परकाया भाग २४

in this part samiraa and i vasu meet first time

परकाया भाग २४

क्रमश: भाग २३

त्याने पण काहीच न बोलता चहा घेतला

वसू " काहि  प्रॉब्लेम आहे का ? मूड ऑफ दिसतोय "

जय " सगळाच प्रॉब्लेम आहे " मनात ( तूच मोठा प्रॉब्लेम आहेस माझ्या आयुष्यातला “)

वसू  जराशी हसून " खरं  तर मीच प्रॉब्लेम आहे नाही का ?"

जय ने एकदम तिच्याकडेच बघितले मनात  मनातले बोललेलं पण ऐकू येत का हिला  

वसू " अरे बोल बोल बिनधास्त बोल .. मला सवय आहे .. लोकांना प्रॉब्लेम मध्ये टाकायची .. आता पर्यंत पंकज ची गोची झाली होती .. आता तुझी गोची होत असणार "

जय काहीच बोलत  नाही

वसू " मी फार त्रास  देणार नाही तुला .. मला नोकरी लागली कि मी एखाद्या लेडीज हॉस्टेल ला शिफ्ट होईन .. "

जय " अरे वाह .. एका दिवसात हॉस्टेल वर राहायची पण तयारी झाली ? काल तर म्हणत होतीस मी मला गावी सोडून ये "

वसू " गावी गेले असते .. पण मी गावी गेले कि लोक मला नावे ठेवतीलच पण तुला पण ठेवतील म्हणतील याने बायकोला टाकले .. त्यामुळे आता गावाला जाताना जरा विचारच करावा लागेल "

जय " झाली लगेच निगेटिव्ह विचार करायला सुरवात "

वसू " निगेटिव्ह नाहीये हे प्रॅक्टिकल विचार आहे "

जय " जस्ट शट अप .. आणि मी अर्धा तास पडतो .. मग आपण डिनर ला जाऊ ? तू खाल्लेस का दुपारी काही .. "

वसू " जेवण तयार आहे .. "

जय " कसे काय ? आज पण दूध भात मी नाही खाणार  मी "

वसू " आज सगळे जेवण तयार आहे .. "

जय " कसे काय ?"

वसू " मी खाली जाऊन सामान आणले .. भांडी आणली .. गॅस बसवून घेतला त्या मुलाकडून .. या फ्लॅट ला गॅस पाईप लाइन आहे हे माहित होत का तुला ?"

जय " काय ? हे तू एकटीने केलेस ? आणि पैसे .. कुठून आणलेस "

वसू " मिस्टर जय .. आय एम अ प्रोफेसर .. मी अडाणी नाहीये .. मी काल  घाबरले होते .. आणि पैशांचे म्हणालास तर मी करोडपती आहे माहितेय ना .. हा तेवढा पगार नव्हता मला गावात पण माझ्या कडे कॅश होती .. इकडे लागणारच होती ना "

जय " कशाला तुझे पैसे खर्च केलेस ? किती पैसे खर्च केलेस ते सांग .. मी तुला काढून देतो लगेच "

वसू " ए हॅलो .. यु आर नॉट माय फादर , नॉट माय हजबंड . त्यामुळे जो काही महिन्याचा खर्च येईल तो शेअर करायचा .. सध्या मी घरात आहे तर मी दोन्ही वेळेचे जेवण बनवेन पण मला नोकरी लागली कि रात्रीचे जेवण तू बनवायचे .. हे सगळे मान्य असेल तरच मी इथे राहीन नाहीतर मला हॉस्टेल बघून दे मी लगेच तिकडे शिफ्ट होते मग तुला पाहिजे ते तू कर "

जय " अरे .. हि काय भाषा आहे ?"

वसू " हो उगाच ऑफिस मधून आल्यावर मला असले लुक्स द्यायचे नाहीत .. जशी काय मीच तुझ्या आयुष्याची वाट लावली ? मला आधीच माझी टेन्शन्स आहेत .. राहता राहिला प्रश्न समीरा चा तिला एकदा माझ्या समोर आण .. तिला पण दाखवून देते कि मला तुझ्यात काडीचा इंटरेस्ट नाहीये म्हणून .. "

जय " अरे .. हो हो .. तू मलाच इथून हाकलवून देशील बहुतेक "

वसू " फालतू गिरी , नवरेगिरी  आणि उगाचच मायबाप बनायला गेलास तर नक्कीच हाकलून देईन तुला .. मग बघ समीरा घेते का तुला घरात "

जय " भांडखोर नुसती .. आलीस परत मूळ पदावर "

वसू " तुझ्याशी तर भांडावेच लागते तेव्हाच तुला कळते "

जय " मला बहुतेक तेलही गेलं आणि तूपही गेलं असेच होणार माझे असे वाटायला लागलय .. दोघींच्या प्रॅक्टिकल विचारात मी प्रॅक्टिकली फ़सलोय

वसू हसायला लागते .. " हे बघ , जय .. ती तुला ढीग सोडून जायचा विचार करेल .. तिचा तो हक्क आहेच  आता तर तू तिचा विश्वास पण गमावून बसला आहेस .. तो फक्त मिळवं .. आणि तो कसा मिळवायचा हे मी तुला सांगायला नको .. रिसॉर्ट चा प्लॅन तिकडे तूच केला होतास ना .. तसेच काहीतरी  कर .. माझ्या सारखी दगड मुलगी पाझरली होती त्या दिवशी तर समीरा तर एक फुल आहे .. ती मोहरून जाईल "

जय " सॉरी .. तुला कळले का ते मीच केले होते ..

वसू "हो आकाश ने मला स्वप्नातून बाहेर काढले आणि पुन्हा कधी स्वप्न पाहू नकोस असा लाईफ टाईम धडा शिकवलंय ना "

जय " मेरे दिल से दुवा है तुझ्या स्वप्नांचा राजकुमार तुला लवकरच भेटो .. अजून एक सांगायचे राहिले इकडे हे मंगळसूत्र आणि हिरव्या बांगड्या वगैरे नाही घातलीस तरी चालेल .. तू फ्री आहेस .. "

वसू " हमम .. बघू ते नंतर .. सध्या राहू दे ..  मामी ने ( जय च्या आईने ) सांगितलय २० दिवसांनी चुडा उतरवायचा त्यासाठी ठेवलाय .. तसेही मी घरातच आहे ना "

जय " ठीक आहे मला भूक लागलीय .. जेवायला वाढतेस का ?"

वसू " पुन्हा तेच .. मी काय बायको आहे का तुझी ? चहा दिला ना .. थोबाड पाडून  आलास म्हणून दिला हातात .. आता जेवण तू वाढायचेस दोघांना आणि भांडी पण तू घासायचीस .. "

जय " अरे ये .. माझा छळ आहे हा .. मी भांडी  नाही घासणार "

वसू " ठीक आहे .. मग उद्या आल्यावर जेवण तू बनव "

जय " यार .. काय चालवलंय तू "

वसू " तुला ट्रेन करतेय .. लग्न झाल्यावर कसे वागायचे त्यासाठी .. उद्या काय समीरा घरी आल्यावर जेवण पण बनवेल आणि भांडी पण घासेल का ?"

जय " अरे .. ते आमचं आम्ही बघून घेऊ "

वसू ला जरा हे वाक्य लागलेच तरी पण आता तिने तिचे दुःख आतमध्ये चेपून टाकायचे ठरवले होते

वसू " ठीक आहे .. पण आता तर मी समीरा नाहीये त्यामुळे मी सांगते तसेच तुला करावे लागेल .. ती आली बघा तुमचे तुम्ही "

जय आत जाऊन दोघांना ताट वाढून आणतो

वसू " अरे भेंडी ची भाजी राहिली ना घ्यायची "

जय " अरे वाह .. माय फेव्हरेट .. जा ना आण .. मला दिसली नाही "

वसू " ती माझी फेव्हरेट आहे म्हणून केलीय मी .. " आणि आत जाऊन त्याला भेंडीची भाजी वाढते .. पाणी देते .. आणि मग स्वतः पण जेवायला बसते

दोघे मस्त गप्पा मारत जेवतात . जय तिच्याशी लुटुपुटु ची भांडण करताना त्याचे दुःख विसरून गेला  आणि याचे समाधान वसू ला मिळाले .

मग असे पुढे बरेच दिवस गेले हळू हळू जय आणि वसू दोघांची एखाद्या रूम मेट्स मध्ये बॉण्डिंग व्हावी तशी झाली . दोघांचे कामाचे नाटक सेट झाले . कधी हा काहीतरी करायचा .. कधी ती काहीतरी करायची .. दोघे भरपूर भांडायचे .. पण तो काही उभा वाद नसायचा ..मजेशीर भांडणे असायची.. हसत खेळत छान दिवस जाऊ लागले .

एक दिवस संध्याकाळी जय ने राहुल आणि समीरा ला घरी बोलावले .. खास वसू ला भेटायला ..

वसू ला एक वेगळीच धडधड होत होती .. समीरा ला मी आवडेल कि नाही .. ती माझ्याशी बोलेल कि नाही .. तिच्याशी माझे गणित जमले नाही तर जय नाराज होईल ..

वसू " जय हे मंगळसूत्र आता आज काढून ठेवते .. कदाचित समीरा ला ते आवडणार नाही "

जय " हे बघ .. हा तुझा निर्णय असावा असे मला वाटते .. तिला बरे वाटावे म्हणून नको करुस .. तसेही अजून २० दिवस झाले नाहीत .. आई ने सांगितल्या प्रमाणे .. त्यांनंर तू काढणार आहेसच ना "

वसू " हमम .. पण ती नाराज झाली तर .. मी खाली गार्डन मध्ये बसू का जाऊन म्हणजे तिला ऑकवर्ड नाही होणार "

जय " अरे .. तुला भेटायला येतेय ती .. जस्ट रिलॅक्स .. ती काय तुझे परीक्षण करायला येत नाहीये .. एकदा तुझी आणि तिची ओळख झाली कि आपण फिरायला एकत्र जात जाऊ .. तसे तू आल्या  पासून बाहेर कुठे गेलोय .. एकदा बाहेर गेलो कि तुला बाहेर ची पण हळू हळू सवय होईल "

वसू " नको ना .. जय सोसायटीच्या बाहेर जायचे म्हटल्यावर भीती वाटते मला .. मी हरवले तर .. "

जय " काय बावळ टच  आहेस .. तुला ऍड्रेस लिहून देतो .. तुझ्या पर्स मध्ये ठेव .. जिथे असशील तिथून टॅक्सी करायची आणि घरी यायचे .. आणि मोबाइल आहेच ना "

तेवढ्यात दाराची बेल वाजलीच .

वसू पटकन आत मध्ये किचन मध्ये पळाली

जय " हे राहुल .. वेलकम .. "

राहुल " हाय .. हाऊ आर यु ?" अरे वाह .. लास्ट टाईम पेक्षा घर खूप छान दिसत आहे "

जय " हो ते .. वसू .. अरे .. आत तर ये .. बस .. बस .. "

राहुल " समीरा नाही आली का अजून ?"

जय " नाही ..येईल इतक्यात .. मला वाटले तुम्ही दोघे सोबत याल"

राहुल " नाही यार आज मला डॅड नि घरी बोलावले होते .. मग मी ऑफीस सुटल्यावर फ्लॅट वर न जाता घरी जाऊन आलो त्यामुळे माझा' आणि तिचे रूट सेम नव्हता "

जय आत मध्ये येऊन  फ्रिज मधून एक बॉटल आणि काचेचा ग्लास घेऊन बाहेर आला आणि त्याला पाणी ओतून देऊ लागला "

राहुल ने पाणी प्यायले आणि गॅलरीत गेला ..

राहुल " अरे वाह .. जय चक्क फुलझाडे लावलीस घरात "

जय " अरे ते वसू ला आवडते तिने केले .. "

राहुल " आहे कुठे मिस्ट्री गर्ल "

जय " काही विचारू नकोस .. बाहेर येत नाहीये आता .. म्हणतेय मी समीरा आली कि येईन "

राहुल " आय है ! ये लाज  शरम इथल्या मुलींनी सोडून दिलीय .. "

जय " गप रे .. तिने ऐकले ना तर मारेल मला .. तिला अजिबात आवडत नाही तिच्यावर कंमेंट्स केलेल्या "

राहुल हसायाला लागतो .. " ओह गॉड .. सॉरी पण मला तिला कधी बघतोय असे झालेय "

जय " राहुल .. गप बसतो का आता .. तिला कॉम्प्लेक्स आला ना तर ती घराबाहेर पडणार नाही .. मला माहितेय इकडच्या मुलींपेक्षा ती खूप वेगळी आहे  तिच्यासमोर ओव्हर रिऍक्ट करू नकोस .. "

तेवढ्यात बेल वाजली आणि इकडे वसुच्या आणि जय च्या दोघांच्याही हृदयाचा ठोका चुकला .. कारण एकच " मिस समीरा "

जय  " हे .. ब्युटीफुल .. लुकिंग गॉर्जस टुडे "

राहुल " आय  हाय मेरी जान .. तुस्सी बडी सुंदर दिख रही हो "

समीरा " हाय जय .. त्याला हलकीशी मिठी मारली .. हाय राहुल .. त्याला पण हलकीशी मिठी मारली तिने "

समीरा " वाह .. जय घर एकदम मस्त ठेवलंस .. "

जय " अरे .. ते मी नाही वसू .. "  मग एकदम शांतता होती दोन मिनिटांसाठी

समीरा " आहे कुठे तुझी वसू .." मुद्दामून राहुल ला डोळा मारून ..

जय आत मध्ये किचन मध्ये येतो .. पुन्हा एक फ्रिज मधून बाटली आणतो आणि ग्लास आणतो आणि पाणी देतो ..

जय " ती चहा आणतेय आपल्याला "

आणि तेवढ्यात वसू  ट्रे मधून चहा घेऊन बाहेर आली  .

🎭 Series Post

View all