परकाया ५२

in this part jay and raghv get to know about natasha in absense of jay

नमस्कार वाचकहो !

नवीन वर्षांच्या सर्वांना शुभेच्छा ! हे नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचे भरभराटीचे आणि आनंदाचे जावो हीच सदिच्छा .

परकाया कथा आपणा सर्वांना आवडत आहे याचा आनंद आहेच .. हि कथा रहस्यमय आहे ..अजून काही रहस्य ओपन होणार आहेत . माझा जसा देवावर विश्वास आहे तसाच खऱ्या प्रेमावर हि खूप विश्वास आहे .. पाहूया देवाच्या मदतीने प्रेम वसू आणि जय यांचे दैव बदलते का ? 

 शनिवार  आणि रविवार  रात्री भाग पोस्ट होणार नाहीये कृपया याची नोंद घ्यावी .

परकाया ५२

क्रमश: भाग ५१

राघव " ठीक आहे मी बाहेर थांबतो .. तू सांग तुझ्या पद्धतीने .. पण मला काही प्रश्न तिला ती शुद्धीत असताना विचारवेच लागणार आहेत " राघव बाहेर जाऊन बसला

जय ने तिला शान्त केले

जय " हे बघ .. राघव आपल्याला मदत करतोय .. तो माझ्या सांगण्या वरून इथे आहे .. आपण दोघे खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये आहोत .. "

वसू " काय झालंय ? माझ्या कडून काही चुकलंय का ?"

जय " मी इकडे नसताना काहीतरी झालंय ... आपल्या घरी कोणी आले होते का ?. "

वसू " जय तू माझ्यावर संशय घेतोय का ?" आणि डोळ्यातून अश्रू ओघळला

जय " नाही ग राणी .. काहीतरी गैर समज करू नकोस .. आपल्या घरात एका वाईट शक्तीने प्रवेश केलाय .. आणि ती वाईट शक्ती आता तुझ्या शरीरावर ताबा मिळवून तुझ्याकडून काही काही करून घेतेय "

वसू " काहीही काय ? जय तू त्या राघव च्या नादाला लागू नकोस .. त्याला कॉलेज मध्ये अर्ध्या पेक्षा जास्त लोक वेडे म्हनतात "

जय " वसू ..पण मी पण वेडा आहे का ? नाही ना .. मी सांगतोय ते खरं आहे .. त्या दिवशी तू रात्री झोपेत चालत गॅलरी मध्ये काठावर उभी राहिलीस .. हे तू केले होतेस का ? नाही ना .. मग त्या नंतर रोज काही ना काही तरी होतंय .. काल रात्री तू माझी कार चालवलीस .. येते का तुला कार चालवायला ? नाही ना ? "

वसू " बापरे !जय मला खूप भीती वाटतेय .. मीच का ? मी काय केलय कोणाचं ?"

जय " तेच तर ना .. तू मदत करायला गेलीस आणि तुझ्या वर तिचा जीव जडलाय .. ती म्हणते कि तू फक्त तिची आहेस "

वसू " कोण आहे ती ? कुठे आहे ती ?"

जय " काहीच माहित नाही ? त्या साठीच राघव ची मदत घेतोय मी .. तेव्हा तो जे विचारेल ते सगळे सांगशील त्याला .. तो आपल्याला मदत करतोय .. कळलं का ?"

जय तिच्या डोक्यावरून हात फिरवला ..

जय - " घाबरू नकोस मी आहे तुझ्या बरोबर .. आपण काढू यातून मार्ग .. फक्त तुझी आत्मशक्ती कमजोर होऊन देऊ नकोस ..ठीक आहे .. मी राघव ला बोलावतो "

जय ने राघव ला आत बोलावले

राघव " वसू हि नताशा कोण आहे ? आणि ती आता कुठे आहे ? "

वसू "  त्यादिवशी रात्री अचानक माझ्या दाराची बेल वाजली .. मी दाराच्या होल मधून तिला पहिले आणि तिचा अवतार बघूनच मी घाबरले .. मी काही दार उघडले नाही .. ती थोडी नशेत होती .. ती बराच वेळ म्हणजे जवळ जवळ १५ मिनिटे बेल वाजवत होती .. मी घरात ऐकटी होते .. आणि बेल च्या आवाजाने घाबरून माझ्या हातातुन फोन खाली पडला आणि फुटला .. मी खूप घाबरले होते .. हात पाय लिटरली थरथर कापत होते.. त्या रात्री मी खूप अस्वस्थ होते .. एकतर मला जय ची खूप आठवण येत ...   मधेच जय कडे बघते .. या विषयावर कशी बोलू अशा नजरेने .. तर जय तिला सांगतो " बोल .. बोल .. त्याला माहितेय सगळे "

वसू " हा तर मला जय ची खूप आठवण येत होती .. बेचैनी होती .. स्वतः बद्दल राग येत होता .. असे वाटत होते कि मी एकटीच आहे .. माझे हक्काचे असे कोणीच नाहीये .. आणि मी थोड्या वेळाने हे सगळे माझ्या डायरित लिहत बसले .. रडून . घाबरून लिहून मी कधी झोपले मला कळलेच नाही ..

सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने मला जाग आली

नेहमी प्रमाणे मी पहिले दूध घरात घेण्यासाठी .. दार उघडायच्या आधी मी होल मधून बाहेर बघितले .. बाहेर कोणी नाही याची खात्री मला झाल्यावर मी हळूच दबकत  दार उघडले  तर नताशा माझ्या दारातच झोपली होती .. मी बाहेर जाऊन बघितले तर तिचे अंग खूप थंड पडले होते .. नाका जवळ हात नेला तर श्वास चालू होते .. मी तिला हात लावून हलवून हलवून उठवले तशी ती उठली . मी तिला तिच्या घरी बाहेरूनच जायला सांगितले तर म्हणाली मला चहा , कॉफी देशील कि नाही .. मी हो नाही म्हणायच्या आधी ती घरात आलीच आणि सोफयावर बसली ..

मी तिला सांगितले .. माझ्या कडे वेळ नाहीये .. मला कॉलेज ला जायचंय तू चहा घे आणि लगेच जा

आणि मी चहा करायला किचन मध्ये जात होते तर तिच्या हातात मला मोबाईल दिसला .. मी तिच्या मोबाइल वरून जय ला कॉल केला .. त्याला इथली सगळी परिस्थिती सांगितली आणि तिचा फोन तिला परत दिला . मी चहा करायला किचन मध्ये गेले तर हि माझ्या रूम मध्ये गेली आणि बेड वर झोपली .. मी चहा घेऊन आले तर हि हॉल यामध्ये नव्हती आणि दार उघडे होते तर मला वाटले हि गेली कि काय ? बघते तर हि माझ्या रूम मध्ये माझी डायरी वाचत बसली होती .. माझी डायरी वाचता वाचता ती रडायलाच लागली .. माझ्या रूम मध्ये जय चा नि माझा आमच्या लग्नातला फोटो होता .. तो फोटो हातात घेऊन ती जय ला बघत होती ..

तिने मला विचारले " हा तुझा नवरा आहे ना ? हा मुलगा खूप चांगला आहे .. मला त्याने मदत केली होती .. मी तिला म्हटले असे दुसऱ्याच्या वस्तूंना हात लावायचा नसतो तुला कळत नाही का ? ठेव तो फोटो खाली .. चहा घे आणि निघ .. मला कॉलेज ला जायला उशीर होतोय .

तर ती म्हणाली तू खूप प्रेम करतेस ना त्याच्यावर . पण तो तुझ्यावर प्रेम करत नाही ना .. तर मी तिला म्हटले तुला काय करायचंय .. तू जा .. प्लिज जा .. मला नाही बोलायचं या विषयावर ..

ती म्हणाली त्या दिवशी पब मध्ये दुसऱ्या मुली बरोबर डान्स फ्लोअर   मी पहिले त्याला ..ती पण चिपकली होती त्याला ..

