परकाया  भाग १६

in this part akash tries to molest vasu

परकाया  भाग १६

क्रमश: भाग १५

तेवढयात आकाश धावत येतो .. जय ला तिकडे बघून जरा घाबरतो ..

जय "तिला रोमँटिक डेट मी प्लॅन केली होती हे सांगू नकोस असे त्याला कानात सांगतो .. " आणि जय बाहेर बिलाचे बघायला निघून जातो .

आकाश वसू समोर   उभा असतो

वसू "काय मग आकाश .. माझ्या पेक्षा श्रीमंत मुलगी मिळाली का तुला ?"

आकाश काहीच बोलत नाही .

वसू बेड वर पाय लांब करून बसलेली होती . तिने छान लाचा घातला होता .. त्यावर ट्रान्स्परन्ट ओढणी घेतली होती .. तिचे केस झोपून उठल्यामुळे विस्कटलेले होते . ती   तशा अवस्थेत पण खूप सुंदर , नाजूक दिसत होती .. तिचा ओठ जरासा सुजला होता .. आकाश  चे लक्ष ती काय बोलतेय तिच्या बोलण्याकडे नव्हतेच त्याचे लक्ष तिच्या शरीराकडे जात होते .. एक क्षण त्याला रिसॉर्ट मधली ती त्याच्या जवळ असतानाची आठवली ..  

वसु "तुला काहीच वाटत नाही का रे ? लहान पणा पासून आपले लग्न आपल्या वडिलांनी ठरवले होते . तरी तुला माझ्याशी असे वागताना काहीच वाटले नाही ना ?"माझ्या विषयी काहीच भावना नसताना रिसॉर्ट मध्ये जे तू केलेस ते का केलेस मग ? माझ्या भावनांशी असा खेळ का केलास तू ?"आकाश अरे बोल ना ...  मला स्वप्न का दाखवलीस .. खोटे प्रेम करून माझी करोडो ची जमीन मिळवायची होती का तुला ?. 

आकाश काहीच बोलत नाही .. वसू उठते आणि तिच्या गळ्यातली चेन आणि पेंडंट काढून त्याच्या अंगावर फेकते

वसू "हि ठेव तुझ्याकडे .. तुझ्या होणाऱ्या बायको ला फसवायला होईल तुला .. आणि शक्य झालेच तर माझ्या समोर तुझा हा चेहरा परत आणू नकोस .

आकाश ला जय ची जिरवयाची असते .. जय आजू बाजूला नाहीये हे बघून तो तिला सांगतो .. "ते रिसॉर्ट चे प्लॅनिंग मी नव्हते केले .. ते जय ने केले होते .. आणि हि चेन आणि पेंडेंट पण त्यानेच आणलेय मी नाही .. त्याला स्वतःला माहित नाहीये कि तो तुझ्यावर प्रेम करतोय .. तुला खुश बघण्यासाठी तो त्या दिवशी किती धडपडत होता . तुझ्या विषयी बोलताना त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते .. मोट्या पोट  तिडकीने मला समजावत होता कि तू किती सुंदर आहेस .. तू किती चांगली आहेस . "

वसू "आकाश चा एकेक शब्द वसू चे अंग शहारून टाकत होता .. तिला काचेतून जय बिलिंग काउंटर वर उभा असलेला दिसत होता .. "

आकाश "त्याला गावात आल्यावर तू  आणि शहरात गेल्यावर त्याची ती .. अशा दोघी पाहिजेत .." आणि कुत्सितपणे हसायला लागला . त्याचे वाक्य पूर्ण होईपर्यंत वसू ने एक जोरात त्याच्या कानशिलात लगावली .. त्याचा सटाक  असा आवाज आला आणि आकाश चा गाल लाल झाला .

आकाश ला पण वसू चा राग आला आणि त्याने वसू चा हात पकडला आणि पिरगळू लागला ..

आकाश "तुझे काय आणि .. तू त्याच्यावर प्रेम करतेस हे तरी त्याला सांगितलेस का ? तुम्ही दोघे मिळून मला फसवणार होतात का ? मित्र मैत्रीण चा खेळ तुमचा लहान पणा पासून चाललाय .. इतके वर्ष आपले लग्न ठरलय कधी मला तुझ्या जवळ तरी येऊन दिलेस का ? कोणासाठी स्वतःला जपलेस त्याच्यासाठी ना .. "

वसू "आई ग .. सोड माझा हात आकाश .. तुझी हिम्मत कशी झाली माझा हात पकडायची .. सोड माझा हात .. "

वसू ने लाचा  घातला होता ..  झटापटीत तिचा दुपट्टा खाली पडला .. आणि आकाश तिला त्याच्या जवळ ओढू लागला  ..

वसू "जय .. जय .. "अशा हाका  मारत होती पण मध्ये काच असल्यामुळे त्याला आवाज येत नव्हता ..

आकाश " तुझ्याशी लग्न करून तुझी जमीन तर हडप करणारच होतो पण तुला पण .. तुझ्या या नाजूक ओठांना कधी .. "

वसू ने तिची पूर्ण ताकद लावली आणि कशी बशी त्याच्या हातातुन सुटली आणि रूम च्या बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करू लागली ..

