परकाया  भाग २८

in this part vasu accepts rahuls friendship .

परकाया  भाग २८

क्रमश: भाग २७

जय " अरे ए .. बेहेव युअर सेल्फ !.. ' आणि तिला पटकन बाजूला करतो

ती मुलगी नताशा असते .. जय तिला ओळखत नाही पण ती जय ला ओळखते

नताशा " अरे यार .. नाराज क्यू होता है .. तू माझी तेव्हा मदत केलीस ना म्हणून तुला ह्ग केले "

जय " तुमचा काही तरी गैर समज होतोय .. मी ओळखत नाही तुला ?प्लिज लिव्ह "

नताशा " नाही रे अँग्री यंग मॅन .. मी तुला ओळखते .. आणि तू पण मला ओळखतॊस .. तू फक्त विसरलास "

जय " चल .. वसू .. ती फुल ड्रिंक्स केलीय तिला कळत नाहीये आपण कोणाशी बोलतोय ते ..चल आपण तिकडे जाऊ "

नताशा " अरे यार .. मी ओळखते तुला ?"

जय " हो का ? मग काय नाव आहे माझे ?"

नताशा " नावंच तर माहित नाहीये ना "

जय " तेच तर सांगतोय मी .. मी तुला ओळखत नाही "

नताशा " हि  कोण आहे रे .. एकदम चिकणि आहे .. तुझी गर्लफ्रेंड  आहे का ? एके काळी मी अशीच होते रे .. ना ड्रिंक्स .. ना डिस्को .. न बॉयफ्रेंड "

जय खूप इरिटेड होत होता .. " दयाटस  नन ऑफ युअर बिझनेस "

नताशा त्याच्या गालावर बोट फिरवत .. " अरे रागावतो कशाला .. आय  जस्ट वॉन्ट टू से थँक यु .. मला मदत केल्या बद्दल "

नताशा " वसू कडे बघून .. अरे तू कशाला आलीस इकडे .. धीस प्लेस इझ नॉट फॉर यु .. खूप वाईट लोक आहेत इकडे .. हा पण हा जो मुलगा आहे तुझ्या बरोबर तो चांगला आहे .. ह्याला सोडू नकोस "

जय लिटरली वैतागून " कॅन यु  प्लिज लिव्ह असं अलोन "

नताशा " अरे तू अजून मला नाही ओळखले .. मी तुझ्या .... ती पुढे काही बोले पर्यंत जय वसू ला घेऊन तिकडून निघाला ..

जय आणि वसू पब च्या बाहेर थोडा मोकळा पॅसेज होता तिथे येऊन बसले

जय " हा बोल .. काय म्हणत होतीस .. तू "

वसू " काही नाही .. अप्पांना कळले कि माझे इकडे मित्र आहेत .. मी मित्रां बरोबर डान्स करते तर अप्पांना खूप वाईट वाटेल .. तू कसा लगेच सगळ्यातून मोकळा झालास तसे मी मोकळी कधी होणार .. मी उगाचच या बंधनात अडकले ..

तेवढ्यात राहुल बाहेर आला " जय अरे इकडे कशाला आलास ? चल आत जाऊ .. खाऊन घेऊ .. समीरा ने ड्रिंक्स घेतलेत खूप .."

झाले यांचा विषय अर्धवट राहिलाच तर सगळेच रेस्टारंट ला बसलं आणि डिनर ला बसले

जय चे सगळे लक्ष समीरा कडे होते .. तिने ड्रिंक्स घेतले तर तिला  भरवतच होता .. टिशू ने तिचा फेस क्लीन करत होता .. तो किती प्रेमाने रिस्पॉन्सिबिलिटी ने करतोय हे वसू बघत होती आणि वसू च्या डोळ्यांकडे राहुल बघत होता .. सब गोलमाल हैं ।

राहुल " जय .. समू ची आणि तुझी भांडणे झाली का ? "

जय " छे .. काही काय ?"

राहुल " ओके .. मला समुच म्हणाली कि तू तिला काल रागाने ढकललं .. जेव्हा ती .. "

जय " राहुल .. राहू दे ना .. तो विषय "

राहुल " अरे .. बिचारी चा फर्स्ट किस अजून पेंडिंग ठेवलास .. हे वागणे बरें नव्हे "

जय " जस्ट शट अप राहुल ! "

राहुल " अरे ! चिडतोस काय ? नालायका .. तू समीराला रडवलंस ना तर गाठ माझ्याशी आहे कळलं का ? आय  कॅन नॉट सी टिअर्स इन हर आईज "

जय " हो रे बाबा ... बरं आता एक काम कर .. मी समु ला घरी सोडून येतो आणि मग वसु ला घेऊन जाईन .. मी आज नेमकी बाइक आणली ना .. मी समु ला सोडून येऊ पर्यंत तुम्ही दोघे इकडे थांबा .. काय चालेल का वसू  तुला ?"

वसू " हो चालेल "

जय समीरा सोडायला तिच्या फ्लॅट वर गेला

राहुल " मग कसा गेला तुझा आजचा दिवस ?"

वसू " ठीक होता ?"

राहुल " आज जय शिवाय कसे जगायचे हे तुला मी दाखवत होतो .. आज ना उद्या हे सत्य तुला एक्सेप्ट करावेच लागेल "

वसू " हमम.. "

राहुल " तुला जय चा राग आला असेल ना आज .. सारखा समीरा बरोबर होता तो "

वसू काहीच बोलत नाही

राहुल " अरे तो कालच मला म्हणाला होता .. वसू ला सेल्फ डिपेन्डन्ट बनवायचं .. तिची भीती गेली पाहिजे इकडे वावरण्याची ..  मुळात माझ्यावर पण ती डिपेंड राहिली नाही पाहिजे .. वेळ आली तर आपण आहोतच रे पण तिला मनापासून थोडी सवय झाली पाहिजे .. इकडे मुलं मुलींचे रिलेशन कसे आहे हे सगळे तिला बघायला मिळाले पाहिजे .. वगैरे वगैरे .. मग  मीच त्याला म्हटले कि उद्या तू तिच्या बरोबर राहूच नकोस .. मी तिच्या आजू बाजूला येऊन जाऊन राहीन .. बघू .. मग नंतर तू तिकडे पब मध्ये एकदम च डाउन वाटलिस .. मग त्याला मी मेसेज केला .. आय थिंक शी नीड्स यु नाऊ .. लगेच आला कि नाही .. "

वसू  काहीच बोलत नाही पण तिच्या डोळ्यातून टचकन पाणी आले

राहुल " तुला एक सांगू का ? जय इज चॅम्प .. इतका स्ट्रॉंग हेड आहे ना .. आणि दोस्त तर सच्चा आहे .. जीवाला जीव देऊन दोस्ती निभावतो .. आत तुझंच बघ .. मैत्री खातीर स्वतःच्या प्रेमाला पणाला लावलंय त्याने .. "

राहुल " तू त्याच्या वर चिडू नयेस म्हणून तुला हे सांगतोय .. जय आपल्याला दिसतो ना तसा नाहीये.  त्याच्या पुढे जाऊन विचार करणारा आहे .. मी त्याला खूप चांगला ओळखतो ..  तुला वाटतं असेल तो तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय पण तसे नाहीये .. तो जरी समीरा सोबत असला तरी तुला कधीच एकटे पडणार नाही कारण मुळातच जवाबदारीने वागणारा मुलगा आहे . कधी कोणाचा गैर फायदा घेणार नाही . आता कलचच बघ दोघे रिलेशन मध्ये आहे तरी त्याने समीराला त्याला किस करून दिले नाही कारण आता नाही म्हणायला तो मॅरीड आहे .. जो पर्यंत तो तुझे लग्न लावणार नाही तो पर्यंत तो आता त्याचे रेलशन असेच ठेवेल . "

वसू " हमम.. माझे चुकलेच रे मी गैर समज करून बसले होते .. आता काय करू ? मला असे वाटत होते कि त्याला माझी फिकीरच नाहीये .. आणि तो माझीच फिकीर करत होता .. "

राहुल " माझ्या लक्षात येत होते ते .. पण बोलू का नको बोलू .. शेवटि बोललोच .. असो .. तु आता तुझ्या जॉब चे बघ .. एकदा तुला जॉब लागला ना कि तुला फ्रेश वाटेल .. "

वसू " थँक्स राहुल .. यु आर सच या गुड फ्रेंड .. तू आज मला खूप समजून घेतलेस "

राहुल " तुला एक विचारू ? खरं  सांगायचे पण ?"

वसू " मी खोटं बोलतच नाही ?"

राहुल " तुला जय आवडतो का ? आय मिन तुला त्याच्याशी जे लग्न झालेय ते खरं लग्न व्हावे असे वाटते का ? कि तू तयार आहेस नवीन साथीदार शोधायला ?"

वसू " मला खरं सांगू या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत .. मीच कॉन्फयुज आहे .. जय शिवाय मी असा विचार सुद्धा करायला मी घाबरते रे .. माझे हार्ट बिट्स वाढू लागतात .. तो माझ्या बरोबर नसेल तर मी जगेन का ? हा विचारच माझ्या मनाला पटत नाही .. पण ह्या चा अर्थ त्याला नको असताना मला त्याच्या सुखी आयुष्यात आक्रमण करायचे नाहीये .. तो आणि समीरा दोघे एकमेकां सोबत किती सुखी आहेत .. ते मेद फॉर इच अदर आहेत .. आणि मी उगाच त्यांच्यात आडवी आलेय .. हा परमेश्वर सुद्धा मला माफ करणार नाही जर मी दोन प्रेम करणाऱ्यांच्या मध्ये आले तर .. राहुल .. मी काय करू .. मला जय ला मोकळे करायचंय .. आज कुठे तरी त्याला पण तिला किस करायचे  होते पण त्याने आमचे लग्न झाल्यामुळे कदाचित  तिला किस केले नाही .. शी यार मी हे पाप कुठे जाऊन फेडणार आहे "

राहुल " हॅलो.. हॅलो .. एकदम स्ट्रेस नको घेऊस .. हाच गुंता आपल्याला सोडवायचा आहे .. "

वसू "  याला सोल्युशन एकच आहे .. मी लवकर स्वतः च्या पायावर उभी होते .. "

राहुल "ते तर होईलच ग .. मी काय सांगतो ते बघ .. तू मनापासून तुझे लग्न झालंय हे विसरून जा .. लग्न हा टप्पा तुझ्या आयुश्यात आलाच नाहीये असे समज तेव्हाच तू तुझ्या मनात तिसऱ्या कोणाला घेऊ शकतेस . तुला माझ्याशी मैत्री करताना पण असे वाटत होते कि जय ला काय वाटेल .. किंवा माझ्या बरोबर डान्स करताना तुला असे वाटत होते कि एका घराची सुनबाई अशी दुसऱ्या बरोबर कशी नाचून चालेल .. त्या घराची सुनबाई होण्याचा अधिकार तुला अजून मिळाला नाहीये .. तेव्हा मुळात जय हा जसा मी आहे तसाच आहे असे आधी मनाला सांग .. त्याच्यात तू इमोशनली इन्व्हॉल्व झालीस तर गुंता अजून वाढणार आहे "

वसू " हो ना .. हे मलाही माहितेय आणि हे जय  मला बोलला होता तिकडून इकडे येताना "

जय तेवढयात आला ..

राहुल " अरे .. झोपली का ती ?"

जय " बावळट आहे .. कशाला एवढी घ्यायची ? झेपत नाही त्या गीष्टी करते ना मग मला राग येतो "

राहुल " असू दे रे आज तू होतास ना तिच्या बरोबर म्हणून तिने एन्जॉय केले .. "

जय " बरं चल .. निघू आता .. "

वसू  पासून थोडी लांब राहून दोघे बोलत होते

जय " तुला वसू  ने जाम पकवले असेल ना .. अरे ती  मोकळी होतच नाही .. अख्ख्या जगाची टेन्शन घेऊन जगत असते .."

राहुल " होईल मिक्स हळू हळू .. ती खूप विचार करते रे .. "

जय " हमम.. पण तू होतास म्हणून दुसरे कोण असते ना तर त्याच्याची बोलली पण नसती .. माझ्याशी १० वर्ष चुप्पी घेतली होती तिने .. लै भारी काम आहे ते "

राहुल " पण काहीही असो यार खूप सुंदर , हुशार आहे आय लाईक हर .. इंनोसन्ट आहे "

जय " ठीक आहे चल ..बाय .. उद्या आराम  करू  "

राहुल " बाय वसू "

तर वसू चालत पुढे आली आणि त्याला चक्क मिठी मारून तिने बाय केले

राहुल आणि जय  दोघे डोळे मोठे करून आश्यर्यचकित होऊन तिच्याकडे बघत होते

वसू राहुल च्या कानात " थँक्स फॉर  एव्हरी थिंग .. आपली मैत्री ची हि खरी सुरुवात आहे या क्षणा पासून .. आता मी मना  पासून तुला फ्रेंड म्हणून एकसेप्ट केले

.. "

जय च्या हृदयाचा एक ठोका चुकला होता .. त्याचा श्वास अडकला होता .. एक अनामिक धडधड झाली होती त्याला .. त्याचा सिस्टम आज वसू ने बिघडवला होता .. मघाशी स्वतःहून शेक हॅन्ड .. आता स्वतःहून मिठी काय ? तिच्या नॉर्मल बिहेविअर च्या बाहेर जाऊन ती वागत होती ..

जय " ठीक आहे चला जाऊ या .. बाय .. बाय .. "

पूर्ण रस्त्यात दोघे काहीच बोलले नाहीत .. घरी आले फ्रेश होऊन झोपून गेले

🎭 Series Post

View all