परकाया भाग ३९

in this part vasu accepts that she loves jay

परकाया भाग ३९

क्रमश: भाग ३८

वसू " अरे ते उदाहरण होते जय ... "

जय  बेड वर आडवा पडतो .." बोल बोल तू बोल .. मी ऐकतोय .. .. तुला माहितेय एक तर मी जेव्हा बोलतो तेव्हा मी शंभरदा नाही मी हजारदा विचार करून झालेला असतो .. मी कोणताच निर्णय असा एक सेकंदात घेत नाही .. तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय सुद्धा मी रात्रभर विचार करूनच घेतला होता ... माझ्या अंतर्र्मनाला हे कुठे तरी माहित होते (सब कॉन्शस माईंड ) कि तू मला आवडतेस त्यामुळेच माझ्या बुद्धीला तेव्हा तो निर्णय पटला होता .. "

वसू " आपण एकदा समीरा च्या आणि तुझ्या नात्याला चान्स देऊन पाहू .. कदाचित तुला उद्या  सकाळी असे वाटेल कि मी थोडी घाई केली आणि नंतर पच्छाताप होण्या पेक्षा आपण थोडा वेळ घेऊ या .. "

जय " ठीक आहे .. माझा निर्णय झालाय .. हि वेळ तुला हवीय .. मला नकोय .. तू तुझा वेळ आणि निर्णय घ्यायला मोकळी आहेस .. अगदी मला सोडून जायचा सुद्धा .. तुला जर गावाला जायचे असेल तर मला सांग मी स्वतः  सोडून येईल .. किंवा तुला त्या राघव शी लग्न करायचे असेल तर सांग मी तेही लावून द्यायला तयार आहे .. "

वसू " अजून एकही ऑप्शन आहे का संपले सगळे ?" रागाने त्याच्याकडे बघत बोलते

जय " आहे ना .. तुझे पण माझ्यावर प्रेम आहे ते एकसेप्ट कर आणि माझ्या बरोबर म्हातारी हो .. मरायच्या आधी माझ्या दहा बारा पोरांची आई हो " आणि हसायला लागतो  

वसू " शट अप .. काही पण बोलतो ..बंगलोर ला जायच्या आधी तर मी काकू बाई वाटत होते तुला ?"

जय " नाहीयेस का मग तू काकूबाई ? तूच सांग ? आहेस ना ? पण याचा अर्थ माझे तुझ्यावर प्रेम नाही असे नाही होत ना .. मला आवडते माझी काकूबाई " आणि तिचे गाल त्याच्या हातच्या चिमटी मध्ये पकडून ओढतो

ती एवढी  सिरिअस होऊन बोलतेय आणि हा सगळंच लाईटली घेतोय हे बघितल्यावर तिची वेगळीच चिडचिड होयला लागली

वसू " जय मला वचन मुक्त कर .. मी तुझी लाईफ माझ्यामुळे खराब होऊ देणार नाही .. तू आणि समीरा एकमेकांसाठी बनलेले आहात .. मला इनफॅक्ट आता जगायचंच नाहीये .. हा सगळं गुंता मी मेल्यावरच संपणार आहे ..

जय ला  तिला खाडकन कानाखाली वाजवावी असेच वाटत होते  ..” मरायचं तुला ? इतके सोपे वाटतंय ? बघावे तेव्हा मरणाच्या गोष्टी .. चल गॅलरीत दोघे खाली उडी मारु .. चल .."

जय रागाने लाल झाला होता .

दोघेही शांत .. कोणच कुणाशी जरावेळ बोलत नाही .. वसू  रूम च्या बाहेर जायला निघते

जय " थांब वसू .. अजून विषय संपला नाहीये .. मला काही प्रश्नांची  उत्तरं हवी आहेत तुझ्याकडून .. तू ला आता माझी नाही .. तुझी स्वतःची नाही पण समीराची काळजी आहे .. एकदा तुझ्या साईडने विचार करून मला खरं सांग .. तुला मी नवरा म्हणून पसंत आहे का नाही ? किंवा त्याही पेक्षा तुला माझ्या बरोबर संसार करायचा आहे का नाही ? या प्रश्नाचे नीट विचार करून उत्तर दे .. माझे प्रेम बीम गेले खड्ड्यात .. तुझे तर नाहीये .. हे सिद्धच झाले .. तुला न  विचारता तुला हात लावला त्या बद्दल सॉरी .. या रूम  च्या बाहेर जर आज गेलीस तर आत घेणे मला कठीण जाईल .. तेव्हा पाहिजे तर तुला खुर्ची आणून देतो इथेच रात्रभर थांबून विचार कर मला काही घाई नाही .. पण एक निर्णय घेऊन टाक .. प्रेम नसलेले लोक पण संसार करतातच ना .. "

वसू  दारातच थांबली .. आणि त्याच्याकडे बघू लागली ..

तो चिडलाय असे दाखवत होता .. त्याला फक्त तिच्या तोंडातून सत्य बाहेर काढायचे होते ..

