परकाया भाग ४७

in this part jay and raghav are discussing about vasu

परकाया भाग ४७

क्रमश : भाग ४६

सिक्युरिटी गेट वर  तो वॉचमन खुर्चीत बसून झोपला होता .. वसू  ने त्याच्या टेबल वर हात मारला .. तसा  तो खाडकन उठला ..

वसूकडे एकटक तो बघू लागला .. व्हाईट सिल्क नाईट ड्रेस मध्ये वसू अजूनच सुन्दर दिसत होती .. तिच्या  कमनीय शरीराकडे वॉचमन त्याच्या घाणेरड्या नजरेने पाहत होता

वसू मात्र शून्यात नजर .. ती काय करतेय .. ती कोणा समोर उभी आहे याचाही तिला अंदाज नाही . वॉचमन च्या लक्षात आले कि या मुलीला .. तिचे भान नाहीये .. याचा फायदा  घेऊन तो तिच्या खांद्याला हात लावून बघणार होता तोच .. वसू चे डोळे एकदम लाल भडक लाल झाले आणि त्या लाल डोळ्यांनी तिने वॉचमन कडे पहिले ..  एकाच हाताने त्या वॉचमन च्या मानेला पकडले आणि भिंतीला  टेकवून त्याला वर उचलले ..

इतक्या कमी वेळात हे सर्व झाले कि वॉचमन च्या तोंडातून आवाज पण आला नाही .. वॉचमन हातपाय हलवत होता .. एकेक श्वास घ्यायला तो तडफडत होता .. मृत्यूच्या दारातच उभा होता .. जिवाच्या आकांताने तो त्याचे हातपाय हलवत होता आणि वसू ने आरामात एका हातात त्याला वर उचलले होते 

तेवढ्यात जय मागून आला .. होत असलेला प्रकार तो डोळ्याने पाहत होता .. त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. १० किलो ची बॅग न उचलता येणारी वसू ५० किलो च्या माणसाला एक हाताने उचलतेय ..

जय वसू ला हात लावून " सोड त्याला .. वसू .. सोड " तसा तोच चेहरा जय ने पहिला आणि एकदम घाबरलाच .. डोळे एकदम लाल .. रक्ता सारखे लाल होते .. दुसऱ्या हाताने तिने जय ला धक्का दिला तर जय लांब जाऊन पडला .. काय होतंय हे त्याला कळेचना .. वसू च्या  हातून एक खून होत होता .. तिला त्या वॉचमन ला मारत होती ..

जय ने तिकडेच वॉचमन ला पिण्यासाठी मोठा २०लिटर चा जार भरलेला होता तो उचलला आणि तिच्या अंगावर टाकला ..

तशी वसू एकदम जागी झाल्या सारखी झाली ..  तो वॉचमन खाली पडला .. जय ने त्याला  पण पाणी प्यायला दिले

एव्हाना वसू  कोलमडली होती .. तिच्या शरीरात काहीच त्राण  राहिले नव्हते.. जय ने लिटरली खांदयावर तिला टाकले आणि घरात जाऊ लागला

 जय त्या वॉचमन ला " उद्या पासून या सोसायटी मध्ये दिसू नकोस आणि काय झाले ते कोणाला सांगू नकोस .. नाहीतर मीच तुझी कम्प्लेंट  करेन .. माझ्या बायकोने स्वतः तुला वाईट कृत्य  करताना बघितले आहे .. "

वॉचमन पुरता घाबरला होता .. त्याने नुसताच जय ला हात जोडला..

जय वसू ला घरात घेऊन आला .. ती अजूनही बेशुद्धच होती .. पण आता हे प्रकरण काही नॉर्मल नाहीये .. काहीतरी मोठ्या  प्रॉब्लेम मध्ये वसू आहे हे मात्र त्याला कळून चुकले होते . नक्कीच कोणीतरी तिच्यावर काळी जादू करून तिला वश करून तिच्याकडून काम करून घेतय .. पण कोण ? नताशा ? एस या नताशाला शोधले पाहिजे .. ती कोणत्या फ्लॅट मध्ये राहते त्याचा शोध घेतला पाहिजे .. बरोबर रात्री २ वाजता ती काहीतरी काळी जादू नक्कीच करत असणार ..

हि घडलेली गोष्ट वसुला सांगायचीच नाही असे त्याने मनातून ठरवून टाकले . हे सगळे ऐकून ती अजूनच घाबरून जाईल .. त्यापेक्षा हि गोष्ट जास्त तिच्या समोर न चर्चा करता .. उद्याच त्या भटजीला जाऊन भेटतो ..

माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे ती बरा च काळ एका मानसिक दडपणात होती .. त्यामुळे आपोआपच मन कमजोर होत गेले तिचे .. मनातून खंगत गेली ती .. तिने जय ला कानाखाली मारलेल्या गिल्ट ने तिला ते जास्त जाणवत होते . शिवाय आपले प्रेम व्यक्त करण्याची हिम्मत पण नसल्यामुळे मनातून नाजूक , हळवी झाली होती .. म्हणतात ना भित्याच्या पाठी राक्षस तसेच काहीसे झाले होते .. मनाने कमकुवत असलेल्या वसू वर एक अदृश्य शक्ती तिच्यावर ताबा मिळवत होती .. आत हि शक्ती नक्की काय आहे ?

दुसऱ्या दिवशी जय खाली सिक्युरिटी ऑफिस ला जाऊन आला .. नताशा चा फ्लॅट नंबर काय आहे ह्याची  माहिती काढून आला . त्याच्या लक्षात आले बरोबर ह्याच्या वरती २ मजले नताशा  चा फ्लॅट होता पण ती रेंट वर होती .

वसू सकाळी उठल्यावर काल काहीच झाले नाही असे दाखवत होता . मी जरा जाऊन आलो म्हणून हा नताशा च्या  घराची बेल वाजवून आला . बराच वेळ बेल वाजवल्यावर तिचे दार तिने उघडले नाही म्हटल्यावर तो खाली आला .

जय च्या मोबाईल वर नताशाने तिच्या मोबाईल वरून एकदा कॉल केला होता .. जय ने  नंबर शोधून काढला आणि त्यावर तो कॉल करू लागला . नताशा कॉल पण रिसिव्ह करत नव्हती .

नाश्ता करताना जय " वसू  तुला त्या नताशा चा कॉल किंवा मेसेज येतो का हल्ली ?"

वसू " नाही रे .. आम्ही दोघींनी नंबर अदलाबदल केलेच नाही . तिने मागितला नाही आणि मी दिला पण नाही ..का रे ? आज सकाळ सकाळी तिची आठवण कशी काय आली तुला ?"

जय " अग चार पाच दिवसात रात्री बेल वाजली नाही म्हणून म्हटले .. ती नाहीतर रात्रीची येते ना तुला भेटायला ?"

वसू " हो ना .. जरा विचित्रच आहे ती .. रात कि रानी " हसत म्हणते

जय च्या लक्षात येत होते कि जर मी हिला सांगितले नाही  कि तू रात्री असे असे केल तर हिला लक्षात पण नाही तिने काहीतरी वेगळे वागली आहे ..आणि मग तिला  स्ट्रेस पण येत नाही ..

जय ने तिला कॉलेज ला सोडले आणि ऑफिस ला गेला ..

आज त्याचे जे काही महत्वाचे काम होते ते करून मोकळा झाला आणि

भटजीला कॉल करू लागला  . पण भटजी पण कॉल उचलेना .. काय करू ? कोणाला कॉन्टॅक्ट करू ? वसू  ला नक्की काय होतंय ? तिला मानसोपचार तज्ञ ला घेऊन गेलो तर .. तिला मेंटल स्ट्रेस आहे कि ? हे खरंच काळी  जादू आहे ? हे असले प्रकार आजच्या युगात अजूनही चालू आहेता का ? त्याचे डोके चालत नव्हते .

शेवटी त्याने राघवला फोन केला . रागावला त्याने थोडीशी कल्पना दिली .. कि वसू मध्ये हल्ली हल्लीच थोडा बदल झालाय ..

राघव " ठीक आहे त्यासाठी मला घरात व्हिसिट करावी लागेल .. "

जय " ठीक आहे मग मी एकदा वसू शी बोलतो आणि मग तुला कळवतो .. तू रात्री तुझे क्लीनिक बंद झाल्यावर जेवायला म्हणूनच ये .. आणि एक .वसू ला यातले काही कळता कामा नये "

राघव " हो .. ठीक आहे चालेल "

लंच नंतर जय ने वसू ला कॉल केला

जय " वसू .. ऐक ना अग पूजे च्या दिवशी राघव शी मनमोकळे पणाने मला गप्पा मारता नाही आल्या तर आपण त्याला आज रात्री जेवायला आपलया   घरी बोलवायचे  का ?"

