परकाया  भाग ३६

jay is back its surprize for vasu

परकाया  भाग ३६

क्रमश: भाग ३५

वसू " ए नाटक कंपनी .. चल आत .. पण माझ्या कडे फार वेळ नाहीये ..  मला जायचंय "

नताशा " ओके .. ठीक आहे .. " तेवढयात  वसुला तिचा फोन दिसतो ..

वसू " ऐक ना .. नताशा .. मला एक फोन करायचाय .. तू मला तुझा मोबाइल देशील का ?"

नताशा " हो .. घे कि .. इतकं काय ?"

वसू ने मोबाइल हातात घेतला आणि अधाशा सारखा जय ला फोन लावला ..

जय ने दुसऱ्या सेकंदाला फोन उचलला कारण तो पण चातका सारखा फोन हातात घेऊन तिच्या फोन ची वाट बघत होता .. त्याला माहितेय हा कॉल अननोन  नंबर वरून कॉल आला म्हणजे हा वसू चाच कॉल असणार

जय " वसू .. कशी आहेस तू ? रात्री कोण आले होते ? आणि तुझा मोबाइल का बंद आहे ?"

वसू " हो ना .. जय .. मी काल रात्री  खूप घाबरले होते .. आणि त्या भीतीत माझ्या कडून माझा मोबाईल पण फुटला  .. "

जय " काय ग तू ? मी रात्र कशी काढलीय काय सांगू ? आत कसे वाटतंय ?आणि एवढ्या सकाळी कोणाच्या मोबाइल वरून कॉल केलास ? "

वसू "अरे .. मला एक मैत्रीण मिळालिय .. अरे जय तुला आठवतंय का ? ती पब मध्ये तुझ्या गळ्यात पडत होती ती मुलगी (आणि हसायला लागते ) तीच काल   रात्री आपलं  दार वाजवत होती .. ती नशेत होती तर तिला तिचे घर सापडत नव्हते .. म्हणून  दार वाजवत होती आणि थोड्या वेळां नंतर आपल्या दारात च झोपली .. मी सकाळी दार उघडले तर दारात हि झोपलेली .."

जय " तिच्या नादि लागू नकोस काय ? अजिब पोरगी आहे ती "

वसू "हो रे .. पण आज माझ्या मदतीलाच आलीय ..खुप तारीफ करत होती .. म्हणत होती तू किती चांगला आहेस ते वगैरे "

जय " अरे वाह .. या जगात कोणी तरी आहे म्हणायचे कि जी माझी पण तारीफ करतेय .. आत तिला भेटावेच लागेल "

वसू "फटके देईन तुला .. समीरा ला सांगू का नाव ? मी तर बदडून काढेनच पण ती पण धोपटेगी "

जय " तिचे ठीक आहे ? पण तू का ? "तू ला काय फरक पडतो ?" मुद्दामून तिला चिडवायला बोलतो

वसू च्या डोळ्यातून टचकन पाणी आले ..

वसू " हो नारे .. मी कोण आहे तुझी ? तू काहीही कर ? चल ठेवते ? मला  कॉलेज ला जायचेय "

जय " अरे वसू  .. किती सेन्सिटिव्ह आहेस ग .. मी  मज्जा करत होतो "

पुढे काही बोलायच्या आत ती फोन कट करते .

जय " आयला .. भडकली वाटतं ? मी पण मूर्खच आहे .. उगाच तिला छेडलं .. " आणि तिला परत कॉल केला . तर नताशाने कॉल उचलला

नताशा " सो मिस्टर .. युअर नेम इज जय .. हँडसम तर तू दिसतोसच आणि तुझे नाव पण भारी आहे बॉस .. आणि तुझी बायको का गर्लफ्रेंड जी कोणी आहे ती तर १०० टक्के सोने आहे ..  "

जय " हॅलो .. प्लिज मी वसू शी बोलू शकतो  का ?"

नताशा " हो .. हँडसम .. देते .. तिला .. तिला सॉरी बोलायचं काय .. आपल्या मैत्रिणीला त्रास दिलेला मला चालत नाही .. आय हेट बॉयफ्रेंड्स .. मुलींना दुखवण्या व्यतिरिक्त तुम्ही काही करत नाही  "

जय " ए हॅलो .. मला तुझे कीर्तन ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये .. आणि ती तुझी मैत्रीण वगैरे मुळीच नाहीये .. सो चिल. आय विल पे व्हॉट एव्हर मनी यु लॉस्ट  फॉर धिस कॉल”

नताशा " यु आर सो हॉट ! "

