परकाया भाग    ४२

in thi part boss and his wife visits at jay and vasu home for puja

परकाया भाग    ४२

क्रमश : भाग ४१

वसू च्या  डोळ्यातून घळाघळा पाणी यायला लागते .. " जय .. हे काय झाले .. "

जय पण एकदम आश्यर्य  चकित झाला  .. हे काय झाले ..

जय " इट्स ओके .. वसू  अग ते अडकले असेल  कशांत  तरी.. तू रडू नकोस "

भटजी " टेन्शन घेऊ नका .. एक संकट जे तुमच्यावर येणार होते ते गेले असे समजा .. आणि मी दिलेला आशीर्वाद कधीच वाया जाणार नाही हे लक्षात ठेवा ..

जय वसू ला आत घेऊन गेला  ..

जय भटजीला त्याची दक्षिणा दिली  ..

भटजी " तुम्ही काहीतरी माझ्या विषयी गैर समज केला आहेत .. मी त्या नजरेने तुमच्या घरात इकडे तिकडे बघत नव्हतो .. हे तुम्हाला आज कळणार नाही पण काही दिवसानंतर तुम्ही स्वतः माझ्याकडे याल.. तुम्हाला यावेच लागेल .. तुमच्या पत्नी वर लक्ष ठेवा ..तुम्हा दोघांना कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे .. हरी ओम .. हरी ओम .. "

जय " ए हॅलो .. काय ते स्पष्ट सांगतोस का ? मी कुठून तुला बोलवल असे झालेय मला .. स्पष्ट बोल ना काय ते "

भटजी " तुमच्या घरात मला एक वेगळाच हवेचा दाब जाणवला आहे .. कोणीतरी निगेटिव्ह एनर्जी आणतय .. त्याचा परिणाम तुमच्या पत्नीवर होण्याची शक्यता जास्त आहे ..

जय " अरे ए काय वेड लागलाय तुला ? हे घर नवीन घर आहे आणि माझे घर आहे .. त्यामुळे असे शक्यच नाही "

भटजी " तूच कवच आहेस तिचा .. तू जोपर्यंत आजू बाजूला आहेस ना तोपर्यंत तिला काहीही होणार नाही .. त्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे .. म्हणून तर हे आज पूजा केलेल मंगळसूत्र तुटले .. एक घाव गेला .. ती अदृश्य शक्ती तिचे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे .. परंतु आज घरात पूजा असल्याने ती काही वाईट करू शकत नाही  "

जय " अरे .. तू जा प्लिज इथून .. प्लिज मला तुझे तोंड दाखवू नकोस परत .. "

भटजी " हा पूजेचा दोरा काढू नकोस .. मी सांगतोय ते लक्षात ठेव .. "

जय " अहो प्लिज तुम्ही जाता  का आता ?माझे डोके खराब नका करू ? आधीच माझी बायको जरा भोळी आहे त्यात तुम्ही तुमचे फंडे नका सांगू इथे "

भटजी " त्या भोळ्या नाहीयेत .. पवित्र  आहेत .. प्युअर सोल .. म्हणूनच मी त्यांचे निरीक्षण  करत होतो .. अशा पवित्र आत्म्यावर  वर ताबा मिळवणे सोप्पे असते कोणत्याही निगेटिव्ह एनर्जी ला .. तुम्ही त्यांची काळजी घ्या .. मला आधीच थोडा वेगळा फील येतोय इथे "

जय " अरे भाई .. तू जा ना .. एक काम तिला सांग .. आजच्या आज दुसरे मंगळसूत्र घातले कि काही होत नाही .. तिला पटलं पाहिजे .. मी जाऊन आता नवीन मंगळसूत्र घेऊन यतो "

जय " अग  वसू  हे बघ काय भटजी म्हणतायत " कि आजच्या आज नवीन मंगळसूत्र गळ्यात घातले कि सगळे ठीक  होईल .. तू थांब मी लगेच घेऊन येतो "

वसू  घाबरत बाहेर येते .. " नाही नको .. जय आज तू कुठेही बाहेर जाणार नाहीयेस .. माझी शपथ आहे तुला .. मंगळसूत्र तुटणे हे चांगली गोष्ट नाहीये .. आज नको बाहेर जाऊस प्लिज "

जय " काही होत नाही अग .. ते मंगळसूत्र मी आणि वीरू ने जाऊन घाईत आणले होते .. तेव्हा बघितले नाही  "

भटजी  जय ला बाहेर बोलवून " त्या म्हणतायत ते बरोबर आहे .. तुम्ही आज बाहेर जाऊ नका .. पाहिजे तर कोणाला तरी आणायला सांगा "

जय  ला नुसता राग येत होता त्या भटजी चा .. हा आणखी वेगळाच काही सांगतोय .. " ठीक आहे "

भटजी निघून गेला ..

