परकाया २०

in this part jay makes it possible akash litarali say sorry to vasu by touching his nose on ground

परकाया २०

क्रमश: भाग १९

तेवढ्यात पोलिसांच्या गाडीच्या सायरन चा  आवाज आला आणि मंडपात पोलिसांची जीप येऊन थाम्बली .

जय पण धावतच मंडपाच्या गेट वर गेला ..

आप्पा " नमस्कार साहेब .. आज इकडे काय काम काढलेत ? "

पोलीस " आप्पा , ते आकाश चे वडिलांना तुमच्या शी  बोलायचंय "

आणि गाडीतून आकाश चे  वडील  खाली उतरले

आकाश चे वडील  अप्पांच्या पा या  पडायचे नाटक करू लागतात .. " माझ्या मुला  वरची केस मागे घ्या .. त्याला  बेल पण मिळत नाहीये " अप्पांनी आणि जय ने गाडीत बघितले तर आकाश ला जीप मधून घेऊन पोलीस आले होते

आप्पा " नालायक माणसा .. कसले घाणेरडे संस्कार केलेस मुलावर .. त्याचे मी रीतसर लग्न लावून देत होतो वसू चे तर ते तुम्ही लोकांनी ऐन लग्नच्या मुहूर्तावर नाकारलेत आणि वरती शिरजोरी अशी कि तिच्याच जीवावर उठला तो .. अरे कुठे जाऊन पाप फेडाल ..

आकाश चे वडील "  पोरग लहान आहे .. त्याला काही कळत नाही .. अक्कल नाही त्याला .. तुम्ही पोलिसांना सांगून केस मागे घ्या त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे "

वीरू तर त्याला मारायलाच धावत होता ..

जय " एक मिनिट .. चालेल आम्ही केस मागे घेतो .. पण एका अटीवर "

वीरू " जय .. तू काय बोलतोयस .. ? ह्याला जेल मधेच सडवला पाहिजे .. "

आप्पा " जय .. वीरू बरोबर बोलतोय .. तो  त्याच लायकीचा आहे "

आकाश चे वडील " अहो तसा  नाहीये माझा पोर .. माझ्या शब्दा बाहेर नाहीये तो .. तुमच्या वसू ने आधी याला मारले म्हणून त्याचे डोके फिरले. आदल्या दिवशी जय ने किती मारले होते ते काय कमी नव्हते  ते तर त्या पोरीने पण मारले .. त्या रागात त्याच्याकडून ते वाईट कृत्य झाले "

जय ने एक  कोणाला तरी फोन केला .. तेवढयात आकाश च्या वडिलांच्या मोबाइल वर  त्यांनी ज्या श्रीमंत मुलीशी लग्न ठरवले होते ना तिच्या वडिलांचा  फोन आला आणि त्यांनी सांगून टाकले " क्रिमिनल मुलाशी माझ्या मुलीचे लग्न नाही होऊ शकत आणि फोन कट झाला .

जय " आता कळले कि इथे बसून काय काय करू शकतो ते .. आता त्याचा जॉब पण जाणार आहे . आय विल मेक शुअर कि भविष्यात ह्याचे लग्न कसे होणार नाही ते "

आकाश चे वडील " जय .. अरे असे करू नकोस .. आकाश माझा एकुलता एक मुलगा आहे .. माझी खुप  सारी स्वप्न आहेत त्याच्या बद्दल.. जय त्याला माफ कर .. इथून पुढे तो कोणाच्याच वाट्याला  जाणार नाही "

जय रागाने त्याचे डोळे लाल झाले होते " त्याची हिम्मत कशी झाली वसू ला घाणेरड्या नजरेने बघायची ? वसू ला हात लावायची ?"

आकाश च्या  वडिलांनी त्याला जीप मधून बाहेर ओढत काढले आणि तिथेच तेच मारू लागले .. " का हात लावलास ? का असे केलंस ? माफी माग .. पाया पड अप्पांच्या पाया पड ..  त्याला त्यांनी अप्पांच्या पायावर आडवा केला "

आकाश चे वडील " आप्पा .. हवे तर मी पण पाया  पडतो .. ह्या पोलीस केस मधून तेवढं वाचवा .. "

जय " एक अटीवर "

आकाश चे वडील " मान्य आहे .. जे काय बोलाल ते सगळे मान्य आहे "

जय " ह्याने नाक घासून वसू च्या पाया पडायचे .. आणि त्याच्या  नावाचा जो प्लॉट आहे तो गावाच्या मुलांना प्ले ग्राउंड साठी गावाच्या हवाली करायचा "

आकाश चे वडील " मान्य आहे .. सगळे मान्य आहे .. ह्याला पोलीस केस मधून सोडवा फक्त "

जय ने आतून कागद पेन आणला त्यावर  त्यांच्या कडून लिहुन घेतले कि अमुक अमुक प्लॉट प्ले ग्राउंड साठी स्वतःच्या मर्जीने गावाला दान करत आहे ..

जय वसू च्या रूम  मध्ये गेला .... वसू बाहेर यायला तयारच नव्हती .. त्याने तिला चक्क हात धरून बाहेर आणले आणि आकाश ला वसू च्या समोर नाक घासून तिची माफी मागायला लावली ..

वसू ला सुद्धा एक आंतरिक समाधान मिळाले होते .. आकाश ला तिच्या पाय जवळ बघून आपला बदला पूर्ण झाल्या सारखेच वाटले होते ..

वसू " आकाश , माफ करावे असा तुझा गुन्हा नाहीये .. पण आज तुला मी माफ करतेय .. असले घाणेरडे कृत्य पुन्हा कोणाही सोबत करू नकोस ..” आणि निघून गेली आतमध्ये

जय ने पोलिसांना " थँक्स फॉर द  कॉपरेशन .. तरी पण तुम्ही याकडे लक्ष ठेवा .. गावातल्या लोकांना लग्नच्या नावाखाली पैसे  प्लॉट साठी फसवत आलेत हे बाप लेक "

पोलिसांनी तंबी देऊन आकाश ला सोडून दिले .

तेवढयात भटजी " जय चला जावा आवरा लवकर शुभ मुहूर्ताची वेळ होत आलीय   

 जय " हो आलोच .. १० मिनिटे द्या फक्त "

एक संकट सरले . जय ने बोलल्या    प्रमाणे जय ने आकाश ला वसू च्या पायाशी आणलेच होते .

पुढील थोड्याच वेळात  मांडवात " शुभ मंगल सावधान "  मंगलाष्टके सुरु झाली ..

जय आणि वसू  भटजी जे जे सांगतील ते करत होते मग सात फेरे आणि हम तेरे , जय ने मंगळसूत्र घातले .. तिच्या केसात कुंकू भरले .. तिच्या बरोबर सप्तपदी झाली . एकेक विधी होत होते जय आणि वसू एकमेकांच्या लग्न बंधनात अडकत होते .. हे सर्व विधी  होत असताना जय पण जरा नर्वस झाला होता .. त्याला हि मनात घालमेल होत होती .. तर वसूची काय अवस्था .. लग्न लग्न पण जेव्हा प्रत्यक्षात लग्न होतंय तर हे खोटे खोटे आहे .. आणि ती या गोष्टीला तयार झालीय . आपल्या नशिबावर ती खरच  नाराज होती ..

जय मध्ये तिला डोळ्यानेच विचारत होता " काय विचार करतेस .. डोळ्यानेच सांगत होता .. नको टेन्शन घेऊस .. होईल आगळे ठीक " ती पण डोळ्यानेच त्याला " हो " म्हणत होती . 

पंकज ने तिचे कन्यादान केले .. पंकज ला जय चे कान  ओढायला सांगितले भटजींनी तर पंकज लहान मु ला  सारखा जय च्या मिठीत जाऊन रडू लागला " जय .. माझ्या बहिणीला सांभाळ .. आणि हात जोडू लागला .. "

जय " अरे पंकज , काळजी करू नकोस ..मी माझ्या जी वा  पेक्षा जास्त वसू ला जपेन .. माझ्या वर विश्वास ठेव .. "

इकडे नंदू ,वसू , आई , आत्या सगळ्या रडत होत्या ..

वीरू चे पण डोळे पाणावले होते .. वीरू " अरे शुभ कार्यांत रडारडी कसली करता .. चला लवकर आटपा .. लोकांना भुका लागल्यात ..

आणि सगळे हसायला लागले ..

फायनली एका मांडवात दोन लग्न पार पडल्यामुळे आज आप्पा , आत्या , आई एकदम खुश होते .. नंदू आणि पंकज नवीन संसाराची स्वप्न उराशी बाळगून एकमेकांकडे बघत होते आणि वसू आणि जय एकदम गोधळलेले होते .. आनंद होतोय का नाही ? दुःख होतंय का नाही ? त्यांना त्यांचे काहीच कळत नव्हते .

जेवणे उरकली .. थोडे पाहुणे राउळे गेले .. आता नंदू ची बिदाई .. जय ने त्याच्या कार ला थोडी डेकोरेशन केली होती .. आता मात्र नंदू खूप रडत होती ..  घर सोडून जाताना तिला मनातून खूप  यातना होत होत्या .. देवाच्या पाया पडली , आई अप्पांच्या पाय पडली , वसू आता मोठी वाहिनी म्हणून जय आणि वसू च्या पाया पडली .. वीरू च्या पण पाया पडली आणि रडत रडत गाडीत जाऊन बसली .. पंकज पण तिच्या मागे मागे गाडीत जाऊन बसला ..

आत्या पण गाडीत बसायला जाणार त्या आधी वसू ला डोळे भरून पाहून घेतले .. वसू पण आई करत आईच्या गळ्यात मिठी मारून रडत होती .. पंकज पुन्हा बाहेर आला आणि वसू ला मिठी मारून रडू लागला " तुला वाटतो तितका मी वाईट नाहीये ग .. काळजी घे आणि तिकडे गेलीस कि कॉल करत जा "

बघत बघता .. नंदू सासरी गेली आणि वसू एकटीच इकडे राहिली .. तिचे हि माहेर सुटले होते . एक दिवसातच ती आई आणि भावा पासून कायमची दुरावली होती .. तरी  पण आता तिला हक्काचे घर जय ने मिळवून दिले होते . अप्पांनी तर नेहमीच तिला  मुली सारखे जपले होते आणि मनातून त्यांनी वसू चे आणि जय चे लग्न व्हावे अशीच इच्छा होती . झाले ते घरातल्यांच्या दृष्टीने चांगले झाले होते .  

थोडा वेळ सगळे शांत बसले ..

आप्पा " चला आपल्या मुलगी आज सासरी गेली असली तरी घरची लक्ष्मी पण आलीय .. तिला आदराने घरात घ्या बर .. चला पुढील कार्यक्रमाची तयारी करा .

वीरू ने पण जय ची गाडी डेकोरेट केली होती .. दोघांना गाडीतून देवळात घेऊन गेला आणि मग गाडी पुन्हा घरात आली . तोपर्यंत सगळ्यांनी नवी नवरीला घरात घेण्याची तयारी केली . दारात दोघांना ओवाळून .. मापटे ओलांडून लक्ष्मी च्या पाउलांनी घरात घेतले .

वसू  ला हे घर काही नवीन नव्हते .. पण आज ती ह्या घरातला एक मेंबर म्हणून आली होती . आईने पण सून बाई ला घराण्याचे दागिने दिले ....

जय मात्र आता खूप दमला होता .. सगळे विधी झाल्यावर त्याच्या रूम मध्ये जाऊन आडवा पडला .

वसू  अर्धा एक तास बसली आणि शालू चेंज करून आली आणि जरा हलकी साडी नेसून सर्वांना चहा करायला किचन मध्ये आली .. आता तिच्याशी बोलायला पण कोण नव्हते . बिचारी मनातून खूप दुखी होती .. अजूनही ती स्वतःच्या घरात परकीच  होती .. हे  दुःख तिला आतून टोचत होते .. इथून पुढचा प्रवास हा आपला एकटी चा आहे .. जय च्या बरोबर नाही म्हटले तरी समीरा आहे पण मी मात्र एकटी आहे .. मी मनात सुद्धा जय चा विचार करताना मला मी पाप  करतेय कि काय असे वाटते .. मग मी कोणाचा विचार करू ?

आई " अग  .. अग .. दूध उतू जातंय .. बाळा .. तू आज दमलीस ना .. जा आता जाऊन थोडा अराम कर "

वसू " हो ..चहा झाला कि जातेच आहे ..

वसू ने सर्वांना चहा दिला ..

आप्पा " जा .. जय ला घेऊन जा त्याच्या रूम मध्ये "

वसू " नाही नको .. आप्पा  तो झोपला असेल .. म्हणजे .. ते झोपले असतील .. उठले कि देईन मी त्यांना पुन्हा करून "

अप्पा  आणि आई हसू लागले तिच्या कडे बघून

आई " किती ग गुणांची पोर .. काही सांगावे लागत नाही तुला .. जा बाळा थोडा अराम कर .. "

वसू   पण तिच्या रूम मध्ये आली झोपून गेली .

थोडा वेळ आराम करायला म्हणून आडवी पडली पण तिच्या जीवाला काही शान्ति नव्हती . सारखी सारखी तिच्या गळ्यातले मगंळसूत्राला हात लावून बघत होती . आणि तिच्या  भांगे मध्ये जय ने भरलेले कुंकू  हा क्षण तिला  बेचैन करत होता .. काश कि हे सगळे नॉर्मल असते .. काश कि जय चे नि माझे हे लग्न खोटें नसते .. आई आणि अप्पांना आम्ही दोघांना फसवलंय . आईंनी किती विश्वासाने लगेच मला घराण्याचे दागिने दिले .. एवढ्या विश्वासाची पात्रता आहे का माझी ?

जय ने हा काय मार्ग काढलाय ..ना मी जय चा विचार करू शकते आणि .ना उद्या मी  जय असताना दुसऱ्याचा विचार करू शकते .. दोन्ही बाजूने विचार केला तर मी पाप करतेय असेच मला वाटतंय ..

असे हे सगळे विचार करत हातात मंगळसूत्राची वाटी घेऊन विचार करत वसू बेड वर आडवी पडली होती .. नवी नवरीचे तेज तिच्या चेहऱ्यावर  होते .. हातात हिरवा चुडा .. त्यात मध्ये मध्ये सोन्याच्या बांगड्या .. नखांना लावलेले नेलपेंट .. हातावर रंगलेली मेहंदी , पायात पैंजण , जोडवी बिचवा , कानात , आणि गळ्यात एक छोटे एक मोठे मंगळसूत्र ..त्यातच लांब केसांची वेणी .. म्हणतात ना देवाने एखाद्याला सौदर्य द्यावे तर असे द्यावे . किती तरी वेळ जय दारात उभा राहून तिला विचारमग्न अवस्थेत पाहत होता ... ह्याकडेही तिचे लक्ष नव्हते .. जेव्हा विचार करता करता तिच्या डोळ्यातला अश्रू ओघळला तसा जय ने दार वाजवले ..

🎭 Series Post

View all