परकाया ४४

in this part both are njoying at choupati

परकाया ४४

क्रमश: ४३

जय बाहेर सोफ्यावर शांत बसला तर त्याला तिथेच शांत झोप लागली . वसू  फ्रेश होऊन बाहेर आली तर तर हा सोफ्यावर झोपला होता .. त्याला उठवायचे तर झोप डिस्टर्ब होईल म्हणून त्याच्या  अंगावर तिथेच पांघरूण टाकून ती एक साईडला बसल्या बसल्या झोपली ..

दुसऱ्या दिवशी सकाळी आरामात उशिराच उठले दोघेजण .. टीपॉय वरचा डबा बघून वसूला कळले कि नताशा काल रात्री आलीच नाहीये .. ती न चुकता यायची काल का बरं आली नाही असे ती जय ला बोललीच

जय " जाऊ दे ग .. मला ना ती मुलगीच जरा विचित्र वाटते "

वसू  " अरे पण तुला ती आठवली का ?"

जय " अग  नीटसा नाही पण पुसटसा चेहरा लक्षात आहे माझ्या तिचा .. त्या दिवशी पब मधे  भेटली होती तेव्हाचा .. काय ते ध्यान .. ना कपड्याचे भान . ना स्वतःचे भान .. "

वसू " अरे .. पण मनाने चांगली आहे .. आता तिचे प्रोफेशनच तसले आहे .. मॉडेलिंग करते म्हणजे कपडे काय बघायलाच नको नाही का ?"

जय " जाऊ दे .. मी उत्तर पूजा करून घेतो .. तू बाकीचे आवर .. आज आपण बाहेर जाऊ फिरायला .. मग उद्या पासून एकदा रुटीन सुरु झाले कि फिरायला जाता  येणार नाही "

वसू " ठीक आहे "

घरातील सर्व काम आवरून  दोघे मस्त बाईक वरून फिरायला गेले .. आज वसू ने जीन्स आणि टॉप घातला .. छोटेसे मोत्याचे कानातले आणि हातात घड्याळ . सिम्पल लांब वेणी , गळ्यात छोटे मंगळसूत्र .. एकदम .. नाजूक चाफेकळी दिसत होती ..

जय " वसू हे पण छान दिसतंय तुला .. सगळ्याच कपड्यात एकदम मस्त दिसतेस .. मला वाटले तुझ्या या लांब शेपटीमुळे तू जीन्स मध्ये छान नाही दिसणार .. फक्त  एक चेंज सांगू का ? वेणी च्या ऐवजी पोनी घाल अजून छान दिसशील "

वसू " ठीक आहे .. वसू ने वेणी सोडून हाय पोनी घातला .. "

जय ने तिला जे सामान आणले होते त्यात मोठया सिल्व्हर रिंग्स होत्या .. त्या त्याने तिला घालायला सांगितल्या ..

जय " परफेक्ट .. एकदम मस्त .. हा फोटो पाठवू का आईला ? "

वसू " ए गप ए .. कालच त्यांनी माझी तारीफ केली आज हा फोटो बघितल्यावर म्हणतील लागले वारे हिला "

आणि दोघे हसत हसत बाहेर पडले .. दोन्ही कडे पाय टाकून वसू जय ला पकडून बसली होती .. जय साहेब म्हणजे काय बाबा एकदम रॉकस्टार दिसत होता .. जीन्स टी शर्ट हेल्मेट आणि गॉगल .. दोघे मस्त दिसत होते .. जसे काल च्या गेटअप मध्ये लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसत होते तर आज हिरो हिरोईन दिसत होते

दोघे मस्त हॉटेल ला जेवले .. मग गार्डन , मग बीच .. चौपाटी वर चाट , नारळ पाणी , पाणी पुरी जे दिसेल ते खात होते .. मग वाळूत जाऊन बसले .. संध्याकाळच्या  रम्य वेळी दोघे हातात हात घालून  वाळूत फिरत होते .. वसू लिटरली आनंदात बागडत होती .. फुगे घेतले ते हवेत सोडले .. धावत होते पळत होते .. सेल्फी घेत होते .. एकमेकांवर पाणी उडवत होते .. जय च्या सवयी प्रमाणे तो तिला म्हणाला तुझी चप्पल आणि पर्स मला दे म्हणजे तुला चालता येईल

वसू " छे .. नवऱ्याने बायकोच्या पायाला हात नसतो लावायचा तर चप्पल कसल्या घेतोस हातात .. आणि मला चालता येतंय नीट " असे बोले पर्यंत चपलेच्या  हिल्स वाळूत रुतल्या आणि वसू पडता पडता वाचली

जय हसायला लागला " आता कळलं .. मी का घेत होते ते .. "

वसू " ठीक आहे ना .. मी माझ्या चपला माझ्या हातात घेऊ शकते कि "

तेवढ्यात  एक कपल समोरून चालत येत होते .. त्याच्या हातात त्याच्या बायकोच्या चपला पर्स होती .. आणि एका हातात तिचा हात होता ..

जय " ते बघितलेस का ? चालतं इकडे ? असे मी नाही केले तर मला नावं ठेवतील "

वसू " नको ना .. जय .. चपला नको मला अजिबात नको वाटतंय "

जय " बघ हा दे नाहीतर मी तुलाच उचलून घेईन आणि बोले बोले पर्यंत जय ने तिलाच उचलून घेतले .. "

वसू " जय .. ठेव ना खाली सगळे आपल्याकडे बघतायत .. "

जय " बघू दे .. माझ्याच बायकोला उचललंय .. आपण नवीन ट्रेंड सेट करू .. चपला बिपला सोडा बायकोलाच उचला "

तेवढ्यात अजून एक कपल जवळून गेले तर

त्या कपल मधला नवरा " अरे वाह .. हे बर आहे .. चपले  सकट बायकोलाच उचला "

जय त्याच्याकडे बघून हसला " माझी बायको चपला घेऊन देत नव्हती म्हणून तिलाच घेतले "

वसू " जय .. काय हे .. ठेव खाली मला .. चल जाऊ आपण घरी आता "

खूप सारे फोटोस , खूप साऱ्या आठवणी , खूप सारी मज्जा करून रात्री घरी आले . दोघांचाही मूड  आज सातव्या आस्मान मध्ये होता .. दोघांनाही एकमेकांची ओढ लागली होती ..

घरी आले फ्रेश झाले .. जेवण तर बाहेरूनच करून आले होते .. दोघांनाही दुसऱ्या दिवशी ऑफिस होते .. म्हणून वसू ने रात्रीच केस धुतले आणि आरशा  समोर केसांना पंचा  लावून बसली होती

जय " अरे रात्रीचे केस कशाला धुतलेस .. सर्दी  होईल ना "

आणि तिचा हात हातात घेऊन कपल डान्स सुरु करतो ..

वसू - " एक मिनिट आज मी माझ्या आवडीचे एक गाणं लावते त्यावर आपण डान्स करू .. हे गाणं तुझ्यासाठी आहे माझ्यातर्फे .. मला जे सांगायचंय तुला हे गाण्यात तुला सांगते

जय " ओके .. रोमान्स से भरपूर आज वसू मॅडम मुझसे  गाने से बात करने वाली है "

वसू  " गप ना जय .. लटक्या रागात "

जय " बर ठीक आहे लाव गाणे "


 https://www.youtube.com/watch?v=IgaB8n5Bj3U&ab_channel=AaryaSAOfficial

गाणं मुद्दामून लिहले नाही .. या क्षणी या लिंक वर (कंट्रोल + लिंक ) वर क्लीक करा म्हणजे गाणे कोणते आहे ते कळेल .. "

चला मग वसू च्या भावनांमध्ये हरवून जाऊ थोडा वेळ

जय आणि वसू एकटक दोघांकडे पहात होते... गाण्यातला प्रतेय्क शब्द जय ला इमोशनल बनवत होता .. वसू वर कसा जीव ओवाळून टाकू असेच त्याला वाटत होते .. मध्ये मध्ये तिच्या कपाळावर किस करत होता .. तिला खोल मिठीत घेत होता .

एक वेळ अशी येते कि स्पर्शाच्या पलीकडे आत्म्याला आत्म्याची  ओढ लागते .. हृदयात चर्र होत असते .. सुख दुःखाच्या पलीकडे एका वेगळ्याच ट्रान्स मध्ये दोघे गेले होते . नजरेने नजरेला नजरबंद केले होते .. गाणे ऐकता ऐकता दोघे एकमेक्नाच्या मिठीत एका  सुकून भरी समाधीत गेले .

रात्री साधारण २ वाजता त्यांच्या बेडरूम मधला नाईट लॅम्प अचानक चालू बंद  होऊ लागला .. शॉर्ट सर्किट होतंय कि काय असे होऊ लागले .. त्या आवाजाने आणि लाईट च्या उघडझाप ने वसू ला जाग आली . जय घट्ट मिठीतुन हळुवार पणे बाहेर येईन वसूने नाईट लॅम्प चे बटन बंद केले . परत झोपणार तर तिला तहान लागल्या सारखे झाले म्हणून ती किचन कडे जाऊ लागली .. बेडरूम चा लाईट  न लावता मधल्या पॅसेज मधला लाईट तिने लावला .. तर तो हि लाईट चालू बंद .. जास्त कमी होल्टेज असल्या सारखा लागला आणि चर्र ..चूर असा आवाज येऊ लागला .

तशीच वसू किचन मध्ये पाणी प्यायला गेली .. ग्लास मध्ये पाणी घेतले आणि एक घोट घेतला असेल तर ... तिच्या मागे कोणी आ हे  असे तिला एक क्षण वाटले .. तिने झपकन मागे वळून पहिले तर कोणी नव्हते .. एक क्षण घाबरली .. पटकन हवेचा लोट पुढे सरकला असे तिला जाणवले .. पुन्हा पाणी प्यायला गेली तर ...

वसू एकदम पुतळा झाली .. स्थिर .. जसे कोणीतरी तिला चावी दिलीय आणि तिचे शरीर चालू लागले ... वसू चालत चालत गॅलरीचे दार उघडून गॅलरीत गेली ..

साधारण १० वा मजला असल्यामुळे नॉर्मली वसू गॅलरीत जात नसे .. तिला उंचावरून खाली बघायला भीती वाटायची पण आज ती गॅलरीत गेली होती .. गॅलरीमध्ये एक टेबल होते त्यावर चक्क उभी राहिली होती .. तिला स्वतःचे भान नव्हते .. ती काय करतेय .. कुठे उभी राहिलीय .. काही माहित नाही .. कोणीतरी तिला करायला भाग पाडतंय अशी .. वसू त्या टेबलाच्या एकदम काठावर उभी होती आत जरा जरी एक पाऊल पुढे टाकले तर वसू डायरेक्ट खाली पडणार होती .. शून्यात नजर लावलेली वसू समोर बघत उभी होती . वसू पाऊल उचलणार आणि हवेत पाऊल टाकणार तोच तिला मागून जय ने मागे ओढले

जय ने तिला मागे ओढले आणि मग जय ओरडला " वसू... वसू .. हे काय .. जय चा घसा सुकला ..  भीतीने त्याच्या तोंडातून आवाज निघेना .. तशीच उचलून त्याने वसुला बेडरूम मध्ये आणली .. तिच्या तोंडावर पाण्याचे हबके मारले .. तशी ती जागी भानावर आली . ती भानावर आल्यावर जय ने तिला एक घट्ट मिठी मारली

जय " आग काय हे .. तू काय करत होतीस ? आता मला जाग  आली म्हणून  नाहीतर .. "

वसू " नाहीतर काय झाले असते जय .. मला काहीच आठवत नाहीये .. मी काय केले जय .. सॉरी मी काहीतरी केले ना आता "

जय " अग  तू बाहेर गॅलरी मध्ये  वर टेबल वर उभी होतीस .. एक सेकण्ड जरी मी लेट आलो असतो ना तरी ... "

वसू " जय .. मी मुद्दामून नाही केलं .. मला खरंच काही आठवत नाहीये .. "

जय "  झोपेत कधी पासून चालायला लागलीस .. आधी तर कधी चालत नव्हतीस "

वसू " अरे हा लाईट अचानक चालू बंद होऊ लागला म्हणून मला जाग आली .. मी पाणी प्यायला म्हणून किचन मध्ये गेले आणि तिथून पुढे मला काहीच आठवत नाही "

जय अजूनही त्या शॉक मधून बाहेर आला नव्हता .. त्याचे हाथ थरथरत होते .. त्याची हृदयाची धडधड खूप होत होती .. वसू ला सारखा मिठीत घेऊन तिच्या कपाळावर केसांवर किस करत होता ..

खूप घाबरला होता तो .. आज एक क्षण जर जाग नसती आली  मला तर मी वसुला कायमचे गमावून बसलो असतो या विचाराने त्याचे डोके चालायचे बंद झाले होते ..

त्याला दरदरून घाम फुटला .. वसू ला तर झालेय तेच नीटसे कळत हि नव्हते आणि आठवतही नव्हते .. आता ती स्वतः मनातून खूप खुश होती . नवीन संसासराची स्वप्न उराशी दोघांनीही बाळगली होती ..  अशातच हे सगळे असे घडत होते कि काय समजत नव्हते .. जय ला वाटे आता काय हिला हवेय ? हिने हि स्टेप का उचलली असेल .. माझे काय चुकले ? काल  तर ती नॉर्मल होती मग आज अचानक हिने पुन्हा स्वतःला संपवण्याचा निर्णय का घेतला असावा ..

असा निर्णय घेताना तिने एकदाही माझे काय होईल असा विचार का नाही केला ?

वसूच्या शरीरात त्राण  नसल्या सारखीच  ती झाली होती ...

वसू " नक्की काय केलंय मी जय ? तू एवढा का घाबरलास ?"

जय ने रागाने ओढत तिला पुन्हा गॅलरीत नेले . तिला गॅलरीतून खाली बघायला लावले " बघ .. किती उंचावर आहोत आपण .. इथून खाली पडल्यावर हाडं सुद्धा मिळणार  नाहीत.. तू अशी इथे उभी राहून काय करत होतीस .. काय हवेत चालायचं का तुला ? मूर्ख कुठली ? केवढा घाबरलो मी ? तुला काही  झाले असते तर ? माझा जरा सुद्धा विचार येत नाही का तुझ्या मनात ? आता तुला कसे पटवून देऊ कि माझे आणि समीराचे नाते संपलय .. मी फक्त तुझ्या आणि  तुझ्या वरचं प्रेम करतोय ? "

वसू जय काय बोलतोय ते ऐकत होती का नव्हती तिचे तिला माहित .. ती ने गॅलरीतून खाली वाकून बघितले आणि तिला एकदम गरगरले आणि चक्कर आल्या सारखे झाले नि ती जय च्या अंगावर कोसळली..

🎭 Series Post

View all