जय ने राहुल ला आणि समीराला फोन केला आणि घरी पूजा आहे तर दुपार पासून घरी या असे सांगितले .. आणि राहुल ला सांगितले येताना एक मोठे मंगळसूत्र घेऊन ये . .. ते दोघे आले कि वसू तिचे टेन्शन पण जरा विसरून जाईल या हेतूने

जय ने काळे मणी सगळे गोळा केले आणि त्याच्या कपाटात ते ठेवून दिले

जय " हॅलो मॅडम .. काय तोंड पासून बसलीस ? आज पूजा आहे ना घरी ? चल उठ ? राहुल आणि समीरा दुपारी जेवायला आहेत .. दुपारचा  महानेवैद्य पण दाखवायचा आहे .. जेवणाची तयारी कर .. चल उठ .. तुला काय काय मदत हवीयं सांग  मी  आहेच "

वसू " जय .. आपले सगळे छान होईल ना ?"

जय " काहीतरी वेड्या सारखा विचार करत बसू नकोस .. मला अजिबात तुझ्यावर आता चिडायचे नाहीये .. असले काहीतरी बोललीस तर मला राग येईल "

वसू " अरे तू बघितलेस ना कसे ते मंगळसूत्र ... "

जय तिच्या बाजूला बसला … तिच्या तोंडावर हात ठेवला .. " काही झालेलं नाहीये .. आणि काही वाईट होणार नाहीये .. तू माझ्यावर विश्वास ठेव .. देव आपल्या पाठीशी आहे हे तर पटलेलंच आहे ..  नाहीतर तुला सांगतो हि जी अंगठी तुझ्या हातात आहे ती अंगठी आज समीराच्या हातात असती .. मी तिच्या हातात घालणारच होतो कि अंगठी हरवली .. मला वाटले कि ती पाण्यात गेली पण ती माझ्या कोट च्या खिशात गेली होती .. मी आणि समीराने खूप शोधली पण मिळाली नाही .. आणि मिळाली कधी जेव्हा आपली एंगेजमेंट होती तेव्हा .. " जय ने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या हाताला किस केले ..

" आणि  प्रपोज केल्यावर मी तिला किस करायला गेलो ना .. तर नेमका त्याच वेळी अप्पांच्या मोबाइल वरून फोन आला .. जसे कि आप्पा मला आठवण करून देत होते घाई करू नकोस .. आणि मी थाम्बलो .. "  जय तिच्या डोळ्यात बघून बोलत होता .. ती पण तो जे काही बोलतोय ते ऐकण्यात गुंग झाली होती .. बोलता बोलता जय तिच्या जवळ गेला होता .. " आता घाई करायला पाहिजे .. तू आटप लवकर" आणि हलकासा किस तिच्या ओठांवर करतो  

वसू पटकन त्याच्या नजरेतून सुटून भानावर येते ..  गोड  हसते .. आणि किचन मध्ये कामाला जाते ..

जय मनातल्या मनात " हूश .. नशीब हि बया .. मंगळसूत्र प्रकरण विसरली  .. पूजेचा घाट घातलाय त्याच्या पण आनंद घालवून बसली असती नाहीतर  ..

मग दोघे किचन मध्ये गेले .. जय तिला त्याला जमेल ती मदत करत होता .. मधेच तिला त्रासहि  देत होता .. मधेच मागून एखादी मिठी .. मधेच गालावर एक पप्पी . त्याच्यावर तिचा लटका राग .. असे आनंदात बागडत होते दोघे ..

तेवढयात राहुल आणि समीरा घरात आले . समीराने  खूप छान असा मोठा पुष्पगुच्छ  दोघांसाठी आणला ..

राहुल ने जय ला कडकडून मिठी मारली .. वसू ने समीराला मिठी मारली .. दोघे पूजेच्या पाया पडले .. राहुल ने जय च्या हातात ते मंगळसूत्र दिले

जय ने त्या मंगळसूत्राची लगेच पूजा केली .. त्याला हळदी कुंकू वाहिले .. मनापासून देवाला नमस्कार केला आणि ते मंगळसूत्र वसू च्या गळ्यात घातले .. तिच्या कपाळावर किस केले .

समीरा ने आणि राहुल ने टाळ्या वाजवल्या .. आणि म्हटले " शुभ मंगल सावधान "

जय " आता खुश .. का ? "

तशी वसू हसली

जय " अशीच हसत रहा ग ... एक लक्षात ठेव जोपर्यंत तुला मी आणि मला तू आहेस ना तोपर्यंत ह्या असल्या गोष्टींमुळे लगेच नकारात्मक विचार करायचे नाहीत . बाहेरच्या देशात कोण घालतं मंगळसूत्र ..  मी  म्हणत नाही कि हे तू 

जय " आता खुश .. का ? "

तशी वसू हसली

जय " अशीच हसत रहा ग ... एक लक्षात ठेव जोपर्यंत तुला मी आणि मला तू आहेस ना तोपर्यंत ह्या असल्या गोष्टींमुळे लगेच नकारात्मक विचार करायचे नाहीत .  घाबरायचे तर मुळीच नाही ..  बाहेरच्या देशात कोण घालतं  का  मंगळसूत्र ..  मी  म्हणत नाही कि हे तू  हे घालू नकोस .. तुटले तर तुटले लगेच रडायचे काय ? काय कळतंय का मी काय म्हणतोय ते ? सारखे मनात नकारात्मक विचार करत बसतेस आणि ..

वसू " बरं बास झाले आता जास्त लेक्चर नको देऊस .. "

जय " लेक्चर नाही ग .. तू रडतेस ना मग मला पण सुचत नाही "

वसू " सॉरी .. पुन्हा असे नाही करणार .. घातल्या घातल्या तुटले म्हणून जरा घाबरले बाकी काही नाही .. "

जय " वस्तू आहे ती एक ना एक दिवस तुटणारच आहे .. त्यात रडायचे काय ? एकतर त्या भटजीने माझे डोके आधीच खाल्ले होते आणि त्यात तू रडून अजून त्यात भर "

वसू " बरं .. ठीक आहे ..  राहुल आणि समीरा थांबलेत .. बाकीचे नंतर बोलू "

जय " हमम.. "

वसू च्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले ..

जय " नुसती रडू बाई आहे .. सारखा डोळ्यातून पाणी येत तिच्या "

वसू " तुला नाही कळणार ते .. "

जय " मला नाही मग कोणाला कळणार ? " आणि तिचे डोळे पुसतो आणि पुन्हा कपाळावर किस करतो .. " काय आहे ना वसू तू एवढी इमोशनल झालीय ना आता ..  अशी रडू बाई पेक्षा मारकुटी म्हैस परवडते मला " काना  जवळ बोलतो " आवडते मला "

वसू " काहीही काय ?" बरं चला जेवायला बसू .. मी नेवैद्याचे ताट वाढून देते .. "

पुरणा वरणाचा  स्वयंपाक वसू ने   नेवैद्य दाखवला  आणि चौघे जेवले

राहुल " यार वसू .. तुझे चरणकमल बघू ..  सगळं कसे ग येते तुला ? रांगोळी .. जेवण , अभ्यासात हुशार ,, दिसायला सुंदर .. यु आर अमेझिंग पर्सन .. प्युअर सोल "

प्युअर सोल हा शब्द ऐकून जय एकदम टेन्स मध्ये आला  .. सकाळी भटजी पण हेच बोलला होता .. शांतपणे वसू कडे नजर टाकतो तर वसू समीराला आग्रहाने पुरण पोळी भरवत होती .. मधेच राहुल ला भाजी वाढत होती .. हसताना किती सुंदर दिसतेय .. निरागस दिसतेय .. तिच्या डोळ्यात तर जो बघेल तो हरवूनच जातो .. असले पाणीदार डोळे आहेत ना ..

राहुल " ए हॅलो .. जय .. जय .. कुठे हरवलास .. एवढा स्टेअर करू नकोस तिला .. बायकोच आहे तुझी ?"

वसू पटकन लाजून आतमध्ये जाते

समीरा " जय यु  जस्ट लॉस्ट इ हर आईज ना "

जय " अरे नाही रे .. तसे काही नाहीये .. तिला नव्हतो बघत .. तिच्या बद्दल विचार करत होतो "

समीरा " यु बोथ आर क्युट टुगेदर .. तुमची दोघांची लुटुपुटुची भांडणे बघायला पण मज्जा येते .. "

जय " अरे लहानपणी तर आम्ही जाम मज्जा करायचो .. हे बदगुल एवढी जाडी होती ना .. म्हणून तिला मी जाडे हाक मारतो .. दोन वेण्या आणि परकर पोलका नाहीतर फ्रॉक घालून सारखी माझ्या मागे पुढे करायची .. " जय . मला हे दे .. मला ते दे .. नाही दिले तर जाम मारायची मला .. मी मात्र कधीच तिला मारले नाही .. पण तिचा गाल एवढ्या जोरात ओढायचो ..मग रडायची .. "

तिला रडवले ना कि आप्पा मला काठीने मारायला यायचे तर हि मध्ये यायची आणि म्हणायची " आप्पा , माझ्या जय ला मारू नका .. मी तुमच्याशी कट्टी घेईन "

मी म्हणायचो " ए मी काय तुझा जय नाहीये .. जाडे .. आणि तिच्या वेण्या ओढायचो .. मग एक रट्टा मिळायचाच मला ..आणि मला मारलं अप्पानी म्हणून हि रडायची  "

मग सगळे हसायचे आम्हा दोघांना ..

समीरा आणि राहुल त्याचे मन लावून ऐकत होते .. जय आज नेहमी पेक्षा वेगळ्या गप्पा मारत  होता.. चेहऱ्यावर ख़ुशी झळकत होती त्याच्या .. 

तेवढयात वसू  सगळ्यांना ट्रे मधून चहा घेऊन आली ..

जय " बस ग .. आता जरा आराम कर .. संध्याकाळी पूजेला पाहुणे येणार आहेत .. तेव्हा दमशील नाहीतर .. "

🎭 Series Post

View all