मी तिच्यावर चिडले  “तुला काय करायचंय”

ती " अरे यार चिल .. काय तू पण एवढी सेंटी होतेस .. तुला सांगते मी जेव्हा इकडे आले ना तेव्हा मी पण तुझ्या सारखीच होते .. असेच माझे लांब केस होत .. अशीच स्वप्न होती .. अशीच तुझ्या सारखी ड्रेस घालून फिरायची . आता बघ .. काय  जिंदगी झाली आहे .. मी किती बदलले .. आणि ती रडूच लागली .. ती रडायला लागल्यावर मला अस्वस्थ वाटले .. मी तिला प्रेमाने जवळ घेतले .. पाणी दिले .. मग चहा बिस्किट्स दिले .. तिला सांगितले कि अजूनही वेळ गेलेली नाही .. आपले आयुष्य कसे जगायचे हे आपल्या हातात आहे वगैरे वगैरे गप्पा मारल्या आणि ती निघाली

जाताना तिने जय च्या  रूम कडे बघितले .. ती रूम बंद आहे त्यावरून तिला कळले कि आम्ही वेगळे राहतोय तुम्ही लिव्ह इन् मध्ये राहता कि नॉर्मल नवरा बायको सारखे

मी तरीही तिला हटकले .. माझी कोणतीही गोष्ट मी तिला सांगितली नाही पण माझ्या डायरीचे पान  वाचल्यामुळे तिला आमच्या दोघात काही प्रॉब्लेम आहे हे कळले होते ..

त्या रात्री पण २ वाजता ती आली .. यावेळी मी पुन्हा दा राच्या होल  मधून तिला पहिले  आणि दार उघडले आणि तिला सांगितले कि तुझा फ्लॅट वरती आहे .. लिफ्ट ने वर जा .. तर ती म्हणाली तू एकटीच आहेस ना .. मी तुझ्या इथे झोपू का ? मी तिला नको नको म्हणत होते तर ती ऐकायलाच तयार नाही .. ती म्हणाली ठीक आहे तू घरात नसशील घेत तर मी काल सारखी इथेच बाहेर झोपते आणि खाली बसली .. मी दार लावून घेतले पण आत मध्ये मला काही चैन पडेना .. शेवटी मी तिला आतमध्ये घेतले ..

ती माझ्या बेड वर झोपली .. मी खाली चटई वर झोपली . सकाळी मला जाग आली तर हि उठली होती .. मझ्या बाथरूम मध्ये अंघोळ करून .. मी रात्रीच दुसऱ्या दिवशी चे कपडे काढून ठेवायची .. तर तो ड्रेस घालून .. तिच्या केसांची वेणी घालून किचन मध्ये चहा करत होती ..

मी उठल्यावर मला कसे तरीच वाटले .. हि एका रात्रीत आपल्या घरात आपल्या घरातली मेम्बर असल्या सारखीच वावरत होती

मी काहीच न बोलता अंघोळीला गेले आणि माझा डबा बनवायला सुरुवात केली .. तर हि मागून मला मिठी मारू लागली .

मी तिला एक प्रकारे झटकलीच

ती " अग  वसू  आज किती छान वाटतंय मला तुझ्या या ड्रेस मध्ये . असे वाटतंय कि मी पुन्हा माझी मी झालेय .. अशीच वेणी घालायची मी .. तूच्या सारखा नॉर्मल संसार मला करायचा आहे .. "

मी  काहीच बोलले नाही

ती " वसू .. तो तयार होईल का ग लग्नाला ? मी विचारू का त्याला ?"

मी " कोण ? "

ती " तो ग माझा बॉयफ्रेंड .. हल्ली खूप भाव खातो .. तो आता मोठा tv स्टार झालाय .. त्याला मी आता त्याच्या लेव्हल ची वाटत नाही .. म्हणून मला तो रात्री लपून भेटतो .. पण भेटतो अजूनही त्याच्या जीव आहे माझ्यावर "

मी " प्रेम असेल तर लग्न करेलच ना .. "

ती " मी विचारेन त्याला .. मी आज या ड्रेस वर त्याला जाऊन भेटेन .. तो पण खुश होईल मला असे बघून .. मी हा ड्रेस घालून जाऊ का प्लिज .. "

मी " हो ठीक आहे .. हा ड्रेस तुला हवा सेल तर तू ठेवून घे तुला "

ती " थँक यु .. म्हणून आनंदात घरा बाहेर निघाली तर मागे वळली आणि मला घट्ट मिठी तिने मारली आणि माझ्या गालावर मला एक पप्पी तिने दिली .. तिचे हे सर्व करताना तिचे डोळे माझ्या डोळ्यांकडे एकटक बघत हो ती "

काय झालंय हे कळे पर्यंत ती निघून गेली .

तिस ऱ्या दिवशी रात्री पण ती आली .. पण त्या दिवशी मी तिला घरात घेतलेच नाही .. तु जा .. सकाळी ये .. तू जा .. असे म्हणून तिला माझी ओढणी तिच्या अंगावर टाकून तिला दिली आणि ती गेली

चोथ्या दिवशी संध्याकाळी जय घरी आला .. त्या दिवशी रात्री पण ती आली होती .. त्या रात्री  माझ्याशी तिला गप्पा मारायच्या होत्या मी तिला म्हटले कि आज नको .. जय ची झोप डिस्टर्ब होईल .. आपण नंतर बोलू .. जाताना पुन्हा तिचा ड्रेस बघून मी तिला माझा दुपट्टा दिला .. मला म्हणाली जर जय तुझा फक्त बॉयफ्रेंड असेल तर त्याचे सगळे ऐकू नकोस .. स्वतःच्या अनुभवावरून सांगते .. तेव्हा हि मी तिला झापले होते तुझे ज्ञान मला सांगत जाऊ नकोस आणि  नको त्या विषयावर माझ्याशी बोलत जाऊ नकोस .

त्या नंतर ती मला म्हणाली  मी काय युज अँड थ्रो आहे का तुझ्यासाठी पण " असे काहीतरी बोलायची .. मला  वाईट वाटले त्यापेक्षा माझ्या ड़ोळ्यांत लगेच अश्रू  आले तर ती मला लगेच सॉरी बोलली .. म्हणाली मी मज्जा केली .. तेवढ्यात जय ला जाग आली .. जय तिला भेटायला येई पर्यंत ती लिफ्ट मधून गेली पण ..

त्या दिवसांनंतर आज पर्यंत ती आमच्या कडे आलीच नाही .. ह्याच्या व्यतिरिक्त मला काहीच माहित नाही . मी अगदी डिटेल मध्ये सगळे सांगितले आहे .. हा एक राहिले .. जेव्हा घरात राहिली होती तेव्हा म्हणाली होती .. कि मी घर खूप छान ठेवलेय .. इथून जावेसेच वाटत नाही "

राघव आणि जय कान  देऊन  ऐकत होते ..

राघव " तिची कोणती वस्तू राहिली आहे का तुझ्या रूम मध्ये "

वसू " तिचा एक ड्रेस आहे .. शॉर्ट ड्रेस ..बाकी काही नाही "

राघव " ठीक आहे .. वसू  तू आता थोडा आराम कर .. "

जय ने घड्याळात बघितले ३ वाजले होते .. आज दोन वाजता वसू  एकदम नॉर्मल होती .. तिने काही वेगळे केलेच नाही .. हे बऱ्याच दिवसांनी झाले होते ..

जय ने तिला बेड वर झोपवले .. पांघरून टाकले

तेवढयात राघव पुन्हा आता आला

राघव - " वसू  .. एक प्रश्न राहिला .. रिचा शर्मा नावाची कोणी तुझी मैत्रीण आहे का ?"

वसू " नाही .. कोण आहे ? हे नाव तर मी पहिल्यांदाच ऐकतेय "

🎭 Series Post

View all