परकाया भाग ४५
क्रमश: भाग ४४
जय ने तिला उचलून बेड वर ठेवले .. तिचं चेहऱ्यावर पाणी मारले .. तिला ग्लास भर पाणी पाजले
जय " काय होतंय ? चक्कर का येतेय ? चल आपण डॉक्टर कडे जाऊ या "
वसू ने त्याचा हात पकडला
वसू - "जय सॉरी .. मी खरच सांगते मी हे नाही केलेय ..माझ्यावर विश्वास ठेव .. मला हेच कळत नाही मी तिकडे काय करत होते .. जय मला जवळ घेना .. मला खूप थकल्या सारखे वाटतंय .. असे वाटतंय मी खूप काम करून माझी सगळी ताकद संपलीय आता "
जय ने तिला कुशीत घेतले .. तिचा हात घट्ट त्याच्या हातात पकडून दोघे पुन्हा झोपून गेले ..
जय मनात विचार करत होता
"का असे करतेस वसू ? नको ग अशी वागूस .. मी कसे सांगू तुला मी किती प्रेम करतोय तुझ्यावर ? मी जगू नाही शकणार तिझ्याशिवाय .. माझा श्वास आहेस तू .. सॉरी मी तुला खूप त्रास दिलाय .. तू असे नको करुस .. प्लिज वसू माझ्यासाठी तुला जगावेच लागेल .. असे पुन्हा नको करुस .. कसला आणि कशाला एवढा स्ट्रेस घेतेस ग ? "
विचार करता करता जय ला झोप लागली
सकाळी उठले तर जय ने तिचा हात इतका घट्ट पकडून ठेवला होता कि सोडवल्यावर तिच्या हातावर त्याच्या हाताचा वळ उठला होता .
वसू उठली नेहमी प्रमाणे तिचे आवरून किचन मध्ये नाश्ता आणि डबा करत होती .. थोड्या वेळाने जय उठला तो पण फ्रेश होऊन बाहेर आला .
जय "गुड मॉर्निंग .. कशी आहेस ?"
वसू "हमम .. ठीक आहे "
जय "वाटत तर नाहीस बरीं .. तो दुधाचा गॅस बंद कर "
वसू "अ .. हो .. जय समोर नाश्ताची डिश ठेवली आणि कपात चहा ओतला दोघांसाठी "
दोघे समोरा समोर नाश्त्याला बसले .. कोणच बोलत नव्हते ..
जय "जाऊ दे टेन्शन नको घेऊस .. होतं असे कधी कधी .. आपण खूप दमलो होतो ना काल त्यामुळे स्लिप डिसऑर्डर होऊ शकतो "
वसू - "जय .. मला खूप भीती वाटतेय ? जय मला नाही मरायचय आता .. मला तुझ्या बरोबर संसार करायचाय .. जय मला काही होणार नाही ना .. जय मला विचार करून करून वेड तर नाही लागणार ना .. मला तू सोडून देशील का मग ?"
जय - "अरे काय वसू ? काय काय विचार करतेय ? असले काहीच होणार नाहीये .. तू एकदम ठीक आहेस .. हुशार आहेस .. उलट मी तर म्हणतो आता तुला पाहिजे तर तू पण Phd ला ऍडमिशन घे .. होऊन जाईल तुझी phd .. कळणार पण नाही "
वसू "नाही .. सध्या नको .. मला थोडा वेळ हवाय .. मला तुझ्या सोबत वेळ घालवायचाय .. हे काय होतंय मला .. जय .. मला काहीतरी होतंय का ?"
जय - "एक मिनिट जास्त स्ट्रेस घेऊ नकोस .. काही झालेलं नाहीये .. तू आज कामावर जाऊ नकोस .. थोडा आराम कर "
जय ने उठून तिला मिठीत घेतले .. तिला उचलून घेतले आणि बेडरूम मध्ये घेऊन गेला .. तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला .. थोडासा हलका मसाज देऊ लागला .. तिला कुशीत घेऊन झोपला .. तिच्या पाठीवर .. रब करत होता .. ती पण शांत पडली .. रिलॅक्स होत होती .. दोघांनाही कळले नाही दोघे एकरूप झाले ..
थोड्या वेळाने जय ला जाग आली तर वसू त्याच्या कुशीमध्ये शांतपणे झोपली होती .. तो तसाच पडून तिला पहात होता .. तेवढयात वसू ला पण जाग आली
जय "आता कसे वाटतंय ?"
वसू "मी ठीक आहे "
जय " एवढा स्ट्रेस घेत नको जाऊस .. यार .. आता तुला पुन्हा स्ट्रेस आला कि सांग मला मग तुझा स्ट्रेस असाच कमी करेल मी " गालात हसू लागला
वसू " काय रे .. गप ना..”
जय " मॅडम ११ वाजलेत .. तुमचे लेक्चर सगळेच राहिले म्हणून मारू नकोस मला "
वसू "अरे बापरे .. जय मी साधे कळवलं पण नाही कॉलेज ला "
जय "टेन्शन नको घेऊस .. मी कळवले आहे .. "
जय "वसू आपले सगळे उलटच आहे ना .. लोक फर्स्ट नाईट करतात .. आपला फर्स्ट डे झाला .. "
वसू तोंडावर हात घेऊन गालातल्या गालात हसायला लागते
जय " बरं तू जाणार आहेस का आज ? मला तर जायला लागणार आहे .. माझी मिटिंग आहे ... "
वसू " मी पण जाते .. संध्याकाळ पर्यंत एकटी घरात बसून तरी काय करू ? त्या पेक्षा माझे लेक्चर्स होतील .. "
बोल बोलता वसू बाहेर हॉल मध्ये आली तेवढ्यात वसू ओरडली " जय ... जय .. बाहेर ये .. जय "
काय झाले म्हणून जय पटकन बाहेर आला तर .. त्यांचे घड्याळ रात्री २. ०० वाजता बंद पडले होते आणि एक मोठे काळे काळे कुळकुळीत अतिशय भयानक दिसणारे मोठे फुलपाखरू त्या घड्याळावर बसले होते .. ते फुलपाखरू एवढे मोठे होते किती त्याचे लाल डोळे स्पष्ट दिसत होते ..
वसूने घाबरतच जयला हात करून ते दाखवले
जय " काय वसू यार .. बावळट .. किती घाबरवतेस कालपासून ? फुल पाखरू आहे ते साधे .. "
वसू " जय अरे हे एव्हडं मोठे फुल पाखरू असते का कधी ? हे काहीतरी वेगळंच दिसतंय ? जय ते माझ्याकडे बघतंय का ?"
जय " हो .. त्याला तू आवडलीस .. त्या फुल पाखराला तुझ्या केसांवर बसायचं .. तुझ्या गालावर किस करायचंय तो तुझा दिवाना आहे ..काल पासून आपला पाठलाग करत ते तूला भेटायला आलंय .. तुझा एक प्रेमी आहे तो ... आणि जय हसायला लागला
जय असे बोलायला आणि काय झाले काय माहीत ते फुल पाखरू उडायला लागले आणि वसू च्या दिशेने येऊ लागले
वसू ची पळता भुई थोडी झाली .. सगळ्या घरभर " आ ... जय .. मला वाचव .. मला वाचवं " ओरडत पळत सुटली .. जय नालायक नुसता हसत होता .. “पळ वसू पळ .. तो आला बघ तुझा दिवाना .. "
तो हसतोय .. हि जीवा च्या आकांताने ओरडत सगळीकडे पळतेय आणि पळता पळता वसू त्या तिच्या आधीच्या रुम मध्ये गेली .. त्या रूम मध्ये वसू त्या फुल पाखरा पासून लपण्यासाठी गेली खरी पण तिने दार लावायच्या आधी ते फुल पाखरू पण तिच्या मागे गेलं .. त्या रूम मध्ये वसू गेली आणि एकदाच मोठ्याने ओरडली आणि नंतर वसू चा आवाजच बंद झाला
जय " वसू अग काय हे .. हे फक्त एक फुलपाखरू आहे .. तू काय एवढी घाबरतेस .. सगळ्यात सेन्सिटिव्ह प्राणी म्हणजे फुलपाखरू असतो .. "
जय " वसू .. वसू .. वसू दार उघड .. ए हॅलो वसू .. यार दार कशाला लवलेस .. दार उघड ना .."
