परकाया भाग १८

jay and vasu discussing on their future

परकाया भाग १८

क्रमश : भाग १७

जय ला समिराचा  कॉल  आला होता

जय " हॅलो "

समीराने ड्रिंक्स घेतले होते आणि ती आता जय वर खूप चिडली होती ..

समीरा " काँग्रॅच्युलेशन्स मिस्टर जय .. यु गॉट एन्गेज टुडे "

जय " समु हे काय तू ड्रिंक्स घेतलेस .. "

समीरा " हो.. मी तुझी एंगेजमेंट सेलिब्रेट करतेय .. चिअर्स राहुल ..

जय ला मागून राहुल चा आवाज येत होता " समीरा .. बास झाले आता .. चल घरी जाऊ .. "

जय " सॉरी समु ... जानू .. मी तुझा दोषी आहे .. पण एक ना आता तू राहुल बरोबर आता घरी जा .. मग आपण बोलू "

समीरा " नाही आज मी इथेच थाम्बणार आहे .. जय आय लव यु "

जय चे डोळे भरून आले होते त्याचा आवाज कापरा झाला " जानू आय अल्सो लव यु .. यु नो दयाट "

समीरा " नो यु डोन्ट लव्ह मी .. नाहीतर तू दुसरी शी एंगेजमेंट केली नसतीस "

जय " तुला सांगितले ना कि इट्स फॉर टाईम बीइंग "

समीरा " नो..  यु डोन्ट नो वन्स यु गॉट मॅरीड इट्स पर्मनंट फॉर सेव्हन बर्थ .. सात जन्म आता तू तिचाच होणार .. मी काय करू जय .. जय मी काय करू .. त्याला राहुल चा आवाज येत होता समीरा " डोन्ट क्राय बेबी "

जय " हे समु  असे काही नसते ग .. माझे फक्त तुझ्यावर प्रेम आहे हे तुला माहितेय ना .. फक्त दोन दिवस थांब मी येतोय तिकडे आता .. .. ऐक ना आता तू घरी जा .. आणि मग आपण बोलू .. "

समीरा " ठीक आहे .. सॉरी जय मी आज हाय हिल्स घातले .. मी आज पार्टी वेअर ड्रेस घातलाय आणि आणि आज मी ड्रिंक्स पण घेतले .. तू चिडणार नाहीस ना माझ्यावर "

जय " नाही ग शोना .. मी नाही चिडू शकत तुझ्यावर .. तू काळजी घे तुझी .. आता शहाण्या बाळासारखी घरी जा बघू .. आपण बोलू नंतर .. आणि एक काही टेन्शन घेऊ नकोस मी आलो कि करतो सगळे ठीक ..तू आता घरी जा प्लिज "

समीरा " जय आय लव यु .. यु ब्रोक माय हार्ट "

जय " सॉरी ना शोना .. तुला आत्ता असे वाटतंय पण मी जेव्हा तिकडे येईन तेव्हा तुला हे सगळे नीट समजावून सांगतो माझा प्लॅन "

समीरा " प्लॅन .. व्हाट द हेल .. असे  प्लांनिंग केलेस माझ्याशी लग्न कराचे म्हणत होतास आणि तिच्याशी लग्न करून येतोस "

जय " अरे जान !  आय एम  ट्रॅप इन सिचवेशन " असे तो म्हणत मागे बघतो तर वसू त्याच्या मागे असते . वसूच्या डोळ्यात पाणी येते हे ऐकून. 

जय फोन कट करतो आणि राहुल ला लावतो

जय "राहुल , तू तिला ड्रिंक्स का घेऊन दिलेस ? "

राहुल " सॉरी आज ती खूपच अँग्री होती .. माझ्या काही ऐकण्या पलीकडे होती .. जय शी इस डिस्टबर्ड  .. तू लवकर ये .. मला खूप वाईट वाटते तिच्यासाठी .. "

जय " आय कॅन अंडरस्टॅंड .. तू प्लिज तिला घरी घेऊन जा "

राहुल " हो .. ठीक आहे "

जय " बाय "

जय " वसू .. एक मिनिट यार .. तू आता का रडतेस ? तुला तर मी आधीच सगळी कल्पना दिली आहे ना .. तु आता अशा गोष्टींची सवय करून घे .. तिकडे गेल्यावर समीरा आपल्या बरोबर कायम असणार आहे .. ती तर माझ्या ऑफिस मध्ये आहे .. त्यामुळे तिच्याशी मी बोलल्यामुळे तू वाईट वाटून नको घेत जाऊस यार .. तू तरी मला समजून घे .. तिकडे तीने रागाने  ड्रिंक्स  घेतलेत .. ती खूप डिसरब झालीय .. मी काय करू .. मला आत्ताच्या आता तिकडे जावेसे वाटतंय यार वसू   काहीतरी कर ना "

वसू " जय . रिलॅक्स .. एवढं तर ती रागवणारच ना .. एवढा रागवायचं तिचा हक्कच आहे ना "

जय " डू यु थिंक एव्हरी थिंग विल बी नॉर्मल "

वसू " नाही झाले तर आपण दोघे मिळून करू ठीक .. मी तुझ्या बरोबर एक मैत्रीण म्हणून  नेहमी उभी राहीन .. मी तिला समजावून सांगेन कि जय फक्त तुझा आहे .. मी त्याची फक्त एक मैत्रीण आहे "

जय  तिला एक हग करतो " थँक्स डिअर "

तेवढ्यात मागून वीरू आणि पंकज येतात. वीरू ला आणि पंकज ला ह्या दोघांचा प्लॅन माहित नाहीये त्यामुळे ते नॉर्मल आहेत

वीरू " जय अरे हे काय चाललंय तुमचे इकडे .. अप्पांनी बघितले तर भडकतील "

पंकज " वसू .. त्याला एक कळत नाही तो शहरातून आलाय तू तर इथलीच आहेस ना .. तुला कळत नाही "

वसू  " नाही .. ते .. नाही .. तुम्ही समजतंय ,.. "

पंकज " जा पळ आत मध्ये "

जय " गप रे पंकज .. आता ती माझी बायको आहे .. तिच्यावर आवाज चढवायचा नाही काय ?"

वीरू " वाह बेटा .. ये सब यहा नही चलेगा "

जय " अरे आय नो .. इट वॉज जस्ट फ्रेंडली ह्ग .. नथिंग लाईक यु थिंक "

वीरू " अरे तुझी बायको आहे ती आता फ्रेंड नाही .. त्यामुळे तुझे फंडे आम्हला नको सांगुस .. चल जेवायला .. "

जय " चला .. मला खूप भूक लागलीय "

तर अशा पद्धतीने जय आणि वसू आणि पंकज आणि नंदू  चा साखरपुडा झाला .

दुसऱ्या दिवशी सकाळी जय ने पोलिसांना फोन केला " काही झाले तरी आकाश सुटला नाही पाहिजे .. त्याने जे काम केलेय त्या कामासाठी त्याला माफी मिळालीच नाही पाहिजे . कोणत्याही कारणाने त्याला बेल देऊ नका .. त्याला जास्तीत जास्त काळ जेल मध्ये ठेवा .. आज त्याची हिम्मत कशी झाली आपल्या गावातल्या मुली सोबत असे वागणायची .. तो क्रिमिनल आहे "

दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटेच तो आणि वीरू घरातून बाहेर पडले आणि वसू साठी शालू घेऊन आले .. आणि विजय साठी लग्नासाठी ड्रेस घेऊन आले

वीरू " शालू तर घेतला पण अजून एक महत्वाची गोष्ट राहिली अरे "

जय " आता काय ? अरे आता माझा पॉकेट रिकामे होयला लागलेय .. आता काही वाढवू नकोस "

वीरू " पण त्या शिवाय तू लग्नच नाही करू शकत "

जय " काय बोलना  पटपट.. इकडे क्रेडिट कार्ड चालेल का कुणीकडे ?

वीरू "  सोनाराकडे चालेल बहुदा "

जय " सोनाराकडे म्हणजे खूप पैसे लागतील रे .. घ्यालच पाहिजे का ?"

वीरू " हो ना .. अरे गाढवा .. मंगळसूत्र .. त्या च्या शिवाय तू लग्न कसे करशील ?

जय " अरे देवा .. म्हणजे आत २ लाख तरी लागतील ? कुठून आणू "

त्याने राहुल ला मेसेज पाठवला " मला अर्जेंट मध्ये २ लाख रुपयांची गरज आहे .. पाठवशील का ?"

दुसऱ्या मिनिटाला राहुल ने ३ लाख रुपये पाठवले

जय " थँक यु यार .. सी यु सून "

जय ने आणि वीरू ने मिळून वसू साठी एक मंगळसूत्र घेतले आणि घरी आले

आप्पा " जय अरे नालायकांनो आज तुझे लग्न आहे कुणीकडे फिरतोस तू ? हळदी साठी सगळे थाम्बलेत . नंदू आणि पंकज ची हळद सम्पत आली ..

जय आला तसा घरातल्यांना जिवंत जीव आला आणि वसू आणि जय च्या हळदीचा प्रोग्रॅम जोरदार झाला ..

लगेच दोन्ही जोडप्यांना उठण्यानी स्नान घातले आणि लग्नही तयारी सुरु झाली .

वसू ला प्रश्न पडला होता तिला शालूचं कोणी दिला नव्हता .. आता मी काय घालू आणि कोणाला सांगू अशा विचारत ती बसली होती तर तिचे दार वाजले .

वसू ने दार उघडले तर जय होता

जय " अग  झाली का तुझी तयारी ? "

वसू " हो आता तीच मी साडी नेसायची तयारी करत होते .. जय यातली कोणती साडी बरी वाटेल रे .. "

जय " सॉरी यार या सगळ्या गडबडीत तुझा शालू आणायचा राहिला "

वसु " इट्स ओके रे .. त्यात काय एवढे .. माझ्याकडे सद्य खूप आहेत .. हि बघ मी हि नसते .. हिची मी घडी पण नाही मोडली "

जय ला वीरू चे बोलणे आठवले .. वसू इतकी सोशिक , सहनशील आहे ..शिवाय कधीच कोणतीही गोष्ट अधिकाराने मागत नाही म्हणून तिच्यासाठी खूप काही करावेसे वाटते .

जय " असे कसे .. एवढी साधी साडी आणि माझी बायको श्यक्यच नाही .. हा घे तुझा शालू .. बघ आवडतो का ?"

वसू " अरे कशाला .. किती खर्च करशील .. थोडे पैसे ठेवून दे .. तिकडे गेल्यावर काय करायचे ? "माझी थोडी सेविंग आहे तशी . "

जय " हॅलो मॅडम , तुम्ही सध्या तरी हा असला विचार करू नका .. "

वसू " हे सगळे फार कठीण  होणार नाही ना  ?"

जय " नको ग राणी .. सारखा निगेटिव्ह विचार करत बसूच .. आपल्याला थोड्याच वेळात इथून उडणं छू होयचंय .. बी रेडी फॉर दयाट .. येशील ना माझ्या बरोबर .. आणि राहशील ना माझ्या बरोबर .. तसा मी माणूस म्हणून चांगला आहे .. तुझ्या सारखा भांडखोर तर नक्कीच नाहीये "

वसू " मला खूप भीती वाटतेय ? तुझ्या समीराने मला फ्रेंड म्हणून एक्सेप्ट नाही केले तर "

जय " बघ कशी कायम निगेटिव्ह विचार करतेस .. किती घाबरतेस .. तिने नाही केले तर मी आहे च ना तुझ्या बरोबर .. जरी खोटा असलो तरी नवरा म्हणून तुझे  रक्षण करेनच "

वसू " जय .. सॉरी मी तुला खूप त्रास देतेय ना .. "

जय " अजून तरी नाही .. खरा त्रास तिकडे गेल्यावर आहे मला .. तिकडे जर माझ्याशी भांडलीस ना तर बघ .. आणि माझ्या मित्रांसमोर माझ्यावर हात तर अजिबात उचलायचं नाही काय ? मारकुटी म्हैस आहेस तू "

वसू " जय काय रे ? इकडे माझे हात थंड पडलेत भीतीने आणि तूला मजाक सुचतोय "

जय " हॅलो , माजक नाहीए .. मी खरं सांगतोय .. मारामारी करायची नाहीये तिकडे .. नाहीतर डोमेस्टिक व्हॉयलन्स च्या ना'वा खाली मला जेल मध्ये टाकतील "

वसू " गप रे.. काही पण बोलतोस .. तसेही मी पती परमेश्वर वाली आहे .. एकदा तुझे आणि माझे लग्न झाले कि तू माझा परमेश्वर होशील "

जय " ए हॅलो .. गॅप बसायचे काय ? तिकडे आपण मित्र - मैत्रीण असणार आहोत आणि एक लवकर तुझा लाईफ पार्टनर शोध म्हणजे मी लग्न करायला मोकळा "

वसू " अहं .. तो तू शोधायचास .. "

जय " अरे .. मी कसा शोधणार ? तुला लग्न करायचंय ?"

वसू " म्हणजे तू त्याची वर परीक्षा घेशील कि नाही .. तुझ्या कडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर च  तो फायनल होईल "

जय " अच्छा ठीक आहे .. वसू  तू खुश आहेस ना .. नक्की ?"

🎭 Series Post

View all