तिने वसू च्या हातात फोन दिला

जय " ऐक ना वसू .. सॉरी .. मी मज्जा करत होतो .. ऐक ना मी आल्यावर तू मला बदडून पण काढ आणि तुला पाहिजे ते कर .. समीराच्या आधी माझ्यावर तुझा अधिकार आहे .. हे तुला माहितेय ना आपण तर लहानपणा पासूनचे साथी आहोत .. "

वसू "  नशीब लक्षात आहे .. असो .. केलंय तुला माफ़ ... केलं तुला माफ़ "

जय " थँक्स यु मॅडम .. मी काम लवकर संपवून घरी येतोय "

वसू "   ये मी वाट बघतेय .. .. ये चहा घ्यायला .. "

जय " हमम .. तुझ्या चहा ला मी मिस करतोय ,, खरंतर  मी तुलाच खूप मिस करतोय .. खूप मिस करतोय .. काय करू ? असे वाटतंय धावत येऊन  तुला ... "

वसू " कळलं कळलं .. नाटक कळलं .. समीरा एवढी जवळ असल्यावर माझी कशाला तुला आठवण येईल .. "

जय "काय ग वसू तू .. नेहमी मी तुझ्याशी बोलत असलो कि तु समीरा ला मध्ये आणतेस "

वसू " मी तिला मध्ये नाही आणत .. मीच मध्ये आलेय तुमच्या ?"

जय चिडला " जस्ट शट .. मी आ लो  तर वाजविन आता तुझ्या .. यु आर जस्ट इम्पॉसिबल .. तुझ्याशी गोड बोलताच येत नाही .. तुला माझी किंमतच नाहीये .. मी नाहीये तिकडे  इतर तुला खूप बरं वाटत असेल ना .. बाय …आता येतच नाही  तू रहा तुझ्या मैत्रिणी बरोबर " आणि फोन ठेवून टाकतो .

वसू कॉल बॅक करते

वसू " जय .. काय करतोयस .. तू आज थोडा वेगळा वागतोयस असे वाटत नाही का तुला ? एरव्ही समीराचे नाव घेतले कि कळी खुलते म्हणून तिचे नाव घेतले .. तर आज चक्क चिडतोस माझ्यावर ? तुला राग आला असेल तर सॉरी .. तुला दुखवायचे नव्हते .. सॉरी .. आता थोडेच दिवस माझा टॉर्चर आहे तुला तेवढा सहन कर "

जय " झाले बोलून ..भांडखोर .. मारकुटी म्हैस आहेस तू .. तरी पण मला तू आवडतेस .. आय मिस यु अँड आय ... फोन कट करतो

वसू " ए हॅलो ".. बघते तर फोन कट ..

वसू  मनात म्हणते हा असा काय ? काहीही बोलतो .. आज काय प्रेम उतू चाललंय काय माहित .. मैत्रीत सुद्धा पझेसिव्ह आहे .. त्या समीरा चे कामकाज लग्न नंतर कठीण होणार आहे .. जाऊ दे मी कशाला त्यांचा दोघांचा विचार करू ..

इकडे या दोघी मस्त चहा पितात आणि नताशा त्यांच्या घराचे निरीक्षण करत इकडे तिकडे बघत  होती

नताशा " वसू .. तू घर किती छान ठेवलेस ग ?असे वाटते इथून जाऊच नये "

वसू " तू काय करतेस ग ? म्हणजे काम काय करतेस ?"

नताशा जरा वैतागल्यासारखी " वसू  मी जातेय उगाच त्रास देऊ नकोस मला "

वसू " हे हॅलो .. यात काय मी तुला त्रास दिला .. तुला नसेल सांगायचं इतर नको सांगुस .. "

नताशा " अरे यार चिल .. कसली चिडतेस ग तू ?"

वसू " अरे .. मी अजिबात चिडत नाहीये .. ठीक आहे .. थँक्स मला तुझा मोबाइल दिल्या बद्दल "

नताशा " तुझा मोबाइल बंद आहे तर आज तू माझा मोबाईल तुझ्याकडे ठेवू शकतेस "

वसू " नाही नको .. थँक  यु .. मी कॉलेज  मधून येताना नवीन घेऊन येईन "

नताशा " तुम्ही दोघे नवरा बायको आहात का लिव्ह इन मध्ये राहता .. आणि  वेगळे का राहता ? ती रूम बंद आहे यावरून मला कळले ?"

वसू " ऐक ना .. माझे लेक्चर शार्प ९ ला सुरु होते .. आज मला ऑटो  ने जायचंय तू जातेस का तुझ्या घरी ?प्लिज ?"

