परकाया भाग ५४

in this part jay calls police to arrest rajiv

परकाया भाग ५४

क्रमश: भाग ५३

 वसू " नको ना जय .. माझ्या  विषयी घरच्यांना  कळले तर ?"

जय " कळू दे ना .. तू मला किती  छळतेस ते तरी कळेल त्यांना .. सगळ्यांना तुझाच पुळका असतो .. गेले 12 वर्षे मी बाहेर  आहे मला  कधी कोणी असा फोन करून करून बोलावले नाही .. तू इकडे येऊन चार महिने नाही झाले तर सगळ्यांचे फोन येत आहेत " कधी येताय ? कधी येताय ?"

वसू  "  जय कॅन्सल कर ना .. प्लिज "

जय काही ऐकायच्या मूड मध्ये नव्हता . शेवटी दोघे एअर पोर्ट ला पोहचले . दोघे फ्लाईट मध्ये बसून एका नवीन ठिकाणी उतरले

वसू " जय - तू नक्की मला कुणीकडे नेत  आहेस आपण नक्कीच घरी नाही चाललोय ना ? "

जय - " नशीब माझे म्हटले हिच्या लक्षात येतंय कि नाही .. केव्हा पासून फुगून बसलीस .. "

खरंतर जय ची कॉन्फरन्स चंदीगड ला होती आणि जय ला ती अटेंड करावीच लागणार होती . आणि वसू ला एकटीला तिकडे ठेवून येण्याचे धाडस आता जय मधे  पण राहिले नव्हते . दोघे एका फाईव्ह स्टार हॉटेल रूम मध्ये आले . वसू अशी पहिल्यांदाच हॉटेल ला राहणार होती . त्यामुळे एक प्रकारचा अवघडलेपण तिच्या चेहऱ्यावर साफ दिसत होते .

वसू " वाह ! छान आहे रे इकडे .. "

जय " अग तू रिलॅक्स हो ना .. अशी घाबरल्या सारखी का वाटतेयस .. ?"

वसू " ते अशा नवीन ठिकाणी मी पहिल्यांदाच अशी हॉटेल रूम वर आलेय ना तर भीती वाटतेय जरा .. "

जय " हमम.. हे बघ माझी  उद्या एक कॉन्फरन्स आहे २ तासांची .. तेवढा वेळ तुला जरा एकटीला काढावा लागले .. त्यांनतर आपण फ्री आहोत .. मग बाहेर जाऊ कुठेतरी . आता तुला आराम करायचंय का ? "

वसू " हमम .. थोडा वेळ .. ते फ्लाईट मधून आले ना कि माझे डोक  दुखायला लागते .. तुला पण असे होते का ?"

जय हसायला लागतो .. आराम कर मी कॉफी ऑर्डर करतो .. मग लंच ला बाहेर जाऊ "

वसू " जय तू मला इकडे येतोय सांगितले नाहीस ? मला वाटले आपण गावी जातोय मी सगळ्या साड्या आणल्या .. आता सगळे मला तुझ्या बरोबर बघतील तर हसतील आणि म्हणतील " काकूबाई "

जय हसायला लागला .. " एवढ्याश्या मेंदूत काय काय विचार करत बसतेस ग .. ? तुझ्यासाठी आपण इकडे शॉपिंग करू मग ..सिम्पल  "

वसू " ठीक आहे "

मग काय आजचा दिवस त्यांच्याकडे होता .. जय आणि ती दोघे चंदीगड सिटीमध्ये फिरले . शॉपिंग केले .. एक दोन वेस्टर्न ड्रेस घेतले .

संध्याकाळी  तिकडच्या एका देवळात  जात होते तर मंदिराच्या बाहेर एक आंधळा साधू बसला होता आणि त्याच्या बाजूला एक कुत्रा बसला होता .. जसे जय आणि वसू त्यांच्या जवळून पुढे निघाले तसा तो कुत्रा वसू कडे बघून बेभान होऊन जोर जोरात भुंकू  लागला .. वसू ने त्या कुत्र्याकडे पहिले तर कुत्र्याचा भुंकण्याचा स्वर बदलला आणि तो घाबरल्या सारखे भुंकू लागला .. सुरुवातीला वसू  कुत्रा भुंकतोय म्हणून जय चा हात घट्ट पकडून त्याच्या आड उभी राहिली पण कुत्रा भुंकण्याचा थांबेच ना बघितल्यावर तिचे डोळे लाल झाले .. आणि त्या लाल डोळ्यांकडे  बघितल्यावर कुत्रा घाबरला .

तो साधू " होनी को कौन टाल सकता है ! तुझं पर किसका साया है .. मौत सर पर आयी है ।" असे तो बोलू लागला ..

हे वाक्य ऐकताच जय ने त्या साधूकडे पहिले .. तर तो आंधळा आहे हे त्याच्या लक्षात आले .. जय ने वसू ला मंदिरात जायला सांगितले .. " मी येतोच मागून तू पुढे हो "

जय त्या साधू जवळ गेला .. त्याच्या समोर उभा राहिला

साधू " क्या चाहिये तुझको ? तुही है जो उसे बचा पायेगा .. लेकिन मौत को कम मत समजना .. मौत हि रास्ता दिखयेगी "

जय " कुछ समज नहीं रहा है आप क्या बोल रहे हो .. मेरी बीवी को इससे कैसे बाहर निकालू .. कुछ रास्ता बताओ .. वो बहुत मासूम है , उसका शरीर भी यह झेल नहीं सकता ।"

साधू - " मदत करना पडेगा .. विश्वास करना पडेगा ... भगवान पर भरोसा रखो .. " आणि त्या साधूने एक लॉकेट त्याला दिले आणि त्याच्या जवळ ठेवायला सांगितले "अभि येह तुम्हारे काम का नहीं है .. लेकिन समय पर काम आयेगा "

जय ने त्याच्या पुढच्या ताटलीत ५०० रुपये टाकले आणि मंदिरात गेला ..

वसू  मंदिराच्या दारात उभी राहिली होती .. पण मंदिरात आत मध्ये जाईना ..

जय - " अरे .. तू आत गेली नाहीस .. "

वसू " जय चल जाऊ ना .. मला कसे तरी होतंय ".. असे म्हणे पर्यंत तिला उलटी सारखे होऊ लागले .. जय ने तिला एक साइड ला नेले .. पाणी प्यायला दिले .. तर तिचे डोळे लाल झाले होते

वसू " जय .. मला नको वाटतंय देवळात जायला .. डोके पण दुखतंय आणि आता पाय पण खूप दुखायला लागलेत .. मला चालायलाच येत नाहीये .. तू मला इथून घेऊन चल "

जय ला आठवले कि राघव त्याला म्हणाला होता इथून पुढे अशक्तपणा येऊ शकतो ..

जय " ठीक आहे .. तू इथे बस  मी कार बोलवतो ..  दोघे एका साइडला पायरीवर कार ची वाट बघत बसले होते .. तेवढयात एक बाई मागून आली आणि वसू ला " रिचा .. रिचा .. "म्हणून हाक मारू लागली . ती बाई जेव्हा पुढे आली आणि तेव्हा वसू चा चेहरा बघून म्हणाली " सॉरी बेटा .. मुझे लगा ... "

जय " आप को क्या लगा ?"

ती बाई " मुझे लगा येह मेरी बेटी है .. मेरी बेटी ना जाने कहां खो गयी है .. पीछे से ऐसा लगा कि वही है .. "

जय " क्या नाम है आपकी  बेटी का ? "

ती बाई -" कोई बात नहीं बेटा .. ये मेरी बेटी जैसी दिखती है ..पर है नही .. पीछे से लगा कि मेरी बेटी है ।"

त्या बाईला बघून वसू मात्र रडू लागली

वसू " मम्मा .. आपने मुझे पहचाना .. मम्मा "

ती बाई " सॉरी बेटा .. मैं  आपकी माँ नहीं हूं .. "

ती बाई जाऊ लागली .. वसू " मम्म्मा .. मम्म्मा करू लागली ..

जय ला काय करू तेच समजेना .... तेवढयात त्याने बोलावलेली कार आली आणि ते दोघे हॉटेल ला निघून आले

जय ने तिला बेड वर झोपवले आणि तो हि फ्रेश होऊन बेड आडवा पडला .. झोपलेल्या वसू च्या चेहऱ्याकडे एकटक बघत होता .. तिचे पुढे आलेले केस बाजूला करत होता .. त्याच्या हाताच्या स्पर्शाने वसू जराशी हलली .. आणि झोपेतच त्याच्या कुशीत शिरली .. जय पण तिच्यावर हात टाकून झोपून गेला ..

मध्यरात्री वसू चे डोळे तिने उघडले .. ती उठली ..  रूम च्या बाहेर निघाली .. रूम च्या बाहेर  रिसेप्शन वर आली .. आणि समोर उभ्या असलेल्या कार मध्ये बसली ..

रिसेप्शन वरच्या मुलाने जय ला रूम मध्ये फोन केला आणि सांगितले कि मॅम रात को किधर तो जा रही है .. शायद होश ने नही है

जय तसाच नाईट ड्रेस वर खाली आला .. तो दुसऱ्या कार मध्ये बसला आणि त्या कार चा पाठलाग करायला सांगितला

वसू एका नवीन शहरात ..मध्यरात्री त्या कार मध्ये एकटीच होती .. जर मधेच तिला शुद्ध आली तर ती घाबरून जाणार ?  आता कुणीकडे ? ते अनेक प्रश्न , भीती , टेन्शन जय ला होते ..

जय " प्लिज डोन्ट मिस दयाट कार .. "

वसू ची कार एका सोसायटीच्या गेट बाहेर थांबली ... सिक्युरिटी गेट मधून एंट्री करत वसू एका बिल्डिंग मध्ये गेली .. आणि एका फ्लॅट ची बेल वाजवली ..

जय तिच्या मागे मागे आलाच

दार उघडले तर समोर तीच बाई जी देवळात दिसली होती .. ती बाई पण अश्यर्यचकित झाली होती ..कि ह्या मुलीला मी दुपारी देवळात पहिले आणि हि मुलगी घरी कशी आली ?

वसू  डायरेक्ट घरात गेली आणि त्या बाईच्या गळ्यात पडून रडायला लागली ..

त्या बाईला पण काय करावे कळे ना .. हिला मी घरात घेऊ का नको घेऊ ?"

जय मागून आलाच त्याने त्या बाईला हात जोडून नमस्कार केला .. आणि घरात शिरला ..  तिला बाहेर ओढू लागला .. पण वसू ला त्या बाईची ओढ लागली होती .. वसू ने त्या बाईचा हात धरला तिला सोफ्यावर बसवले आणि स्वतः खाली जमिनीवर बसली आणि तिच्या मांडीवर डोके ठेवून शांत बसली . वसू ची नजर शून्यात होती .. ती आता जय ला ओळखत पण नव्हती .. किंबहुना तो तिथे असल्या नसल्याचा तिला काहीच फरक पडत नव्हता .

त्या बाईने वसू च्या डोक्यावरून हात फिरवला "थक गयी हो बेटा सो जाओ " आणि एखाद्या लहान मुलं सारखी वसू तिच्या मांडीवर डोके ठेवून शांत झोपली .. मिटलेल्या डोळ्यातून अश्रू वाहत होते .. हे अश्रू नक्की कोणाचे होते .. वसूचे का ? रिचा चे ?"

जय पण खूप दमला होता .. सोफ्या च्या समोर दोन खुर्च्या होत्या त्यातल्या एका खुर्चीवर वर तो बसला होता पण बसल्या बसल्या त्याला पण झोप लागली

एका अनोळखी घरात, अनोळखी बाई बरोबर जय आणि वसू रात्री थांबले होते ..

पहाटे पहाटे जय ला जाग आली वसू ला त्याने उचलले आणि सोफ्यावर नीट झोपवले .

जय त्या घराचे निरीक्षण करू लागला .. काही माहिती मिळतेय का ? हे पाहू लागला .

तेवढ्यात ती बाई बाहेर आली

ती बाई " चहा घेणार का ?"

जय - " अ .. सॉरी .. तुम्हला माझ्या वाईफ मुळे त्रास झाला ?"

ती बाई " चहा कि कॉफी काय घेशील ?"

जय " तुम्हाला मराठी छान येतंय ? कसे काय ? "

ती बाई " साखर किती ? चहात ? आणि तिचे तिने २ चमचे साखर टाकून त्याला चहा दिला .. जय ने पण घेतला ..

जय - " रिचा कोण आहे ? कुठे आहे ?आणि तुम्ही कोण आहेत तिच्या ?"

ती बाई - " मेरी बेटी है रिचा .. कहां है मालूम नहीं .. ३ साल पाहिले घर से एक लडके के साथ भाग गयी ..अब कहा है ? क्या कर रही है ? जिंदा है या मर गयी मालूम नाही ?

जय " आपने उसे ढुंढा नही ?"

ती बाई " कहा ढुंढू .. मेरे बेटे को मैने भेजा था उसे लाने के लिये एकबार .. नहीं आयी वो .. वो आना हि नहीं चाहती थी ।"

जय " किसके साथ भागी थी ?"

ती बाई " है एक बडे बाप कि औलाद .. उसे मॉडेल बनऊगा ऐसे फुसलाया और वो चल पडी उसके साथ .. अब वो लडका कहता है कि मुझे मालूम नहीं वो कहा है ।"

जय - " शायद आपकी बेटी किसी मुश्किल में  हो सकती है ?"

ती बाई च्या डोळ्यातून एकदम अश्रू वाहू लागले " तो मैं क्या करू ? मैने बिना किसी के सहारे मेरे दोनो बच्चोन्को पढाया .. बडा किया .. और उसने घर से भागते वक्त एक बार भी मेरे बारे मी नहीं सोचा ?"

जय " आपका लडका कहा है ?" नाम क्या है उसका ?"

ती बाई "    मालूम नहीं ? दोनो ने मुझे छोड दिया .. आणि पुन्हा रडू लागली "

जय " सॉरी .. मैं आपका दर्द समज सकता हूं "

तेवढ्यात वसु उठली .. आणि आवाजाच्या दिशेने आली आणि एकदम आश्यर्य चकित होऊन

वसू " जय आपण कुठे आलोय ? आणि तू मला यांच्या कडे का आणलेस ? जय काय हे आपण दोघे इकडे काय करतोय ? कोण आहेत ह्या? "

🎭 Series Post

View all