परकाया ४०

in this part vasu and plans for pooja at their home

परकाया ४०

क्रमश: भाग ३९

जय " मग परवा  करू .. "

वसू " ठीक आहे .. पण आप्पा आणि मामी ला यायला जमेल का लगेच ?"

जय " ओये .. काय वेड लागलं का तुला ? त्यांना इथे बोलवायची हि वेळ नाहीये .. मी त्यांना सांगतो काय सांगायचे ते  ? तू पूजेच बघ .. मग आपण जाऊ  त्यांना भेटायला .. नंदू च्या ओटी भरणाला .. जमले तर तुझे पण ओटी भरन करून येऊ तिकडूनच . लग्न एकाच मांडवात केलय आपण उगाच लोक नावं नको ठेवायला  मला "

आणि हसायला लागतो

वसू " गप ना जय  .. किती स्वप्न बघतोस रे एका दिवसात .. जय मला खूप भीती वाटते रे सगळं छान होयला  लागलं ना कि मनात हुरहूर लागते .. माझा आनंद  फार काळ टिकत नाही " आणि डोळ्यात पाणी हजर ..

जय ने तिला मागून  मिठीत घेतले आणि तशीच उचलली .. "आता फक्त एन्जॉय करायचे .. तू कसलाच स्ट्रेस घेऊ नकोस प्लिज .. झाले तेवढं खूप झाले .. नो मोअर टिअर्स .. नो मोअर्स वरिज .. कळलं का बायको ? असे काहीही होणार नाहीये .. कोणत्याही दुःखाला तुझ्या पर्यंत पोहचण्या आधी त्याला माझ्या शी फाईट करावी लागेल .. आणि तुला माहितेय इट्स नॉट  इझी टू फाईट विथ मी .. तुझा मार खातोय लहान पणा पासून कारण तुझ्यावर माझे प्रेम आहे .. नाहीतर हिम्मत आहे का कुणाची माझ्याकडे वाकड्या नजरेने पण बघायची "

वसू " सॉरी..  .. मी तुला खूपच त्रास दिला ना .. आता नाही मारणार .. "

जय " नाही .. आता पण मारू शकतेस तू बिनधास्त .. फक्त जेवढे फटके मारशील तेवढे किस द्यावे लागतील सिम्पल "

वसू ने जय चा हात कोपरा पासून पकडला आणि त्याच्या  खांद्यावर डोकं ठेवून शांत बसली ..

जय ते " सोन्याची चेन आणि पेंडंट पण दे .. मी घालतो तुझ्या गळ्यात .. "

वसू त्याला कपाटातून काढून त्याला देते .. जय त्याच्या हाताने तिच्या गळ्यात ते चेन आणि पेंडंट घालतो .. हातात सोन्याची अंगठी घालतो ..

जय " तुला एक सांगू वसू .. आपल्या प्रेमाने खूप अप्स अँड डाउन पहिले .. हे पेंडेंट आणि चेन मी घेतली पण आकाश तर्फे तुला घालायला सांगितली पण ती माझ्या कडूनच तुला मिळायची  होती  .. देवाला आपल्या  प्रेमाची काळजी फार  आहे .. त्यानेच आपले लग्न  घडवून आणलेय .. नाहीतर मी समीरा सोबत अल्मोस्ट सेट होणार होतो .. म्हणूनच मी तुला म्हणतो आपण दोघे जन्मोजन्मीचे साथीदार आहोत .. आकाश , समीरा राघव सगळे आले आणि गेले पण देवाने आपल्याला एकत्र आणलेच "

वसू " जय .. आकाश बरोबर ची डेट तू प्लॅन केलीस हे जेव्हा मला कळले ना तेव्हा मला किती आनंद झाला होता काय सांगू .. एक क्षण आकाश इतका चांगला कसा काय वागतोय मला कळलेच नाही .. तो जेव्हा माझ्या गळ्यात चेन घालत होता तेव्हा एक क्षण मी कावरी बावरी पण झाले होते .. नशीब तो माझ्या मानेला किस करणार होता पण बाहेर कोणतरी वेटर ने काहीतरी पाडले म्हणून तो राहिला .. "

जय " ए .. तो काय कोण वेटर नव्हता .. मीच होतो बाहेर .. तुला असे दुसऱ्याच्या हातात सोपवायचे मला जमतच नव्हते .. मी अर्धा तास ब्लूटूथ कॉल चालू  ठेवला होता .. तो तुझ्याशी कसा वागतोय ते ऐकण्यासाठी .. नंतर १० मिनिटांनी मुद्दामून वेटर तुम्हला दोघांना काहीतरी सर्व्ह करत होता .. विसरलीस का ?"

वसू हसायला लागते  " तू ना मॅड आहेस खरंच .. सरळ गोष्टी तुला समजतच नाहीत ना .. "

जय " नंतर राघव कॉलेज मध्ये मला म्हणाला " मिस वसुंधरा किती सुन्दर आहेत ना .. " तेव्हा त्याचे कानफाड फोडणार होतो .. त्याला मी तसा दम पण दिला होता .. तिला अजिबात त्रास द्यायचा नाही .. तुझ्या बाबतीत  पझेसिव्ह आहे तरीही मला कळले नाही कि आय एम इन लव विथ यु एवढा मॅड आहे मी "

वसू " अरे ते जाऊ दे .. त्या दिवशी  राहुल ला मिठी मारली होती तर कसला वाईट लुक्स देत होतास मला आठवतंय का ?"

जय " हो ना च्यायला .. मी खरच  सांगतो एक क्षण मला असे वाटले कि राहुल ला तुझ्यात इंटरेस्ट आहे कि काय ?"

वसू "   तुला एक गोष्ट अजून कळली नाही ना .. "

जय " काय ? त्याने तुला प्रपोझ केले का ?"

वसू " म्हणून माझा मार खातोस .. काही पण बोलतोस .. अरे राहुल लव्हज समीरा .. "

जय " ए गप ए .. काय पण काय बोलतेस ?"

वसू " जसा तू आणि मी लहान पणा  पासून एकत्र आहोत ना तसे ते दोघे एकत्र आहेत लहानपणा पासून . राहुल ने काहीतरी लपवलंय तुमच्या दोघांपासून "

जय " कशावरून तू हे बोलतेस ?"

वसू " मी हे आज बोलतेय कारण या आधी मी बोलले असते तर तुला वाटले असते कि मी तुमच्या दोघांच्यात फूट पाडतेय ? त्या दिवशी आपण बीच वरून त्याच्या फ्लॅट वर फ्रेश होईल गेलेलो ना तेव्हा मी चुकून एका  चुकीच्या रूम मध्ये गेले .. तेव्हा एका रूम मध्ये समीराचे मोठे मोठे फोटोस होते .. काही फोटोत राहुल स्वतः तिच्या फोटोत होता .. मी पटकन बाहेर आले उगाच काही गोंधळ नको म्हणून. मी त्याला मिठी का मारली माहितेय का ? एवढे त्याचे प्रेम समीरा वर असून सुद्धा तो मला सांगत होता तू लवकर सेटल हो .. म्हणजे  जय आणि समीराला लवकर एकत्र होता येईल .. हि  इज ग्रेट .. सिम्पली ग्रेट .. समीरा ची ख़ुशी त्याला इतकी महत्वाची आहे कि ती त्याला भेटली नाही तरी चालेल असे प्रेम करतो तो  "

जय " अरे यार .. म्हणजे खरें पाप माझ्याकडून होणार होते .. त्या दोघांच्या मध्ये मी आलो होतो "

वसू " तसे नाही रे .. जसे तुला माझे तुझ्यावर प्रेम आहे हे नोटीस होयला  वेळ लागला तसा समीराला अजून हे नोटीस नाही झालंय कि राहुल तिचा पार्टनर आहे .. "

जय " अरे यार .. ठीक आहे …अजूनही वेळ गेलेली नाही .. मला वाटतं आता राहुल हा चान्स सोडणार नाही .. थांब मी त्याला खुश खबर देतो "

जय ने राहुल ला कॉल केला

जय " हे राहुल .. तू दिल्ली वरून कधी येणार आहेस ?"

राहुल  " हे काय आज रात्री .. उद्या आपण भेटू शकतो .. बऱ्याच दिवसात भेटलो नाही सगळे "

जय " हो चालेल ना .. अरे ऐक ना .. एक बॅड न्यूज आहे .. माझे आणि समीरा चे ब्रेक अप झाले .. "

राहुल " हो बोलली मला ती .. तुम्ही बंगलोर ला होतात तेव्हाच सांगितले तिने मला "

जय " अरे तिने मला खूप समजून घेतले .. माझे खरे प्रेम वसू  वर आहे  आत्तापासून नाही तर लहान पणापासून आहे हे मला तिनेच रिअलाइज करून दिले .. आय एम हैप्पी विथ वसू .. ऐक ना .. समीरा तशी मनाने खूप स्ट्रॉंग आहे पण तुला जमलं तर प्लिज स्टँड बाय हर .. तू तर तिला लहानपणा पासून ओळखतो .. ती थोडी रिलॅक्स  होईल तुझ्या बरोबर "

राहुल " हमम.. होप सो .. मी आहे तिच्या कॉन्टक्ट मध्ये .. जय काँग्रॅच्युलेशन फॉर युअर मॅरेज.. यु आर नॉट अ बॅचलर नाऊ .. हैप्पी फॉर यु गाईज .. वसू ला सांग तिच्या हातचे जेवण जेवायचं आहे मला एकदा .. "

जय "एनीटाईम ब्रो .. समीरा कडे थोडे तेवढं लक्ष असू दे .. "

राहुल " अरे .. ते तर मी लहान पणा पासून करतोय .. शी इज माय बेस्ट फ्रेंड यु नो ना "

जय " यस .. सॉरी यार तुझ्या फ्रेंड ला माझ्या मुळे त्रास झाला .. "

राहुल " मला स्वतःला कमिटमेंट ची भीती वाटते .. तुम्ही लोक कसे काय मॅनेज करता काय माहित ? "

जय " प्रेम असले कि सगळे सोप्प होऊन जाते .. असो .. बोलू निवांत .. भेटू लवकरच .. "

जय ने फोन ठेवला पण वसू म्हणते त्यात खरंच तथ्य आहे हे त्यालाही जाणवले.

खूप आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता .. वसू साठी  काय काय काय करू असे त्याला झाले होते .. तिला खुश बघायचे हेच एक अंतिम ध्येय त्याचे झाले होते . जाणता -अजाणता त्याने तिला खूप दुखावले पण होते आणि तरसवले होते .. त्याला जेव्हा त्याच्या प्रेमाची जाणीव झाली तेव्हा पासून तो किती अस्वस्थ होता त्यावरूनच त्याला कळले होते कि वसू ने हे सगळे कसे सहन  केले असेल आपले ज्याच्यावर प्रेम आहे तो मुलगा म्हणतो कि मला तुझ्यात इंटरेस्ट नाही .. माझे दुसऱ्यावर प्रेम आहे .. माझ्यासाठी तू एक फक्त मैत्रीण आहेस .. मी तुझ्यासाठी नवरा शोधतो .. हे असे सारखे बोलून बोलून तिच्या जीवाला त्याने कितीदा दुखावले असेल .. वसू ने मात्र कधी त्याच्यावर तिचा अधिकार पण दाखवला नाही आणि तक्रार पण केली नाही . 

आता त्याला वसू ला सर्व सुखं द्यायचे होते ..

जय साडीचे पॅकेट तिच्या हातात देतो ..

जय - " हे बघ तुला आवडते का ? उद्या पूजेच्या वेळी हि साडी नेस .. "

वसू - " खूप छान साडी आहे .. जय .. किती मस्त चॉईस आहे तुझी .. "

जय - वसू , तू खुश आहेस ना .. मला आता तुला फक्त खुश बघायचंय .. मी पण ऑफिस मध्ये कोणाला अजून सांगितले नाही कि माझे लग्न झालेय तर माझ्या काही मित्रांना बोलावतो .. तू पण तुझ्या ओळखीच्या लोकांना बोलावं .. आपण छान पूजा करू .. उद्या शॉपिंग करू .. तुला काय काय करायचे ते करू.. "

वसू - " जय मंगळसूत्र पण घालायचंय गळ्यात .. ते पण पूजेला बसायच्या आधी भटजी समोर पूजा करून घाल.. आपण आपल्याला वाटले तेव्हा घातले .. आपल्याला वाटले तेव्हा काढले .. "

जय " ठीक आहे .. पण आज पासून तू इथेच रहायचे .. मला आता तुझ्या पासून लांब नाही राहायचे .. अगदी तू शेजारच्या रूम मध्ये जाणे सुद्धा मला नकोय .. बाकी सगळे मला मान्य आहे "

वसू " ठीक आहे .. "

गप्पा मारत , उद्याचे प्लॅनिंग करत दोघे एकाच बेड वर आनंदात झोपले .. वसू ला त्याच्या बरोबर बेड शेअर करताना खूप ऑकवर्ड होत होते पण कधी ना कधी तरी सुरुवात करणारच होती आणि जय आजच सुरुवात कर असे म्हणत होता .. जय तर पडल्या पडल्या झोपला .. एक वेगळीच शांती त्याच्या मनाला लागली होती आज ..

साधारण रात्रीचे २ वाजले असतील तर दाराची बेल वाजली .. वसू ला पण डोळा लागलाच होता पण बेल च्या आवाजाने तिला जाग  आली  .. बघते तर जय ने त्याचा हात तिच्या भोवती टाकून गाढ झोपला होता.

दारावर तिची मैत्रीण आली आहे हे याचा तिला अंदाज आला होता .. हळूच हात बाजूला करून वसू बाहेर आली आणि दाराच्या होल मधून बघू लागली ..

🎭 Series Post

View all