नताशा " ओके .. चल बाय .. "

वसू  " अग  थांब तू अशी बाहेर जाणार आहेस का ? चांगल्या  घरातल्या मुली अशा कपड्यात बाहेर जात नाहीत .. तू हा माझा दुपट्टा घेऊन जा "

नताशाने तिला एक घट्ट मिठी मारली .. आणि तिचा दुपट्टा अंगावर घेऊन ती तिच्या घरी गेली ..

नताशा " तू खूप छान आहेस ग .. थँक यु .. तुला सांगू काही वर्षांपूर्वी मी तुझ्या सारखीच होते .. साधी , सरळ , छान कपडे घालणारी पण या शहराच्या रात्रीच्या चांदण्यात मी हरवले .. मी खूप बदलले .. आता इतकी बदलले कि रात्री मला माझे घर सापडत नाही "आणि कुत्सितपणे स्वतः वर हसू लागली

वसू " अजूनही वेळ गेलेली नाही .. जर तू मनाने ठरवलेस तर तू परत नॉर्मल लाईफ जगू शकतेस .. जीवन हे एकदाच मिळते ते आपल्यावर आहे कमळा प्रमाणे चिखलात वाढून सुद्धा पवित्र  जगायचे का त्याच चिखलात लोळायचे ..एकदा प्रयत्न करून तर बघ "

नताशा " अग मी एक मॉडेल आहे .. ते रॅम्प वॉक करणारी मॉडेल .. एके काळी  शो स्टॉपर असायचे .. आता एक साधी मॉडेल आहे .. पैसे खूप आहेत .. ऐषोआराम पण खूप आहे पण प्रेम नाही ग मिळत कुणाचे .. आतून खूप एकटी आहे .. माझा एक बॉयफ्रेंड होता पण तो आता सिनेमा मधला मोठा हिरो झाला त्याला आता एका सध्या मॉडेल ला प्रेयसी म्हणून घ्यायला लाज वाटते .. मला सोडून गेला ग तो .. मी नाही जगू शकत त्याच्या शिवाय .. तो ऐकतच नाही माझे .." आणि रडू लागते

वसू मनात म्हणते " एकटी तर मी पण आहे .. माझा हा वनवास कधी संपणार आहे काय माहीत .. जय नसला तर त्याची जागा मी कुणालाच नाही देऊ शकत .. "

नताशा रडत रडत निघून गेली आणि वसू च्या डोळ्यात पाणी देऊन गेली .

वसू तिचे यावरून कॉलेज ला निघून गेली . पियुन ला सांगून एक मोबाईल आणायला सांगून फोन चालू करून घेतला आणि जय ला मेसेज टाकून दिला .. फोन चालू झाला आहे .. सकाळ साठी सॉरी .. वेळ मिळाला कि अप्पांना फोन कर त्यांचा फोन आला होता "

जय " ओके "

जय ने तिकडचे काम जे आठवड्याचे होते ते काम पटपट करून चार दिवसातच उरकवले आणि दोघे चार दिवसन्नी पुन्हा आपापल्या घरी आले .

जय ने मुद्दामून वसू ला सांगितले नव्हते कि तो आज येणार आहे .. त्याला वसू साठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचे होते .

जय घरी आला .. त्याने त्यांच्या लग्नाचे फोटो बाहेर काढले .. त्यातले वेग वेगळ्या विधी करतानाचे फोटो त्याने बाजूला काढले आणि त्याचा एक कोलाज त्याने त्याच्या रूम च्या भिंतीवर लावला .. आज पर्यंत वसू त्याच्या रूम मध्ये कधीच आली नव्हती .. आज तो तिला त्याच्या रूम मध्ये आणणार होता .. मुळात अजून वसू ला माहित नाहीये कि जय आणि समीराचे ब्रेक अप झालेय .. त्यामुळे जय ला तिच्याशी कसे वागावे आणि कसे तिला सांगावे हेच सुधरत नव्हते .. काल पर्यंत माझे प्रेम समीरा वर होते आणि आज अचानक माझे तुझ्यावर प्रेम आहे हे ती समजेल का ? अशीही भीती त्याला मध्ये मध्ये वाटत होती .

पण आज त्याने सगळं तिला सांगायचे ठरवले होते .. त्याचे प्लॅनिंग करत होता .. त्याला हे हि माहित होते कि ती पहिल्यांदा चिडेल.. पण ती कितीही चिडली  तरी  मी आज चिडणार नाही .. असे सगळे तो मनोमन ठरवत होता

🎭 Series Post

View all