परकाया भाग ३८

in this part jay is trying to her into his room nd she is not ready for that

परकाया भाग ३८

क्रमश : भाग ३७

वसू " जय हे काय करतोय .. प्लिज खाली ठेव मला ".. जरा तिचा टोन बदलला होता .." ठेव खाली प्लिज "  त्याच्या दंडावर त्याला मारू लागली .. " अरे समीरा चा विचार कर एकदा .. ती माझी पण मैत्रीण आहे .. मी असा तिच्या स्वप्नांचा चुराडा माझ्यामुळे होऊ देणार नाही .. मी आताच्या आता गावाला निघून जाते .. आज आता या क्षणा पासून तुझा आणि माझं कहीही संबंध नाही .. मी असले पाप नाही करू शकत .. देव सुद्धा मला माफ करणार नाही .. तू काय बोलतोयस ह्याची तुला शुद्ध नाहीये .. आज अराम कर .. उद्या बोलू आपण " आणि ती तिच्या रूम मध्ये जायला निघाली

जय ने पटकन तिचा हात पकडला .. ती अशीच रिऍक्ट होईल असा जरासा अंदाज होताच त्याला ..

जय " थांब .. थांब .. तुला काय मी इतका खालच्या पातळीचा वाटतो का ? मी सांगितलं त्यातला शब्द नि शब्द खरां  आहे .. माझे तुझ्यावर प्रेम आहे या बद्दल मी १०० परसेन्ट शुअर आहे .. त्यामुळे तू हे जरी स्वकारले नाहीस तरी समीरा चा आणि  माझा ब्रेक अप झालाय हे सुद्धा १०० टक्के खरेच आहे .. समीरा ने स्वतः  तिच्या मनाने  हा निर्णय घेतलाय .. उलट तिलाच हे पाहिले जाणवले कि माझे तुझ्यावर प्रेम आहे .. नाहीतर मी म्हणत होतो कि तू माझी जवाबदारी आहेस .. मला तुझी काळजी आहे .. तुझे लग्न होइ  पर्यंत तुला सांभाळणे हेच माझे कर्तव्य आहे .. मला कधी हे वाटलं पण नाही कि मी तुझ्यावर प्रेम करतोय कारण मी तेवढाच समीरा शी प्रामाणिक होतो .. "

तोपर्यंत वसू  ने समीरा ला फोन लावला पण

वसू " समीरा .. "

समीरा " हॅलो वसू  कशी आहेस ? अरे तू आता मला कॉल कसा केलास .. मला वाटले जय ने आता तुला सोडलेच नसेल .."

वसू "   मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचंय.. हे काय नवीन ? तुम्ही असा ब्रेक अप का केलात ? समीरा प्लिज एवढे मोठे सक्रिफाईज नको करुस प्लिज .. "

समीरा " हे हॅलो .. सक्रिफाईज वगैरे असले मोठे शब्द वापरू नकोस प्लिज .. मी काय सांगते ते नीट ऐक .. जय वर माझे आणि त्याचे माझ्यावर प्रेम आहे .. पण ते प्रेम निखळ मैत्री वाले प्रेम आहे . आताही जर त्याला मी बोलावले तरी तो तुला सोडून मला भेटायला येईल .. कारण त्याचे माझ्यावर प्रेम आहे .. पण ते प्रेम आणि त्याचे तुझ्यावर असलेले प्रेम यात खूप फरक आहे .. तो तुझ्यावर खूप प्रेम करतो पण त्याला जेव्हा तुझ्या पासून लांब गेला तेव्हा जाणवले आणि मुख्य म्हणजे मला पण जाणवले कि तो माझ्या बरोबर या नात्यात खुश नाहीये .. नंतर त्याला असे वाटायला लागले होते कि तो मला फसवतोय .. किंवा प्रोपोज केले म्हणून आता हे नातं निभवावेच लागेल .. यात सगळ्यात आपण तिघेही नाखुश च राहिलो असतो ..

तुम्ही दोघे मेड फॉर इच अदर आहेत .. सो आता तुम्ही आधीच खूप वेळ फुकट घालवलाय आता फोन ठेव आणि एन्जॉय युअर फॅमिली लाईफ ..

वसू " आणि तू ?

समीरा " हे बघ .. जो माझा आहे तो येईलच .. भेटेल मला तो भेटला कि सांगेन तुला .. "

वसू " सॉरी समीरा .. तुझ्या दुःखाला मी करणीभूत आहे "

समीरा " अरे दुखी .. कोण दुखी .. मी खूप खुश आहे .. मेरे यार को उसका प्यार मिला  हैं  । आय एम हैप्पी फॉर यु बोथ ..  प्लिज काही गिल्ट ठेवू नकोस मनात आणि माझ्या मित्राला सांभाळ काय ?"

वसू " तू येशील घरी मला तुला भेटायचंय .. तू खुश आहेस ना .. तू दुखी तर नाहीस ना .. मला काय करावे ते कळत नाहीये ग .. "

समीरा " तू काही करू नकोस .. जे काही करायचंय ते तोच करेल .. " आणि हसायला लागली

जय " झाले बोलून .. झाली खात्री करून . .. पण आता मला थांबवू नकोस .. कारण तुला माहितेय मी जो पर्यंत १०० पर्सेंट शुअर नसतो तोपर्यंत मी काहीच करत नाही .. आज मी १०० परसेन्ट शुअर आहे .. "

वसू " मला पण तसेच शुअर होयचेय .. "

जय " मग तू मला काहीपण विचार .. तुला अन्सर द्यायला मी तयार आहे .. समीरा ला कशाला मध्ये  आणते ? तुला असे वाटतंय का ? कि मी घरात तू आणि बाहेर तिला ठेवेल "

वसू " मारू ? मारू का ? गालावर ? काहीपण बोलतोस .. "  

 तिला उचलून पुन्हा त्याच्या रूम मध्ये न्यायला निघतो

जय " आज आता मी तुझं काही ऐकणार नाही .. हा एका कारणा  साठी ऐकेन ते म्हणजे जर तू मला सांगितलेस कि तुझ्या मनात मी नाही दुसरा कोणीतरी  आहे  .. किंवा नवरा म्हणून मी तुला पसंत नाही ? असे काही असेल तर सांग "

वसू " तुला माहितेय असे काही नाहीये ते "

जय " माहितेय नाही मी १०० परसेन्ट शुअर आहे कि तुला मी आवडतो आणि मीच तुझा या जन्मीचा नाही जन्मोजन्मी चा पार्टनर आहे .. फक्त मला थोडे उशिरा कळले तुला  हे आधीच कळले होते .. तू म्हणाली पण होतीस  समोरच्या ला न मागता .. ना सांगता त्याला कळलं पाहिजे  .. आता मला कळलंय तू मला ना सांगता .. मग आता का मागे हटतेस  "

जय "  मी म्हटलं ना .. यु अल्सो लव मी ..  तू नाही बोललीस तरी मला तुझ्या डोळ्यात दिसतंय .. जसे आज तुला माझ्या ड़ोळ्यांत दिसले तसेच "

वसू " जय मला एक मिनिट खाली ठेव .. मला खूप कसतरी होतंय .. "

जय " अग हेच मला पण होतंय .. मी गेले ४ दिवस तिकडे कसे काढले ते मलाच माहितेय .. आता नाही मी ऐकणार "

वसू " जय .. प्लिज .. प्लिज .. मला लाज वाटतेय आता .. "

हा सगळं प्रकार इतक्या लवकर आणि ती मनातून या सगळ्या गोष्टींसाठी मनाने तयार नव्हती .. काय आहे हे ? आहे ते स्वीकारू का नको स्वीकारू ? खूप घाई होतेय का ? बरोबर आहे का ? छातीतली धड धड वाढत होती .. जय चा स्पर्श सुखावत पण होता आणि भीतीही वाटत होती ... घशाला कोरड पडली होती ..

जय ने तिला खाली ठेवले ..  भिंतीला हात टेकून तिच्याकडे बघत उभा होता .. आणि तिच्याकडे बघून भुवया उडवत हसत होता ..

जय " झाले समाधान .. " आणि तिच्याकडे जाऊ लागला तसा तिने दोन्ही हातांनी तिचा चेहरा लाजून झाकला तेवढ्यात पुन्हा समीरा चा फोन जय च्या मोबाइल वर आला

जय " हा बोल समीरा .. प्लिज आता काहीही काम असले तरी आज मी येणार नाहीये .. “आणि हसायला लागला .

समीरा " नालायक .. फोन स्पीकर वर टाक .. मला वसू शी बोलायचंय "

जय ने फोन स्पीकर वर टाकला

समीरा " वसू  तू आहेस का तिकडे ?"

वसू  " हो आहे ग .. बोल काय म्हणतेस "

समीरा " या नालायकाने मला किस पण केले नाहीये .. त्याला किस देऊ नकोस आज .. जरा तरसू दे नालायकाला " आणि हसायला लागली

जय " ए गप ए .. ठेव फोन .. "

वसू " शी बाबा .. तुम्ही दोघे फारच . निर्लज्ज आहेत. " आणि फोन कट केला

वसू पटकन वळून तिच्या रूम मध्ये जायला निघाली तर जय ने तिचा हात पकडला ..

जय " एवढी आज्ञा धारक बनू नकोस काय .. आज तू तिकडे जायचेच नाहीयेस .. आज मी तुला इकडे नेणार आहे "

वसू " जय मला भूक लागलीय .. मला जेवण बनवू दे .. "

जय " ठीक आहे .. जा मग .. कोणाचं काय आणि कोणाचं काय ?"

वसू " अरे चिडतोस काय ? मला जरा वेळ तरी दे .. मला सावरू तर दे .. आता घरात येई पर्यंत मला वाटतं होते कि माझे लग्न लवकरात लवकर बाहेर कुठेतरी झाले पाहिजे कारण मला तुला मोकळे करायचे होते . आता एक तासात चित्र बदललंय .. मला हे स्वप्न आहे का सत्य आहे याची तरी जाणीव होऊ दे "

जय " अरे म्हणूनच मला तुला त्या रूम मध्ये न्यायचेय .. हि रूम आता या आपली रूम आहे म्हणून मला तुला तिकडे न्यायचेय .. तिकडे एक गम्मत आहे ती तुला दाखवायचीय  .. तुझ्या साठी एक गंमत आणलीय ती दयायचीय म्हणून तुला त्या रूम मध्ये नेतोय .. "

वसू " ठीक आहे .. जेवल्यावर जाऊ .."

जय " जेवण बिवण काही नाही .. मी पिझ्झा ऑर्डर केलाय .. माझ्यात आता पेशन्स नाहीयेत आणि तिला पुन्हा उचलून घेतो आणि आतमध्ये नेतो

जय " वेलकम टू माय लाईफ .. वसू.. आय रिअली लव यु सो मच "

वसू ला तो हातात उचलूनच सर्व रूम दाखवतो .. तिला त्याने तयार केलेला कोलाज दाखवतो .. लग्नाचे फोटो बघून वसू खूप खुश होते ..

वसू " खोटे खोटे लग्न खरं लग्न झाले .. काय होतंय आज .. मला विश्वासच बसत नाहीये या सगळ्यावर ..असे वाटतं कि हे सगळे एक स्वप्न आहे आणि मी जागी झाले कि सत्य वेगळे असेल .. "

जय तिला काही कळायच्या आत तिला किस करतो .. " आता कसे वाटतंय .. हे तरी खरं वाटतंय का ? " आणि अजून एकदा किस करतो .. " आत आता बघ .. काहि फरक वाटतो का ? " आणि अजून एकदा किस .." आता तर फरक पडलाच पाहिजे .."

वसू  "  व्हॉट वॉज धिस !!!.. थरथरत्या हाताने त्याला ती फटके मारत होती आणि चेहरा कुठे लपवू असेच काहीसे होत  होते तिला आणि त्याच्या खांद्यावर डोके ठेवून चेहरा लपवते ..

जय " पटलं का आता कि हे स्वप्न नाही सत्य आहे का अजून काही करावे लागेल मला "? .. ..

वसू " शी बाबा .. तू जा ना .. मला खूप कसे तरी होतंय जय .. प्लिज असे नको करुस ना .. "

जय " मग कसे करू ? तूच सांग "

वसू " मला नाही माहित कि कशी रिऍक्ट होऊ ते .. समीरा ची जागा  मी नाहीत घेऊ शकत जय .. समीरा आणि माझे कंपेरिजन पण होऊ नाही शकत .. ती किती सुंदर आहे , स्मार्ट आहे , स्टईलीश आहे .. तुझ्या बरोबरीची आहे मी तिच्या शी माझी बरोबरी पण नाही  करू शकत ..तिच्या पुढे मी गावंढळ आहे .. काय करू जय .. हे सत्य तू नाकारू नाही शकत आणि मी पण नाही नाकारू शकत .. या सगळ्या पेक्षा तीच तुझ्यावर प्रेम आहे .. "

जय " आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे त्याचे काय ?"

वसू " अरे हे सगळे तुला वाटतेय कारण मी आता तुझ्या घरात राहतेय .. तुझ्या बरोबर गेले ४ महिने आहे मी .. अरे आपण एखादे मांजरीचं पिलू जरी घरत आपल्या जवळ ठेवले तर आपल्याला त्याचा लळा  लागतो मी तर काय माणूस आहे .. तेव्हढ तर ओढ लागणारच ना .. याच अर्थ अशी असलेली गर्लफ्रेंड शी ब्रेक अप घेणे बरोबर आहे का ?"

जय " हमम.. हा मुद्दा माझ्या लक्षातच आला नाही .. म्हणजे तू मांजरीची पिलू आहेस तर जी कि मी पाळली आहे  लहान पणा पासून मना  मध्ये  .. हे बाकी बरोबर आहे मांजरी सारखे मध्ये मध्ये पंजे तर मारत च असतेस ना .. तू "

🎭 Series Post

View all