का ?"

वसू " का?"

जय " इकडे  बघ मग  सांगतो .. "

वसू " ओह .. चल गपचूप … मला हेअर स्पा करायचाय .. "

जय ने तिच्या गालावर एक हलका किस केलं.

जय " एक मिनिट एक छान गाणं लावतो ..  जय ने मोबाइल वर गाणे लावले आणि दोघे डान्स करू लागले . दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले आणि डोळ्यातूनच एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत होते.

काही वेळा एकमेकांच्या सहवासात पण खूप समाधान असते तसे दोघे सहवासात विश्वासात आणि प्रेमात  समाधानी होत होते 

 जय ने तिच्या कपाळावर किस केले आणि आवरायला लागला .. जय  मस्त ब्लेझर घालून तयार झाला ..

दोघे त्याच्या कॉन्फरन्स च्या इथे आले .. जय ने तिला पार्लर ... वॉशरूम .. आणि कुठे बस .. वगैरे सगळे सांगितले आणि तो कॉन्फरन्स ला निघून गेला .

वसू पण तिथल्या एका कॉफी शॉप मध्ये थोडा वेळ बसली .. आज साडीत कमालीची सुंदर  दिसत होती .. एकटीच असल्याने येता जाता कोण कोण तिच्याकडे बघत होते ..

थोड्यावेळाने ती स्पा करायला जाणार होती ..

कॉफी घेतली आणि टाइमपास म्हणून मॉल मध्ये फिरली .. पुन्हा एका टेबल वर बसली .. तर एका वेटर ने तिला एक ड्रिंक दिले नॉर्मल ज्यूस .. आणि सांगितलं " ते समोर साहेब बसलेत ना त्यांनी तुम्हला हे द्यायला सांगितले आणि एक कागद तिच्या हातात दिला . त्यात रूम नंबर लिहला होता

तिने पटकन तो माणूस कोण आहे ते बघितले तर तो राजीव ( पब मध्ये वसू ने ज्याला बघून .. हाक मारून मिठी मारली होती तो ).

आज आत्ता तिला हा राजीव आठवत पण नव्हता ..  राजीव च्या पण लक्षात वसू नव्हती .. कारण लोकेशन वेगळे होते  आणि आज वसू  एकदम साडीत होती .. त्या दिवशी ती शॉर्ट ड्रेस वर होती .

वसू रागाने उठली आणि त्याला ओरडायला त्याच्या इथे गेली तर तो उठून कुठेतरी निघाला .. वसू त्याच्या मागे मागे निघाली ..

राजीव एका रूम मध्ये गेला .. वसू पण त्याच्या मागे गेली ..

राजीव " थँक्स फॉर कमिंग "

वसू " आपण ओळखतो का एकमेकांना ?"

राजीव " नाही .. म्हणजे मी तरी नाही ?" बहुदा आपण कुठेतरी भेटलोय असे वाटतंय पण

वसू " मग मला ड्रिंक्स का दिलेस .. तुझी हिम्मत कशी झाली मला ज्यूस द्यायची ?"

.. तेवढयात .. वसू एकदम स्तब्ध झाली आणि दोन मिनिटांनी " ए हॅलो राजीव .. तू इथे ? इथे काय करतोय ? काय यार किती दिवसानीं दिसतोय ? बोलता बोलता वसू ने त्याला एक फ्रेडली मिठी मारली .. पण राजीव .. राजीव मात्र त्या मिठीचा वेगळाच आनंद घेत होता .. जगातले सगळे सौदर्य आज त्याच्या मिठीत स्वतःहून आलंय असेच त्याला वाटू लागले .. राजीव आता तिच्या पाठीवर हात ठेवणार तोच जय मागून आला आणि त्याने वसू ला त्याच्या पासून दूर केले .

जय ने वसू ला त्याच रूम मध्ये असलेल्या सोफ्यावर बसवले

राजीव " चिल ब्रो .. मी काहीही केलेलं नाही ..  तुझी गर्ल्फ्रेन्ड का बायको माझ्या गळ्यात का पडते रे सारखी .. त्या दिवशी पब मध्ये पण माझ्या मागे लागली होती .. तू खुश ठेवत नाहीस का तिला ? " आणि कुत्सित पणे हसला

जय ने त्याची कॉलर पकडली " जस्ट कीप युअर माऊथ शट .. माझ्या बायकोला वाईट नजरेने बघायची हिम्मत कशी झाली तुझी ?"

