परकाया भाग २५

rahul , samira, jay and vasu meet together

परकाया भाग २५

क्रमश: भाग २४

आकाशी रंगाचा अनारकली  ड्रेस .. चेहरा नंतर मान  दिसत आहे नंतर डायरेक्ट तिच्या हाताची लांब सडक बोटं दिसत आहे .. दुपट्टा अश्या पद्धीतीने पिन अप केला होता कि ती कितीही हलली  तरी दुपट्टा जागेवरून हलणार नाही .. तिचे मऊ ,सरळ , लांब केस एका छोट्या क्लिप मध्ये बांधून मागे मोकळे सोडले होते .. जशी चालतेय तशी तिच्या पायातल्या पैंजणाच्या हळुवार होणाऱ्या आवाजाकडे आपोआप जात होते .. चेहऱ्यावर स्मित हास्य होते पण हृदयात अनामिक भीती होती आणि ती भीती लपवण्याचा ती खूप प्रयत्न करत होती .

राहुल ने तिला पहिले आणि पहातच बसला .. सौदर्यांचा अनमोल खजाना तो हि कोणताही गर्व नसताना .. सादगी मी हि सुदंरता म्हणतात ना अगदी तशीच होती ती

बाहेर आल्यावर ट्रे जय ने तिच्या हातातून घेतला आणि तिला सोफयावर बसायला सांगितले ..

ती डोळ्यांनीच त्याला नको नको म्हणत होती आणि तो डोळ्यांनीच तिला सांगत होता " बस ग .. मी चहा देतो "

समीरा त्यांचे हे हावभाव सगळे डोळ्यांनी पाहत होती आणि राहुल हरवला होता

जय ने दोघांना चहा दिला . एक कप वसू ला दिला आणि एक कप स्वतःला घेऊन राहुल च्या शेजारी जाऊन बसला

जय " तर हि आहे वसुंधरा .. आम्ही तिला वसू म्हणतो .. माझी लहानपणीची मैत्रीण "

वसू " हाय समीरा .. आणि हलकेच राहुल कडे बघून " हाय"

जय " वसू .. हा माझा मित्र राहुल माझ्याच ऑफिस मध्ये आहे आणि ..

वसू " आणि हि समीरा .. खुप सुंदर आहे ..  जय तुझी चॉईस खूप छान आहे "

समीरा " बाय द वे .. यु आर अमेझींगली ब्युटीफुल .. किती छान राहतेस .. ग .. मलाच तुझ्या कडून टिप्स दे .. "

वसू " थँक यु .. सो स्वीट ऑफ यु "

मग बराच वेळ चौघे गप्पा मारत  बसले .. बऱ्याच दिवसन्नी चौघे खूप हसले ..

समीरा " जय .. उद्या शनिवार आहे तर मग उद्या आपण बाहेर जाऊ शकतो .. काय वसुंधरा .. आपण शॉपिंग ला जाऊ "

जय " मला चालेल .. राहुल कोणता लेटेस्ट मुव्ही चांगला आहे का रे ?"

राहुल " आपल्याला काय टाईम पास च करायचा य ना मग कोणताही का असेना ना.. जाऊ बघायला "

जय " ठीक आहे मग उद्या १२ वाजता मी आणि वसू  मॉल ला येतो तिकडे आधी मुव्ही , मग लंच , मग शॉपिंग करू आणि रात्री डिस्को करूनच घरी येऊ "

राहुल " एकदम डिस्को ? डिस्को ला येतील ला या तुमच्या वसुंधरा मॅडम “

वसु" डोन्ट जज मी राहुल..  हो मी गावातली असली तरी मी काही बहेनजी नाहीये " आणि चौघे हसू लागले

राहुल " बघू ना उद्या कळेलच मला "

वसुंधरा " मी काय नाचणार वगैरे काही नाहीये पण बघू तर शकतेच ना "

राहुल " झाले आधीच माघार घेतलीस .. आताच तर म्हणालीस कि मी बहेनजी नाहीये मग डान्स करायला काय होतंय "

समीरा " राहुल .. डोन्ट फोर्स हर .. तिला थोडा वेळ दे .. उद्या पहिल्यांदाच ती बाहेर पडणार आहे

जय  त्यांच्यात होता पण त्याला वसू चे कौतुक वाटत होते कि ती कशी लगेच या दोघांच्यात मिक्स झाली ..

वसू " मी सगळ्यांना काहीतरी खायला करते आणि ती उठून आत मध्ये गेली "

थोडावेळ तिघे उद्याच्या प्लॅनिंग विषयी बोलत होते .. तर जय आणि समीरा गॅलरी मध्ये बोलायला गेले .. तसा राहुल पटकन किचन मध्ये आला वसू शी बोलायला

राहुल " सो  वसुंधरा ..  तुझ्या प्रमाणे तुझे नाव पण सुंदर आहे "

वसू " थँक यु "

राहुल " मी काही मदत करू का ?"

वसू " नुसताच  फॉर्मॅलिटी म्हणून विचारतोय का खरच मदत करणार आहेस "

राहुल डोळे विस्परून " तू सांग .. काय करू ?"

वसू " उम्म ... हा घे कांदा चीर "

राहुल ने त्याच्या शर्ट चे बाही फोल्ड केल्या आणि एकदा कांदा आणि एकदा चाकू कडे पाहू  लागला  " कुठून सुरु करायची रे कांद्या .. तुला उभा चिरू का अर्धा "

वसू त्याचे हे बोलणे ऐकून हसायला लागली

राहुल " ओह माय गॉड .. यु ह्याव डिम्पल .. "

तेवढ्यात जय किचन मध्ये आला

जय " तू काय करतोय रे इकडे .. "

राहुल " ओये .. मी काहीपण करेल माझ्या मैत्रिणी ला मदत करतोय "

जय " वसू ला मेसेज पाठवतो " यु  ओके .. कंफोर्टेबल ? का बाहेर काढू याला "

वसू चा मोबाईल ब्लिंक झाल्यावर तिने लगेच पाहिला आणि खुद्कन हसली

वसू " हो.. तुला थोडे समीरा शी बोलायला मिळावे म्हणून तो आलाय इकडे "

जय " तू कंफोर्टेबल आहेस ना .. हे महत्वाचे "

वसू " होय रे .. मला काही वाटले तर सांगेन तुला "

राहुल ने तोपर्यंत कांद्याचा खून करून त्याला आडवा उभा चिरला होता आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते

वसू " राहुल .. तू बाहेर बसलास तरी चालेल बघ तुझ्या डोळ्यातून पाणी यायला लागले .. कांद्या मुळे "

राहुल " हो यार .. मी जातो बाहेर आपले लैला मजनू काय करतात ते बघतो " आणि निघून जातो

समीरा "जय खूप सुन्दर आहे रे वसुंधरा ..  ?"

जय " सुदर कसली मारकुटी म्हैस आहे .. "

समीरा बघत होती जय तिच्या बद्दल बोलताना किती सहज बोलत  होता

समीरा " राहुल , मी मगच पासून बघतेय वसुंधरेला पाहून तुझी विकेट पडलीय ते "

जय जरा हडबडलाच हे वाक्य समीराच्या तोंडून ऐकून

राहुल " ओह शट आप समीरा .. विकेट वगैरे नाही .. मी जस्ट मेस्मराइज्ड आहे तिच्याकडे बघून .. ती सुंदर तर आहेच यात काही अपवाद नाही पण तिच्या डोळ्यात खूप काही आहे .. .. मला अशी मैत्रीण नक्कीच आवडेल .. .. मी असा बोलतो हे काही तुमच्यासाठी नवीन नाही .. "

जय " अरे जस्ट रिलॅक्स .. समीरा थोडी टेन्शन मध्ये आहे .. तिचे तसे इंटेन्शन नव्हते "

राहुल " आय नो समीरा .. आणि मी पण काही एक्सप्लेनेशन देत नाही .. समु तुला उगाच कॉम्प्लेक्स येऊ देऊ नकोस .. तुझी आणि तिची कोणी कॉम्पॅरिझन करत नाहीये "

समीरा " सॉरी राहूल .. तुला लागले का हे वाक्य ?"

राहुल " नाही ग .. मी माझ्या कडून क्लिअर करतोय .. "

तेवढ्यात वसू  पोहे घेऊन बाहेर येते

 जय  दोन प्लेट्स घेतो एक राहुल ला देतो आणि स्वतःला घेतो तोपर्यंत वसू  समीराला एक प्लेट देते आणि एक स्वतःला घेते .

राहुल " वाह ! टेस्टी .. तू जेवढी सुंदर आहेस ना तेवढेच टेस्टी पोहे आहेत हे "

जय " हमम .. वसू  खरच खूप टेस्टी झालेत "

समीरा " यम्मी .. wow .. यु आर टू गुड .. सर्वगुण संपन्न आहेस "

 वसू " बस .. बस .. एवढी तारीफ कराल तर हरभऱ्याच्या झाडावर जाऊन बसेल मी "

जय एकटाच हसतो .. राहुल आणि समीरा ला  हा जोकच कळत नाही.

राहुल म्हणतो तसा समीरा ला मात्र कॉम्प्लेक्स येऊ लागला होता .. हि  एवढी सुदर आहे .. जय आता तर म्हणतोय कि त्याला हिच्यात इंटरेस्ट नाहीये पण एवढी सुंदर , सुशील मुलगी आहे .. आणि मी का नर्वस होतेय हिला बघून .. जय चे तर माझ्यावर प्रेम आहे .. तो काल किती जीव ओतून म्हणत होता .. असा विचार करत समीरा पोहे खात होती आणि समीराला मोठा ठसका लागला ..

तिच्या नाका तोंडातून पाणी येऊ लागले .. आणि एकसारखी ती खोकत होती ..

जय चा जीव नुसता घाबरा  झाला होता .. त्याने क्षणाचाही विलंब करता .. तिला पाणी दिले .. तिच्या पाठीवरून हात फिरवत होता .. तिच्या पाठीवर  थोपटत होता ..

वसू ने पटकन तिला आतमध्ये नेले .. तिचे टाईट कपडे लूज केले .. तिला मध चा ट वले .. आणि हाताने तिला पाणी पाजवले .. खिडक्या ओपन करून फ्रेश हवा येऊ दिली .. आणि मग तिचा ठसका थांबला

जय नुसता रडवेला झाला होता ..वसू ला त्याच्या डोळ्यात तिच्या विषयीची काळजी , प्रेम दिसत होते

वसू " जय .. काळजी नको करुस .. ती ठीक आहे आता .. "

जय " समु .. चल दवाखान्यात जाऊ .. "

राहुल " रिलॅक्स जय.. नॉर्मल आहे ती .. खाताना ती विचार करत असली कि तिला ठसका लागतो .. मला लहान पणा पासूनची तिची हि सवय माहितेय "

समीरा " हमम.. थँक्स वसुंधरा "

थोडा वेळ सगळेच शांत होते आणि मग वातावरण परत  नॉर्मल झाले ..

वसू  च्या लक्षात आले कि कदाचित तिला तिचे आणि जय चे नाते धोक्यात आहे असे वाटत असेल

वसू " जय .. चला तू च ची चषाभा चटवतेआ ?  ? ( हि च ची भाषा आहे .. जय तुला च ची भाषा आठवतेय ?"

जय " चहो ( हो )

वसू : “ चग चम च झ्याशीमा चंडभा” (मग माझ्याशी भांड )

जय " काय हे वसू  .. हे असे कसले पोहे केलेस ? तिला केवढा ठसका लागला "

वसू " ए .. मी बरोबर केलेत .. मी मिरच्या पण कमी टाकल्यात तुला कमी तिखट लागते म्हणून .. नाहीतर एवढे गोडं पोहे कोण करते का ?"

जय " तुला काय कळणार गोडाची चव ? तिखट मिरची नुसती .. "

वसू " तू आहेस ना गुळाची ढेप .. गप्प बस "

जय " मला कशाला सांगतेस गप्प बस ..यु शट अप "

वसू " यु शट अप .. आला मोठा शहाणा लगेच मोठा मला शिकवायला .. स्वतःला काय येतंय का ? साधा चहा सुद्धा नीट येत नाही "

जय " कोणी सांगितलंय तुला मला सहन करायला .. लवकर तुझा तू बॉयफ्रेंड शोध आणि एकदाची मला मोकळी कर "

वसू " मी बघेन माझे माझे .. तू सांगायची गरज नाहीये .. तुझ्या पेक्षा तर नक्कीच बेटर असेल माझा पार्टनर "

जय " बघतो ना आता .. कोण वाट बघतोय इकडे "

राहुल आणि समीरा दोघे एकमेकांकडे बघून आश्यर्य चकित झाले होते .. हे दोघे असे काय भांडत आहेत

वसू " हे समीरा याला घेऊन जा यार लांब माझ्या डोळ्या समोरून .. खूप इरिटेट करतो मला .. ह्याच्या सारख्या माणसाला सतत डोळ्यासमोर ठेवणे म्हणजे शिक्षा आहे "

जय " यु गेट लॉस्ट .. माझ्या समोरून .. तुझ्या मुळे समी रा ला ठसका लागला "

वसू " ओ के फाईन .. समीरा आय एम सॉरी आणि रागाने रूम मधून बाहेर पडली आणि खाली गार्डन मध्ये गेली "

राहुल " जय .. हे काय होते ?"

जय " जाऊ दे तिला .. मला वैताग देते कधी कधी ती .. "

जय " समीरा आर यु ओके डार्लिग "

राहुल " जय मी निघतो रे .. मला एक काम आहे " आणि वसू च्या मागे खाली गेला

समीरा "हे काय होते ?"

जय " काही नाही ग .. अटीट्युड बघितल्यास का महाराणीचा ? तिच्याशी भांडावेच लागते तेव्हा तिला कळते ?"

समीराने जय ला एक कडकडून मिठी मारली

समीरा  " कशाला एवढी चिडचिड करतोयस .. आणि तिच्यावर कशाला राग कढतोयस ? मला ठसका लागला यात तिचा काय दोष "

जय गावावरून आल्या आपासून जवळ जवळ १५ दिवस झाले होते आज समिरा ने त्याला अशी मीठ मारली होती .. नाहीतर त्याच्या पासून लांब लांबच राहत होती .. जय मनोमन वसू  ला धन्यवाद देत होता .. आज तिच्याशी  भांडण केल्यामुळे समीरा त्याच्या जवळ आली होती ..

🎭 Series Post

View all