(मागील भागात बघितले कि रावी चा रिजल्ट लागल्यानंतर ती आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत पार्टी चा प्लॅन बनवते... आता पुढे... )
".... ये श्रुती चल यार लवकर.. " गाडीला किक मारत रावी ओरडली..
हो.. हो .. आले गं..फ्लॅट लॉक करत श्रुती म्हणाली..
ती पाठीमागे बसताच रावीने स्पीड वाढवला..
" येss य.. हळू अगं.. पडू अशाने आपण.. "
" श्रुती ss यार आज मी खूप खुश आहे.. असं वाटत आहे कि हात सोडून हवेत मस्त गाडी घेऊन उडावं..." हॅन्डल चे दोन्ही हात सोडून ती म्हणाली..
" ओ मॅडम ss, आधी ते हॅन्डल नीट पकडा आणि हवेतुन पहिले खाली या... नाहीतर इथेच जमिनीवर उपडे पडायचो आपण...."
तिला एक चापट देत श्रुती म्हणाली..
ओय ss.. केवढं लागलं मला.. ! आणि मारलं कशाला गं?? आत्ता कुठे हवेत उडायला सुरुवात केली होती ना मी..
आणि पडलेही असते तर काय झालं असतं.. तू आहेस ना सोबत माझ्या.. डॉक्टर arthopedic... " .. रावी.
"ओये.. तुझ्यासोबत मी देखील पडले असते डॉक्टर gynaecologist.. ! आता नार्मल मोड मध्ये ये आणि सांग कुठे चाललो आपण..?? " तिच्याच स्टाईल मध्ये बोलत श्रुतीने विचारलं.
" शॉपिंग.... " करकचुन ब्रेक दाबत ती म्हणाली.
" आऊचss, रा ss वी जरा हळू न.. " उतरत श्रुती म्हणाली.
गाडी पार्क करून दोघी मॉल मध्ये आल्या..
.... आत्तापर्यन्त कळलेच असेल.. रावी आणि श्रुती ह्या दोघी रूम पार्टनर..(फ्लॅट पार्टनर )... कॉलेजपासूनच दोघी एकत्र होत्या... आणि आत्तापण internship पासून एकत्रच आहेत. रावी ला गायनिक व्हायचं होतं आणि श्रुतीला आर्थ्रोपेडिक... आणि आता त्यांचं स्वप्नही पूर्ण होणार होतं...
" हा नाही.. तो.. "
" हा कलर थोडा लाईट आहे.. किंचित डार्क शेड..?? "
" ह्या मध्ये सेम बघूया... "
" हा बघ कसा दिसतोय.. "
" येsय.. याला एकदा ट्राय करून बघू... "
.
.
..एकदाचे कपडे झाले घेऊन.. मग त्यांनी मोर्चा वळवला असेसरीज कडे...
मग तिथलाही फडशा फाडून झाला...
" हुशss..., झालं एकदाच.. आता थोडी पेटपूजा करायची..?? "
श्रुतीने पोटाला हात लावत विचारलं.
" नेकी और पूछ पूछ..?? चल पिझ्झा पार्टी करूया.. " ... रावी.
मस्तपैकी दोघींचा पिझ्झावर ताव मारून झाला. बिल पे करून झाले. उरलेली रक्कम परत घ्यायला श्रुती मागे थांबली आणि पार्किंग मधून गाडी काढायला रावी पुढे निघाली..
तेवढयात मागून तिला कोणाचा तरी धक्का लागला... हातातील पिशव्या खाली पडल्या.
" सॉरी.. " समोरून आवाज आला.
पिशव्या उचलून तिने समोर बघितले.. एक निमगोरा , हॅन्डसम तरुण तिच्या समोर उभा होता..
" ओयss मिस्टर xyz.. नीट बघून चालता येत नाही का..?? "
ती रागाने म्हणाली.
" सॉरी म्हटलंय ना मी तुम्हाला.. " तो तरुण म्हणाला.
" बस.. ! सॉरी म्हटलं कि झालं...?? डोळे काय डोक्यावर घेऊन चालता का..?? एवढी मोठी मी दिसलें नाही का..??? .... रावी.
" अहो, आता सॉरी म्हटलं ना ? पुन्हा काय करू..?? " ... तो.
" what happened dear.."
मागून एक नाजूकशा आवाजातील शॉर्ट्स घातलेली तरुणी येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाली.
" nothing हनी.. " शांतपणे तो म्हणाला.
" हां ss..? गर्लफ्रेंड आल्याबरोबर कूल अटीट्युड..?? यू डोन्ट नो मिस्टर कोणाशी पंगा घेताय ते.. I\"m doctor रा.. "
तिचं बोलणं मध्येच तोडत तो म्हणाला ,
" I hate doctors ... specially D.G.Os "
" हां..?? हाऊ कॅन यू से थिस.??
ओय मिस्टर xyz.. स्टॉप.. स्टॉप.. " जवळपास ती ओरडलीच.
तेवढयात श्रुती तिथे पोचली.
" काय झालं?? आर यू ओके??.. " तिने विचारलं.
" नो यार I\"m not ok.. बघ ना तो मुलगा आत्ता काय बोलला मला माहितेय..? .. " .. रावी..
" सोड ना यार.. चल उशीर होईल आपल्याला. "
तिला खेचतच श्रुती बाहेर घेऊन आली..
" असं कसं सोडणार..?? तू हवी होतीस तिथे मग कळलं असतं तूला.. " अजूनही ती धूसपूसत होती..
" चावी दे.. " ... श्रुती.
" काय? " ... रावी.
" अगं गाडीची चावी दे.. मी ड्राईव्ह करते आता.. " ... श्रुती.
" मी का नको करू..? " ... रावी.
" अगं माझे माते.. आधीच रागाने डोकं तापलंय तुझं.. तू मागे बसून थंड हो आणि मला ड्राईव्ह करू दे.. "
तिच्या हातातील किज घेत ती बोलली.
गाडीवर थोडावेळ दोघीही गप्प होत्या. मग रावीच म्हणाली..
" तूला माहितीये काय म्हणाला तो? म्हणाला.. I hate doctors..
How can he dare to say this?? " ती पुन्हा रागाने म्हणाली.
" असेल अगं त्याची काही दुश्मनी डॉक्टरांशी.. जाऊ दे ना. "
... .. श्रुती.
"असं कसं जाऊ देऊ यार..? लागलं मला ते. डॉक्टरांबद्दल असं कोण काही बोलू शकतो..?? एक मिनिट... श्रुती गाडी थांबव.. " .. रावी. " आता काय झालं..? " ब्रेक लावत श्रुती म्हणाली.
" तो म्हणाला कि स्पेशालि तो dgo ना हेट करतो... त्याला कसं माहित कि मी dgo करणारे..?? " ... रावी.
काहीसा विचार करत ती पुन्हा म्हणाली..
" तो माझ्यावर पाळत तर ठेवत नाही आहे ना?? त्याची काही एजन्सी वगैरे आहे कि काय..?? "
" ये डफर वेड लागलंय का तूला?? ह्यासाठी तू मध्ये गाडी थांबवायला सांगितली..?? घरी गेल्यावर पण बोलू शकतो आपण.. "
श्रुतीचा चिडका स्वर बघून ती गप्प झाली आणि शांतपणे गाडीवर बसली.. पण मन बेचैन होतं..
" असा कसा तो मला म्हणू शकतो..? " घरी पोहचल्या वरही डोक्यातला प्रश्न निघत नव्हता..
फ्रिजमधून थंड पाण्याची बाटली तिच्याकडे देत श्रुती म्हणाली ,
" आता तरी जरा थंड व्हा मॅडम.. ! " .. आणि ती चेंज करायला गेली.
" श्रुती.. वेट..
त्याला कसं कळलं मी dgo होणार ते.?? " .... रावी.
" आता मार खाशील हं पुन्हा तेच विचारशील तर.. अगं कॅजुअली बोलला असेल तो.. यापुढे जर कधी त्रास दिला तर सरळ कंप्लेंट करू... ओके?? Now रिलॅक्स.. जा चेंज करून घे.. . "
श्रुतीचे म्हणणे पटले तिला.. चेंज करून ती आली.
आता मूड थोडा फ्रेश झाला.. दोघींनी परत एकदा शॉपिंग बघितली..
रात्र बरीच होत आली होती.. उद्याच्या बेस्ट फ्रेंडसोबत करणाऱ्या पार्टीच्या excitement मध्ये ती झोपून गेली....
.
.
.
...... सकाळचा पाच चा गजर झाला. ती आळस झटकून उठली... रात्री बहरलेल्या प्राजक्ता cha सुगंध सगळीकडे दरवळत होता... उठून ती गॅलरीत आली. फुललेली पारिजातकाची फांदी तिला खुणावत होती.. मनभरून तिने तो सुगंध हुंगला.. तिच्या रोमारोमात तो भिनला... तिथेच बसून ती आवडत्या कॉफीचा हळुवार घोट घेऊ लागली.. रावीची आठवण आली तिला.. आणि तिचे ओठ हळूच रुंदावले... किती दिवसांनी तिला आज मनातून प्रसन्न वाटत होतं...
" गुड मॉर्निंग बच्चा... " तिने वॉट्सअप मेसेज पाठवला. कॉलेज ला उशीर होईल... आवरायला हवं म्हणून ती आत गेली....
.
.
.... सात वाजले.. गजर झाला तशी रावी जागी झाली.. मस्तपैकी आळस देऊन मोबाईल पाहिला. गुड मॉर्निंग चा मेसेज बघून तिच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं..
"विडिओ कॉल करू का?? " तिने स्वतःलाच विचारलं.
" oh.. control ravee.. only for some hours.... !स्वतःलाच तिने बजावलं..
" गुड मॉर्निंग मॉम.. " तिने रिप्लाय पाठवला..
" फक्त काही तास मम्मा... मग तूला मोठ्ठ सरप्राईज मिळेल."
मनात ती म्हणाली.. आजची मॉर्निंग जरा जास्तच फ्रेश वाटायला लागली.
.
.
.
" ए गधडे.. उठ ना..! बघ किती फ्रेश वाटत आहे आज.. "
कॉफी चे दोन मग घेऊन येत ती म्हणाली.
" झोपू दे ना यार रावी.. " श्रुती आळसावत म्हणाली.
"आता जर उठली नाहीस ना तर गरम कॉफी मध्ये तुझा बोट बुडवेल.. "
रावी ने धमकी दिली तसं ती पटकन उठून बसली..
" तू कॉफी केलीये..? अरे यार दे लवकर..
तूझ्या हातची कॉफी म्हणजे एक पर्वनीच असते.. "
असं म्हणून ती कॉफी पिऊ लागली.
" ये रावी थँक यू यार... अँड गुड मॉर्निंग.. ! " तिला मिठी मारत श्रुती म्हणाली.
" व्हेरी गुड मॉर्निंग.. ! पण मस्का लावू नकोस हं.. मी काही रोज रोज कॉफी करणार नाहीये.. " ... रावी.
" हो ss माहितीय मला. आज बेस्ट फ्रेंड कडे जाणार ना, म्हणून आमच्यावर ही कृपादृष्टी.. ! " ... श्रुती.
"एस... सही पकडे है.. ! " हसत म्हणत ती आंघोळीला गेली...
.
.
.
.
" आज काय स्पेशल मॅडम...?? जेवणाचा मस्त घाट घातलेला दिसतोय... "
घरी काम करणाऱ्या शांताकाकूने विचारलं.
त्यावर ती हसली... जराशी... !
.
.
टिंग टॉंग ss...
तितक्यात डोअर बेल वाजली.
तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली..
स्मित मुखाने तिने दार उघडलं.
समोर उभी असलेली व्यक्ती पाहून चेहऱ्यावर खूप सारा आनंद आणि थोडयाशा आश्चर्याचे भाव उभे राहिले..
" ओ माय गॉड.. ! वाट अ प्लीजन्ट सरप्राईज... !! माय बच्चा... !! मिस यू लॉट डिअर.. ! "
समोर उभ्या असलेल्या रावी ला मिठी मारत ती म्हणाली.
" आय मिस यू टू मॉम... "
मिठी घट्ट करीत ती म्हणाली.
" पण तूझ्यापेक्षा मोठ्ठ सरप्राईज तर मला मिळालं.. ह्या वेळेला तू कशी गं घरी?? कॉलेज ला दांडी काय?? कि बरं नाही तूला?? आणि शांताकाकू आली नाही का आज..?? "
रावी ची प्रश्नमंजुषा चालू झाली.
" अगं हो , हो.. ! किती सुसाट पडशील..? जरा ब्रेक लाव. आणि डोन्ट वरी..शांताकाकू आलीये . किचन मध्ये आहे ती. आणि मला देखील काही झालेलं नाहीय. हाफ डे टाकला होता आज.. म्हणून मी घरी आहे... "
रावी च्या सर्व प्रश्नांची ती उत्तर देत होती.
" पण हाफ डे का टाकला..? " रावी तिला हा प्रश्न विचारणार तोच किचन मधून आलेला घमघमाट सरळ तिच्या नाकात घुसला.
" शेवयांची खीर... ! माय फेवरेट...
शांताकाकू.. प्लीज दे ना मला... " त्या सुगंधाने धावतच ती किचनकडे पळाली.
" छोट्या मॅडम.. स्टॅचू.. "
शांताकाकू ओरडलीच. तशी रावी एकाच जागेवर खिळून उभी राहिली.
" छोटया मॅडम... माझ्या किचन मध्ये असं आंघोळ केल्याबिगर नाही यायचं हा.. सांगून ठेवते. "
शांताकाकूने तिच्याकडे बघत धमकीच भरली..
" आता ओव्हर.. स्टॅचू कॅन्सल.. " ... शांताकाकू.
" अगं पण शांताकाकू.. मी तुझी आवडती छोटी मॅडम आहे न.. प्लीज फक्त एकच चम्मच दे ना गं टेस्ट करायला.. "
रावी मस्का मारत म्हणाली.
" नाही म्हणजे नाही.. आंघोळ करा आणि मग सगळी संपवा.. मी काय पण मनणार नाही.. तसही मोठया मॅडम नी तुमच्या साठीच बनवली आहे... " ... शांताकाकू बोलून गेली.
" काय ss? " .... रावी.
" कुठे काय..?? " कमरेवर हात ठेवत शांताकाकू म्हणाली. " जा आंघोळ करून या.. "
" बघून घेईन तुला " असा कटाक्ष टाकून ती आत गेली. ..
.
.
.
"... आहाहा काय खीर बनलीय, मॉम.. मजा आ गया.. ! "
आंघोळ केल्यावर ति खीरी चा आस्वाद घेत होती.
" शांताकाकू... शिक जरा मॉमकडून.. " ती म्हणाली.. मघाचा राग काही गेला नव्हता तिचा..
"... मम्मा.. आता मी झोपते थोडावेळ.. ! शिन आलाय प्रवासाचा. दोन तास तरी उठवू नकोस.. " .. रावी.
".. हो.. पण तुझी पार्टी होती ना तूझ्या बेस्ट फ्रेंड बरोबर..
कळवलस का तिला..?? " ... तिने विचारलं..
" हो अगं.., पार्टीचं फिक्स आहे.. उठल्यावर कळवते मी तिला . तू नको टेन्शन घेऊ... "
आत जात रावी म्हणाली...
... ती हसली... जराशी.. !
शांता काकू निघून गेली.
मग तीही पहुडली थोडया वेळासाठी.....
क्रमश :
*********************************************
आजचा भाग कसा वाटला.... नक्की कळवा.. आणि तिच्या बेस्ट फ्रेंड सोबत सेलेब्रेशन चा प्लॅन success होनार कि नाही हे वाचा पुढील भागात...
ही कथा शेवटपर्यन्त फ्री आहे तिला ssubscription ची गरज नाहीय...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा