पारिजात… गंध प्रेमाचा..!
( मागील भागात आपण वाचलीत रावीच्या करिअर मधील एक गुंतागुंतीची केस आणि त्यातून आई आणि बाळाला वाचवण्यात ती यशस्वी होते. साठे सर तिला आपल्या भूतकाळातील घटना नमूद करतात. विराज हा सरांचा भाचा असल्याचे तिला कळते. दोघांचे नाते पूर्ववत करण्यात ती यशस्वी होईल का…? वाचा या भागात. )
**********
" मॅडम. या बाळाचं नाव तुम्हीच सुचवा. तुमची आठवण आयुष्यभर राहील आमच्या सोबतीला."
बाळाला तिच्या समोर धरत ती म्हणाली.
रावीनं त्या बाळाला पाहिलं आणि पुन्हा मनात साठे सरांची चिमणी रावी तिला आठवली.
" विराज! "
तिच्या मुखातून एकदमच बाहेर पडलं.
तिच्या मुखातून एकदमच बाहेर पडलं.
" छान नाव सुचवलं मॅडम तुम्ही. हेच नाव ठेवणार आम्ही. "
बाळाची आजी म्हणाली.
बाळाची आजी म्हणाली.
" विराज, तूला भेटायला हवं. एनी हाऊ ! "
रावीच्या मनात चालू होतं.
रावीच्या मनात चालू होतं.
" पण भेटल्यावर बोलू काय? कसं समजावू त्याला साठे सर गुन्हेगार नाहीत त्याचे म्हणून ? "
मनाचा सगळा गोंधळ उडत होता.
हा गोंधळ निस्तरायला एकच व्यक्ती तिला मदत करू शकणार होती…
तिने लगेच नंबर डायल केला.
.
.
" हॅलो s "
हा गोंधळ निस्तरायला एकच व्यक्ती तिला मदत करू शकणार होती…
तिने लगेच नंबर डायल केला.
.
.
" हॅलो s "
" बच्चा?? ह्या वेळी ? सगळं काही ठीक आहे ना?"
" मॉम आधी मला सांग तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना?"
" बेटू s? हे विचारायला रात्रीचे तीन वाजता मला कॉल केलाहेस? "
आळसावलेल्या आवाजात सुमतीने विचारलं.
आळसावलेल्या आवाजात सुमतीने विचारलं.
" प्लीज टेल ना मॉम. आर यू माय बेस्ट फ्रेंड ऑर नॉट ? "
" तुझ्यासारखी बेस्टी असल्यावर मी असेलच ना तुझी बीबीएफ. बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर!
सांग आता कसला प्रॉब्लेम झालाय ? "
सांग आता कसला प्रॉब्लेम झालाय ? "
ती बेडवर उठून बसत म्हणाली.
" मॉम s "
स्वर रडवेला झाला रावीचा.
स्वर रडवेला झाला रावीचा.
ती पेशंट हॉस्पिटलला आल्यापासून ते आत्तापर्यंतचा सगळा वृत्तांत तिने सांगितला सुमतीला.
" मॉम बघ ना, vएवढी क्रिटिकल केस सॉल्व केली पण साधं सेलेब्रेट नाही करता आलं मला. केवढा घोळ होऊन बसलाय विराज आणि साठे सरांच्या आयुष्यात ? "
ती अजूनही रडतच होती.
" बच्चा , नेमकं रडू कशाचं येतंय तूला? सेलेब्रेट करू शकत नाहीयेस याचं की तूझ्या लाडक्या सरांच्या आयुष्यातील दुःखाचं ? "
-सुमती.
" आय डोण्ट नो मॉम. बट आय थिंक सरांसोबत खुप वाईट घडलंय. विराजला त्याची चूक उमगायला हवी ना गं? "
-रावी.
-रावी.
सुमती हसली थोडीशी.
"यू नो रावी तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्याजवळच आहे. विराज फ्रेंड बनलाय ना तुझा? मग त्याच्याशी बोलून बघ ना. एक डॉक्टर आहेस तू. जे तूझ्या साठे सरांना जमलं नाही ते करून दाखवलंस आज. त्याचाच संदर्भ देऊन बघ त्याला. जेव्हा विराजच्या मनातील क्लेश दूर होतील ना साठ्यांबद्दल, तेव्हा तो खरा क्षण असेल सेलेब्रेशनचा.
माणसांची मने तुटणे केव्हाही वाईटच गं . आणि परत जोडणे त्याहून अवघड.पण जेव्हा तू हे तुटलेली मने एकत्र आणशील ना तो क्षण जास्त महत्वाचा असेल तुझ्यासाठी. "
सुमती म्हणाली.
माणसांची मने तुटणे केव्हाही वाईटच गं . आणि परत जोडणे त्याहून अवघड.पण जेव्हा तू हे तुटलेली मने एकत्र आणशील ना तो क्षण जास्त महत्वाचा असेल तुझ्यासाठी. "
सुमती म्हणाली.
रावीची कळी खुलली एकदाची.
" मॉम यू आर सोल्युशन ऑन माय एव्हरी प्रॉब्लेम असं म्हणते मी नेहमी ते काही खोटं नाहीये. कसा अगदी चुटकीसरशी प्रॉब्लेम सोडवला तू माझा.आता बघच तु कशी त्या मोटूला वठणीवर आणते ते. थँक यू सोss मच मम्मा ! लव्ह यू. गुड नाईट ! "
रावीचा मूड आता बराच निवळला होता. झोप उडाली होती पण प्लॅन रेडी होता.
" रावी म्हणजे ना अगदी गोडुली आहे माझी . तिच्या प्रयत्नांना यश येवू दे.विराज आणि तिच्या साठे सरांचे सगळे गैरसमज दूर होवू दे."
सुमतीने मनोमन देवाला हात जोडले.
.
.
.
.
.
मॉर्निंग राऊंड आटोपल्या आटोपल्या रावी हॉस्पिटलमधून सटकायच्या विचारात होती. त्यापूर्वी रात्रीच्या पेशंटला परत एक व्हिजिट दिली. पेशंट बऱ्यापैकी सेटल झाली होती आता.
"पिल्लू झोपलाय का? "
बाळाकडे बघून तिने विचारले.
" हो. झोपलंय आत्ता. ये विरू ss उठ. मॅडम आल्यात भेटायला. "
बाळाला हलकेच हलवत आजी म्हणाली.
बाळाला हलकेच हलवत आजी म्हणाली.
" विरू ? नाव पण ठेवलंत का? "
रावी हसून म्हणाली.
रावी हसून म्हणाली.
" तुम्हीच तर सुचवलंत मॅडम काल विराज हे नाव. "
आजी.
आजी.
रावी बघतच राहिली.
" मी सुचवलं नाव ? ते पण विराज?
गॉड! हा मुलगा डोक्यात जातोय माझ्या. भेटायलाच हवं आता."
आजीला एक स्माईल देवून ती रूमबाहेर आली.
" हॅलो ss
पुढील अर्ध्या तासात तु मला हवा आहेस. सांग ना कुठे भेटशील?"
पुढील अर्ध्या तासात तु मला हवा आहेस. सांग ना कुठे भेटशील?"
" काय मुलगी आहे यार. ना हाय ना हॅलो डायरेक्ट भेटायला बोलवतेय.."
विराज मनात म्हणाला.
" तु म्हणशील तिथे. "
तो.
तो.
" कॉफी सेंटरला. पण एक मिनिटही उशीर नकोय मला."
तिने कॉल कट केला.
" अचानक काय झालं हिला ? काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला ? माझ्यावर चिडलीये असं का वाटतंय मला? "
तयार होत तो स्वतःशीच बोलत होता.
तयार होत तो स्वतःशीच बोलत होता.
बरोबर अर्ध्या तासात विराज कॉफी सेंटरला पोहचला. तर मॅडम आधीच हजर होत्या. प्राब्लेम नक्कीच मोठा आहे हे लक्षात यायला वेळ नाही लागला त्याला.
"गूड मॉर्निंग..!"
शक्य तेवढ्या हसऱ्या चेहऱ्याने तो म्हणाला.
उत्तरादाखल तिनं केवळ एक स्मित केलं.
उत्तरादाखल तिनं केवळ एक स्मित केलं.
" काय झालंय पार्टनर? सगळं ठीक आहे ना? आँटीचा काही प्रॉब्लेम आहे काय? "
पुढ्यातील कॉफी हातात घेत तो.
"आँटी? म्हणजे माझी मॉम? रिअली तुला असं वाटतं का मी असतांना काही प्रॉब्लेम होईल तिला?"
तिचा चिडका स्वर अजूनही तसाच होता.
मग सांग ना काय झाले? काय चिडचिड होतेय तुझी? मला काळजी वाटतेय यार."
त्याच्या चेहऱ्यावर काळजी पसरायला लागली होती.
आपण जरा जास्तच रिऍक्ट होतोय की काय असं वाटलं तिला.
" विराज थोडं बोलायचं होतं रे. "
खालच्या स्वरात ती सांगायला लागली.
खालच्या स्वरात ती सांगायला लागली.
".. काल रात्री एक खूप कॉम्प्लिकेटेड केस आलेली हॉस्पिटलला. प्रेग्नन्सीच्या सुरुवातीपासूनच बाळाची वळ खाली होती. युज्युअली प्रेग्नन्सीचा पिरेड वाढत गेला की ती वळ आपोआप वर जाते. पण काही पेशंटमध्येना नाही होत असं. तेव्हा खूप जपावं लागतं. कधीही अचानक ब्लीडींग सुरु होवू शकते. आणि कधी कधी ती एवढी जास्त असते की बाळ आणि आई दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होवू शकतो. कालची पेशंट पण अशीच होती रे.. रक्ताच्या सड्यात पडलेली."
बोलता बोलता थांबली ती.
कालच्या विचारानेच शहारा आला तिच्या अंगावर.
" मग काय झालं पार्टनर ? ती ठीक आहे ना आता? "
त्याच्या डोळ्यात काळजीचं काहूर दाटलं.
"... साठे सर, माझे मेंटार. ते नव्हते तेव्हा हॉस्पिटलला. मी तातडीने सीझर करायचं ठरवलं.इतके दिवस सरांना असिस्ट करायचे मी. काल पहिल्यांदा पूर्ण प्रोसिजर स्वतः केली. ती सुद्धा एवढी क्रिटिकल.
मनात भीती होती रे खूप. होईल ना सगळं नीट? याचंच दडपण होतं. पण त्या भीतीला डोक्यापर्यंत पोहचायला वेळच मिळाला नाही. डोक्यात एकच होतं मी माझ्या कर्तव्यावर आहे नी मला ते चोख बजावायचे. बस्स! "
मनात भीती होती रे खूप. होईल ना सगळं नीट? याचंच दडपण होतं. पण त्या भीतीला डोक्यापर्यंत पोहचायला वेळच मिळाला नाही. डोक्यात एकच होतं मी माझ्या कर्तव्यावर आहे नी मला ते चोख बजावायचे. बस्स! "
".. पुढे काय झालं ?"
त्याचं कान अधीर झाले होते ऐकायला.
" तिच्या उदरातून जेव्हा बाळ बाहेर काढलं आणि ते रडलं ना.. तेव्हा अर्धी लढाई जिंकल्याचा विश्वास आला मला."
तिच्या डोळ्यातून एक थेंब खाली निथळला.
" रावी… ती पेशंट? तिचे काय झाले.? "
तिच्या हातावर हात ठेवून त्यानं विचारलं.
" ती बरी आहे आता. रात्रीपासून ब्लड लावलं आहे तिला.नाऊ शी इज बेटर.!"
" थॅंक गॉड! "
त्यानं सुटकेचा निःश्वास टाकला.
" डॉक्टर रावी, यू आर रिअली ग्रेट! हॅट्स ऑफ टू यू!"
आता त्याचाही डोळ्यात पाणी होतं.
आता त्याचाही डोळ्यात पाणी होतं.
" विराज , ती पेशंट आमच्या हॉस्पिटलला पहिल्यांदा आलेली होती तरी तिच्यावर ट्रीटमेंट केली आम्ही. पण हे सर्व करतांना जर तिला आणि तिच्या बाळाला काही झालं असतं तर मी चुकीची होते असं वाटलं असतं काय रे सर्वांना? "
" वेडी आहेस का गं तू? उलट तुझा निर्णय तर स्तुत्य होता.
जर तिला काही झालं असतं तर ते तिचं नशीब असतं. पण रावी डॉक्टर म्हणून तू चुकीची नव्हतीस मुळात."
जर तिला काही झालं असतं तर ते तिचं नशीब असतं. पण रावी डॉक्टर म्हणून तू चुकीची नव्हतीस मुळात."
तिच्या हातावर एक आपुलकीचा दाब देत तो म्हणाला.
" खरंच तुला असं वाटतं विराज? "
डोळे पुसत तिनं विचारलं.
" अगदी शंभर टक्के. तू तर तुझं पूर्ण योगदान दिलेस ना."
तो.
तो.
" थॅंक यू विराज. तूझ्या शब्दांनी खूप रिलॅक्स वाटत आहे बघ मला!
कॉफी? "
कॉफी? "
हातात मग घेत ती म्हणाली.
"तुला माहितीय काही वेळाने साठे सर आले तिथे. मला रडताना बघून त्यांनी धीर दिला मला. पण नंतर स्वतःच खूप हळवे झाले रे ते. हॉस्पिटलमध्ये सर्व त्यांना काटेरी फणस म्हणतात. बट ही इज नॉट लाईक द्याट. इनफॅक्ट ही इज क्वाएट सॉफ्ट हार्टेड पर्सन."
त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली.
" हम्म ! "
तो उदगारला.
तो उदगारला.
" तुला माहित नाही पण त्यांच्या आयुष्यात देखील अशीच एक घटना घडलीये. बावीस वर्षांपूर्वी. सेम हीच सिच्युएशन..! पण दुर्दैवाने त्यांच्या केस मधल्या पेशंटला खूप ब्लड लॉस झाला होता
शिवाय रेअर ब्लड ग्रुप मुळे ब्लड अरेंज व्हायला वेळ लागला.
बाळ आणि आई दोघांनाही नाही वाचवू शकले ते. "
शिवाय रेअर ब्लड ग्रुप मुळे ब्लड अरेंज व्हायला वेळ लागला.
बाळ आणि आई दोघांनाही नाही वाचवू शकले ते. "
तिची नजर आताही त्याच्यावर खिळली होती.
त्यानं आपले डोळे मिटून घेतले.
"... त्या घटनेचा गिल्ट आजही त्यांच्या मनात आहे. इतक्या वर्षानंतरसुद्धा. याचा अर्थ असा होतो का रे की ते चुकले असतील?"
कॉफीचा घोट घेत तिनं प्रश्न केला.
" त्यांची वकिली करते आहेस तू ? "
तो म्हणाला.
तो म्हणाला.
त्याच्या मिटल्या डोळ्यातून आसवांचे थेंब खाली सरकू लागले होते.
" छे रे ! मी जस्ट विचारतेय तुला.
कालच्या पेशंटला मी पहिल्यांदा भेटले होते तरी ती आऊट ऑफ डेंजर होईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता.
सरांची पेशंट त्यांची सख्खी बहीण होती. त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल ना?
आपल्या बहिणीला असं आपल्या डोळ्यांसमोर शेवटचा श्वास घेतांना बघून त्यांची काय अवस्था झाली असेल रे ? "
ती पुढे बोलत होती.
कालच्या पेशंटला मी पहिल्यांदा भेटले होते तरी ती आऊट ऑफ डेंजर होईपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता.
सरांची पेशंट त्यांची सख्खी बहीण होती. त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल ना?
आपल्या बहिणीला असं आपल्या डोळ्यांसमोर शेवटचा श्वास घेतांना बघून त्यांची काय अवस्था झाली असेल रे ? "
ती पुढे बोलत होती.
" स्टॉप इट रावी. यू आर टॉकिंग अबाऊट माय मॉम. मला नाही ऐकायचंय काहीच."
तिला मध्येच थांबवत तो म्हणाला.
" आय एम टॉकिंग अबाऊट डॉक्टर साठे , विराज.
ज्यांनी मला शिकवलं पेशंटला ट्रीट करण्यापूर्वी त्यांच्या वेदना फील करायला. कालचा पेशंट ट्रीट करतांना एका क्षणासाठी मी स्वतःला तिच्या ठिकाणी ठेवून पाहिले आणि ती काय सफर करत असेल त्या वेळी याचा अंदाज आला मला.
ज्यांनी मला शिकवलं पेशंटला ट्रीट करण्यापूर्वी त्यांच्या वेदना फील करायला. कालचा पेशंट ट्रीट करतांना एका क्षणासाठी मी स्वतःला तिच्या ठिकाणी ठेवून पाहिले आणि ती काय सफर करत असेल त्या वेळी याचा अंदाज आला मला.
आपल्या बहिणीला त्या अवस्थेत बघून त्यांनीही तेच फील केलं असेल रे.
सांग ना मला ? तुला खरंच असं वाटतं की ते चुकीचे असतील तेव्हा? "
सांग ना मला ? तुला खरंच असं वाटतं की ते चुकीचे असतील तेव्हा? "
तिनं अगतिकतेने विचारलं.
" मला काहीच बोलायचं नाहीये यावर. "
तो उठून उभा राहिला.
तो उठून उभा राहिला.
" विराज प्लीज. त्यांना एक चान्स देवून बघ ना. शेवटचा? नं केलेल्या चुकीची शिक्षा का भोगायला लावतोस त्यांना? एक पाऊल समोर टाकून तर बघ.. नंतर ठरव ना पुढचं. "
ती हळवी झाली होती.
ती हळवी झाली होती.
" तुला नाही कळणार माझं दुःख रावी. कारण प्रेमाची उधळण करणारी तुझी मॉम आहे तुझ्याजवळ."
तो.
तो.
" विराज तेच म्हणतेय मी. तू सरांना नाही ओळखलंस पण मला माहितीये खूप प्रेम आहे त्यांचं तुझ्यावर. कदाचित माझ्या मॉमसारखंच..!
एकदा मनातील सारी किल्मिष बाजूला सार आणि पाच वर्षाचा वीर होवून त्या निरागस बालनजरेनं बघ त्यांच्याकडे. तुला त्यांच्यात तुझा आवडता मामा दिसेल."
त्याच्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली, तसा तो ढसाढसा रडायला लागला....
.
.
.
क्रमश :
*************************
करू शकेल का विराज डॉक्टर साठेना माफ...??
वाचा पुढील भागात.
आणि आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
भाग आवडला असल्यास कमेंटसोबत एक लाईक तर नक्कीच करू शकता.. तेवढं कराच. मलाही लिहायला मग हुरूप येतो.
परिसस्पर्श नावाची छोटी लघुकथा लिहिलीय ती वाचून सांगा आवडली की नाही ते .