परकाया भाग ३२

in this part vasu and jay are discussing abt raghv

परकाया भाग ३२

क्रमश: भाग ३१

जय " अरे .. तो तुझा ढापण्या काय म्हणतोय ? मला म्हणाला मिस वसुंधरा खूप सुंदर आहेत .. मी लग्नाला तयार आहे .."

वसू " हो का ? त्याची एवढी हिम्मत .. समोर आला कि जीभ जड होती त्याची माझ्या समोर

जय पुन्हा जोरात हसायला लागतो

जय - " अरे .. प्रेमात पडलाय तुझ्या तो ..काय वसू एवढ्या अख्या कॉलेज मध्ये तुझ्यावर हा जोकरच भाळला "

वसू " हडं .. भाळला नाही रे तो येडा आहे मला म्हणाला तू तुझी काळजी घे येणारा काळ खूप कठीण काळ येणार आहे .. मी म्हटले तुझ्या सारखा माणूस माझ्या मागे लागला या पेक्षा अजून काय कठीण काळ असणार माझा "

जय " अरे तू त्याला बावळट समजू नकोस .. त्याला १७ गोल्ड मेडल्स मिळालेत .. दिसायला सुद्धा बरा.. राहतो गबाळा .. आणि त्यात त्याचा त्याला ना सूट होणार चष्मा .. "

वसू " अरे तो काय काय करत असतो .. भविष्य बघतो , पत्रिका बघतो , फेस रिडींग करतो , हॅन्ड रायटिंग वरून स्वभाव ओळखतो .. हिप्नोटाईज करतो , प्लँचेट करतो .. काय काय चालू असते त्याचे .. तुला माहितेय काय ? त्याचा Phd चा विषय कोणता आहे .. पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज .. "

जय " हो ना च्यायला .. वाटतो असा फुसका ? या असल्या भुताच्या गोष्टीवर अभ्यास करायला गट्स पाहिजेत .. इथे भुताचा सिनेमा बघताना माझी वाट लागते हा तर डायरेक्ट त्या विषयावर phd करतोय .. म्हणूनच त्याला तू आवडलीस .. तू पण काही भुतापेक्षा कमी नाहीस .. मला तर वाटते तुझ्यात एक भूत असावे ... ते तुझे लग्न होऊन देत नसावे ... आणि तिची वेणी ओढतो आणि हसायला लागतो "

वसू " हा रे माझ्यातच भूत असणार .. तुझ्या सारख्याला लाईन वर आणायला मला भूताचीच मदत घायवी लागत असणार .. आणि भेट असे कोणाला पण धरत नाही काय ? त्याच्या कामाच्या माणसाला धरतं .. त्याचे राहिलेलं काम पूर्ण करायला धरतं "

जय " ए गप ए .. काही नसते भूत बित .. इथे माणूस चंद्रावर जाऊन पोहचला आणि अजून तुम्ही भूत खेताच्या गोष्टीवर विश्वास ठेवता "

वसू " काय माहित यार ? पण आफ्टर लाईफ असते असे म्हणतात एवढं तर खर  आहे .. म्हणून तर हिंदू धर्मात माणूस मेल्यावर त्याचे सर्व विधी नीट करावे लागतात .. त्या शिवाय आत्म्याला मुक्ती  मिळत नाही असे म्हणतात "

जय " ते असेल ग .. पण उगाच ह्याच्या त्याच्या शरीरात कशाला घुसत असतील ? जगातले ९० टक्के लोक ज्यांचे लग्न झालेय ते मी कधी मारतोय असेच त्यांना झालेय .. हसतच .. बायको पासून सुटका पाहिजे असते त्यांना .. त्यामुळे त्यांची कसली आलीय आफ्टर लाइफ .. "

वसू " अहाहा .. तू तर असा म्हणतोय कि तू संसार ना करताच माझ्या बरोबर राहून थकला आहेस "

जय " हा संसार नाही तर काय आहे ? भाजी पाला आणतो .. दुध आणतो .. तुला रोज कॉलेज ला सोडायला येतो .. अजून काय असतो वेगळा संसार .. फक्त ..."

पुढे बोलायचं थांबतो .. त्यालाच ऑकवर्ड होतो आणि तिला पण जर ऑकवर्ड झाले .

जय " ते जाऊ दे .. एक विचारु का ? "

वसू " विचार ? प्रोफेसर राघव बद्दल ना "

जय " हमम.. आता विषय निघालाच आहे तर क्लिअर करतो " तू ला इंटरेस्ट आहे का त्याच्या मध्ये ?"

वसू " तुला कसा वाटतोय तो ? मी तुला आधीच सांगितले होते कि माझा पार्टनर तुझ्या पसंतीने मी करेन "

जय " हो तेच तर .. पण बेसिक तरी इंटरेस्ट आहे का ? हे कळायला लागेल ना मला "

वसू " मला काहीच कळत नाही .. मी काय करावे तेच कळत नाहीये मला .. उद्या या गोष्टीनां आपण अप्पांना कसे पटवणार आहोत आपण या विचारानेच माझे डोके सुन्न होते आणि दुसरे मन वाटते .. या जगात कोणालाच माझ्यात इंटरेस्ट नाहीये त्या बावळट तर बावळट पन त्याचे माझ्या वर प्रेम तरी आहे ? मग त्याचा का विचार नाही करावा ? कदाचित देवाने च त्याला माझ्यासाठी सिलेक्ट केला असेल तर ?"

जय " च्यायला .. अप्पांना कळले कि माझा तर खूनच करतील .. आणि पंकज .. तो कसा रिऍक्ट होईल काय माहित ? माझी नंदू चे लाईफ त्याचा हातात आहे ?"

वसू " अरे त्याची काळजी करू नकोस तू ? पंकज कसाही असला तरी नंदू वाट त्याचा जीव आहे .. त्याने आपल्या सारखे नाही खरे खरे लग्न केलय तिच्याशी "

वसू" अरे तुला कळलं का ? नंदू इज प्रेग्नेंट "

जय " काय ? अरे मला कोणच बोलले नाही .. यार तुम्ही लोक इतके नालायक ना .. मला का सांगत नाही अशा गोष्टी "

वसू" अरे बाळा तू घरात येतोस नि माझ्याशी भांडायला सुरुवात करतोस .. मी कधी  सांगणार तुला  ?"

जय तिचे गाल हातात घेऊन "काँग्रट्स मग आता तू मामी होणार ?"

वसू " मामी नाही रे आत्या होणार मी "

जय " आता तुला मी वाजवली असती .. पण जा .. आता माझा मूड खूप चांगला आहे .. तुझे मैने माफ़ कर दिया "

वसू " ओये मामा .. जास्त शहाणपणा नाही करायचा काय ? तुझी माफी तुझ्याकडेच ठेव .. आता माझ्या भाच्याला बघायला जाऊ आपण "

जय " ओबीअस्ली ! नंदू .. आय एम सो हैप्पी फॉर यु "

बोल बोलता त्यांचे दोघांचे जेवण झाले आणि सोफ्यावर बसून गप्पा मारत बसले

वसू - " जय .. सॉरी माझ्या मुळे तुझा संसार अर्ध्यात अडकला ना .. नाहीतर एव्हाना तू आणि समीराने पण नंबर लावला असता .. मला तिच्यासाठी खूप वाईट वाटतं .. स्वतःचा खुप राग येतो  .. "

जय " झालं परत .. मै और मेरी तनहाई .. कम ऑन वसू .. व्यिई शुड एन्जॉय धिस मोमेन्ट फॉर पंकज अँड नंदू .. चल तुला डान्स शिकवतो .. कपल डान्स .. उद्या राघव बरोबर डान्स करायची वेळ आली तर .. येत नाही असे नको होयला .. आणि तिचा हात हातात घेऊन तिच्या बरोबर डान्स करू लागला .. "

वसू " जय .. नको मला कसे तरी होतंय हा असला डान्स तुझ्या बरोबर करायला "

जय " काय होतंय .. काकू बाई ? काही होत नाही .. जर ते डोकं विचार करायचं बंद कर .. आणि दिल कि सुनो मेरी जान "

वसू " अरे वाह .. आज मूड एकदम सातव्या अस्मान मध्ये गेला कि काय ? "

जय " मग .. तू बातमीच अशी दिलीस मी दिल खुश हो गया मेरा .. " " ऐक ना वसू .. उद्या कॉलेज मधून येताना ते गर्भ संस्कार चे पुस्तक आणि डीव्हीडी घेऊन ये मी नंदू ला पाठवून देईन "

वसू " अरे वाह .. बरीच माहिती आहे तुला .. "

जय "अरे तुने अभि मुझे पहचाना नही "आणि एक तिला घेऊन गिरकी घेतो

वसू " हमम.. आय नो यु विल बे ग्रेट डॅड अँड औसम हजबंड .. मी बघते ना तू समीरा ची किती काळजी घेतोस ते .. अगदी तिच्या चपला हातात घेतोस .. छान वाटतं तुम्हा दोघांना बघायला  "

जय " थँक  यु .. तुझी चप्पल हातात घेणारा कोण आहे साला .. आणि कुठे आहे ह***खोर अजून लपलाय .. लपलाय का लपवलास त्याला "पुन्हा एक गिरकी घेतो .. आणि दोघे हसायला लागले ..

वसू " ओह गॉड .. जय किती हसवतोय आज .. हसून पोट दुखलं माझे "

जय " तशी तू पण चांगली बायको होशील .. सुगरण तर आहेसच .. सांसारिक तर आहेसच .. आणि दिसायला पण सुन्दर आहेसच , नोकरी पण करतेस .. त्यामुळे मॅरेज मटेरियल आहेस "

वसू " पण काय उपयोग .. फिर भी कोई इंटरेस्टेड नहीं है !.. बहुतेक मी बॅचलर च मरणार.. "

दोघे दमून पुन्हा सोफ्यावर बसले

वसू ने त्याला आणि दिले आणि स्वतःला ला पण घेतले

वसू " बापरे .. जय २ वाजले .. चल झोपूया .. "

जय " वसू  तेल मालिश करून दे ना .. आज झोप ये नाहीये "

वसू " तुझे ना लवकर लग्न होईल पाहिजे .. मग ती समीरा तुझी सगळी नाटकं सहन करेल "

जय " काय यार वसू .. सारखे टोमणे मारतेस  "

वसू "टोमणे नाही रे असे मज्जा .. मला पण लक्षात राहिले पाहिजे कि तू ऑलरेडी एंगेज आहेस म्हणून मी सारखे हेच बोलते " आणि हसायला लागते ..

जय " हसतेस काय ? दात दिसतात बघ तुझे ? "

वसू " चल गुड नाईट .. उद्या बोलू .. मला लवकर उठावे लागते .. "

जय " तो मैं येह रिश्ता पक्का समजू ?" आणि तिची वेणी ओढतो

वसू " हा .. हा.. .. हा .. "

जय " वसू  वेड्स राघव . "

वसू " गप रे.. "

जय " गप रे काय.. तू त्याचा सिरिअसली विचार कर ?"

वसू "त्याला मी झेपेल का रे ?" तुला काय वाटतं ?"

जय " तुला झेपावयाला कोणीतरी माझ्या सारखाच पाहिजे .. उके बस कि बात नहीं है ।"

वसू " तेच तर मी म्हणतेय .. पण तुला जर योग्य वाटत असेल तर मी तयार आहे .. आत तूच ठरव आणि सांग मला "

जय " बघ हा .. नंतर म्हणशील कि तुझ्यामुळे मी ह्याच्याशि लग्न केले ? मी मागून नंतर टोमणे नाही ऐकून घेणार "

वसू " काय करू टोमणे मारून नंतर ? एकदा का मी इथून गेले कि तुझे माझे रिलेशन संपेल .. आणि हो त्याला सगळं रामायण सांगावे लागेल .. आपण लग्न का केले ? वगैरे ते ? त्याला एकदा गावी नेऊन आणावे लागेल "  

जय " अरे हो .. तू तर पार पुढे गेलीस "

वसू " हमम.. मला तुला मोकळे करायचेय .. मला तुला समीरा बरोबर सुखी बघायचंय "

जय " ठीक आहे .. तू पण थोडा विचार कर ? मी बंगलोर वरून आलो कि आपण मिशन राघव हातात घेऊ "

🎭 Series Post

View all