वसू" कशाला ? उगाच त्याला ऑकवर्ड होते आणि मला पण ऑकवर्ड होते .. तो सारखा मिस वसू  करत असतो "

जय " म्हणूनच ग त्याला एकदा जेवायला बोलावू .. म्हणजे त्याच्या डोक्यात बसेल कि आता तू मिस नाहीस मिसेस आहेस ते " आणि हसायला लागतो

वसू " मला तशी गरज वाटत नाही .. पण तुला हवे असेल तर बोलव .. मी तशीही त्याच्याशी बोलत नाही "

जय" एक  काम कर तूच त्याला इन्व्हाईट कर .. त्याला बरं वाटेल "

वसू " ठीक आहे "

वसू ने  स्टाफ रूम मध्ये तो असताना त्याला जेवायला आमंत्रण दिले .. जय ने सांगितल्यावर राघव तिचे निरीक्षण करू लागला .. तिच्यात त्याला काही बदल जाणवतो का ? अशा दृष्टीने . वसू च्या माने जवळ त्याला एक मोठा काळा निळा डाग दिसला .. असा डाग कि जणू तिला कोणीतरी पट्ट्याने मारलंय त्याचा वळ दिसला .

राघव " तुझ्या मानेला काय झालंय का "

वसू "नाही कुठे काय ?"

राघव " जा बघून ये आरशात "

वसू  लगेच वॉशरूम मध्ये गेली तर तो डाग तिला पण दिसला .. तिने त्याला हात लावून बघितला तर तिला चटका बसल्या सारखा झाला .. कसला हा डाग ? कशामुळे हे होतंय तिला काहीच कळेना . तिने लागसह जय ला फोन केला

वसू -  " माझ्या मानेवर आणि पाठीवर व्रण आहेत .. जसे कि  कोणीतरी मला पट्टा ने मारलाय .. जय हात लावला कि दुखतंय "

जय  - " थांब .. तू हात लावू नकोस .. आपण स्किन स्पेशालिस्ट कडे जाऊ ? कदाचित कसली तरी रिऍक्टशन आली असेल "

वसू - " जय .. काय सारखा दवाखाना लागलाय आपल्या मागे काही कळत नाही .. कालची एक रात्र जरा व्यवस्थित गेली तर हे आज असे होतंय .. जय मला काहीतरी होतंय ? बहुतेक नजर लागली असावी "

जय - " हमम.. मग तू आहेसच एवढी सुंदर .. तर नजर तर लागेलच ना .. एक काम कर संध्यकाळी घरी आल्यावर  मीच नजर काढतो तुझी "

वसू " तुझं आपले काहीतरीच .." आणि लाजली

ठरल्या प्रमाणे रात्री राघव घरी जेवायला आला .. वसू ने त्याच्यासाठी छान जेवण बनवले .. जय आणि राघव निवांत गप्पा मारत होते .. जय मुद्दामून तिच्या समोर कोणताही वेगळा विषय काढत नव्हता .

तिघांनी एकत्र बसून छान जेवण केले . जेवण झाल्यावर वसू किचन मध्ये आवरत होती तर

राघव " जय मला तुझे घर दाखवशील का ? म्हणजे मी पण नवीन फ्लॅट घेणार आहे तर मला बघायचंय "

जय ला कळले हा असे का म्हणतोय " हो त्यात काय चल दाखवतो .. “

जय ने त्यांच्या रूम पासून त्याला घर दाखवायला सुरुवात केली .. राघव  च्या हातात एक रुद्राक्ष ची माळ होती .. राघव ने बराच वेळ त्यांच्या बेडरूम मध्ये घालवला .. रुद्राक्ष ची माळ त्याच्या हातात समोर धरून त्याने प्रत्येक कोपरा तपासला.. नंतर तो दुसऱ्या रूम मध्ये गेला .. तशीच रूद्राक्ष ची माळ त्याच्या हातात घेऊन त्याने त्या रूम च्या प्रत्येक कोपरा तपासला .. काही ठिकाणी त्याच्या  हातातली रुद्राक्ष ची माळ जोर जोरात हलताना जाणवली ..

