Jan 20, 2021
रहस्य

परकाया भाग २१

Read Later
परकाया भाग २१

परकाया भाग २१

क्रमश : भाग २०

 

 तिची तंद्री हटली आणि तिचे लक्ष दारात उभा असलेल्या जय कडे गेले .. जय च्या चेहऱ्यावर पण नवऱ्याचे तेज होते .. कपाळावर कुंकवाचा टिळा हो आता पुसट च झाला होता .. तो नुकताच झोपून उठला होता म्हणून त्याचे केस विस्कटले होते .. मध्ये कुठे तरी हळदीचा हलकासा चट्टा त्याला दिसत होता . .. वसू च्या रूम च्या दाराला हाताची घडी घालून टेकून उभा होता ..  एख्याद्या मुलीचा स्वप्नातला राजकुमार असावा असे वाटेल तसाच होता ..

 

वसू ने मोठ्या शिताफीने तिचे अश्रू पुसून हसतच " झाली का झोप ?"

 

जय " हमम.. तू नाही झोपलीस .. सॉरी अग  ते विधी झाल्यावर मला कंट्रोलच झाला नाही मी तुझ्याशी न बोलता झोपायला गेलो .. तुला असे वाटले असेल ना कि मी इकडे एकटी आहे .. कारण आज आत्या पंकज आणि नंदू पण नहिये .. "

वसू मनातून जय चे बोलत होता तेच फील करत होती .. पण " छे .. मला हे घर नवीन नाही .. आम्ही मगाशी चहा घेतला आणि मग आडवी पडले .. "

 

जय " ठीक आहे .. ऐक ना .. तुला टेन्शन आलंय हे तुझ्या चेहऱ्याकडे बघून लगेच दिसतंय .. फक्त आजच्या दिवस हे जरा लपवं ..आप्पा तुला आणि मला चांगले ओळखतात .. ते लगेच पकडतील कि  पोरं कोणत्या तरी वेगळ्याच धुंदीत आहेत .. तर आजचा दिवस आपण जे दोघांना दाखवू त्यावरून ते अंदाज लावतील कि आपला तिकडचा संसार कसा असेल .. सॉरी .. मला तुला हे कसे सांगू ते कळत नाहीये .. "

 

वसू " अरे .. तू टेन्शन नको घेऊस .. मला कळले तुला काय  म्हणायचेय .. "

 

जय " थँक्स वसू .. आज खूप ऑकवर्ड फील होतंय ना .. म्हणजे मला पण होतंय .. अचानक एकमेकांशी लग्न झालेय . ह्या लग्नाचा आपल्या मैत्री वर परिणाम झालाय .. मला बघ आता तुझ्या रूम मध्ये यायला पण खूप ऑकवर्ड होत होते ..  "

वसू " अरे .. हे बघ मी पण वेडीच आहे ... तुला आत मध्ये ये पण नाही बोलले .. ये ना .. आत ये ना "

 

जय " उद्या आपल्या लग्नाची पूजा आणि गोधळ आहे .. परवा सकाळची मी टिकेट्स बुक करतोय .. आपल्याला सकाळच्या ६ च्या बस ने जावे लागेल आणि  मग फ्लाइट ने  चा ट्रॅव्हल .. मग आपण  फ्लॅट वर जाऊ .. तर तुझे पॅकिंग आजच करून ठेव .. उद्या वेळ नाही मिळणार .. तुझे सर्टिफिकेट्स घेऊन ठेव .. म्हणजे थोड्या दिवसांनी आपण तिकडे जॉब अप्लाय करू .. थोडे दिवस तू घरातच थांब म्हणजे तुला रुटीन सेट होईल . "

वसू " ठीक आहे .. "

जय " उद्या आपण पंकज आणि नंदू ला फायनल भेटायला जाऊ .. तुला पाहिजे तर तू उद्या तिकडे राहिलीस तरी चालेल .. कारण पूजा झाल्यावर इकडे उगाच दोघे एकत्र झोपा वगैरे सुरु होईल .. " जय हळू हळू तिला सूचना देत होता .. तो तरी काय करणार होता बिचारा .. घरातल्यांच्या पुढे जाऊन त्याला सेटिंग लावायची

 

वसू मान हलवूनच हो म्हणून त्याला सांगत होती .

 

जय " थोडे दिवस जातील या सगळ्यात एकदा तिकडे गेलो ना कि थोडे बरे वाटेल .. ह्या घरातल्यांच्या  प्रेशर मधून बाहेर येऊ आपण .. मग जरा दोघेही मोकळा श्वास घेऊ.. थँक्स वसू  ह्या सगळ्यात पेशन्स ठेवल्या बद्दल "

 

वसू " ठीक आहे .. अजून काही .. "

जय " अरे .. तू पण बोल कि .. तुला काय वाटतंय ह्या मध्ये तुला काही सजेशन द्यायचे असेल तर सांग .. मीच एकटा बोलतोय असे नको करुस यार .. आपल्यातल्या मैत्रीला जिवंत ठेवण्यासाठी आपण मोकळे पणाने बोलत  राहिलो पाहिजे .. जे मनात येईल ते बोलायचे तरच हे साध्य होईल .. तिकडे तर दोघेच असणार आहोत .. तुला काय हवंय , काय नकोय हे तू सांगितल्या शिवाय मला कळणार कसे .. ? "

 

वसु " हमम.. "

 

वसू " मला फक्त आपण ह्या लोकांना फसवतोय याचे गिल्ट आलेय .. मी अप्पांच्या डोळ्यात बघू नाही शकत आहे .. आई पण इतक्या काळजी घेतायत .. मला फक्त हेच वाटतंय कि माझी सेटलमेंट वगैरे हे सगळे ठीक आहे पण ह्या लोकांच्या भावना चुकून पण दुखायला नको .. "

 

जय " हमम.. "

 

तेवढ्यात वीरू आला .. वीरू " ए हॅलो .. तुम्ही दोघे पण फार विचित्र आहेत रे .. काल नुसते साखरपुडा झाला तर एकमेकांना मिठ्या मारत होतात आणि आज लग्न झालेय तर १० फुटांवरून एकमेकाशी बोलताय "

 

जय " अरे .. आताच झोपून उठलोय मी .. अजून फ्रेश नाही झालोय "

 

वीरू " हे घ्या साहेब बॅग .. तुम्ही मागितली तशी व्हील वाली बॅग .. खूप शोधावी लागली मला "

 

जय " थँक्स यार .. वीरू .. आता आपण कधी भेटायचे .. तू येतोस का तिकडे ? आपण तिघे माझ्या फ्लॅट वर राहू .. तू पण नोकरी करशील "

 

वीरू " मेलास नाय कधीचा .. आता काय कबाब मी हड्डी बनू का तुमच्यात .. पण येईन मी नक्की माझ्या बहिणीचा संसार बघायला एकदा नक्की येईन "

 

जय " यु आर आल्वेज वेलकम "

 

वीरू " तू नाही वेलकम केलेस तरी येईन .. आणि एक जिजाजी .. माझ्या बहिणीला जर काही त्रास दिलात तर ना इकडे मी आहे आणि समोर तू आहे समजलं का ?"

जय " बरं  बाबा .. तुला विचारूनच .. "

वसू "शु... काही पण काय बोलतोय .. "

वीरू " आय है .. वसू  एकदम छान दिस्तेयस .. तुला असे नवरीच्या रूपात बघून जीव धन्य झाला माझा .. वीरू ने जय ला एक कडकडून मिठी मारली आणि अश्रूंना मोकळी वाट करून दिली "

तिकडे वसुच्या पण डोळ्यातुन धारा वाहिल्या .. जय ने तिला हातानेच बोलावून घेतले आणि तिघांनी एकच मिठी मारली ..

वसू " चला मी तुम्हा दोघांना चहा करून आणते .. जय तू फ्रेश होऊन घे "

वीरू " क्या बात है । जय आता वसू चे ऐकायची सवय कर .. ते काय म्हणतात ते " जोरू का गुलाम "

जय " ए गप ए .. मी आणि जोरु  का गुलाम ... शक्यच नाही आणि गुपचूप फ्रेश होयला गेला .

ठरल्या प्रमाणे आणि जय ने ठरवल्या प्रमाणे त्यांची पूजा आणि गोंधळ झाल्यावर ते दोघे आत्याकडे (म्हणजे वसू च्या माहेरी )गेले . आणि जय मुद्दामून तिला तरी तिकडे ठेवून आला आणि घरी सांगितले कि आता तिकडे गेल्यावर तिला आई कडे राहायला मिळणार नाही ना .. सकाळी पंकज ५ वाजता घरी सोडेल तिला गाडीतून .

 

घराल्यांना नमस्कार करून .. दोघे सकाळीच घरातून निघाले .. आता मात्र वसू ला राहवले नाही आणि जय च्या आईच्या  आणि अप्पांच्या गळ्यात पडून तीने भावनांना वाट करून दिली . 

 

पंकज ,वीरू यांचा निरोप घेऊन जय आणि वसू घरातून बाहेर पडले आणि प्रवासाला लागले . पूर्ण बस मधल्या प्रवासात वसू रडत होती ..  जय पण तिला रडून देत होता .. साहजिकच आहे अशी पहिल्यांदाच ती बाहेर पडली होती .. सुटले ते गाव पण सुटले आणि आपली माणसे पण एकदम सुटली ..जसे एअर पोर्ट वर आले तशी तर भीती तिच्या डोळ्यात दिसत होती .. या आधी कधी फ्लाईट मध्ये ती कधीच बसली नव्हती .. पूर्ण वेळ जय चा हात धरूनच आणि डोळे मिटून बसली होती ..

 

थोड्याच वेळात जय आणि वसू ची कार त्याच्या सोसायटीच्या  गेट वर आली ..

 

वसू मात्र डोळे मोठे मोठे करून उंच उंच बिल्डींग्स बघत होती .. शहरात मुलीपण कार चालवत आहेत .. त्यांचे कपडे .. त्यांची स्टाईल , त्याचा बिनधास्त पणा तिला डोळ्यांना दिसत होता .

 

फायनली घरात आले ..

 

जय "वेलकम "

 

वसू " थँक यु "

 

जय चा फ्लॅट तर एकदम चकाचक होता .. नवीन असल्यामुळे आणि फुर्निश्ड असल्यामुळे अजूनच भारी दिसत होता .. हॉल चा अवतार बरा होता पण किचन आणि दोन्ही बेडरूम बघितल्यावर लगेच कळत  होते कि एका बॅचलर मुलाचे घर आहे ..

 

जय ने पटापट वसू चे सामान दुसऱ्या बेडरूम मध्ये नेऊन ठेवले .. आणि तिला दाखवू लागला .. हि गॅलरी .. हे तुझे बाथरूम , हे किचन , हा प्यायच्या पाण्याचा नळ ..

 

वसु "छान आहे रे .. किती मस्त घर आहे .. गावातल्या बैठया घरांपेक्षा किती वेगळे आहे ना .. गॅलरी तुन खाली बघायला पण भीती वाटतेय मला इतक्या उंचावरन "

 

जय "काही नाही ग होईल सवय तुला ... बर ठीक आहे .. मी एकटाच होतो म्हणून मी बाहेर खाऊन यायचो ..त्यामुळे घरात किचन मध्ये खूप सामान नाहीये . फक्त चहा कॉफीचे सामान आहे आणि  गॅस पण इंडक्शन चा आहे .. मी पुढील दोन दिवसात किचन चा सेट अप लावेन .. तोपर्यत आपल्याला जेवायला बाहेरच जावे लागेल .. तू फ्रेश हो .. तोपर्यंत मी दूध घेऊन येतो .. "

 

वसू "नको .. नको .. मला चहा नकोय .. तू जाऊ नकोस ना लगेच .. मला एकटीला भीती वाटेल .. दार उघडता येईल कि नाही .. उगाच मी आतमध्ये अडकले तर "

 

जय "अग  .. काय हे इतके घाबरायची गरज नाहीये .. मी माझ्याकडच्या चावी ने उघडेन दार .. तू काही च करू नकोस दाराला .. मी आल्यावर लैच चे सेटिंग दाखवतो तुला .. तुला नाही मलाच चहा किंवा कॉफी पाहिजेय .. आपण  येतानाच घेऊन यायला पाहिजे होते .. तू काही खाशील का ? सँडविच वगैरे .. खाऊन घेतले म्हणजे बरं पडेल "

 

वसू "मी पण येते तुझ्या बरोबर .. प्लिज जय "

 

जय "ठीक आहे .. टेन्शन नको घेऊस .. चल दोघेही जाऊ बाहेरच नाश्ता करून येऊ आणि येताना दूध घेऊन येऊ .. "

 

वसू "सॉरी .. तुला मी त्रास देतेय ना .. "

 

जय "अरे .. नाही  इट्स ओके .. आत्ताच तर आलोय आपण .. इतके तर वाटणारच ना .. डोन्ट वरी .. पण उद्या मला ऑफिस ला जावे लागेल चालेल ना "

वसू "ते दाराचे तेवढे बघ .. घरात बसून राहीन "

जय हसायला लागला "घाबरू नकोस .. यु आर सेफ हिअर किती हायपर होतेस "

 

दोघे जाऊन जवळच्या रेस्टॉरंट मधून नाश्ता करून येतात .. येताना दूध घेऊन येतात ..

 

घरात आल्यावर जय त्याच्या  रूम  मध्ये जाऊन दार लावून घेतो आणि फ्रेश होऊन येतो

 

जय " अरे .. तू अजून फ्रेश नाही झालीस ?"

 

वसु हसायला लागते " अरे ते मला नळचं चालू होत नाहीये .. "

 

जय " अरे सॉरी मी तुला ते सेटिंग दाखवलेच नाहीना ? ये इकडे तुला दाखवतो आणि त्याने तिला बाथरूम मधले नळाचे सेटिंग दाखवत होता .. तर खरच  पाणी येत नव्हते .. वसू हसायला लागली " अरे तेच ना मी खूपदा  सगळीकडे फिरवून बघितले पाण्याचा एक थेम्ब पण येई ना .. म्हटले पाणी फक्त जय च्या सांगण्यावरच येते कि काय ?

 

जय पण हसायला लागतो .. तेवढयात अचानक शॉवर सुरु झाला  .. आणि सगळेच नळ सुरु झाले  .. दोघांन कळायच्या आत दोघांच्या अंगावर पाणी पडायला लागते .. बहुदा टाकीत पाणी नव्हते म्हणून पाणी येत नव्हते आणि अचानक टाकीत पाणी आल्यावर सगळीकडे पाणी यायला लागले ..

 

अचानक पाणी आल्यामुळे दोघे चिंब भिजून गेले आणि दोघे बाथरूम मधेच खूप जोरात हसू लागले .. इतके जोरात हसू लागले .. मगा च पासून शांत शांत असणारी वसू  अचानक इतकी हसायला लागली तर जय नुसता तिच्याकडे बघतच बसला .. वसू मात्र खूप जोरात अजूनही हसत होती ..

 

जय ने पटकन शॉवर बंद केला .. बघतो तर वसू भिंतीकडे तोंड करून जोर जोरात हमसून हमसून रडायलाच लागली . जय ला कळे ना आत्ता  तर हि हसत होती .. आता रडायला काय झाले ..