आकाश ने तिला पुन्हा मागून पकडले आणि उचलायचा प्रयत्न करू लागला .. ति पण त्याला लाथा मारत होती .

आकाश च्या हाताचे व्रण तिच्या अंगावर उठत होते .. आणि ती पण तिची ताकद एकवटून त्याला विरोध करत होती .. मोठ्याने ओरडली "जय...."

जय ला आकाश असे काही करेल असे वाटलेच नव्हते . जसा काय वसू चा आवाज त्याच्या हृदयापर्यंत पोहचला आणि रूम मध्ये आला ... त्याला बाहेरूनच  आकाश वसू ला त्रास देतोय हे दिसले आणि तो आतमध्ये आला .. आणि एक क्षणात त्याने आकाश ला जमिनीवर पाडला ..

न जाणे किती लाथा किती बुक्के किती फटके आकाश ला त्याने मारले .. त्याच्या डोळ्यातून अश्रू पडत होते आणि तो तिच्याकडे बघून त्याला मारत होता ..

तेवढ्यात वीरू तिकडे आला आणि त्याला वसू कडे बघून काय प्रकार झालाय यांचा अंदाज आला . वीरू ने लगेच पोलिसांना फोन केला आणि आकाश ला पोलीस घेऊन गेले .

वसू एका कोपऱ्यात शून्यात नजर लावून बसली होती .. आणि थरथर कापत होती

जय ने तिला बघितले .. तिचा दुपट्टा उचलून तिच्या खांद्यावर टाकला .. तिचा खांद्यावर फाटलेला ब्लाउज पाहून त्याने तिकडची एक चादर तिच्या अंगावर टाकली .. नर्स कडून फर्स्ट एड बॉक्स घेऊन स्वतः तिच्या जखमांवर औषध लावू लागला .. तिच्या डोक्यावर मार लागला होता .. तिच्या हातावर , पाठीवर काळेनिळे डाग पडले होते .. आणि डोळ्यातून अश्रू वाहत होते ..

 वसू "जय मला मरायचंय .. मला मुक्त कर .. मी तुला दिलेलं वचन नाही पाळू शकत ..  आता तू वेळेत आला नसतास तर .. आणि काही कळायच्या आत ती जय च्या मिठीत गेली .. जय पण तिचे सांत्वन करण्यासाठी तिला मिठीत घेऊन तिच्या केसात किस करू लागला ..

जय "काही झालेलं नाहीये .. आता होईल सगळं ठीक .. मी आहे ना .. तू काही काळजी करू नकोस .. तू आधी रडायचे थांबवं बघू .. सॉरी तुला मी त्याच्या बरोबर एकटीला सोडायलाच पाहिजे नव्हते .. तो इतक्या थराला  जाईल असे वाटलेच नव्हते .. "

वसू  खूप जोरात रडत होती .. जय तो मला म्हणाला मी तुला आणि तुझ्या जमिनीला पण हडप करणार होतो .. माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बघत होता .. जय त्याची नजर .. जय त्याने मला इथे हात लावला .. जय त्याने मला .. "

जय " शु... जाऊदे त्याला आता पोलिसांनी पकडून नेलंय .. त्याचे बघ आता लग्न कसे होणार नाही हेच मी बघतो आता .. त्याला तुझ्या पाया पडायला नाही लावले तर जय नाव नाही लावणार .. त्याच्या वर आता मी केसच टाकतो .. "आणि तिच्या कपाळावर .. केसांवर तो किस करत होता .. ती पण  त्याच्या कुशीत शिरून रडत होती . घाबरली होती .. भेदरली होती .. असा काही प्रसंग आपल्या आयुष्यात येईल असं तिला कधी वाटलंच नव्हते ..

जय च्या डोळ्यातून तिची अवस्था बघून अश्रू येत होते .. ती  भीतीने थरथर कापत  होती तो तसाच ब राच वेळ तिला मिठीत घेऊन बसला होता.. तिला शांत करत होता .. तिची काळजी घेत होता ..

तेवढयात वीरू पोलिसांशी बोलून आतमध्ये येतो त्या दोघांना असे एकत्र पाहून तो खूप आनंदी होतो पण मनात विचार येतो कि समीरा वाहिनीचे काय ? या सगळ्यात तिची बिचारीची फरपट होणार आहे .. देवाने या तिघांच्या राशीत नक्की काय लिहून ठेवलंय काय माहित ..

जय वसू ला घेऊन घरी आला तिच्या रूम मध्ये तिला त्याने झोपवली आणि थेट अप्पांकडे गेला

आप्पा "माझ्या आणि वसू च्या लग्नाची तयारी करा .. ठरलेल्या वेळेत दोन्ही लग्न पार पडतील . लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी काय ते पूजा वगैरे उरकून मी लगेच वसू ला घेऊन जाईन "

आप्पा त्याच्याकडे बघतच बसले .. त्यान्ना त्याच्यावर अभिमान वाटत होता .. माझा मुलगा स्वार्थी नाहीये .. त्याला त्याची जवाबदारी कळतेय हे बघून त्यांना खूप बरं वाटले .

घरात सगळ्यांचं हि  बातमी कळली आणि घरात पुन्हा लाऊडस्पिकर वर गाणी लागली . घरातील वातारण एकदम बदललं . पुन्हा सगळे शुभ कार्यांत मग्न झाले . अप्पांनी पुन्हा मोठ्या दिमाखात फेटा लावला

पंकज ने जय ची हात जोडून माफी मागितली .. जय ने त्याला सांगितले कि नंदू विषयी मला काहीच काळजी नकोय .. तू तुझ्या बहिणीची काळजी करू नकोस ती आता माझी जवाबदारी आहे .. ती कशी सुखी राहील ते आत तू माझ्यावर सोड "

वसु रूम मध्ये झोपली होती आणि जय तिच्याच रूम  यामध्ये बाजूला खुर्चीवर बसला होता .. बिचारी वसू .. आकाश ने असे नको होते करायला .. नशीब मी आलो वेळेत.. आणि उठून तिच्या डोक्यावरून हात फिरवला .. आता एकदा आपण तिकडे शहारत गेलो कि या सगळ्यातून तुला मुक्त करतो .. एक मोठे आकाश उंच उडी घेण्यासाठी वाट बघत आहे .. इथून पुढे तू कशी आनंदी राहशील हेच मी बघेन .. असा विचार करत खुर्चीवर बसलेला होता

तेवढ्यात वसू एकदम दचकून जागी झाली .. तिचे अंग घामाने भिजले होते .. सकाळी झालेल्या प्रकाराने ती पुरती घाबरून गेली होती . 

जय ने तिला पाणी दिले .. "घाबरू नकोस .. तू घरी आहेस ..शांत हो .. काही झालेले नाहीये .. " असे बोलून तिला शांत करत होता .. ती पण भेदरलेल्या नजरेने जय कडे पाहत होती .. तिने पाणी घटाघटा प्यायले .. ह्या धक्क्यातून लवकर बाहेर येणे गरजेचे होते .

जय "आता कसे वाटतंय ?"

वसू "मी ठीक आहे ?"

जय "आता थोडे जेवून घे आणि मग ह्या गोळ्या घे .. तुला बरं वाटेल .. मी अप्पांना सांगितलंय .. आज संध्यकाळी आपला साखरपुडा आहे .. तेव्हा छान तयार हो .. " आणि त्याने तिला एक पॅकेट दिले .. "हा नवीन लाचा  मी घेऊन आलोय आज संध्याकाळ साठी .. अजून काही तुला हवे असेल तर सांग मी आणून देईन .. तू तयार आहेस ना मनापासून .. म्हणजे मी जे सांगितलंय ते ते पटलंय ना तुला ?" मला माझं कोणताही मत तुझ्यावर लादायचे नाहीये . अजूनही वेळ गेलेली नाहीये . "

वसू " जय .. सॉरी रे अजून माझ्यासाठी काय काय तुला सोसावे लागणार आहे काय माहित .. "

जय " मला तुझी खुशी हवीय बाकी काही नकोय .. मी काही सोसत नाहीये .. मी तुला दुखी नाही बघू शकत ..”

आणि रूम मधून  बाहेर पडून गेला .

आज त्याला समीरा ची खूप आठवण येत होती .. मनात एक प्रकारची धडधड होत होती .. समीरा ला जेव्हा कळेल कि मी वसूशी लग्न करतोय .. ती कशी रिऍक्ट करेल .. तिला कसे समजावू .. तिला पण मी दुखी नाही बघू शकत .. तिला फोन करून सांगू का ? का डायरेक्ट तिच्या समोर  जाऊ ? ती मला असे बघितल्यावर  काय अवस्था होईल तिची ? आणि आपोआप त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळला . नात्यांचा गुंता वाढतच जात होता .. वसू आणि समीरा दोघींच्या आयुष्याशी मी खेळ तर करत नाहीये ना .. या त्रिकोणाचा एक कोण मी आहे .. च्यायला माझ्या नशिबात द्विभार्या योग आहे कि काय ? जर वसू ने मला सोडलेच नाही तर ? आणि समीरा मला सोडून गेली तर .. या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी खूप भयानक असणार आहेत .. मी घेतलेला निर्णय मलाच टेन्शन देणार आहे .. नाही म्हटले तरी वसू माझ्या बरोबर माझ्या घरात राहील .. आणि हे सगळे विधी जे आज पासून होतील त्याचं काय ? एक एक क्षण जसा पुढे जातोय तस मी समीरा पासून दूर जातोय असे वाटतंय मला .. समीरा .. आय लव यु .. प्लिज मला समजून घे .. मी तुझ्याशी प्रामाणिक आहे .. मी तुला फसवत नाहीये ग .. मी फक्त वसुला मदत करतोय .. तिला ताठ मानेने जगायला मदत करतोय .. तीची  खूप निराशा झालीय माझ्या मैत्रीच्या ज्योतीने थोडासा आशेचा किरण तिच्या तिला देतोय .

🎭 Series Post

View all