Feb 28, 2024
रहस्य

परकाया भाग ३७

Read Later
परकाया भाग ३७

परकाया भाग ३७

 

क्रमश: भाग ३६

 

त्याने रेड रोझ च्या पाकळ्या पंख्याच्या पात्यावर  टाकल्या .. ती आली कि तिच्या अंगावर या सगळ्या पडतील .. तिला हि मी आणलेली साडी गिफ्ट देईन आणि तिला आजच नेसायला लावेन .. ती सोन्याची चेन आणि त्यातलं हार्ट वाले पेन्डन्ट तीच्या गळ्यात माझ्या हाताने घालेन .. जी अंगठी मी लग्नात तिच्यासाठी घेतली होती ती राहिलीच ती तिच्या हातात  घालेन .. काय काय करू असे त्याला झाले होते

 

जय छान तयार होऊन गॅलरी मधून बघत होता ती येताना दिसतेय का ? जशी ती ऑटो मधून उतरली तसा तो आत आला ..

 

वसू ला जय आलाय हे माहीतच नव्हते .. तीने तिच्या कडच्या चावी ने दार उघडले आणि ती आत आली .. वसूने दार आतून लावून घेतले आणि टर्न  केला आणि सोफ्यावर डोळे मिटून बसली .. जय ने हळूच फॅन चे बटन ऑन केले तसे दोघांच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या पडल्या .. तिने डोळे उघडले .. तर समोर जय  उभा ....

अचानक जय ला समोर बघून खूप खुश झाली ..

 

वसू  " ए हाय .. तू कधी आलास ? फोन करायचास ना ? मी लवकर आले असते .. उलट घरी आल्यावर कंटाळा येतो म्हणून मी एक्सट्रा लेक्चर घेतला "

 

जय " कशी आहेस ? मी तुला खूप मिस केले .. " आणि तिला घट्ट मिठीत त्याने घेतले ..

 

वसू पण त्याच्या मिठीत विसावली .. असा तो फ्रेंडली हग करतो त्याची तिला सवय होती .. ती पण एक दोन मिनिट शान्त पणे  त्याच्या मिठीत विसावली

 

वसू " मी पण तुला खूप मिस केले .. पहिल्या दिवशी खूप  घाबरले होते .. जरी तू तुझ्या रूम मध्ये असलास तरी तुझ्या असण्याचा वेगळाच आधार असतो हे मला कळले ..  तू भांडतोस माझ्याशी ते भांडायला पण कोण नव्हते त्यामुळे मला  कंटाळा पण यायचा .. "

 

जय " अच्छा म्हणजे .. मी तुला एन्टरटेन करतो ते तुझी होत नव्हती म्हणून आठवण आली का माझी ?"

 

वसू मनात " मग काय ? तुला काय सांगू ? असे सांगू का कि मला एक एक क्षण बेचैनी होत होती .. मला तू नव्हतास तर श्वास घेताना पण त्रास होता ते .. "

 

जय " हॅलो .. जाडे झोपलीस कि काय ?"

 

वसू " झाले सुरु .. आणि गोड हसली ..आणि त्याचे गाल एक हाताने ओढले .. आणि बाजूला झाली " चल मस्त चहा टाकते "

 

वसू पायावर पाणी घेऊन किचन मधे गेली .. हा पण तिच्या मागे मागे किचन मध्ये गेला .. तिला चहा करताना एक टक तिला बघत होता .. तिच्या वेणीतले पुढचे केस थोडे बाहेर आले होते .. ते तीच्या गालावर .. मानेवर .. हलत होते .. ती हलली कि तिने घातलेले मोत्याचे कानातल्याचे डूल पण हलकेच हलत होते .. तीचे बोलके डोळे मधेच दुध गरम झाल्यावर ती हळूच फुक मारत होती ..

 

जय ने तिचा हात हातात घेतला आणि तिच्या कपाळावर किस केले .. तिचे केस जे तिच्या गालावर नाचत होते ते त्याने त्याच्या हाताने मागे केले .. तिच्या कानातलया वर हळूच एक फुंकर घातली .. तसे ते कानातले जोरात मागे पुढे हलू लागले .. पण तिने मात्र डोळे मिटून घेतले ..

 

जय ने तिच्या मानेवर एक हलका किस केला .. तशी  त्याच्या पासून लांब गेली .. त्याने तिला हाताला पकडून परत तिला जवळ ओढले आणि तिच्या गालावर किस केले .. आणि जय आता तिच्या ओठावर किस करणार

 

तेवढ्यात वसू  " जय .. अरे जय .. हॅलो.. कुठे हरवलास .. ?"

तसा  तो भानावर आला .. बघतो तर वसू सिंक जवळ कप धुवत होती आणि हा तिच्यापासून खूप लांब होता .. स्वतः वरच हसू लागला .. काय काय विचार करतोय मी .. हिला जर ह्यातले काही कळले तर .. कसे रिऍक्ट करेल ती ? हीचा  काही अंदाज येत नाही यार .. कसे सांगू हिला कि आता मला काय काय होतंय ..

वसू " बाय द वे .. समीरा काय म्हणतेय ? तुमचे ऑफिस चे काम कसे झाले ? मिटिंग व्यवस्थित झाली का ?"

 

जय " हॅलो .. हॅलो .. चिल .. जरा वेळ बस शांत .. सगळे सांगतो .. आधी मला शान्त बसू दे तुझ्या जवळ "

 

जय च्या डोळ्यातले भाव बघून वसू त्याच्या डोळ्यांत फार काळ बघू नाही शकली .. ती त्याच्या पासून नजर चोरू लागली होती

 

जय "तू घाबरल्या सारखी का वागतेस ? मी काही खात नाहीये तुला "

 

हे वाक्य ऐकून तिला धस्स झाले .. हा असा काय वागतोय ? हा नॉर्मल नाहीये ..

 

वसू " जय तू ड्रिंक्स केलेस का ? हॅलो .. मी समीरा नाहीये .. मी वसू  आहे .."

 

जय हसायला लागला .. म्हणजे माझ्या डोळ्यात तिला प्रेम दिसतंय एव्हडं तर नक्की

 

जय " हमम.. आय नो यु आर नॉट समीरा .."

 

दोघांसाठी चहा करून दोघे बाहेर सोफयावर बसायला आले

 

जय " मला तुझ्याशी बोलायचंय .. तू ऐकणार आहेस का ? का भांडणार आहेस ? "

 

वसू " मी नाही भांडत तूच भान्डतोस .. तरी पण आज तरी मला तुझ्याशी भांडायचे नाहीये .. बोल मी ऐकतेय "

 

जय " माझे आणि समीराचे ब्रेक अप झालेय .."

 

वसू" व्हॉट ??? काय वेड लागले का तुला ? ..असला मजाक मला आवडत नाही ..जय लाज वाटत नाही का तुला असला मजाक करताना ? आणि हे सांगताना तुला कसलेही दुःख .. टेन्शन नाहीये .. उलट आनंदात सांगतोय असेच वाटतंय   "

 

जय " का ? असे नाही विचारलेस ?"

 

वसू " का ? पेक्षा हे चुकीचे आहे तू आता च्या आता तिला कॉल कर आणि तिला सॉरी बोल .. मी सगळ्यांसाठी जेवण बनवते .. आणि लगेच पॅच अप कर ..  तू आहेस च भांडखोर .. आपल्या वर प्रेम करणारी शी कसे वागावे तुला कळतच नाही .. निदान तिला तरी दुखवू नकोस .. खूप प्रेम आहे तिचे तुझ्यावर "

वसू  खूप हायपर झाली

वसू " तुला काय सोपे वाटते का हे सगळे ? त्या मुलीने किती स्वप्न पहिली असतील तुझ्या सोबत .. अशी एकदा ब्रेक अप म्हटल्यावर सगळी स्वप्न अशी संपतात का ? अरे हृदय तुटते .. जीवन जगणे मुश्किल  होते .. जय प्लिज मला तुझ्या कडून हि अपेक्षा अजिबात नव्हती .. तू का असा वागलास तिच्याशी ? तू चुकतोयस जय ? माझंच बघ आपल्यावर प्रेम करणारं माणूस भेटणं इतके सोपे नाहीये ? तू असे करू नकोस जय .. तू जा .. आताच्या आता जा .. तिला परत घेऊन ये "

 

जय " शु.. ऐकून घे आधी सगळं .. मग बोल "

 

वसू "नाही मला काहीच ऐकायचे नाहीये .. मी माझ्या मोबाइल वरून तिला कॉल करते आणि उठून उभी रहाते ..

 

जय " ऐक ना .. वसू मी काय म्हणतोय ते तरी ऐक .. "

 

वसू " बोल तू .. पण तुझंच चुकले असणार आहे मला खात्री आहे .. "

 

जय पुढे होऊन तिच्या तोंडावर एक  हात ठेवतो .. आणि एक हाताने तिला चूप बस असे सांगतो .. पुन्हा ती त्याच्या प्रेमळ डोळ्यात हरवते .. तो पण तिच्या डोळ्यात बघत उभा राहतो ..

 

जय " आता मी बोलणार तू ऐकणार मग तुझे जे काही मत आहे ते तू बोल .. ठीक आहे "

 

जय " हे सगळे जे काही झालेय ते खूप वेगळे आहे .. अनपेक्षित आहे पण मी सांगतोय त्यातला शब्द न शब्द खरा आहे .. वसू तू आणि मी लहान पणा पासूनच एकत्र आहोत .. तुझ्या वरून जेव्हा मला अप्पा चिडवायचे .. कि वसू तुझी बायको होऊ शकली असती तिच्या वडिलांनी तिचे लग्न ठरवले नसते तर तेव्हा मला तू माझीच आहेस असेच वाटायचे .. तुला आठवते .. तुला जर कोणी शाळेत त्रास दिला तर त्याला मी किती बडवायचो ते .. आणि मी म्हणायचो " माझ्या वसू ला जर त्रास दिला तर फोडून काढेन .. तू विचार वीरू ला विचार .. वीरू या सगळ्याचा साक्षीदार आहे .. तुला रोज ते रानटी फुल काढून द्यायचो .. तुझ्याकडून मुद्दामून माझी कामं पण करून घायचो आठवतंय का ? कसले मस्त दिवस होते ते .. मी जेव्हा तुला दहा वर्षांनंतर बघितले ना तेव्हाच माझी विकेट पडली होती .. तुला आठवतंय तू डान्स करताना माझ्या हातात पडली होतीस तेव्हाच तुझ्या डोळ्यात हरवलो होतो .. तेव्हा मला माझे प्रेम तुझ्यावर आहे याची जाणीव झाली नाही कारण मी येताना समीराला प्रपोज करून आलो होतो ..

 

तू जेव्हा दोन महिन्या पूर्वी हरवलीस ना तेव्हा मी अल्मोस्ट मेलो होतो .. मी एवढा कधीच घाबरलो नव्हतो .. माझे काहीतरी खूप जास्तीच नुकसान  होतंय . माझी आवडती वस्तू हरवलीय असेच काहीसे मला वाटत होते .. .  अशीच भीती जेव्हा तू गावी हॉस्पिटल मध्ये होतीस ना तेव्हा मला वाटली  होती .. काय आहे हे सगळे हे मलाच कळत नव्हते .. आता थोड्या दिवसांपूर्वीच सांगतो .. मला प्रमोशन मिळालं ना तेव्हा हा आनंद मला फक्त तुझ्या बरोबरच सेलिब्रेट करावासा वाटत होता .. अगदी समीरा सुद्धा नको होती .. तरीही मी बुद्धू मला काय होतंय हे मला कळतच नव्हते ..

 

बंगलोर ला समीरा माझ्या जवळ इतकी जवळ होती पण मला तुझीच  आठवण येत होती .. समीराला किस काय मला तिला फ्रेडली ह्ग करायला पण नको वाटत होते ..  हे तिला प्रकर्षाने जाणवू लागले होते .. तेव्हा तिने मला समजावलं कि हे सगळे होतंय कारण " मी तिच्या वर नाही तुझ्यावर प्रेम करतोय ..  हे आत्ताचे नाही तर लहान पणा पासूनचे आहे "

 

वसू दोन्ही हात तोंडावर घेऊन जोरात रडू लागली होती .. कसे रिऍक्ट करावे हे तिला समजेना पण मनातला हळवा कोपरा फुटला होता ..  डोळ्यातून बाहेर पडत होता ..

 

जय " वसू .. तू फक्त माझी आहेस .. वसू  आय लव यु .. सॉरी मी आहेच बुद्धू .. मला जरा हे उशिरा कळले .. तुझ्या पासून लांब गेलो आणि मला हे कळले कि तू माझा श्वास आहेस .. "

 

जय ने बोलता बोलता वसू  ला त्याच्या मिठीत घेतले.. " आय लव यु .. वसू .. " असे म्हणत तिला मिठीत घेऊन उभा राहिला .. ती अजूनही तिचे हात डोळ्यांवर ठेवून रडत होती ..  तो हि तिला रडून देत होता .. पण मिठी घट्ट करत तिचे सांत्वन करत होता .. "

जय " ऐक ना .. बस झाले आता किती रडणार आहेस .."  त्याने तिच्या केसांवर हात फिरवला .. आज तिला त्या मिठीत खरंच खूप सेफ वाटत होतं .. आपलेपण वाटत होतं ..

एक मन तिला असे वाटले "या मिठीतुन कधीच बाहेर येऊ नये .. आज आत्ता या क्षणी मृत्यू जरी आला तरी चालेल इतका तिचा आत्मा तृप्त झाला होता .. माझ्यावर कोणीतरी प्रेम करतय हेच तिला सुखावून गेले होते .. जय शिवाय माझे लाईफ अधुरे आहे हे तिला माहीतच होते .. आता याक्षणी कसलाही विचार न करता त्याची होऊन जावे असेच तिला वाटत होते .. जय ची पण काही वेगळी अवस्था नव्हती ..

 

जय ने तिला त्याच्या हातात उचलून घेतली आणि तिला त्याच्या रूम मध्ये नेऊ लागला

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//