Nov 30, 2021
प्रेम

पारिजात... गंध प्रेमाचा.. भाग -1

Read Later
पारिजात... गंध प्रेमाचा.. भाग -1

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

 सुरु होतेय एक नवी कथामालिका... गंधाळलेल्या प्रेमाची..., पारिजातकाच्या सुगंधासारखी... !!


                       ............................... 

  ... दुपारची चार साडेचारची वेळ.. गरमागरम वाफाळलेल्या कॉफीचा मग घेऊन ती ग्यालरीत आली... अंगणात वाढलेल्या पारिजातकाची  फांदी गॅलरीत डोकावत होती.. फुलं तर नव्हती आता.., पण सकाळी दरवळणारा सुगंध तिच्या रोमा रोमात भिनला होता.. गॅलरीचा हा कोपरा तिची आवडती जागा... आणि  सोबत तिची आवडती  कॉफी...  मग तर बोलायलाच नको... आहाहा... 

तेवढयात मोबाईलची रिंग वाजली...  विडिओ कॉल बघून  चेहऱ्यावर मोठ्ठी स्माईल आली.. 

कॉल रिसिव्ह झाला... 

"हा...  बोल बच्चा ss.. "

ती म्हणाली.. 

" मॉsssss म... ऐक ना खूप exciting  न्युज आहे.... " 

 समोर उत्साहाचा धबधबा खळखळत होता... 

".. अगं हो हो..  तुझा उत्साह बघूनच कळतंय न्युज exciting आहे म्हणून...  आता सांग तरी.. " 

कॉफीचा घोट घेत ती म्हणाली.. 

"...मॉम...  आधी मला सांग तुझी ही कॉफी तूला जास्त  प्रिय आहे कि हा तुझा बच्चा..??  "

लटक्या रागाने तोंड फुगवून ती म्हणाली.. 

"..अर्थातच गॅलरीतल्या ह्या कोपऱ्यात बसले कि..  मला ही कॉफी जss रा जास्त आवडेल.. पण ह्या क्षनी मात्र तोंड फुगवून बसलेला माझा लाडका बच्चा खूप खूप जास्त प्रिय आहे... " 

कॉफीचा मग बाजूला सारत ती म्हणाली तसा बच्चा जरा जास्तच लाडात आला.. 

"..गुणांची गं माझी ममूडी ती... !"

"... पुरे.. हं आता...  आणि ती exciting news सांगणार आहेस कि नाही.. "

हसत ती म्हणाली..,  तसा उत्साहाचा धबधबा पुन्हा खळखळायला लागला... 

"..ओह ममाss..,  माझा रिजल्ट आलाय.. मी DGO ची  एंट्रन्स पास झाले.. आहेस कुठे..??  "

" wow.. ! What a great news... ! Heartiest congratulations my dear...  उउउउउउउम्म्म्म्मआआआ.. " खरंच ही न्युज ऐकून ती खूप excite  झाली..  डोळ्याचं काजळ मोबाईलला लावत म्हणाली... 

" किसी कि नजर ना लगे मेरी डाक्टरनी साहिबा को... आपकी मेहनत  रंग लाई मॅडमजी.. "

 "शुक्रिया मोहतरमाँ.. अब आगे भी सुनो... "

आता तीही हिच्यात  सामील झाली. 

"..नौटंकी.. बोल.. " हसत ती म्हणाली. 

"..अगं तूला माहितीय माझे mentor कोण असणार आहेत..?? "

"..कोण..? " तिनेही त्याच exciting मोड मध्ये विचारलं. 

"कोण...??  अगं..,  द ग्रेट ग्रेट ग्रेट gynaecologist... Dr. साठे सर.... !   आहे की नाही exciting news..??  मॉम काय झाले..??  R u not happy with this news..??  "

"अरे मी तर खूप खूप खूप खुश आहे... माय डिअर.. !

थोडंस वाईट वाटलं जरा.. माझी छोटीशी चिमणी कशी भरकण मोठी झाली..,  कळलंच नाही मला.. ! माझा लाडका बच्चा..    Dr. रावी... "

ती शांत झाली. 

" ये मम्मा...,  अशी इमोशनल नको होऊ ना यार.. ! "

रावी ही थोडी हिरमुसली. 

दोन क्षण असेच गेले शांततेत...

मग तिनेच शांततेचा भंग केला. 

"...फिर सेलेब्रेशन तो बनता है...  काय प्लॅन आहे..??  "

तशी रावी पुन्हा मुळपदावर आली.. 

"...प्लॅन तो बडा तगडा है.. माँल.. शॉपिंग.. लॉन्ग ड्राइव..डिनर.. आईसक्रीम.. और बहुत कुछ... "

"...आणि हे सगळं कोणासोबत..??? "

भूवई वरती करत तिने विचारलं.. 

"..well... it"s secret.. पण तूला म्हणून सांगते.. 

हे सगळं करणार आहे मी माझ्या बेस्ट बेस्ट बेस्ट फ्रेंडसोबत.. "

रावी आपल्याच मोड मध्ये होती. 

"...ऐक ना मॉम मी तूला पूर्ण प्लॅन सांगितला तर आठवलं की मला शॉपिंगला जायचे आहे...  कदाचित यायला लेट होईल तर कॉल करणार नाही.. ओके.?  वाट बघू नकोस... now एन्जॉय युअर कॉफी.. बाय डिअर लव्ह यू.. मी तयार होते.. "      ..... रावी. 

"बाय बाय बच्चा... लव्ह u too.. "   ... ती. 

एव्हाना तिची कॉफी थंड झाली होती... परत दुसरा मग आणून ती आस्वाद घेऊ लागली.... 

.

.

.

.... कसा वाटला पाहिला पार्ट...???  नेक्स्ट पार्ट लवकरच.... 

ही कथामालिका शेवटपर्यन्त फ्री आहे. 


❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now