Feb 25, 2024
प्रेम

पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग - 30

Read Later
पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग - 30
     आपण वाचत आहात एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कथामालिका..

       पारिजात.. गंध प्रेमाचा..!

( मागील भागात आपण वाचले की डॉ. साठे आपल्या भूतकाळातील आठवणीत हरवतात. त्यांना रावीमध्ये सुमतीचेच प्रतिबिंब जाणवत असते. इकडे विराज अमेरिकेला जाण्यासाठी तयार होत असतो. त्यानं हे अजून रावीला सांगितले नसते. हॉस्पिटलमध्ये डॉ. साठे रावीला हे सांगतात आणि तिला त्याला भेटायला जाण्याची परवानगी देतात.
आता पुढे.)

  ***********      " सर, निघू मी? प्लीज नाही म्हणू नका नं? "

त्यांनी हसून मान डोलावली. तसं आनंदाने आपली बॅग घेऊन ती निघाली. दोन पावलं चालल्यावर परत थबकली ती.

        " काय झाले? "
त्यांनी नजरेनेच विचारले.

        " सर , ऍक्च्युअली आय डोन्ट नो युअर ऍड्रेस. "
बोलतांना तिचा चेहरा पिटुकला झाला होता.

त्यांनी तिला पत्ता दिला.

          "थँक यू सर! "
घाईतच म्हणाली ती आणि मग निघाली भरधाव.
त्याच्या ओढीने.

        सरांनी दिलेल्या पत्त्यावर ती पोहचली आणि समोरचं दृश्य पाहून ती स्तब्धच झाली. समोर एक बंगलीवजा टुमदार घर. घरावर कोरलेले नाव. 

    ` पारिजात.´

बाजूला एक छोटेखानी वेगवेगळ्या फुलांनी नटलेला बगीचा आणि त्या जोडीला लक्ष वेधून घेणारा अंगणात डौलाने उभा असलेला पारिजात!
   घराचे नाव,  दारातील प्राजक्त!!

      " मॉमसारखेच साठे सर देखील ह्या चिमण्या फुलाच्या प्रेमात दिसताहेत. "

मनात आलं तिच्या.

       दरवाजा उघडाच होता. ती आत प्रवेशली.स्वयंपाकघरात रेखाकाकू काम करत होती. रावीला बघून ती बाहेर आली.

     " कोण हवंय तुम्हाला? "

रावीकडं निरखून पाहत तिनं विचारलं.

     " विराजला . आहे ना तो घरी ?"
ती .

      " वीर बाबाकडे आलात होय? इथून वर जा. उजव्या बाजूला त्यांची रूम आहे. जा तुम्ही. "

रेखाकाकूंचे बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच ती निघाली होती.

    " वीर बाबा.."

तिला हसूच फुटलं. एवढा मोठा बाप्या झालाय तरी अजून बाबाच राहिलाय.
ती मनात म्हणाली.

     कपडे बॅगेत ठेवतांना हातात रावीच्या लिपस्टिकचे डाग असलेला तोच पांढरा शर्ट आला. शर्टवरचे डाग बघून चेहऱ्यावर हलके स्मित उमटले.

     " मिस गोंधळेकर , तुम्हीही चला हो सोबत अमेरिकेला."

शर्टवरून हात फिरवत त्याने तो घडी करून आत ठेवला.

     खोलीचे दार अर्धवट उघडे होते. त्या अर्ध्या कललेल्या दारातून रावी आत आली.तो आपल्यातच मग्न होता.

   " विराज s "

तिच्या आवाजाने तो फक्त हसला.

    " पार्टनर , आता मला तुझे भासदेखील व्हायला लागलेत यार. "

तो स्वतःलाच म्हणाला.

    " ओय हिरो, खरेच आलीये मी. "

ती त्याच्यासमोर येत म्हणाली. तसा तो भानावर आला.

     " तू कशी म्हणजे कधी आलीस? "

आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

    " तुला काय वाटलं ?  तू सांगणार नाहीस तर कळणार नाही मला? हीच आपली मैत्री ?  ही पार्टनरशिप ? "

ती काहीशी चिडून म्हणाली.

    " अगं, अगं!  चिडू नकोस. सांगणारच होतो मी. "
तिला शांत करण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला.

    " केव्हा ?  तुझं विमान अमेरिकेत लँड झाल्यावर ? "

अजूनही राग होताच.

    " तू पहिले बस इथे "

तिला बसवत तो म्हणाला.

तीही त्याचा हात झिडकारून फणकाऱ्यानं बसली.

      " सरांनी सांगितलं म्हणून मला कळलं तरी. तू तर पार परकंच करून टाकलंस ना?"

तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.

     " अरे !  तसं नाही गं बाई. काल उशीर झाला म्हणून नाही सांगू शकलो. सकाळी उठायला लेट झाला.खरं तर तुला आज सरप्राईज द्यायचे ठरवलं होतं मी. तुझे वर्किंग अवर्स संपेपर्यंत पोहचणारच होतो हॉस्पिटलला. त्या आधीच तू आलीस इथे. "

तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला तोवर डोळ्यातून एक मोती घरंगळत आलाच तिच्या गालावर.

    " ये वेडाबाई तू का रडते आहेस? आता इतक्या ओढीने आलीच आहेस तर तुला लगेच हाकलणार नाहीये मी."

तो मस्करीत म्हणाला.

      " तू कोण रे हाकलणारा? मी माझ्या सरांच्या घरी आले आहे. "

बिछान्यावरची उशी त्याला फेकून मारत ती म्हणाली.

    " हो का? "

त्याचं चिडवणं अजूनही सुरूच होतं.

तिच्या डोळ्यातल्या  सरीसोबत  नाकातूनही पाणी यायला लागले होते. ते बघून त्याला हसू आवरेना.

    " तुझ्या नाकाडोळ्यातल्या पाण्यानं पूर येईल बहुतेक इथे.थांब हा मी एखादी बादली घेऊन येतो. "
म्हणत तो उठला.

तिनं लांब श्वास घेऊन नाकातील पाणी आत ओढलं.

    " किती दुष्ट आहेस तू विराज? मी इकडे इमोशनल होतेय नी तुला मस्करी सुचतेय ना? आता बोलवलस ना तरी कध्धी कध्धी येणार नाही मी. "

ती रागाने तिथून जायला निघाली.

    " ये पार्टनर! असं कुठे असतं गं. तुझा मूड फ्रेश व्हावा म्हणून मस्करी करत होतो ना? "

तिच्या हाताला पकडून तिला थांबवत तो म्हणाला.


    " हां तर मीदेखील किचनमध्येच जातेय पाणी प्यायला. रडून रडून सगळं पाणी आटलंय शरीरातलं माझ्या आणि तू तर आल्यापासून साधं चहा , पाणी.. काही विचारलस सुद्धा नाही."

ती आपली भुवई उंचावून म्हणाली.

    " अरे! एक्सट्रीमली सॉरी यार. माझ्या डोक्यातच नाही आलं ते. मी लगेच घेऊन येतो हं. "

तो स्वतःच्याच डोक्याला टपली मारत म्हणाला आणि खोलीबाहेर जायला निघाला.

   " वीर बाबा हे चहा आणि पाणी आणलंय. तुमच्याकडे कोणीतरी मॅडम आल्यात ना? "
रेखाकाकू त्याला दारातच भेटली.

    " थँक यू गं काकू. मी तेच घ्यायला येतं होतो. "

तिच्या हातातील ट्रे घेत तो म्हणाला.

     " बरं बाबा. मी निघते आता. सात वाजता येईन परत. "

ती निघून गेली. तो चहाचा ट्रे घेऊन रावीजवळ आला.

    " घ्या मॅडम पाणी , चहा , बिस्कीटं.. हवं ते घ्या आता. "
तिच्यासमोर उभा राहत तो म्हणाला.

  " थँक यू हं वीर बाबा ! "
पाण्याचा ग्लास उचलत ती त्याला चिडवत होती .

   " ये काय गं? मी लहान असतांना पासून रेखाकाकू काम करते इथे. तिच्या तोंडात वीर बाबाच येतं त्याला मी काय करू यार? "
तो म्हणाला.

   " जाऊ नकोस ना यार तू. "

त्याच्या डोळ्यात बघत ती म्हणाली.

   " अरे? जावं तर लागेलच ना? "

तिची ती नजर टाळत तो म्हणाला. पण तिचे ते आर्जव मनात घर करत होते.

   " विसरशील ना मला तिथे गेल्यावर? "

पुन्हा तिच्या डोळ्यात अश्रू जमा व्हायला लागले.


    " काही काय गं छोट्या मुलांसारखी बोलतेस? "

तो हसत म्हणाला. ओठांवर हसू होतं त्याच्या पण तिच्या अशा बोलण्याने त्यालाही रडायला येत होतं.

     " मे आय हग यू? "
तिनं अनपेक्षितपणे त्याला विचारलं.

आणि त्याच्या उत्तराची वाट न बघताच तिनं त्याला मिठी मारली.  आतापर्यंत हळुवार ओघळणाऱ्या सरी आता चांगल्याच बरसू लागल्या होत्या.  तिच्या ह्या अनपेक्षित मिठीने तो स्तब्ध झाला. नंतर हळुवार तिच्या पाठीवरून त्यानं हात फिरवला.

    " पार्टनर अशी वेड्यासारखी का रडतेस सारखी सारखी? आणि ह्या तुझ्या छोटुशा डोक्यात काय काय विचार भरून ठेवतेस तू? "

त्यानं तिचा चेहरा ओंजळीत पकडला.

    " आणि तुला विसरणं कधीतरी शक्य होईल का माझ्यासाठी? तुझं माझ्या आयुष्यात येणं म्हणजे परिसासमान आहे बघ.तुझ्यारूपात मला एवढी चांगली मैत्रीण मिळाली. तुझ्यामुळे इतके वर्ष मी गमावलेला माझा मामा मला परत मिळाला.तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहेस ,  ते शब्दात नाही सांगू शकत गं मी.  बट स्टील आय निड यू. "

तिच्या डोळ्यात बघत त्याचं मनात चाललं होतं.


      " खरंच रे किती वेड्यासारखी वागत आहे मी?  तुला माहीत नाही जेव्हा मी मॉमला सोडून इकडे यायला निघते ना ती अशीच रडत असते. तेव्हा मी किती वैतागत होते  आणि आज मीच तिच्यासारखी वागतेय.  का असं होतंय मलाच कळत नाहीये. "

आपले डोळे पुसत किंचितशी हसत ती म्हणाली.

     " आपल्या जवळची माणसं दूर जायला निघाली की येतंच असं भरून. "

सरांचा आवाज ऐकून ती वळली.

    " सर तुम्ही कधी आलात? "
तिनं आश्चर्याने विचारलं.

     " हे काय दहा मिनिटांपूर्वीच आलोय. "

हातात कॉफीचा मग घेऊन तिथेच बाजूला बसत ते बोलले.


   "  किती वाजलेत?  "

तिनं भिंतीवरच्या घड्याळाकडे नजर टाकली.

    " बापरे!  सहा वाजत आलेत.  विराज निघते मी. "
आपली बॅग उचलत ती म्हणाली.

   " नको जाऊस. थांब ना."

त्याच्या मुखातून आपसूकच बाहेर पडलं.

    तिनं बघितलं त्याच्याकडे.  त्याच्या त्या नजरेतील भाव. अगदी हृदयात घट्ट जाऊन बसले.  त्या नजरेत जणू अडकलीच ती.  दोघांच्याही मनात चाललेली कालवाकालव डोळ्यात स्पष्ट दिसत होती. मनात तर खूप काही होतं पण दोघांच्याही ओठांवर येत नव्हतं.

     " हो अगं रावी.  थांबच तू. आपण मिळून मस्तपैकी डिनर प्लॅन करूया. "

दोन मिनिटांपासून एकमेकांच्या नजरेत हरवलेल्या दोघांना भानावर आणत ते म्हणाले.

   " हं..?  चालेल.  "

तंद्रीतून बाहेर येत तिनं मान डोलावली.

       तिघांनी मिळून मग व्हेज पुलाव , पापड , लोणचं, दही असा बेत जमवला.  तोवर रेखाकाकू आली.  तिने पुरी आणि बटाट्याची भाजी केली .
स्वयंपाक आणि त्यानंतर हसतखेळत झालेले जेवण.. नऊ कसे वाजलेत कोणाच्या ध्यानातच आलं नाही.

     " सर मी खरंच निघते आता. इट्स टू लेट नाऊ! "

ती उठली जायला.

    " हो जा तू. पण एकटी नको जाऊस. वीर तिला ड्रॉप कर."

अगदी विराजच्या मनातलंच बोलले ते.

     " मी जाईन  ना सर. उगाच ह्याला त्रास आणि माझी स्कूटी पण इथेच राहील ना?"

ती म्हणाली.

    " एखाद्यावेळेला असा त्रास चालतो गं. "
ते मिश्किल हसले. 

     " आणि उद्या परस्पर रिक्षाने ये हॉस्पिटलला. मी कुणालातरी तुझी स्कूटी घ्यायला पाठवून देईल. "
ते पुढे म्हणाले.

       त्याने आपली स्विफ्ट सुरु केली.  बाजूला ती बसलेली.
दिवसा हॉस्पिटल , त्यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडे.  मध्येच कितीतरी वेळा ओले झालेले तिचे डोळे.  आता चेहऱ्यावर थोडा थकवा जाणवत होता तिच्या. ती सीटवर मागे डोके रेलून बसली.
       वाऱ्याने उडणारे केस.  खाली झुकलेली नजर.  दोघेही शांत बसले होते.  बोलायचं तर खूप काही होतं.. पण शब्दच उमटत नव्हते.

एफएम वर गाणे वाजत होते.


       " चाहे कुछ ना कहना
         भले चुप तू रहना
         मुझे हैं पता तेरे प्यार का
         खामोश चेहरा
         आखों पे पहरा
         खुद हैं गवाह तेरे प्यार का
         तेरी झुकी नजर
         तेरी हर अदा
          मुझे कह रही हैं ये दासतां 
           कोई शक्स
           हैं जो की इन दिनो
           तेरे जहन - ओ - दिल पें
            हैं छा गया 
           तेरी झुकी नजर
            तेरी हर अदा
          मुझे कह रही हैं ये दासतां…"


… ते गाणं ऐकताना दोघांनाही उगाच आपणच गात आहोत असं वाटत होतं.

          तिचे घर आले तसे त्यानं कार थांबवली. बाय म्हणून ती निघणार तोच त्यानं विचारलं ,

      " उद्या येशील एअरपोर्टवर मला सोडायला..? "

तिने मान डोलावून होकार दिला.

      तो कार सुरु करून जायला निघाला तशी ती सुद्धा आपल्या फ्लॅटकडे वळली.


      " तो विराज होता ना ? "

वर पोहचलेल्या रावीकडे आपली धारदार नजर रोखून श्रुती विचारत होती.

    " हूं. "
थंडपणे रावी उत्तरली.

    " काय झालंय?  तू अशी शांत शांत का आहेस? "  

तिच्याकडे एकटक पाहत श्रुतीने पुन्हा विचारलं.

     " नथिंग . "
-ती.

     "  कॉल का उचलत नव्हतीस आणि तू ?  तुला माहीतीये ऑन्टीने तुला कितीदा कॉल केला ?  माझा नाही किमान त्यांचा तरी कॉल रिसिव्ह करायचा ना.  "

-श्रुती.


     " गॉड !  मोबाईल सायलेंट होता अख्खा दिवस .  "

आपला मोबाईल बाहेर काढत तिने बघितले.

    " मॉमचे इतके सारे मिस्ड कॉल ?  तिच्याशी आधी बोलायला हवं. "

तिने नंबर डायल करून मोबाईल कानाला लावला.
.
.
.
.

क्रमश :


    ***************


कसा वाटतोय हा पारिजात? त्याचा गंध पोहचतोय ना तुमच्यापर्यंत..??
पण मग मला कसं कळणार ना?
त्यासाठी हवाय केवळ तुमचा एक लाईक. तुम्ही लाईक केलंत, कमेंट केली की तेवढीच स्फूर्ती मिळते लिहायला. तर मग जर हा पार्ट आवडला तर लाईक कमेंट करायला विसरू नका. आणि शेअर करावासा वाटला पार्ट तर नावासह जरूर करा.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//