मग किचन , मग हॉल , गॅलरी एकेक करत राघव ने घराचा कोपरा न कोपरा तपासला

राघव पुन्हा सोफ्यावर बसला .. यावेळी त्याला जय शी  एकट्याने बोलायचे होते पण वसू मुळे त्याला बोलता येई ना

जय " वसू .. मी आणि राघव खालून आईस क्रिम घेऊन येतो .. तोपर्यंत तुझे किचन मधले काम होईल ना "

वसू " हो चालेल .. तू लॅच ची चावी  घेऊन जा "

जय आणि राघव खाली गेले

राघव " घरात निगेटिव्ह एनर्जी ने शिरकाव केलेला आहे हे नक्की .. ते सुद्धा दुसऱ्या रूम मध्ये  ती निगेटिव्ह एनर्जी ने वास्तव्य केलेलं आहे .. तिचे काही सामान पण त्या खोलीत अजूनही असण्याची शक्यता आहे .. "

जय " पण घरात आमच्या दोघांच्या शिवाय कोणी  राहिलेलं नाही कधीच .. त्या रूम मध्ये फक्त वसूच रहायची आधी .. आता १० एक दिवस झालेत ती इकडे रहायला आलीय "

राघव " म्हणजे ?" ती आधी वेगळी का राहत होती मला कळेल का ? आय मिन मला हे जाणावेच लागेल कारण तिची मानसिक स्थिती कमजोर असताना तिला निगेटिव्ह एनर्जीने ताबा मिळवली असण्याची शक्यता असू शकते "

जय " ते मी तुला नंतर सांगेन कधी तरी .. आता नको .. आता आधी ह्यातून बाहेर कसे पडावे त्या बद्दल सांगशील का ?"

राघव " लगेच काही सांगता येणार नाही .. एक म्हणजे हि तू म्हणतोस  तसा काळी जादू आहे का ? का तिला भूत बाधा झालीय  का तिला मानसिक दबाव असल्यामुळे तिच्या मानसिक असंतुल झालेय याचा शोध लावावा लागेलं .. बऱ्याचदा अशा पेशंट .. सॉरी मी पेशंट बोललो .. .. वसू हि मुलगी तिच्या डोळ्यात बघितले तर लगेच कळते कि आतमध्ये खोल समुद्र आहे .. खूप साऱ्या भावना तिने दाबून टाकल्या आहेत .. भावनांचा उद्रेक होऊन अशी व्यक्ती स्प्लिट पर्सन (split पर्सन )बनून जातात .. आपण म्हणतो ना आतमध्ये एक .. बाहेर एक अशा होतात .. बाहेरून त्या शांत शांत असतात पण रात्री किंवा एकांतात त्या त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध वागतात .. जसे कि एखाद्याचा राग डोक्यात असला तर त्याच्यावर जीव घेणा हल्ला हि करू शकतात .. त्यावेळी त्यांच्या शरीरात दहा हत्तीचे बळ येते .. आणि त्यांनी आता काय केले हे त्यांना आठवण सुद्धा नाही .. असे  व्हायचे प्रमाण जर वाढत गेले तर वेड लागू शकते किंवा त्या स्वतःचा जीव पण घेऊ शकतात  "

जय ने राघव ला रागातच सांगितले " वसू वेडी नाहीये .. आणि असला काहीच प्रॉब्लेम तिला नाहीये .. कारण मी बंगलोर वरून येई पर्यंत ती एकदम ओके होती .. त्या नंतर आम्ही दोघांनी आमचे नाते जे मी स्वीकारले नव्हते ते स्वीकारले आणि त्यांनतर दोन दिवसातच हा प्रॉब्लेम सुरु झालाय "

राघव " ओके .. ओके .. जय तू रागावू नकोस मी सगळ्या शक्यता वर्तवल्या  .. मी  तर म्हणतो आपण एखादा सेशन करून बघूया .. नक्की कोणता विषय काढल्यावर तिचे हावभाव बदलतात त्यावरून पण अंदाज येऊ शकतो "

जय " अरे पण तिला हे मी कसे सांगू .. तिला जर कळले कि ती वेगळीच वागते हे मी जर तिला जाणवून दिले तर तिला खूप प्रेशर येते .. खूप घाबरते ती .. "

राघव " एक काम कर तिला  बाहेर घेऊन जा कुठेतरी .. हवापालट .. तिकडे खूप लक्ष ठेव तिच्यावर .. म्हणजे ह्या जागेतच ती असे करते का ? बाहेर पण करते हे लक्षात येईल .. तोपर्यत मी एक वस्तू पांढऱ्या रुमालात बांधून त्या रूम मध्ये ठेवतो .. बघू आपल्याला कळून जाईल "

बोल बोलता दोघे आईस क्रिम घेऊन घरात आले .. वसू ला समोर अशा अवस्थेत बघून जय आणि राघव तिच्याकडे बघतच बसले.

🎭 Series Post

View all