चिडला तर होताच तिच्या मरणाच्या गोष्टी ऐकून त्याला तिचा खूप राग आला होता .. पण त्याने मनापासून आज ठरवले  होते कि मी आज चिडणार नाही .. तीच्या मनातुन ती खूप इन्सिक्युअर आहे .. ती अशी अचानक हे सगळे एक्सेप्ट करणार नाही .. तिच्यामुळे कोणाचे नुकसान झालेले तिला मुळीच आवडणार नाही .. आणि त्यात जय च्या बाबतीत ती जास्तच सेन्सिटिव्ह होती .. त्याने कोणताही निर्णय घाई गडबडीने घेऊन अजून गुंता वाढवू नये .. थोडा स्वतःला वेळ द्यावा असेच तिला वाटत होते ..

वसू " माझे प्रेम तुझ्यावर आहे कि नाही याला कोण विचारते ? मला ना आता या प्रेमावर विश्वासच राहिला नाहीये .. मला एवढच माहितेय कि  नको असताना तुझ्या गळ्यात पडायचे नाहीये "

जय " मूर्खच आहे .. आता मगच पासून काय मी कानडीत बोलतोय .. मी आता तुला सांगतोय ना .. मला तुझ्या बरोबर संसार करायचंय .. आत ह्या पेक्षा काय सांगू ?"

वसू " पण तुझे प्रेम समीरा वर आहे ?"

जय " नाहीये .. हे आम्हा दोघांनाही रिअलाइज झालेय तेच तर सांगतोय ना .. "

जय मुद्दामून पुन्हा तिला डिवचतो " तो मैं यह रिश्ता पक्का समजू "

वसू त्याच पावली मागे फिरते आणि बेड वरची उशी घेते आणि त्याला बडवायला लागते " नालायक .. तुला मज्जा वाटते .. तुला पाहिजे तेव्हा तू संसार करणार .. तुला पाहिजे तेव्हा मला मैत्रीण मानणार .. तुला पाहिजे तेव्हा तू माझ्यासाठी नवरा शोधणार .. .. तुझी हिम्मत कशी झाली मला नवरा शोधायची ? तू जर माझ्यासाठी नवरा शोधला असतास ना तर तुला .. तुझा खूनच केला असता मी .. "  हसता हसता रडत होती आणि उशीने त्याला मारत होती ..

जय " बास .. बास .. रण चंडिका .. शांत हो .. आणि  तिचा हात तो धरत होता .. एक  दोन फटके तर जोराचे बसले पण त्याला " ओये अग .. लागतंय वसू "

शेवटी दमली आणि बेड वर त्याच्या शेजारी जाऊन बसली .. केस सगळे विस्कटले होते .. हात थरथरत होते .. लिटरली घाम आला होता त्याला मारून लिटरली तिला दम लागला .. तिचा श्वास  वर खाली होता ..

जय ने तिला मागून बसल्या बसल्याच मिठीत घेतले

जय " सॉरी ना बाबा .. खरंच सॉरी .. थोडं उशिरा जाणवलं .. पण जाणवलं ना यार .. आता एकही क्षण तुझ्या पासून दूर नाही राहायचंय मला .. "

वसू "  आता इथून पुढे जर मला रडवलंस ना तर तुला मी खरंच सांगते  मी खरोखर जीव देईन .. माझे आता पेशन्स संपलेत "

जय ने तिची वेणी ओढली " परत जर हे वाक्य बोललीस ना तर मग बघच नाही तुला दाखवल मी काय चीज आहे ते   .. तू आता तुझी पण नाहीयेस .. माझी आहेस .. कीप इन माईंड दयाट "

वसू " आई ग .. जय तू केस नको रे ओढत जाऊस .. मला जाम दुखतात .. "

जय " तुझ्या हे लक्षात रहायला पाहिजे ना म्हणूनच मी आता जोरात ओढले कळलं बायको ? "

वसू " ते तुझ्यावर आहे .. तू नसलास माझ्या आयुष्यात तर जगून तरी काय करु ?"

जय तिला ओढून जवळ घेतो .. आणि तिच्या कपाळावर किस करतो .. तिचा चेहरा दोन्ही हातात धरून तिच्या नाकाला आपले नाक लावतो .. तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंना किस करतो ..

जय " किती रडतेस ग ? कसली तुला एवढी भीती वाटते ? मी आहे ना .. का एवढा विचार करतेस ? आता मी करतो सगळं ठीक .. "

वसू लहान मुलांसारखी रडत होती.. तो तिला प्रेमाने जवळ घेऊन तीचं सांत्वन करत होता .. तिच्या चेहऱ्यावर त्याच्या प्रेमाच्या असंख्य  खुणा तो तिला देत होता .. स्वतःची आणि तिची तहान भागवत होता .. दोघे एकमेकांना स्पर्शाने  अनुभवत होते .. जय च्या डोळ्याच्या कडा पण ओल्या झाल्या होत्या ..

दोन रंग एकमेकांत मिसळण्यासाठी आतुर झाले होते ..

तेवढ्यात दाराची बेल वाजली .. एकदा .. दोनदा .. तीनदा .. बेल वाजतच  होती... शेवटी नाइलाजाने जय तिच्या पासून लांब झाला  .. आणि विस्कटलेले स्वतःचे केस नीट करतो आणि बाहेर जातो तर बाहेर पिझ्झा वाला होता .. जय त्याला पैसे देतो आणि पिझ्झा घेऊन आत मध्ये ओट्यावर  ठेवतो .. 

वसू अजूनही शांत बेड वर पडली होती ..  आत्ता काय झाले याचा विचार करून तीला जय कडे बघायला पण खूप लाज वाटत होती ..

जय ने हॉल मध्ये दोन प्लेट्स घेतल्या ..

तिला बेड वरून उचलून त्याने हॉल मध्ये आणले .. तीने तिचा चेहरा दोन्ही हाताने झाकून घेतला होता ..

जय " इट्स ओके .. चल पिझ्झा खाऊन घे "

वसू " जय मला कसंतरी होतंय "

जय ने पिझ्झा वर सॉस टाकला

जय " माझी मारकुटी म्हैस .. म्हैस नाही मांजर .. चल आ कर पटकन "

वसू  अजूनही त्याच्या कडे बघत नव्हती .. " नको तू खा .. मी खाईन  नंतर "

जय " अग .. खा ग .. इतक काय लाजतेस .. ?"

वसू  उठून आत किचन जायला निघते .. " तू खाऊन घे .. मी कॉफी करते दोघांना "

जय " अरे यार .. वसू .. बघ हा मी उठलो तर .. काय करेन मला नाही माहित.. हात खाली कर आता  "

जय आणि वसू चे प्रेम तर सुरु झाले होते .. दोन आत्म्यांनि एकमेकांना ओळखले होते .. म्हणतात ना पेअर्स (pairs ) आर मेड इन द हेवन .. आपल्या हातात काही नसते .. नदी वाहत वाहत शेवटी जाऊन समुद्राला मिळतेच .. दोन जीव खूप आनंदात होते .. नव्याने एकमेकांना पाहत होते .. नव्याने एकमेकांचे होत होते .. प्रेम म्हणजे काय असे विचारलेत तर उत्तर आहे " दोन शरीर एक मन " तिथे ना कसले बंधन असते .. असते फक्त ओढ .. जीवाला कासावीस करणारी ओढ .. हजारो लोक आपल्या आजू बाजूला असतात पण वेड फक्त एकालाच बघून लागतं .. हृदय त्याचे अस्तित्व एकाला बघूनच दाखवते .. सांगून देते कि हाच आहे तो आत्मा ज्याचा साठी परमेश्वराने तुला या धर्तीवर पाठवलंय .. भले आपण कोणत्याही  मार्गावर असलो तरी देव आपल्याला त्याच्या जवळ पोहचवतोच " इट्स अ  गेम ऑफ डेस्टिनी "

सिम्पल गोष्टी जास्त कॉम्प्लिकेटेड होयला लागल्या कि समजायचे आपल्यासाठी अजून बेटर ऑप्शन देवाने आखले आहेत .. आता समीराचेच बघा .. तिच्या आयुष्यात तिच्यावर प्रेम करणारा बेटर पर्सन तिला भेटेल तेव्हा तिला ते कळेल .

शेवटी जय ने तिच्या  मागे पुढे करून पिझ्झा भरवला आणि स्वतः पण खाल्ला ..

पिझ्झा खाऊन झाल्यावर जय ने तिला सांगितले हे वॉर्डरोब ओपन करून बघ .. वसू ने त्याच्या रूम मधले वॉर्डरोब ओपन केले तर त्याने तिच्यासाठी खूप छान ड्रेस आणले होते .. तिला युज होईल असे मेक अप चे सामान आणले होते ..

जय " उद्या इथे ड्रेसिंग टेबल आणू म्हणजे तुझे खूप सामान राहील .. इथे एक बुक शेल्फ लावू .. तुझ्या माझ्या आवडीची बुक्स अरेंज करू .. अजून काय काय चेंजेस करायचेत ..

वसू " आपण घरात एक देव्हारा आणू.. आणि ऐक  ना जय पुढल्या महिन्यात वगैरे तुला वेळ असेल तेव्हा घरात पूजा करू .. आणि मग आपण आपली फॅमिली लाईफ सुरु करू "

जय " पुढल्या महिन्यात ? काय वेड बीड लागलंय का तुला ? उद्याच आणतो भटजीला .. " आणि हसायला लागतो .. " शुभ काम में ..  देरी नही करनी  चाहिये मॅडम " आणि तिचे गाल ओढतो ..

वसू " निर्लज्ज कुठला .. उद्या नको .. आता वाजले किती १० .. उद्या कधी मी तयारी करेन पूजेची .. मला खूप शॉपिंग करायचीय "

🎭 Series Post

View all