Mar 04, 2024
प्रेम

पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -5

Read Later
पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -5

पारिजात...  गंध प्रेमाचा.. 

आपण वाचत आहात एक भन्नाट प्रेमकथा...  गंधाळलेल्या प्रेमाची.. पारिजातकाच्या सुगन्धासारखी... 

( मागील भागात आपण बघितले रावी आणि सुमतीची फुल्ल टू धम्माल मस्ती..  आणि रात्रीचं हँगओव्हर...  आता पुढे... )


... आज रविवार. दुपारी चारच्या बसने रावी निघणार होती.. मग सकाळच्या नाश्त्यापासून तर दुपारच्या जेवणापर्यंत सगळा रावीच्या आवडीचा मेनू होता. दोघींची धमाल मस्ती सुरूच होती. जेवतानाही तिचे धिंगाणे चालूच होते.


" ये सुमी ss भरवणं गं मला प्लीss ज.. "
क्युटसा चेहरा करत ती म्हणाली.
" परत सुमी..?

नो वे.. मी नाही भरवनार तूला.

आणि काय गं गधडे.., लहान आहेस का भरवायला..? जेव गुमान आपल्या हाताने.. "
आपले मोठे डोळे तिच्यावर रोखत ती म्हणाली.


" हो ss. मी लहानच आहे. तुझा बच्चा आहे ना मी..
मॉ s म , प्लीज भरव ना गं.. ! "
आपले डोळे बारीक करत ती म्हणाली. तिला तसं बघून सुमती ला हसूच आलं.
" अगदी हट्टी आहेस हां.. "
तिला भरवत ती म्हणाली.
" तुझ्याचसारखी... ! आफ्टरआल लेक तुझीच आहे ना.. !! "
तिची गोड पापी घेत ती म्हणाली.

" माझी वेडूली गं.. ! " म्हणत तिने दुसरा घास भरवला..
" आम्ही नाही जा.. " रावीचा फुगा फुगला.
" माझी लाडूली ss गं... ! " ती हसत म्हणाली.
तशी रावी गोड हसली...... बस्स.. ! आणखी दोन तास... मग पुन्हा रावी निघेल परतीला.. आणि आपण राहू ह्या गोड आठवणी आठवत..
ती मनात म्हणाली.

रावीचा परत जाण्याचा दिवस आला की नेहमीच ती अस्वस्थ व्हायची. आताही तिला भरून येत होतं पण तिच्यापुढे आत्तापासूनच नको म्हणून ती स्वतःला सावरत होती...


हां हां म्हणता निघायची वेळ झाली. रावीने घरीच रिक्षा बोलावली होती. ( हल्ली मॉमला लवकरच रडू कोसळतं... मग बस- स्टॉपवर पण ती रडू शकते.. तेव्हा आपल्या इज्जतीचा फालुदा नको व्हायला म्हणून... ! रावी मनात ) .
रावी रूममधून बाहेर आली तशी सुमतीच्या डोळ्यातुन इतका वेळ कंट्रोल केलेले अश्रू बाहेर पडू लागले.


".. अगं मम्मा... !

पुरे अगं.. ! किती हा आसवांचा महापूर... !!

अशाने वाहून जाईल ना मी.. ". तिचे डोळे पुसत ती म्हणाली.


"... नीट राहायचं... , बाहेरचे जास्त खायचं नाही. वेळेवर जेवण करायचं.. तब्येतीची हेळसांड करायची नाही.. रोज सकाळी योगासनं करायची...
राहील ना लक्षात मॉम..? "
रावी बोलत होती..
" हो... " तिला मिठी मारत ती म्हणाली.
" मग येऊ मी आता...? "
- रावी.
" हुं.. ! " - ती.
तिच्या गालावर ओठ टेकवत रावीने मिठी सैल केली आणि जायला वळली.
" एक मिनिट.. रावी.. ! तू काय म्हणत होतीस....?? नीट राहायचं.. वेळेवर जेवण करायचं... बाहेरचे खायचं नाही...
हे तर मी तूला सांगते ना..? मग तू मला का सांगत होती?? "
- सुमती.
" रडण्याच्या ओघात तूला आठवेल की नाही म्हणून... "
- रावी हसत.
" you... ! "
तिला धपाटा घालत ती म्हणाली.
".. मॉम अशी रडत नको ना जाऊस.. ! चार तासांच्या अंतरावर तर आहे मी.. कधीही गरज पडली तर अश्शी पळत येईल मी.. आणि रोज व्हिडीओ कॉलवर बोलतोच ना आपण.. ! "

तिचा चेहरा आपल्या ओंजळीत पकडत रावी म्हणाली.
" हो गं माझे आई.. " तिचे नाक खेचत सुमती म्हणाली.
" माझी गं ममूडी... ! " रावीने परत एकदा घट्ट हग केलं.
रिक्षावाल्याने जोरात हॉर्न दिला.
" मम्मा येते आता... उशिर होईल.. " म्हणत ती निघाली.
"... सांभाळून जा गं. नी नीट राहा.... बाहेरचे जास्त खाऊ नकोस... " - सुमती.
" हो मॉम... पाठ झाले मला ते... ! बा ss य.. " - रावी.
" बा ss य बच्चा.. ! " फ्लयिंग किस देत ती.
.
.
.
... बसमध्येही तिला सुमतीची आठवण येत होती..
" कित्ती भोळी आहे माझी मॉम... आणि कित्ती प्रेमळ... देव करो आणि सर्वांना अशीच मॉम मिळो... "

तिने मनोमन देवाला साकडंही घातलं.


".. पण तो तिचा अनी...?? तो मात्र नक्कीच मूर्ख असेल. ठोंब्या कुठला.. लग्नासाठी आजोबांना साधं पटवू सुद्धा शकला नाही. नक्कीच आता पस्तावत असेल. अनी का बनी मला भेटच तू.. मग चांगला जाबच विचारते तूला.. ! "


ती एकटीच बडबडत होती. अचानक तिने सीटवर बाजूला बसलेल्या आजीकडे बघितलं. आजीही तिच्याचकडे मघापासून बघत होती. रावीनी तिला आपली बत्तीशी दाखवली, आणि खिडकीकडे मान करून गपचूप डोळे मिटून बसली...
.

.

.
... तिचा स्टॉप आला तशी ती उतरली..
"वेलकम बॅक रावी... आपका स्वागत है. इस खुली हवा मे आज खुलके साँस लो क्योंकी कल से तुम्हारी जिंदगी का नया अध्याय शुरु होनेवाला हैं.. ! "
ती परत स्वतःशी बोलायला लागली...
" मॅडम रिक्षा लगेगा क्या ..?? "
रिक्षावाला विचारत होता.. तशी ती भानावर आली.
" कंट्रोल रावी... ! कुठेही कशी सुरु होतेस गं तू..? " - ती मनात.
" हो चला दादा... " तिने त्याला ऍड्रेस सांगितला आणि ते निघाले.. रिक्षातून सहज तिची नजर बाहेर गेली तर... तिने बघितले त्याला...


" कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण कोण..? "

तिला आठवेना.. !

तेवढयात रिक्षाला कट मारून तो निघून गेला... आणि अचानक तिला क्लिक झालं..
" अरे हा तर तोच.. मॉलमध्ये धडकणारा.. "
".. अरे ए... ओयss mr. Xyz... स्टॉप , स्टॉप... " ती ओरडली तसं रिक्षावाल्याने पटकन ब्रेक मारला.
" काय झालं मॅडम..? " त्यानं विचारलं.
" तुझं नाव xyz आहे का..?? मग कशाला थांबवली रिक्षा..?? " ती वैतागून म्हणाली.
" आता चल, त्या बाईकच्या मागे लाग... " - ती.
" कोणत्या...?? " -तो भांबावून..
" अरे ती काय.. " बोलता बोलता ती थांबली. त्या गर्दीत तिला तो दिसलाच नाही..
" आधी सांगितलेल्या पत्त्यावरच चल.. " ती खट्टू होत म्हणाली. त्यानंही गुमान रिक्षा फिरवली. काहीतरी वेगळाच नमुना आहे ही पोरगी.. त्याच्या मनात आलं..
.
.
.

"... वेलकम टू होम रावी.. how r u dear.. I miss u lot.. "
तिला हग करत श्रुतीने विचारलं.
" ड्रॅमेबाज.. ! Im absolutely fine.. आणि एकाच दिवसासाठी गेले होते मी. म्हणे I miss u lot.. "
सोफ्यावर बॅग फेकत ती म्हणाली.

" काय गं घरी भांडून वगैरे आलीस की काय..? मूड ऑफ आहे तो तुझा.. "   - श्रुती काळजीने.
" Shut up यार श्रुती.. तूला भांडखोर वाटते का मी..? " - ती.
श्रुतीने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. ( कारण रावी कित्येकदा भांडतच असते.. )
"काय बघतेस अशी..? जाऊ दे... let me tell u की तो पुन्हा भेटला होता.. " - रावी.
" कोण तो..? " - श्रुती.
" तोच गं.. मॉलमध्ये धडकलेला... " - रावी.
" गेलाच नाही का तो अजूनपर्यंत डोक्यातून तुझ्या.. co incident असेल अगं. सोड ना त्याला.. आणि तशीही कराटे चॅम्पियन आहेस ना तू? नेक्स्ट टाइम भेटेल तर दे एक ठेवून.. " तिला समजावत श्रुती म्हणाली.
तिलाही ते पटलं. मग लगेच मॅडम नार्मल मोड मध्ये आल्या.
" सॉरी यार श्रुss.. I miss u too a lot.. "
तिला हग करीत ती म्हणाली.
" चल नौटंकी.. जेऊया.. भूक लागलीय मला. आणि उद्या फर्स्ट डे आहे तर लवकर निघायचंय.. आहे ना लक्षात..? "
तिला टपली मारत श्रुती म्हणाली...
" हो गं.. n I\"m very exited about that.. ! डॉक्टर साठे सर.. त्यांच्यासोबत शिकायला मिळणार मला. Wow.. ! I\"m so so soooo happy... !! "
एक गिरकी घेत ती म्हणाली...
" चल मग आटपा लवकर.. " - श्रुती.
जेवणं आटोपली. थोडया गप्पा टप्पा पण झाल्या. नंतर दोघीही उदयाच्या गोड स्वप्नात झोपी गेल्या...
.
.
.
.
".... अगं रावी... हळू अगं. आपण वेळेतच पोहचतोय.. जरा तूझ्या ऍक्टिवाच्या वेगावर आवर घाल... " - श्रुती.
" हो गं.. पण पाच मिनिट आधी पोहचलो तर काही बिघडनार आहे का..? "
आपली ऍक्टिवा पळवत रावी.

आज फर्स्ट डे.. दोघींनी लवकर उठून अगदी वेळेत आवरलं होतं. आणि आता त्या ऑन द वे होत्या...
हॉस्पिटलच्या आवरात त्या पोचल्या. श्रुतीला तिची सिनियर दिसली. तशी ती रावीला म्हणाली ,
" मी होते पुढे.. तू गाडी पार्क करून लगेच ये.. अँड ऑल दि बेस्ट... ! "
रावीनेही तिला अंगठा दाखवला आणि ती गाडी पार्क करून वळली..
.
.
.
Dr. A. Y. Sathe. (Gynaecologist ).

केबिनच्या दारावर नेमप्लेट झळकत होती.
टक.. टक..
" मे आय कम इन सर..? "
केबिनच्या दारावर थाप देत एक आवाज आला.
" येस "
एक भारदस्त आवाज आला.
दार लोटून ती आत आली. समोर खुर्चीवर डॉक्टर साठे बसले होते. त्यांचं व्यक्तीमत्व बघून आपोआपच समोरच्यावर एक छाप पडत होती.
" गूड मॉर्निंग सर.. " - ती.
" ओह गुड मॉर्निंग सिस्टर.. "
- डॉक्टर साठे.
" सर राऊंड घ्यायचा वेळ झालाय.. निघायचं..? "
- सिस्टर.
"हां.. निघूया. त्यापूर्वी मला काही अपडेटस हवेत ते दया. आणि आज कुणी स्टुडन्ट जॉईन होणार होते काय..? " - डॉ. साठे.
" हो सर.. एका स्टुडन्टचं जॉइनिंग होतं आज. नाव त्यांचं..
डॉ. रावी..
आणि एक उद्यापासून येत आहेत.. "
ती पेपर बघत म्हणाली.
" आल्या नाहीत त्या..? " - डॉ. साठे.
" नो सर.
सर थांबायचं का त्यांच्यासाठी थोडावेळ..? " - सिस्टर.
" नो. ऑलरेडी सर्जरीमुळे राऊंडला उशीर झालाय. And there is same rules for everyone. Those who are new or old, if u want to work with me then firstly follows disciplines. Ok? Now lets go... "
- डॉ. साठे.
" येस सर.. " - सिस्टर.
दोघे केबिनच्या बाहेर आले.
" सिस्टर सीमा.. जर डॉक्टर रावी आल्या तर त्यांना माझ्या केबिनमध्ये बसायला सांगा.. "
काउंटर सिस्टर ला instructions देऊन डॉक्टर साठे राऊंडला निघाले....
.
.
... गाडी पार्क करून रावी जायचं म्हणून वळली... तर...
तिला पुन्हा तो दिसला...
हो... तोच तो...
तिचा मिस्ट्री मॅन... मिस्टर xyz.... !
" ये ss य... you...
स्टॉप.. स्टॉप. "
पार्किंग मधून तो आपली बाईक काढत होता.
" बरा गावलास रे... ! कोण आहेस कोण तू?? आणि का सारखा माझ्या मागावर असतोस..??
डिटेक्टिव्ह आहेस कोणी...??
एजेन्सी आहे तुझी..??
का कोणी हायर केलंय तूला? सांग पटकन..
माहित नसेल तूला... पण कराटे चॅम्पियन आहे मी. एका फटक्यात असा लोळवेन ना तूला... "
त्याची कॉलर मुठीत पकडून ती बोलत होती.. त्याच्या काळ्याभोर डोळ्यात डोळे घालून...
" excuse me... may I know you...?? "
तिच्या हातातून आपली कॉलर सोडवत तो म्हणाला...
" चांगली नाटकं करतोस रे.. तू तोच आहेस ना परवा मला मॉल मध्ये धडकनारा..
काल बस स्टॉपलाही होतास. आणि आता इथेही..
काय म्हटलं होतं मला I Hate DGO डॉक्टर... ! How dare to say this हां..
आणि तूला कसं माहिती मी dgo करतेय ते..? "
तिने परत त्याची कॉलर पकडली.
" ये येळपट... तू काय करतेस ना त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. Bt I hate dgo डॉक्टर्स, इट्स रिऍलिटी कळलं?


And listen.. this is one free advice for u..
जर तू DGO करत असशील ना तर माझी कॉलर पकडन्याऐवजी स्वतःला सावर.. डॉक्टर साठे is very panctual about time.. जर तू लेट होत असेल तर पळ आधी.. नाहीतर पस्तावशील.. "
तो हसत म्हणाला...
तशी तिची नजर हातातील घड्याळाकडे गेली.
" O my god... पंधरा मिनिटं उशीर झालाय... ! "
त्याची कॉलर सोडून ती पळाली..
" सोडणार नाही तूला... "
पळता पळताच ती म्हणाली.
" गेली ही आता बाराच्या भावात... "
तो तिच्याकडे बघून हसत होता...

.

.

.

.

.                    

                                                                क्रमश :  ... 


        ************************************

कोण आहे हा मिस्ट्री मॅन... 

आणि काय होईल रावीसोबत पुढे... 

कळण्यासाठी वाचा पुढील भाग आणि तोपर्यंत हा भाग कसा वाटला नक्की सांगा.. 

कंमेंट करा..  like करा आणि मला follow करा... ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//