राजीव " मी काय केलय? .. तिलाच माझ्या मिठीत सुख मिळत होते .. त्याला मी तरी काय करू ?"

जय ने एक फाडकन  कानाखाली वाजवली त्याच्या .. आणि तिला घेऊन जाऊ लागला

तर वसू " जय .. हा कोण आहे ? आपण इकडे का आलोय ? "

जय " कोण नाही माझा मित्र आहे .. आपण त्याला भेटायला आलोय "

जय तिला म्हणाला .. तू थांब इथे मी वॉशरूम मध्ये जाऊन येतो आणि राजीव ला म्हणाला " नाऊ ट्राय विथ हर "

जय ने मुद्दामून तिला राजीव बरोबर त्या रूम मध्ये ठेवले आणि तो वॉशरूम ला गेला

राजीव " हॅलो .. ब्युटीफुल .. यु लूक सेक्सी टुडे " आणि तिच्या जवळ गेला

जय लांब नव्हता .. त्यांचे चाललेलं संभाषण त्याला ऐकायला येत होते  आतून .. तेवढयात त्याला जोरात कानाखाली मारल्याचा आवाज आला .. एकदा नाही दोनदा .. हा आवाज ऐकल्यावर  जय हसत हसत बाहेर आला

राजीव चे दोन्ही गाल लाल झाले होते .. आणि तो रागाने लाल झाला होता

राजीव " यु ब्लडी .. "

जय " बघू .. गालाचा नकाशा बदललाय .. किती जोरात आवाज आला बघितलेस ना .. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली का अजून काही शंका आहे माझ्या बद्दल किंवा माझ्या बायको बद्दल "

राजीव " अरे वेडी आहे ती .. तुझी बायको वेडी आहे .. "

जय " इकडे ये तुझ्या कानात सांगतो .. तुला ती कशी ओळखते .. जय ने त्याची कॉलर पकडली आणि त्याला ओढत बाहेर नेले आणि त्याला सांगितले " रिचा शर्मा ला ओळखतॊस का ?"

रिचा शर्मा चे नाव ऐकून त्याला घाम फुटला

जय " रिचा शर्मा ला तू मारलस ना ? रिचा इज बॅक .. तिनेच मला सांगितलंय तू तिला फसवलंस म्हणून "

राजीव " कोण ... कोण... रिचा शर्मा .. मी नाही ओळखत तिला .. " आणि रुमालाने घाम फुसू लागला

जय " ठीक आहे .. जे काही करायचे ते रीचाच करेल आता .. ?  नताशा ला ओळखतॊस का ?"

राजीव नताशा चे नाव ऐकून तर अजूनच घाबरला .. ' ए तू पण वेडा आहेस आणि हि मारकुटी तुझी बायको पण वेडी आहे "

राजीव ने तिला मारकुटी म्हटल्यावर जय ला पण हसायला आले .. " हो आहेच ती माझी मारकुटी .. "

राजीव " सोड मला जाऊ दे .. "

जय ने पोलिसांना बोलावले होते आणि राजीव ला पोलिसांनी अरेस्ट केले ..

जय ने त्या बाईला फोन केला आणि सांगितले " तुमच्या मुलीचा गुन्हेगाराला पोलिसांनी पकडलंय .. तुम्ही एकदा पोलिसांना सांगा कि तुमची मुलगी मिसिंग आहे .. पोलीस शोध घेतील .. "

जय ची कॉन्फरन्स झाली होती .. तिला स्वतः स्पा ला घेऊन गेला आणि मग दोघे पुन्हा हॉटेल ला आले .

जय ने इकडे जे जे झाले ते राघव ला सांगितले .. तेवढयात तुमच्या हॉटेल रूम चे दार वाजले

वसू बेड वर झोपली होती .. आता कोण आलंय म्हणून जय ने तिच्या अंगावर पांघरून टाकले दार उघडले तर ती बाई ( म्हणजे रिचा ची आई )आली होती .

तिला बघून जय ने तिला आत मध्ये घेतले

तिने वसू साठी साडी , बांगड्या , कुंकू असे सगळे सामान घेऊन आली .. एक नजर जय कडे बघून ती वसू च्या डोक्यावर हात फिरवू लागली .. त्या बाईच्या डोळ्यातून अश्रूंची धारा वाहत होत्या .. त्या बाईने रडतच वसू च्या कपाळावर किस केले .. आणि मोठं मोठ्याने रडू लागली .. " रिचा ... रिचा.. मम्मा आलीय .. डोळे उघड बाळा ..

🎭 Series Post

View all