(प्रेरणादायक लघुकथा स्पर्धा.)
************
" निशूबाबा हे घ्या.. भरकन दूध पिऊन घ्या."
" उम्म.. नको ना मला शकूकाकू. दूध अजिबात आवडत नाही मला. "
लहानगा निशांत नाक मुरडत म्हणाला.
" असं कुठं असतं बाबा..? दुध नाही पिणार तर मोठे कसे होणार? "
" मम्मा तर मला म्हणते की अभ्यास केला की मी खुप मोठा होईन. तू म्हणतेस की दुध पिलं की मोठा होणार? कोण खरं बोलतोय तूच सांग? "
" निशू बाबा , मॅडम म्हणतात ते अगदी बरोब्बर आहे. शिक्षणानं माणूस मोठा होतो.पण ते मोठेपण पेलवायला ताकद हवी की नाही?दुध पिल्यानं शक्ती मिळते आपल्याला."
शकू त्याला प्रेमानं समजावत होती.
निशू गटागटा दुध प्याला तिचं ऐकून. त्याला कधी काही आवडलं नसलं तरी शकूने समजावले की लगेच ऐकायचा तो.
त्याची मम्मा शलाका… नेहमी म्हणायची, माझ्यापेक्षा शकू जास्त जवळ आहे निशूच्या.
त्याची मम्मा शलाका… नेहमी म्हणायची, माझ्यापेक्षा शकू जास्त जवळ आहे निशूच्या.
… शकू आणि निशूचा हा संवाद पायरीवर बसून खेळता खेळता ती ऐकत होती.
" खरंच दुध पिल्यानं शक्ती येत असेल का.? मग मला का कधीच दुध देत नाही ..? "
तिच्या छोटुसा चेहरा मनात आलेल्या त्या प्रश्नानं आणखीनच आक्रंदला.
स्कूलबसच्या हॉर्नने शकूनं हातातली कामं बाजूला सारून निशूला आवाज दिला.
" निशू बाबा.. बस आलीय चला लवकर..!"
एका हातात त्याची बॅग आणि दुसऱ्या हातानं त्याचं बोट पकडून तिनं त्याला बसमध्ये बसवलं…
आणि परत येऊन उरलेल्या कामाला लागली.
पायऱ्यावरती खेळून कंटाळलेली ती टेबलापाशी आली. तळाशी दोन चार घोट दुध उरलेला निशूचा उष्टा ग्लास अजूनही तिथेच होता. त्या ग्लासकडे आशाळभूतपणे ती नजर रोखून उभी होती.
" मनू .. काय बघतेस? दे तो ग्लास इकडे. विसळून ठेवते. "
शकूच्या आवाजाने ग्लास उचलून दिला तिला . त्यातील दुध सिंकमध्ये ओतून शकू धुवायला लागली.
तिची नजर मात्र अजूनही त्या ग्लासकडेच.
तिची नजर मात्र अजूनही त्या ग्लासकडेच.
" मनू असं नाही बघायचं. "
शकू तिच्याकडे डोळे मोठे करून म्हणून म्हणाली.
" आई तू खोटं का बोललीस निशूशी? "
छोटया मनूने तिलाच विचारलं.
" काय खोटं बोलले? "
शकूच्या कपाळावर आठया होत्या.
शकूच्या कपाळावर आठया होत्या.
" हेच की दूध पिल्यानं शक्ती येते म्हणून? "
" बाई गं. खरंच बोलले मी. "
शकू हसत म्हणाली.
शकू हसत म्हणाली.
" मग मला का देत नाहीस तु दूध कधीच..?? "
तिच्या प्रश्नानं शकूचा चेहरा खर्रकन उतरला.
डोळयांपुढे उभी राहिली घरातील वास्तविकता.
खाटेवर असलेले दोन म्हातारे सासुसासरे.. एका अपघातात पाय गमावलेला नवरा.
घरात कमवणारी ती एकटी.. आणि खाणारी पाच तोंडे. दुधाच्या रतिबासाठी कुठून खर्च करणार?
खाटेवर असलेले दोन म्हातारे सासुसासरे.. एका अपघातात पाय गमावलेला नवरा.
घरात कमवणारी ती एकटी.. आणि खाणारी पाच तोंडे. दुधाच्या रतिबासाठी कुठून खर्च करणार?
" सांग ना मला का देत नाहीस दूध?"
मनूच्या प्रश्नाने ती भानावर आली.
हातातील कामं बाजूला ठेवून शकूनं तिला ओट्यावर बसवलं.
" तू लहान होतीस ना तेव्हा खुप दूध प्यायचीस माझं . त्यामुळंच तर किती ताकद आलीये तुझ्यात माहितीय का? "
" खरंच..? "
आपले इवलेसे डोळे विस्फारून ती म्हणाली.
"मग नाहीतर काय.रविवारी मला पंजा लढवताना हरवलंस की नाही?"
शकू.
" हो गं आई. मी आहेच ताकदवार."
मनूच्या डोळ्यात चमक होती आता.
" आई पण तू मला निशूसारखं मोठया शाळेत का नाही पाठवत? माझी शाळा किती छोटी आहे माहितीय का? "
आपले गाल फुगवत ती म्हणाली.
आपले गाल फुगवत ती म्हणाली.
" मनु शाळा लहान असली तर काय झाले? तुझे टीचर किती छान शिकवतात. तुझ्याकडून चांगला अभ्यास करवून घेतात. तूला तर आत्ताच किती पाढे पाठ झाले आहेत. "
शकू तिला सांगत होती. मनूचं काही समाधान होईना.
" आई आपण गरीब आहोत म्हणून छोटया शाळेत टाकलं नं मला? " ती आईच्या डोळ्यात बघत म्हणाली.
शकूची भांडी विसळून झाली होती. आपले हात कोरडे करून मनूच्या गळ्यात तिने ते गुंफले.
" मनू .. गरीब आहोत आपण.. पण तो काही गुन्हा किंवा चूक नव्हे. आपण आपल्या कष्टाची भाकरी खातो. कुणापुढं हात नाही ना पसरत. माणसाने श्रीमंत नसावं पण स्वाभिमानी असावं. कुणाचे मिंधे होवू नये.!"
" म्हणजे गं..? "
न समजून मनू.
न समजून मनू.
" म्हणजे.. बघ. तूला काही हवं असेल नी पैसे नाहीत म्हणून तूला ती वस्तू नाही मिळाली. पण तूला आवडली म्हणून कुणी तूला फुकट देवू केली तर घेशील तू? "
" छे गं. मी नाही घेणार. मी आधी खुप पैसे जमा करणार नी मगच घेणार. "
ती आपले डोके हलवत म्हणाली.
ती आपले डोके हलवत म्हणाली.
" त्यालाच म्हणतात स्वाभिमान "
शकू तिची पापी घेत म्हणाली.
शकू तिची पापी घेत म्हणाली.
कामं आटोपली तशी दोघीं मायलेकी घरी निघाल्या.
अगं मनू.. हे फ्रॉक बघ. माझ्या भाचीचे आहेत . तिला छोटे होतो म्हणून तुझ्यासाठी आणलेत. घेवून जा गं. "
शलाका म्हणाली.
शलाका म्हणाली.
" नाही मॅडम.. माझ्याकडे पैसे आले की घेईन मी. "
ती बाहेर पळाली.
" शकू खुपच मानी आहे गं तुझी लेक. "
शलाका.
शलाका.
" म्हणूनच तर तिचं नाव मानिनी ठेवलंय ना मॅडम मी. आणि असं तिला सगळं फुकट मिळत गेलं तर पैशांचं मोल नाही कळणार तिला. "
शकूच्या चेहऱ्यावर स्वाभिमानाचं तेज झळकत होतं.
मनू.. मानिनी..! मोठया विचाराने शकूने तिचं नाव ठेवलं होतं. नावाप्रमाणेच लेक मानी व्हावी असं तिला वाटायचं. घरात अठराविश्व दारिद्र्य.. त्यात नवऱ्यानं दोन वर्षांपूर्वी अकॅसिडेन्टमध्ये आपला एक पाय गमावला. म्हातारे सासुसासरे.. पण त्याही परिस्थितीत ती ताठ मानेने जगत होती. आणि तेच संस्कार आपल्या चिमण्या मानिनीवर देखील करीत होती.
तिच्या संस्काराच्या बाळकडूने छोटी मनू वाढत होती.. रोजची शाळा , घरी आईला मदत ह्यात तिचा वेळ निघून जाई.
शकूचं म्हणणं एकच… तू शिक खुप मोठी हो.
तिच्या संस्काराच्या बाळकडूने छोटी मनू वाढत होती.. रोजची शाळा , घरी आईला मदत ह्यात तिचा वेळ निघून जाई.
शकूचं म्हणणं एकच… तू शिक खुप मोठी हो.
" मोठी म्हणजे किती मोठी होवू गं..? "
"एवढी मोठी हो की दुसऱ्यांना तुझ्याकडे बघताना नजर वर करून बघावं लागेल.. "
शकू.
शकू.
मनू पटकन स्टूलवर उभी झाली..
"आई बघ माझ्याकडे..! एवढी मोठी होवू?"
तिने विचारलं.
तिने विचारलं.
" हो… ह्यापेक्षा आणखी उंच हो. फक्त शरीराने नाही तर तुझ्या कर्तृत्वाने मोठी हो. अशी कुणीतरी मोठी हो की मला गर्वाने मान वर करून तुझ्याकडे बघता आले पाहिजे."
तिला स्टूलवरून खाली घेत ती म्हणाली.
.. मनू मोठी होतं होती.. आता तिलाही हळूहळू आईच्या बोलण्याचा अर्थ कळायला लागला होता. शिकून खुप मोठं व्हायचं हे एकच ध्येय तिने पुढे ठेवलं होतं.
इकडे सगळ्यांचे करता करता शकू खंगत चालली होती.मध्येच कधी पोटात कळ दाटून यायची .पोट फुगल्यासारखं दिसायला लागलं.हल्ली अंगावरही जास्त जावू लागलं होतं. वयानुसार होत असेल असं म्हणून ती फारसं लक्ष नाही द्यायची. तसही तिच्याशिवाय घरात करणारे कुणीच नव्हते. एके दिवशी दुखण्याने कहर केला. पाळी पंधरा दिवसांपासून थांबली नव्हती. मनू तिला जबरदस्तीने दवाखान्यात घेवून गेली.डॉक्टरांना थोडा संशय वाटला म्हणून त्यांनी तिचे सॅम्पल लॅबमध्ये पाठवले.
.. आणि त्यांची शंका खरी ठरली. गर्भाशयाच्या कॅन्सरने आत सगळीकडे घेराव करून टाकला होता…
पुढच्या दोन महिन्यातच शकू तिच्या लाडक्या मनूची साथ सोडून निघून गेली.
.. आणि त्यांची शंका खरी ठरली. गर्भाशयाच्या कॅन्सरने आत सगळीकडे घेराव करून टाकला होता…
पुढच्या दोन महिन्यातच शकू तिच्या लाडक्या मनूची साथ सोडून निघून गेली.
… तिसरा दिवस झाला आणि मनू शलकाच्या दारात उभी राहिली.
" मनू..? तू का आलीहेस? "
शलाका.
शलाका.
" मॅडम.. आता आई नाहीये तर मी येईल तिच्याजागेवर कामाला. "
" तूला जमेल का पण..? "
न जमायला काय झालं? "आईसोबत यायचे तेव्हा करायचे कधी मदत तिला. " डोळे पुसत ती म्हणाली.
" अगं पण थांबली असती ना काही दिवस. तीनच दिवस झालेत शकूला जावून. "
तिच्या पाठीवर हात फिरवत शलाका म्हणाली.
तिच्या पाठीवर हात फिरवत शलाका म्हणाली.
" सगळी सोंग आणता येतील पण पैशांचं सोंग नाही ना आणू शकत मॅडम..! मी लागते कामाला. "
आत जावून तिने किचनचा ताबा घेतला.
आत जावून तिने किचनचा ताबा घेतला.
प्रत्येक क्षणाला आई डोळ्यापुढे दिसत होती. अश्रुंना थोपवत कसेबसे तिने कामं पूर्ण केली. फार मोठी नव्हतीच ती. नुकतेच चवदावे वर्ष लागले होते.. ह्या वयात आईची जास्त गरज होती तिला. पण तीच निघून गेली. शलाकाला तिच्या मनाची जाणीव होत नव्हती असं नव्हे पण तिचा करारी स्वभाव माहिती होता तिला. त्यामुळं पैश्यांची मदत करायला कचरायची ती. मात्र तिला कामं करताना मदतीला असायची अधेमध्ये.
हळूहळू वर्ष सरलं.
" मनू.. अगं एक्झाम फॉर्म भरायचा आज शेवटचा दिवस आहे ना. भरला की नाही तू.? "
निशांत तिला विचारत होता. दोन वर्षांनी मोठा होता तरी लहानपणापासून चांगली गट्टी होती दोघांची.
तिने नकारार्थी मान हलवली. आलेले सर्व पैसे घरखर्चात जात होते. एक्झामफॉर्म भरायला काहीच उरले नाही तिच्याकडे.
" हे घे पैसे नी जा भर फार्म "
तो म्हणाला.
" नाही निशू नको. पुढल्या वर्षी भरेन. " ती म्हणाली.
" वेडी आहेस का मनू तु? थोड्याशा रकमेसाठी तु दहावीचं वर्ष वाया घालवणार. घे हे. आणि समज की तूला असेच नाही दिले.शकूकाकूने म्हटल्याप्रमाणे जेव्हा तु कोणीतरी खुप मोठी होशील ना तेव्हा व्याजासह परत देशील मला. "
तिने नकारार्थी मान हलवली. आलेले सर्व पैसे घरखर्चात जात होते. एक्झामफॉर्म भरायला काहीच उरले नाही तिच्याकडे.
" हे घे पैसे नी जा भर फार्म "
तो म्हणाला.
" नाही निशू नको. पुढल्या वर्षी भरेन. " ती म्हणाली.
" वेडी आहेस का मनू तु? थोड्याशा रकमेसाठी तु दहावीचं वर्ष वाया घालवणार. घे हे. आणि समज की तूला असेच नाही दिले.शकूकाकूने म्हटल्याप्रमाणे जेव्हा तु कोणीतरी खुप मोठी होशील ना तेव्हा व्याजासह परत देशील मला. "
तिच्या हातात पैसे कोंबत तो म्हणला. डोळे पुसत अक्षरशः ती शाळेकडे धावतच निघाली…
दहावीत टॉप केलं तिने शाळेतून. तेव्हा कोण आनंद झाला होता. सायन्स घेवून पुढे डॉक्टर व्हावे असं खुप यायचं मनात.. पण पुन्हा प्रश्न पैश्यांजवळ येऊन थांबायचा.
निशांत तेवढा हुशार नव्हता पण पेमेंट सिटवर त्यानं मेडिकलला ऍडमिशन घेतली होती. मुलगा डॉक्टर होतोय याचा शलाकाला खुप अभिमान होता.आणि इकडे पुढे काय करायचं हा एकच प्रश्न मनूला रात्रंदिवस छळत असायचा .
निशांत तेवढा हुशार नव्हता पण पेमेंट सिटवर त्यानं मेडिकलला ऍडमिशन घेतली होती. मुलगा डॉक्टर होतोय याचा शलाकाला खुप अभिमान होता.आणि इकडे पुढे काय करायचं हा एकच प्रश्न मनूला रात्रंदिवस छळत असायचा .
निशू सुट्यामध्ये घरी आला होता. तो डॉक्टर होणार नी आपण काहीच नाही याची एक खंत सतत मनात सलत राहायची.
" मनू डोळे मीट ना. मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले आहे. "
तो किचनमध्ये येत म्हणाला.
" मला नकोय कसलं गिफ्ट. "
ती मागे सरत म्हणाली.
" का नको? परवा तुझा वाढदिवस होता ना त्याचं गिफ्ट आहे हे. शकूनी दिलं असतं तर नाही म्हंटलं असतंस का? आणि तसेही या गिफ्टबद्दल मीच सुचवलं निशूला. आता मीट बघू डोळे. "
तो किचनमध्ये येत म्हणाला.
" मला नकोय कसलं गिफ्ट. "
ती मागे सरत म्हणाली.
" का नको? परवा तुझा वाढदिवस होता ना त्याचं गिफ्ट आहे हे. शकूनी दिलं असतं तर नाही म्हंटलं असतंस का? आणि तसेही या गिफ्टबद्दल मीच सुचवलं निशूला. आता मीट बघू डोळे. "
शलाका तिला प्रेमाने दरडावत म्हणाली.
तिने ते गिफ्ट उघडून बघितले… प्रशासकीय सेवेसाठी असणारी काही पुस्तकं होती त्यात आणि सोबत एक माहितीपत्रक देखील.
" थँक यू मॅडम.. " शलाकाला मिठी मारत ती म्हणाली.
"थँक्स निशू मला योग्य मार्ग दाखवल्याबद्दल. "
निशांत हसून बाहेर गेला.
आता मनूच्या डोक्यात एकच ध्येय होत… प्रशासकीय सेवेचं.
बारावीनंतर तिने सरळ आर्टसला प्रवेश घेतला. दिवसा कॉलेज.. शलाकाकडची कामं आणि घरातील सगळं सांभाळून जोमाने अभ्यासाला भिडली. तिचे वडील घरबसल्या जमेल तशी तिला मदत करत होते. आजोबा वारले. आजी तर खाटेवरचीच झाली होती. कोणतेही क्लासेस न लावता स्वबळावर तीन वर्ष मेहनत घेवून तिने mpsc ची प्री एक्झाम दिली. आणि तिला विश्वास नसतांना ती चांगल्या गुणांनी पास झाली. मेहनतीचं चीज झालं होतं… ह्या रिजल्टने तिचा आत्मविश्वास दुणावला. आणखी जास्त जोमाने अभ्यास करून तिने mains क्रॅक केली तेव्हा तर वडील एका पायावर नाचायला लागले. इंटरव्हिव्ह बऱ्यापैकी पार पडला… आणि काही दिवसातच टीव्ही वर न्युज झळकली..
"एक घरकाम करणारी मुलगी बनलीय डिप्युटी कलेक्टर.."
" मानिनी मॅडम कसं वाटतंय तुम्हाला..? "
न्यूज चॅनलवाले तिला विचारत होते.
ती हसली.
" मानिनी मॅडम कसं वाटतंय तुम्हाला..? "
न्यूज चॅनलवाले तिला विचारत होते.
ती हसली.
" मुळात घरकाम करणारी मुलगी.. जी न्युजच चुकीची आहे. कारण काम हे काम असतं. मी जर हे काम केले नसते तर खाल्लं काय असतं. कोणतेही काम लहान नाही. हां पण त्याजोडीला आपली ध्येय मोठी असू दया. "
" एक शेवटचा प्रश्न… तुमच्या यशाचे श्रेय कुणाला द्याल..? "
" परिसाला..! "
ती हसून म्हणाली.
सगळे आश्चर्याने पाहत होते.
सगळे आश्चर्याने पाहत होते.
" एक स्वप्न.. आईने पहायला शिकवलं. मोठं ध्येय ठेवण्याचं. आई हिच माझा परिस. तिच्या त्या परिसस्पर्शाने मी ध्येयवादी बनले.
आणि निशू.. शलाका मॅडम.. ह्यांनी मला योग्य वाट दाखवली. तेही आहेतच माझ्या आयुष्यातले मार्गदर्शक... आईनंतररचे. "
आणि निशू.. शलाका मॅडम.. ह्यांनी मला योग्य वाट दाखवली. तेही आहेतच माझ्या आयुष्यातले मार्गदर्शक... आईनंतररचे. "
तिने धावत जावून शलाकाला मिठी मारली.
"अरे मी देखील आहे बाजूलाच. आणि माझं व्याजासह देणं ही आहे बाकी तुझ्यावर. "
निशांत म्हणाला.
" थँक्स निशू. तुझ्यामुळेच सर्व शक्य झालं. सांग ना किती व्याज झाले तुझे. तु जे म्हणशील ते देईन मी. "
त्याला हग करत ती म्हणाली.
त्याला हग करत ती म्हणाली.
"बघ हां. दिलेला शब्द फिरवू नकोस."
तो.
" नाही रे बोल तर. "
" माझ्या हास्पिटलचं इनोग्रेशन तुझ्या हस्ते करायचंय मला. कुठेही व्यस्त असलात तरी यावं लागेल. काय डेप्युटी कलेक्टर मॅडम आत्ताच अपॉइंटमेंट घेवून ठेवतोय.. "
तो हसत म्हणाला.
तिनेही हसून प्रॉमिस केले त्याला.
आजी आणि बाबा तिचा कौतुकसोहळा भरल्या डोळ्यांनी मनात साठवत होते..
त्यांना घेवून ती लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसली.
त्यांना घेवून ती लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसली.
बाजूच्याच सिटवरून शकू आपल्या परिसस्पर्शाची उधळण करत आहे असा भास झाला मनूला…
त्या परिसस्पर्शाने तिच्या आयुष्याचे सोने झाले होते.
********समाप्त *********
कशी वाटली ही छोटीशी कथा? सांगा मला. आवडली तर एक लाईक आणि कमेंट नक्की करा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा