पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -3

एक भन्नाट प्रेमकथा... गंधाळलेल्या प्रेमाची... पारिजातकाच्या सुगन्धासारखी...

एक भन्नाट प्रेमकथा... गंधाळलेल्या प्रेमाची.. पारिजातकाच्या सुगंधासारखी.... 

( मागील भागात आपण पाहिलं..  सुमतीला सरप्राईज द्यायला रावी घरी परतते... 

आता पुढे... )




" नॉक.. नॉक...
रावीs , बच्चा ss
तूला जायचं होतं ना..?? " दार ठोठावत तिने विचारलं.
" हो गं ss . मी तयारच होत आहे.. ! "
रावी आतून बोलली.
" कॉफी घेणार...? " ... तिचा प्रश्न.
" हां.. तू घे. मी होतेच दोन मिनिटात तूला जॉईन.. "
आतून रावी म्हणाली.
ती कॉफ़ीचा मग घेऊन गॅलरीतल्या तिच्या आवडत्या कोपऱ्यात आली.
आपल्याच तंद्रीत ती कॉफी एन्जॉय करीत होती..
" see मॉम.. कशी दिसतेय मी..??? "
तिच्याकडे येत रावीने विचारलं.
" wow.. ! सिम्पली बयूटीफुल.. !! " तिच्याकडे बघत ती म्हणाली.
ब्लूइश जीन्स, त्यावर फ्लॉवरिश प्रिंट असलेला व्हाईट टॉप.. हलकासा मेकअप. कानातील लॉन्ग इअररिंग्स.. खांद्यावर रूळनारे केस... !
रावीकडे ती पाहतच राहिली...
"सादगी मे सुंदरता " म्हणतात , ते बहुतेक यालाच.. "
ती म्हणाली.
" अगं माझी फ्रेंड काय सुंदर आहे तुला नाही माहिती.. तिच्यापुढे माझा कुठे टीकाव लागतो.? "
- रावी.
" असू दे. पण तूच सर्वांत सुंदर आहेस माझ्यासाठी..
- ती.
"सगळ्या आयाना आपली मुलं सुंदर दिसतात.. पण तू एकदा भेटच तिला.. मग तुलाही माझं म्हणणं पटेल. " - रावी.
" पण तू का एवढी नटलीयेस..?? म्हणजे एकदम भारीतली साडी वगैरे..?? कुठे जाणारेस का?? "
तिला निरखून बघत परत रावी म्हणाली.
" मी कुठे गं जाणार?? "
तीनही पलटवार केला.
" मग एवढी नटलीयेस ते..?? " - रावी.
" लेक आलीय ना एवढया दिवसांनी.. ! म्हणून जरा आनंदात.. ! " ती हसून म्हणाली.
रावी ही हसली मिश्किलसं ....
" कॉफी झाली की ये माझ्या रूममध्ये.. बेस्ट फ्रेंडशी भेटवायचय... "
रावी आत जात म्हणाली.
" नॉक.. नॉक..
येऊ का आत..?? "
तिने विचारलं.
"अगं हो मम्मा.., ये ना तुझीच वाट बघतेय.. "
ती हसून आत आली.
" काही दिसतेय का..? "
" नाही गं बाई.. ! "
" नक्की ना..?? "
" हो गं.. "
" ओके. नो चीटिंग हां.. ! चल माझ्यासोबत.. "
रावीने तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिला आरशासमोर घेऊन आली.. पट्टी सोडत म्हणाली..
" हां.. उघड डोळे आणि बघ आता... आहे की नाही माझी बेस्ट फ्रेंड माझ्यापेक्षा सुंदर...?? "
आरशातुन तिच्याकडे बघत ती म्हणाली..
" नाही... ! तूझ्यापेक्षा सुंदर कुणीच असू शकत नाही.. !" रावी च्या कपाळावर ओठ टेकवून ती म्हणाली.
"ऑss..! माझी गं ममूडी...!! तुला माझ्या बेस्ट फ्रेंड बद्दल माहित होतं..?? "
ओठांचा चंबू करत निरागसपणे तिने विचारलं.
"हम्म.. म्हणजे हां... म्हणजे तशी थोडी आयडिया होती.. !" - ती.
" कशी काय..?? " - रावी.
" आफ्टरऑल ... \"तेरी यार हू मै.. ! "
तिला मिठी मारत आपल्याच अंदाजात ती म्हणाली.
".. मग बेस्ट फ्रेंड.. आर यू रेडी..?? " - रावी.
" मग काय केव्हाचीच.. ! "
आपल्या साडीवरून हात फेरत ती म्हणाली.
"..ईssय.., अशी साडी नेसून येणारेस माझ्यासोबत..?? " - रावी.
" का गं..?? तूला सूट होत नाहीये मी.. " - ती.
" तसं नाही गं ममूडी.. ! पण ही माय लेकीनची नाही फ्रेंड्स ची पार्टी आहे. तर तुला माझ्यासारखं तयार व्हावे लागेल. " - रावी.
" नको गं.. " - ती.
" नको काय..?? अपुन ने शॉपिंग की है तेरे वास्ते.. चल ये पहण ले.. "
तिच्या हातात पिशवी देत ती म्हणाली..
हो नाही करत शेवटी ती तयार झाली..
" काहीतरीच रावी... किती ऑड वाटतेय हे...? " - ती.
" कुठे मॉम..? काय सॉलिड दिसतेस तू.. !
आय.. हाय.. ! किसी की नजर ना लगे.. "
कानाच्या मागे बोट मोडत रावी म्हणाली.
नेव्हीब्लू कलर ची जीन्स आणि त्यावर पिंकीश शेड असलेला टॉप.. नाजूकसे कानातले...
ती रावी ची मोठी बहीण वाटत होती..
रावीने क्लचर काढला आणि तिच्या केसांना थोडं कर्ल केलं..
" now परफेक्ट.. !" -रावी म्हणाली.
" मला आकवर्ड फील होत आहे... " - ती.
" काही काय..?? आणि तू मला अशीच आवडतेस. चल आता.. "
काहीशी तिला खेचतच नेत रावी म्हणाली.
" आज ड्रायविंग मी करणार आहे.. "
कारजवळ येताच रावी म्हणाली.
"अगं पण.. " - ती.
" हे बघ मॉम.. टुडे यू आर माय गेस्ट.. सो ड्रायविंग मीच करणार. अँड डोन्ट वरी... तेवढीही हार्श ड्राईव्ह नाही करत मी.. सो प्लीज कम इन.. "
हॉर्न वाजवत ती म्हणाली.
ती हसून आत बसली.
... आणि सुरु झाला त्यांच्या सेलेब्रेशनचा पहिला टप्पा..
लॉन्ग ड्राईव्ह.....
Fm वर गाणं सुरु होतं..
"...ये दोस्ती हम नहीं छोडेंगे....... !"
रावीही सुरात सूर मिसळू लागली....
सुमारे एक दीड तास ड्राईव्ह केल्यानंतर त्यांची कार शहराच्या बाहेर मस्त अशा एका रमनिय ठिकाणी आली तसं रावी ने कार एका ठिकाणी पार्क केली.
"उतरीए मोहतरमाँ हमारा डेस्टिनेशन आ गया है... "
तिच्या बाजूचा दार उघडून तिला आपला हात देत ती म्हणाली.
" नौटंकी... ! " म्हणत रावीच्या हातात हात देत ती बाहेर आली.
" wow रावी.. ! किती मस्त ठिकाणी आलोय आपण.. ! "
ती खूष होत म्हणाली.
थोडं इकडे तिकडे भटकून दोघी मग एका ठिकाणी आल्या. तिथे एक पाणवठा होता.
आता उन्हं कलली होती.. सूर्यदेव मावळतिला जात होते. आकाशात रंगाची नुसती उधळण उधळली होती... घराकडे परतनाऱ्या पक्षानची लगबग सुरु होती... !
" कित्ती दिवसांनी इथे आलोय आपण..? " ती उत्साहीत होत म्हणाली.
" मॉम दिवसांनी नव्हे कितीतरी वर्षांनी आलोय.. " - रावी.
दोघींनी मस्त फोटोशूट केलं..
"मॉम.. अशी नीट उभी राहा..
कमरेवर हात.. व्हेरी गूड..
आता ओठांचा पाऊट...." रावी तिचे फोटो काढत होती.
" ए.. काहीतरीच काय गं..? ते पाऊट बीउट मला नाही जमणार हां.. " - ती.
" जमतंय सगळंच हं मम्मा.. फक्त ओठांचा असा चंबू करायचा.. ! ओके..? " तिला शिकवत ती म्हणाली.
नंतर तिनेही रावीचे वेगवेगळ्या अँगलनी फोटो घेतले... दोघीनी मस्त सेल्फी काढल्या.....
एकमेकींच्या अंगावर पाणी उडवलं...! आता दोघीही पाण्यात पाय सोडून बसल्या होत्या. ते विलोभनीय दृश्य डोळ्यात साठवून ठेवत होत्या...
पंधरा विस मिनिट त्या तिथेच निसर्गाचा आस्वाद घेत होत्या.. अंधार पडायला आला..
" निघायचं.. "
पाण्यात एक छोटासा दगड मारत रावीने विचारलं.
पाण्यावर तरंग उठले.
" ठहरे हुये पाणी मे कंकर ना मारे.. " ती गुणगुणत होती...
" रावी.. माय बच्चा.. ! यू गिव्ह मी अ बयूटीफुल ट्रीट टुडे.. !
थँक्स डिअर... !"
तिला हग करत ती म्हणाली.
" मोस्ट वेलकम मॅम.. ! बट पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..
आगे आगे देखो होता है क्या.. ! "
रावी आपल्याच अंदाजात म्हणाली.
हसत हसत दोघी तिथून निघाल्या... त्यांची कार शहराच्या दिशेने निघाली..
आता त्यांची जोडी मॉल मध्ये होती. एक पैसाही खर्च न करता केवळ डोळ्यानी कशी शॉपिंग करायची ते रावी तिला शिकवत होती. अर्धा एक तास तिथे भटकल्यावर दोघी बाहेर पडल्या.
" काय गं रावी काही घ्यायचंच नव्हतं तर तिथे कशाला गेलो आपण..?? " ती विचारत होती.
" मम्मा.. प्रत्येक वेळी काही घ्यायलाच पाहिजे असं नसतं बरं.. कधी कधी नवनवे प्रॉडक्ट.. न्यू स्टाईल.. ह्यांचे केवळ नेत्रसुख अनुभवायचं असतं.. तुम नहीं समझोगे.. उसमे क्या मजा है.. ! "
रावी तिला सांगत होती... पण तिला खरंच कळेना की ह्यात कसली मजा..??
... जवळपास आठ वाजायला आले.. आता रावीने कार वळवली तिच्या फेव्हरेट हॉटेलकडे..
"...हॉटेल पॅराडाइज... "
कित्येकदा ती रावीला इथे घेऊन आलेली.. आणि आज रावी तिला घेऊन आली.
"... मुलगी मोठी झालीये.. ! "
ती मनात म्हणाली..
रावीने सगळा तिच्या आवडीचा मेनू ऑर्डर केला.. स्टार्टरवर ताव मारता मारता ती म्हणाली..
" अरे... ! मी तूला तर काँग्रच्यूलेट केलंच नाही...
काँग्रच्यूलेशनस.. डॉक्टर रावी... ! माय प्रॉउड.. ! "
तिच्या हातात RS अल्फाबेट असलेले एक नाजूकसे डायमंडचे ब्रेसलेट घालत ती म्हणाली..
".. ओह मॉम.. ! How beautifull it is... ! पण एवढं महागंढ घ्यायची काय गरज होती..?? "
रावी आनंदाने म्हणाली.
" तूझ्यापेक्षा मौल्यवान दुसरं काहीच नाही माझ्यासाठी... ! " रावीचा हात हातात घेत ती म्हणाली.
" लव्ह यू मॉम... ! "
" लव्ह यू बच्चा... ! "
"..अरे.., तू सांगितलंच नाही की डॉक्टर रावी म्हंटल की कसं वाटतं ते?? तिने पुन्हा विचारलं..
" ठीक ठाक.. ओके ओके टाईप..." - रावी.
" का गं..?? "
" काज... , इट्स नॉट ओन्ली डॉक्टर रावी.. इट्स डॉक्टर रावी सुमती... MBBS DGO.. !"
रावी उत्तरली.
".. सुमती काय गं मध्येच..?? आणि सरनेम कुठे गेलं..?? " - ती.
" सरनेम को मारो गोली यार... ! आणि सुमती म्हणशील तर ती तू आहेस. जशी तूझ्याशिवाय मी अपूर्ण आहे... तसं माझं नाव देखील तूझ्या नावाशिवाय अपूर्ण आहे.. !
Now tell me...
" Dr. Ravee Sumati.... "
How its sound....??? "
रावीने विचारलं..
"...too cool.. !!! "
ती हसून म्हणाली.
"... मग डॉक्टर सुमती.. कसं वाटतंय तुमची मुलगी डॉक्टर बनतेय ते...?? "
तिच्यासमोर चमचा पकडत रावी म्हणाली..
तिनेही तो चम्मच माईकच्या अविर्भावात पकडला...
"... well... ! मी खूप आनंदी आहे. खरंतर आम्ही दोघी डॉक्टर आहोत.. पण वेगवेगळ्या विषयात. मी वनस्पतीशास्त्रात phd केलंय तर माझी मुलगी खऱ्याखुऱ्या माणसांची डॉक्टर आहे.. मला तिचा खूप अभिमान वाटतोय. Thank you... ! "
चम्मच खाली ठेवत ती म्हणाली.
"... व्वा.. ! मस्त.. माझ्या कॉनव्होकेशन ला हिच स्पीच देशील तू... ! "
टाळ्या वाजवत रावी म्हणाली..
ती हसली..
डिनर आटोपले... दोघी परत निघाल्या... रावीने कार दुसरीकडे वळवली..
" आता गं कुठे..?? " - सुमती.
" आपल्या फेमस आइसक्रीम कॉर्नरला.. ! "
कार ब्रेक करत रावी म्हणाली.
दोघींनी आपापल्या आवडत्या फ्लेवरवर मस्त ताव मारला..
कार मध्ये बसल्यावर रावीचे हात घट्ट पकडत सुमती म्हणाली..
" थँक्यू रावी.. ! यू मेड माय डे.. !! "
" थँक्स मॉम... ! यू मेड माय लाईफ.... !"
तिला हग करत रावी म्हणाली...
आता त्यांची कार घराकडे निघाली......

    

                                               क्रमश :   ..... 


        *************************************


कशी वाटली आजची मायलेकींची  आउटिंग...??  नक्की सांगा.. 

आणि रावी - सुमतीच्या नात्यातील उलगडनारा दुसरा पैलु पुढील भागात नक्की वाचा.... 

आजचा भाग आवडला तर कमेंट आणि share करायला विसरू नका 

🎭 Series Post

View all