जय जोर जोरात दार ठोकवू लागला . आतून काहीच आवाज नाही ..
बराच वेळ ती काहीच बोलत पण नाहीये आणि आवाज पण देत नाहीये तसा तो पण घाबरला .. त्याच्या रूम मधून फ्लॅट च्या पझेशन च्या वेळी मिळालेल्या चाव्या शोधू लागल्या .. हा ड्रॉवर .. तो ड्रॉवर .. पटपट शोधत होता .. मिळेल ते सगळे खाली फेकून देत होता .. पाच एक मिनिटांनी त्याला तो चाव्यांचा गठ्ठा सापडला .. आता त्यातली कोणती चावी ह्या दाराला लागते ते माहित नव्हते .. एकेक चावी लावून बघत होता .. मधेच तिला हाक मारत होता .. फायनली एक चावी लागली आणि त्याने फटकन दार उघडले तर वसू बेड वर आडवी पडली होती ते मोठे भयानक फुलपाखरू वसू च्या गालावर बसले होते .. वसू घाबरून पुतळ्या सारखी स्थिर न हलता आडवी पडली होती .. डोळ्यात अश्रू साचले होते ते सुद्धा डोळ्यात अडकले होते ..
जय च्या चाहुलीने ते तिच्या गालावरून उडाले .. जय ने पटकन खिडकि ची काच उघडली तसे ते बाहेर निघून गेले .. जय ने पटकन पुन्हा काच लावून घेतली ..
ते उडून गेले तरी वसू अजूनही बेडवरच पडली होती ते हललीच नाही .. तिला तसे बघून जय ला इतके हसू येत होते .. कसेबसे स्वतःला कंट्रोल करून
जय " अग .. गेले ते .. उठ .. तिला हाताने उठवू लागला .. आणि गालातल्या गालात हसत होता .. "
वसू पटकन त्या कुशीवर वळली आणि डोक्यावर उशी घेऊन रडायला लागली
जय ला अजूनही हसायला येत होते .. तिचे रडणे बघून तर अजूनच हसायला येत होते .
जय " अरे यार .. एवढी काय रडतेस .. चल उठ मी जाऊ का ? ऑफिस ला .. माझी अर्ध्या तासात मिटिंग आहे .. "
वसू " जा .. तू .. मी जाईन ऑटो ने "
जय " अरे बापरे .. आता मी काय केलंय ? माझ्यावर का चिडतेयस ? "
वसू " तू जा ना .. मला नाही बोलायचंय तुझ्याशी "
जय ला तिला असे या गोष्टीवरून त्याच्याशी भांडताना बघून अजून हसायला येत होते ….
तो पण तिच्या बाजूला बेड वर बसला होता .. त्याला तिला छळायला जाम मज्जा यायची अजून मस्ती
जय - " अरे छू .. वसू उठ ते परत आले बघ .. उठ लवकर "
तशी ती पटकन उठली आणि त्याच्या मिठीत गेली आणि डोळे मिटून बसली
वसू " गेले का ते ?"
जय हसतच " हो गेले .. आताच हे काय बाहेर गेले ..
वसू ने डोळे उघडले इकडे तिकडे बघत होती .. तो आवाज होणार नाही असा हसत होता .. तिची घाबरघुंडी उडालेली बघून त्याला इतकी मजा येत होती ..
वसू ने उठून डबे भरून घेतले आणि त्याच्या बरोबरच जायला निघाली .. बाईक वर त्याच्या मागे बसून कॉलेजला गेली
जय " वसू .. तुझे चाहते भरपूर आहेत ग .. त्या बिचार्या फुलपाखराला पण नादाला लवलेस "
वसू " जय .. ते फुलपाखरू माझ्याकडे एकटक बघत होते .. मला त्याने स्टॅचू केले होते .. मला माहित नाही मी श्वास तरी घेतला कि नाही .. जय ते भूत नसेल ना .. माझ्यामागे लागलेलं ... त्यानेच मला काल हिप्नोटाईज्ड केले असावे .. "
जय " अग वेडे .. तुझे रूप बघून ते हिप्नोटाइज्ड झाले होते .. त्याला सुधरेना .. बावरा झाला होता तो .. तुझ्या मागे पळत होता "
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा