परकाया  भाग २९

in this part vasu gets lost in the city

परकाया  भाग २९

क्रमश: भाग २८

दुसऱ्या दिवशी वसू सकाळी लवकर उठली .. गॅलरी मध्ये योगा  केला .. मग दोघांसाठी ब्रेकफास्ट तयार केला . स्वतः खाऊन घेतले आणि छान तयार होऊन बसली . बराच वेळ झाला जय उठला नाही .. तिला आज जय जवळ खूप महत्वाचे काम होते तो उठला नाही तर शेवटी त्याचे दार ठोकवू लागली ..

वसू " जय .. अरे गधड्या १० वाजले .. उठ ना आता ?.. जय .. जय .. उठ "

जय " वसू काय यार वैताग देतेस .. रात्री किती उशिरा  झोपलोय .. जरा झोपू दे ना .. आज माझी सुट्टी आहे "

वसू " जय .. उठ मला एक काम आहे तुझ्याकडे ?"

जय " थांब दहा मिनिटे .. "

वसू " ठीक आहे मग मी एकटी जाऊ का बाहेर ? मला बाजारात काम आहे थोडे ?"

जय " एकटी  जाणार आहेस ? जा ?"

वसू " बघ हा मी नक्की जाऊ ना ?.. "

जय  झोपून गेला .. त्याला माहित होते ती काही जाऊ शकत नाही ..  त्याला झोप येत होती तर तो बिनधास्त झोपला

अर्धा एक तास नंतर त्याची झोप झाली . फ्रेश होऊन बाहेर आला तर वसू खरोखरच घरात नव्हती ..

जय ने तिला कॉल केला

जय " कुठे आहेस तू ?"

वसू " मी बाहेर आलेय .. तू विसरलास का ? तुला सांगून तर आले मी "

जय " काय बावळटपणा आहे हा ? अशी एकटी कशी काय गेलीस बाहेर ? तुला रस्ते कुठे माहित आहेत .. कुठे आहेस ते सांग मी येतो तिकडे ?"

वसू " मी ना आता एका  दुकानात आलेय .. मला एक वस्तू घ्यायची होती  "

जय " अरे पण वसू .. तू काय डोक्यावर पडलीस का ? एकटीने जायची काय गरज होती तुला ?"

वसू " जय .. अरे मला आता स्वतःच्या पायावर लवकर उभे राहायचंय .. मला समीरा सारखे स्ट्रॉंग होयचंय .. सेल्फ डिपेन्डन्ट होयचय .. मला या शहराची आणि या शहराची भीती घालवायचीय . जोपर्यंत मी एकटी फिरणार नाही तोपर्यंत मी नाही  मोकळी होणार .. अशी तुझ्यावर किती दिवस अवलंबून राहू रे "

जय " वसू ... जरा ओरडलाच .. “तू काय झाशीची राणी समजतेस स्वतःला .. असला शहाणपणा करायला कोणी सांगितला तुला ? .. तुला काही झाले तर मी  कोण कोणाला काय उत्तर देऊ .. "

वसू " अरे तू निगेटिव्ह कशाला विचार करतोयस ?"

जय " वसू मी आलो ना तर एक अशी वाजवींन आता तुला ? पटकन सांग कुठेआहेस ते "

वसू " अरे .. ते मी ... सोड .. सोड .. वाचवा .. वाचवा ... आणि फोन कट झाला "

जय "वसू  तू कुठे आहे ? .. वसू .. कोण  आहे तिकडे .. "

बोलता बोलता वसू  चा फोन कट झाला .. जय ने पुन्हा फोन लावला तर फोन स्विच ऑफ येत होता .. जय ला काही कळे ना .. फोन बोलता बोलता असा का कट झाला नि ति सोड सोड अशी ती कोणाला बोलत  होती .. ती नक्कीच संकटात आहे .. पण ती कुठे आहे ? का अशी गेली ? आत काय करू ? त्याने राहुल ला फोन केला .. राहुल पण जरा ऐकून टेन्शन मध्ये आला .. तो म्हटला मी पण निघतो तू पण घरातून निघ .. एक काम कर तू समीरा ला पण फोन कर .. जय ने समीरा ला कळवले .. समीरा  म्हणाली मी पण येते तिला शोधायला ..

तिघांनी पटपट त्यांच्या  गाड्या काढल्या .. जय  फोन लागत नाहीये तरी सारखा फोन लावून बघत होता .. जय खूप टेन्शन मध्ये आला .. " काय झाले असेल  ? कुठे गेली असेल  ? तिला कोणी पकडले असेल ? तिचा तो आवाज सोड .. सोड .. हा आवाज जय च्या कानात घुमत होता .. मनातून स्वतःवर इतका नाराज झाला होता कि का ? का ? मी सकाळी नाही उठलो ? का मी तिला एकटीला जाऊ दिले ? ती जाणार नाही अशा अंध विश्वासात राहिलो आणि आज वसु  कुठेय ?

तिघे एक स्पॉट वर भेटले

राहुल " काही बोलली का ? कुणीकडे जाणार होती ?"

जय " नाही ना .. अरे मी झोपेत होतो सकाळी .. ती मला हाक मारत होती "

समीरा " मला वाटतंय आपण काल जिकडे जिकडे गेलो ना तिकडेच असेल ती .. ?"

जय " हा शक्यता आहे .. आपण आधी मॉल ला जाऊ ? तिला  काही शॉपिंग करायचे असेल बहुदा ?"

राहुल " हमम.. बहुतेक तिने काल बघून ठेवले असणार .. माहित नसलेल्या ठिकाणी ती जाणार नाही ? "

तिघे मॉल ला गेले ..

तिघे वेगवेगळ्या दिशेने मॉल मध्ये फिरू लागले .. जय तर लिटरली तिचा मोबाइल मध्ये फोटो दाखवून लोकांना विचारू लागला हिला पाहिलं का ? त्याच्या डोळ्यात खूप काळजी होती .. खूप रडवेला झाला होता .. जशी काय एखादी महत्वाची वस्तू हरवलीय  ..

मॉल खुप  मोठा होता .. १०० एक दुकानं असतील मॉल मध्ये .. आधी ते लोक काल ज्या  शॉप मध्ये गेले होते त्या शॉप मध्ये गेले .. पण कोणीच बोलले नाही कि ती इथे आली हाती .. किंवा तिला आज पहिले म्हणून .

पुन्हा तिघे एकत्र आले .. समीराने जय ला पाणी दिले ..

जय " चल .. पोलीस स्टेशन ला जाऊ ? ती प्रॉब्लेम मध्ये आहे हे नक्की ? ती सोड .. मला बोलत होती आणि वाचवा वाचवा पण बोलत होती .. जास्त उशीर न करता आपण पोलिसांची मदत घेऊ "

राहुल ' ठीक आहे ? काय पोरगी आहे मुलगी हि ? मी तिला काल म्हटले कि तू लवकर स्वतःच्या पायावर  उभी रहा .. तर असे काही करेल असे वाटले नव्हते "

जय " काय ? अरे .. तू माझ्या बद्दल पण काही बोललास का तिला ?"

राहुल " हो.. हेच कि तू मैत्री खातीर प्रेम पणाला लावले आहेस .. तू किती चांगला मुलगा आहेस "

जय " शिट ... राहुल .. अरे यार ती थोडी डिप्रेस आहे .. तिला जर असे वाटले ना कि ती माझ्या आणि समीराच्या मध्ये आलीय तर ती कोणती स्टेप घेईल तू विचार पण करू नाही शकत .. ती काल मला म्हणाली तुमच्या दोघांच्या मध्ये मी आले त्या पेक्षा मी मेले असते तर बरी झाले असते .. तिने गावाला दोन वेळा सुसाईड पण करायचा प्रयत्न पण केला होता "

राहुल " शीट यार राहुल .. मी उलट तिला तयार करायचा प्रयत्न करत होतो .. तिची मनाची तयारी करत होतो ..

समीरा .. हॅलो .. तुम्ही इथेच नका वेळ घालवू ? आपल्याला तिला शोधणे गरजेचे आहे .. "

तेवढयात जय चा फोन वाजला .. अननोन नंबर वरून "

जय " हॅलो .. कोण बोलतंय "

समोरून " रडण्याचा आवाज .. जय ... माझी पर्स आणि मोबाईल कोणीतरी चोरला .. मी त्याच्या मागे खूप धावले .. पण तो कुठे गेला मला कळलेच नाही .. जय मी घरी कशी येऊ .. जय माझ्याकडे पैसे नाहीयेत .. जय .. मी कुठे आहे मला माहित नाहीये .. "

जय " हॅलो .. हॅलो .. वसू रडु नकोस .. हा फोन कोणाचा आहे ? "

वसू " रडतच .. माहित नाही .. इथे एक अप्पांसारखा माणूस दिसला त्यांना मी म्हटले मला एक कॉल करायचंय .. त्यांनी मला त्यांचा मोबाइल दिला कॉल करायला "

जय " काय यार वसु .. का ग अशी करतेस तू ? मी आम्ही इकडे किती वेळ झालो तुला शोधतोय .. "

वसू " माझे ५००००/- रुपये चोरीला गेले जय .. "

जय " अरे बाळा .. तू ठीक आहेस का ? तुला काही झाले नाही ना ? "

वसू " नाही .. मी ठीक आहे ? फक्त माझी धावताना चप्पल पण तुटली तेव्हा मी  जराशी पडले म्हणून ढोपराला लागलंय .. "

जय " त्या काकांना फोन दे .. मी त्यांना लोकेशन विचारतो आणि येतो तुला घ्यायला "

जय ने त्या काकांना ती कुठे आहे ते विचारून घेतले

राहुल " अरे काय झालेय ?"

जय ने दोघांना सांगितले .. समीरा " थँक गॉड "

राहुल " ओह गॉड .. काय रे देवा .. नशीब .. ती सुखरूप आहे "

जय ' तुम्ही लोक इथेच थांबा .. मी तिला घेऊन येतो .. मग आपण भेटू "

जय पटकन वसू ला आणायला गेला .. तिकडेच एका झाडाखाली एका बाकड्यावर वसू बसली होती आणि बाजूला ते काका बसले होते .. जय ने त्यांना तसे सांगितले होते .. कि मी येई पर्यंत तिच्या बरोबर थांबा म्हणून ..

जय त्या झाडाखाली वसू ला बघून धावतच तिकडे गेला .. वसू रडतच होती ..

जय ला बघून तिला इतका आनंद झाला आणि त्याला बघून रडतच तिने त्याला मिठी मारली . जय पण तिला तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता . घाबरली होती ती .. तिचे सांत्वन करत होता

जय " कशी आहेस तू ? "

वसू " मी ठीक आहे "

जय " तूला हे नको ते शहाणपणा करायला कोणी सांगितले होते ? किती घाबरलो होतो मी .. ?"

वसू " सॉरी .. मला वाटले मी आरामात इकडे फिरू शकेल .. पण  त्या चोराने माझी पर्स चोरली आणि माझा मोबाइल पण घेऊन पळाला .. .. माझे  ५००००/- रुपये घेऊन पळाला .. " रडत रडत च जय ला सांगत होती

जय " पैसे जाऊ दे ग .. तू व्यवस्थित आहेस हे जास्त महत्वाचे.. तू रडू नको ग " आणि तिच्या कपाळावर किस केले .

जय  ने त्या काकांना एक मिठीच मारली

जय " थँक यु काका ..  तुम्ही आज मदत केली म्हणून .... "

काका " अरे किती गोड आहे  मुलगी. तुझी बायको आहे का ? .  तुम्ही दोघे किती एकमेकांवर प्रेम करता रे  .. .. "

जय आणि वसू  एकमेकांकडे बघू लागले ..

जय ने त्यांना पैसे देणार होता.. वसू  ने त्याला डोळ्यानेच खुणावले नको म्हणून

काका  " सगळ्या गोष्टी पैशात नसतात रे बघायच्या .. मला माझ्या मुली सारखीच आहे हि मुलगी .. देणारच असलास तर हिला आयुष्यभर जपेन असा विश्वास दे इतकेच खूप आहे मला "

जय काहीच बोलत  नाही आणि त्यांना थँक यु म्हणून वसू ला घेऊन मॉल ला आला . समीरा ने पण तिला घट्ट मिठी मारली .. दोघी गळ्यात गळा घालून रडल्या .. राहुल आणि जय समोर बसून बघत होते आणि वसू  बरोबर काय काय झाले ते ऐकत होते .

जय ने सकळ पासून नाश्ता पण केला नव्हता .. तीकडे सगळे जण जेवले आणि घरी आले

जय " एवढे काय घ्यायचे होते तुला ?" एवढी कॅश घेऊन गेलीस ?"

वसू " मला एक लॅपटॉप पाहिजे होता .. म्हटले लॅपटॉप आला कि माझा अभ्यास सुरु करेन.. पर्वा  लायब्ररीत मी पुस्तक वाचत होते तर तिकडे एक १२ वी तली मुलगी दिसली .. तिला मी सहज विचारले कि कॉलेज मध्ये कसे शिकवतात तर ती म्हणाली प्रत्येक लेक्चर चे एक प्रेझेन्टेशन असते .. म्हणजे मला जर उद्या इथल्या मुलांना शिकवायचं  असेल तर आधी मला माझे सर्व लेक्चर प्रेझेन्टेशन मध्ये तयार पाहिजेत .... म्हणजे मला जड नाही पडणार .. थोडा लॅपटॉप वर थोडा हात बसेल .. ह्याच विचारानेच मी लॅपटॉप आणायला गेले होते .... "

🎭 Series Post

View all