पारिजात.. गंध प्रेमाचा...! भाग -22.

Outing Of Ravi And Viraj.


आपण वाचत आहात हळुवार फुलणारी एक नाजूक प्रेमकथा…


पारिजात… गंध प्रेमाचा..!



( मागच्या भागात आपण वाचलंत सुमीला गरज असतांना अचानक भेटायला आलेली रावी आणि अनुभवली त्यांची ती सुंदर भेट.
काही दिवसांनी हॉस्पिटलला भेटलेला विराज.. आणि त्यांची सुरु झालेली आउटिंग…
आता पुढे..)


       ************


 " कुठे जायचं..?? "
त्यानं विचारलं.

" चल. तूला मी घेऊन जाते.."

त्याच्या हातातील किज घेवून तिनं ड्रायविंग सीटचा ताबा घेतला.

" विराज बस लवकर. "

तिनं हॉर्न दिला.

खांदे उडवत तो आत बसला.

सुसाट वेगानं ती कार पळवत सुटली....

 अगदी सराईतपणे ती कार चालवत होती.

एफएम वर गाणं वाजत होतं..

" दो दिवाने शहर में
रात मे या दोपहर में
आबदाना ढुंढते हैं 
एक आशियाना ढुंढते हैं…"


विराज च्या चेहऱ्यावर नकळत एक हसू आलं…


अर्ध्या तासाने ते शहराच्या बाहेर पडले.. तिनं कार आडवळणाने घेतली.
त्याच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं..
कुठे घेवून जात आहे ही..?
पण विचारायची सोय नव्हती. तो गुमान डोळे मिटून बसून होता..


पंधरा वीस मिनिटांनी तिने ब्रेक मारत कार पार्क केली.



" आलंय आपलं डेस्टिनेशन चला उतरा..! "

त्याला एक फटका देत ती म्हणाली.


तो उतरला.


" अरे यार कुठे घेवून आली ही मला ..?? "

सभोवताल नजर फिरवत तो मनात म्हणाला.


" कुठे आलो गं आपण? "

न राहवून त्यानं विचारलंच.



"पहिल्यांदा आलायेस इथे? "

तिनं त्याच्याकडे अशाप्रकारे पाहून विचारलं की त्यालाच ओशाळल्यागत वाटलं.

ह्यापूर्वी इथे न येणं म्हणजे जणू काही खुप मोठी चूक केली होती त्याने असाच फील आला त्याला.



" समोर बघ.. "

उत्साहाने ती म्हणाली.



" व्हिलेज वॉक "

नावाची एक पाटी झळकत होती दर्शनी भागात.
आणि आत मोकळ्या जागेत छोटया छोटया झोपड्या तयार करून तिथे खुर्च्या टाकलेल्या होत्या..
चहोबाजूनी अस्सल गावठी मेजवानीचा सुगंध दरवळत होता.



"चल तूला फिरवून आणते. "


असं म्हणत ती त्याला आत घेवून गेली.

पलीकडे गेल्यावर मात्र तेथील सौंदर्य पाहून त्याची कळी खुळली.

बाजूला संथ वाहणारी नदी..
उन्हाच्या किरणांनी चमचमणारे चंदेरी पाणी..
कसला कोलाहल नाही की कोणते प्रदूषण नाही.

अगदी निर्मळ वातावरण.. त्या निर्मळ नदीप्रमाणे.


" वॉव..! खरंच किती मस्त प्लेस आहे यार..! "

तो आनंदाने म्हणाला.


" रिअली? तू पहिल्यांदा येतोहेस इथे? "

ती आश्चर्याने म्हणाली.


त्यानं मान डोलावली.


" तू इथलाच आहेस ना? "

तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव तसेच होते.


" हो.. म्हणजे नाही.. म्हणजे हो..! "

तो खजिल होत म्हणाला.


तिची नजर त्याच्यावरच रोखली होती.

"... ऍक्च्युअली मी इथलाच.
बट लहानपणापासून बाहेरच होतो फॉर एज्युकेशनल परपज. हॉस्टेलला राहून शिकलोय मी. सो इथलं फारसं माहिती नाहीय मला."


त्यानं स्पष्ट केलं.



 " ओह असं आहे तर..!"

ती पाण्यात छोटे दगड टाकत म्हणाली.

" पण का रे अगदी लहानपणापासूनच घराबाहेर..??
माझ्या तर मॉमने नसतं जावू दिलं बा.
ती तर आत्ताही.. "


" मी लहान असतानाच मम्मा वारली माझी. "

तिचं बोलणं पुरं व्हायच्या आत तो म्हणाला.


तिच्या हातातला दगड हातातच राहिला.

" सॉरी विराज. मला तूला हर्ट नव्हतं करायचं. "

ती वाईट वाटून म्हणाली.

तो शांत झाला जरासा.

त्याची आई म्हणजे त्याचा हळवा कोपरा हे एव्हाना लक्षात आलं तिच्या.

त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी काहीतरी बोलायला हवं याच्या शोधात होती ती.

" लुक विराज..
पक्षांचा थवा..! "


ती आकाशात बोट दाखवत म्हणाली.

त्याचे ओठ रुंदावले थोडेसे..!

तिलाही हायस वाटलं.


" यू नो? माझ्या मॉमला ना निसर्गाच्या सानिध्यात रमायला खुप आवडतं. "

तिची गाडी पुन्हा मॉमवरती येऊन धडकली.

लक्ष्यात आल्यावर तिनं जीभ चावली.


" इट्स ओके. तुझी मॉम जरा जास्तच जवळची आहे वाटते तूझ्या.
मी ऐकलं होतं की मुली डॅडीज गर्ल असतात. "

तो.


" माझं जरा वेगळं आहे. "

ती खिन्न हसत म्हणाली.


" बाय द वे.. तूझ्या ममाला काय झालं होतं सांगशील?
म्हणजे इफ यू डोन्ट माईंड??"


तिनं त्याच्या काळजात हात घातला.


" मी लहान होतो गं तेव्हा.. म्हणजे केवळ पाच वर्षांचा.
मला एक छोटं भावंड मिळणार होतं खेळायला.
पण डिलिव्हरीच्या वेळेस खुप रक्तस्त्राव झाला नी दयाट ब्लडी डॉक्टर डिडन्ट सेव माय मदर ऍज वेल माय सिबलिंग.. "

सांगताना त्याच्या डोळ्यात दुःख आणि खुप सारा राग होतं. हाताच्या मुठी आवळल्या होत्या.


" रिलॅक्स विराज. जे घडलं ते खुप वाईट होतं. पण प्रत्येकवेळी डॉक्टरच दोषी असतो असं नाही ना? ती सिच्युएशन तशी असेल. "


ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती.


" तूला असं वाटतं कारण तू एक डॉक्टर आहेस. पण मी भोगलोय हे सारं.

आय लॉस्ट माय मदर. आय लॉस्ट माय लिटल न्यूबॉर्न सिस्टर. माझे वडीलही मला सोडून गेले त्या परिस्थितीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती डॉक्टर व्यक्ती माझ्या फॅमिलीतील होती.
त्या पाच वर्षाच्या मुलावर काय परिणाम झाला असेल असं वाटणारं कोणीच नव्हतं मला.आजी होती तोपर्यंत मी राहिलो तिथे. त्यानंतर कळायला लागल्यापासून हॉस्टेलची वाट धरली.

सुट्यांमध्ये यायचो घरी इच्छा नसतानाही.. कारण दुसरा पर्याय नसायचा.

आताही तेच.. विसाचं काम बाकी आहे म्हणून घरी आलोय.
मग अमेरिका.

नाही राहायचंय गं मला इथे."

त्यानंही एक दगड फेकला पाण्यात.


" म्हणून गायनॅक डॉक्टर्स ना हेट करतोस तू..? "

तिनं विचारलं.

त्यानं नुसती मान डोलावली.



" कधी विचार केलाय विराज तू की तूझ्या घरातील त्या डॉक्टरांना पण किती त्रास झाला असेल याचा..? "

-ती.


" ही इज ए क्रिमिनल..! येवढया वर्षानंतरही नाही माफ करू शकलो मी."

त्यानं एक पॉज घेतला.


" त्या दिवशी मम्माचा बर्थडे होता माझ्या. खुप लो फील होतं होतं मला. आणि अचानक तू दिसलीस. म्हणून तूला भेटायचं विचारलं.

तूला पार्टनर म्हणालो ना मी?

मम्मा पार्टनर होती माझी. माझ्या खेळण्यातली, मस्त्या करण्यातली.

मोटू म्हणायची मला ती तेव्हा जाम चिडायचो मी.
तू मला एकदा मोटू म्हंटलंस तेव्हा तिच आठवली.
तुझ्याशी बोललं की डोन्ट नो वाय, पण बरं वाटतं मला. म्हणून म्हणालो तूला पार्टनर."


तो हसला किंचितसा.

कदाचित डोळ्यातील थेंब लपवायचे होते.. म्हणून!



" काय एकटाच बडबडतोय मी..? "

पुन्हा हसून तो म्हणाला.

" तुझ्याघरी कोणकोण असतात? तू सांग ना? "

-तो.


" ओ ss माझ्या बाबतीत जाणून घ्यायचं आहे वाटतं..?"

ती हसत म्हणाली.

" मग ऐक.. माझ्याकडे ना सगळेच आहेत. आजी आजोबा. मम्मा पपा… एव्हरीवन. "



" वॉव ! हाऊ लकी यू आर!"

तो एक्साईट होत म्हणाला.


" डू यू वॉन्ट टू मीट विद देम?"

हसत रावी.


" शुअर..!"
तो आनंदानं म्हणाला.

तिनं नेहमीप्रमाणे व्हिडिओ कॉल केला…


" हॅलो मॉम..!"


" हां बच्चा..! कशी आहेस?"

पलीकडे सुमी होती.


" अगं मी मस्त.
कुणालातरी भेटवायचं होतं तूला म्हणून कॉल केला."

ती म्हणाली तसं विराज कॅमेऱ्यासमोर आला.


" काय गं हा मोटू सॉरी विराजच ना? "

सुमीनं स्माईल देत विचारलं.
त्याचेही ओठ रुंदावले.

" नमस्ते आंटी. तुम्ही ओळखता मला? "

त्यानं हसून विचारलं.

" हो रे. रावी सांगत असते अध्येमध्ये. "

ती म्हणाली.

" पण आहात कुठे तुम्ही दोघं..? खुप छान नेचर दिसतोय बाजूला. "

-सुमी.

" अगं एक व्हिलेज वॉक नावाचं ठिकाण आहे शहराच्या बाहेर.. तिथेच आलोय. मस्त प्लेस आहे."

रावी सांगत होती.


" मग एन्जॉय करा मस्त. नी वेळेत पोहचा घरी.
ओके बाय बच्च्यांनो..!"

तिनं कॉल कट केला.

" बाय..! "

म्हणत रावीनेही मोबाईल बाजूला ठेवला.


" मग कशी वाटली माझी फॅमिली..? "

त्याच्याकडे बघत तिनं विचारलं.



" तुझी मॉम काय ऑसम आहे यार.
अगदी दिलखुलास..!

आवडली आपल्याला. पण इतर कोणी दिसले नाही घरी? "

त्यानं प्रश्न केला.


ती हसली.

" भेटलास की तू सगळ्यांनाच !
यू नो? माय मॉम इज माय फॅमिली. माझी मम्मा.. पप्पा.
आजी.. आजोबा. एव्हरीथिंग..!"


ती सांगत होती.


" म्हणजे..? "

न कळून त्यानं विचारलं.

" म्हणजे… "

तिनं एक सुस्कारा टाकला.

" म्हणजे ऐक..
जेव्हा मी चार पाच वर्षाचे होते ना तेव्हा खुप मोठा ऍक्सीडेन्ट झालेला माझ्या फॅमिलीचा.

आय लॉस्ट एव्हरीवन..!

मी आणि माझी मावशी दोघीच बचवलो.
तेव्हापासून तिच माझं सर्वकाही आहे.जेव्हा प्रेमाचा वर्षाव करते ना तेव्हा माझी मॉम असते. खंबीरपणे पाठीशी उभी असते तेव्हा ती पप्पा बनते. कधी काही चुकलं तर कान पिळणाऱ्या आजी आजोबांच्या भूमिकेत असते. कधी ती माझी बेस्ट फ्रेंड असते तर कधी एक छोटीशी मुलगी असते तेव्हा तर मलाच तिची आई झाल्यासारखं वाटतं."

ती हसता हसता डोळे पुसत म्हणाली.


" आय एम सो सॉरी रावी.. मला खरंच काही माहिती नव्हतं अगं "

तो तिला म्हणाला.

 " चिल विराज..!
एवढं असं काही नाहीये रे.

आणि मला पार्टनर म्हंटलंस तर आवडलं ते.
यू नो विराज वी आर सेलिंग इन द सेम बोट..!

गमवाण्याचं दुःख दोघांनाही आहे. फरक एवढाच की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे.

मला माझा पेला अर्धा भरलेला वाटतो… आणि तूला तुझा पेला अर्धा रिकामा..!

चेंज युअर वे ऑफ थिंकिंग पार्टनर…
मग तुलाही तुझा पेला अर्धा का होईना पण भरलेला दिसेल..! "
त्याच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली.

त्याचा डोळ्यातून एक टपोरं थेंब तिच्या हातावर पडलं...

.
.
.
.
                   क्रमश :
    
             पुढील भाग लवकरच.

            *********************

तर कसा वाटला आजचा भाग सांगा पटापट कमेंट करून.
आवडला तर लाईक करा आणि share ही करा पण माझ्या नावासह..!
     ( साहित्यचोरी गुन्हा आहे )

🎭 Series Post

View all