Mar 02, 2024
प्रेम

पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -44 (अंतिमपूर्व!)

Read Later
पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -44 (अंतिमपूर्व!)

आपण वाचत आहात, एका गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कहाणी!
पारिजात.. गंध प्रेमाचा..!


( मागच्या भागात आपण वाचले, की विराज अनिकेतला रावी आणि सुमीचा भूतकाळ सांगतो. सुमीला परत आणायचे म्हणून ते घराबाहेर पडतात, पण हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आल्यामुळे ते तिकडे जातात.
आता पुढे.)

***************


विचार करत ते ड्राईव्ह करत होते, तोच त्यांचा मोबाईल खणखणला. हॉस्पिटल मधून कॉल होता, इमरजन्सी केस असल्यामुळे त्यांना त्वरित बोलावले होते. इतका वेळ फुलपाखरू बनून उडणारे मन अचानक परत आपल्या जागेवर आले. आधी कर्तव्य महत्वाचे म्हणून त्यांनी आपली कार हॉस्पिटलच्या दिशेने वळवली.

हॉस्पिटल मध्ये एक क्रिटिकल सर्जरी आणि मग दोन सीझरच्या केसेस. त्यानंतर ओपीडीचे पेशंट.. त्यांना सुमीकडे जायला ना वेळ मिळाला, ना लक्षात राहिले.

एकदा डॉक्टरचा ऍप्रॉन अंगावर चढवला की त्यांचं काही वैयक्तिक आयुष्य उरायचंच नाही मुळी! थोडा वर्कलोड कमी झाल्यावर त्यांनी नेहमीप्रमाणे कॉफी मागवली. कॉफीचा पहिला घोट घेत डोळे मिटले आणि त्यांच्या डोळ्यांसमोर सकाळचा दारात सांडलेला पारिजात विखूरला. पाठोपाठ दारात धडकलेली सुमीही उभी राहिली. तिचे परत जाणे, त्यानंतर विराजचे समजावणे आणि त्यांचं तिला परत आणण्यासाठी बाहेर पडणे, सगळे आठवले आणि त्यांचे डोळे खाडकन उघडले.

कॉफीचा मग तसाच बाजूला ठेऊन ते उभे राहिले.
"अरे, काय हे? सुमीला घ्यायला जायचं सोडून मी इथेच अडकलो."  ते जरा मोठयानेच पुटपुटले.

समोर बसलेली डॉक्टर राधा त्यांच्याकडे बघत होती. त्यांना कॉफी अशी बाजूला ठेवतांना ती पहिल्यांदाच पाहत होती.

"सर? काही म्हणालात?"  तिने विचारले.

"डॉक्टर, ओपीडी संपलीय नी सध्या कोणत्या वेटिंग केसेस देखील नाहीयेत, सो आता मला निघायला हवं. काही इमरजन्सी आली तरच मला कॉल करा,  अदरवाईज तुम्हीच हँडल करा. करणार ना?"
त्यांच्या प्रश्नावर तिने हसून मान डोलावली.

"शुअर सर! पण एवढया घाईत कुठे? बर्थडे पार्टी का?"  ती.

"नाही, जरा इम्पॉर्टन्ट काम आहे, निघतो मी."  तिचे पुढचे बोलणे न ऐकताच ते केबिनबाहेर पडले.
"बोल, मग काय ठरवलेस तू? तुझे हे बेसन लाडू तुझ्या अनीला पोहचवायचे ना?"   लाडवांचा डबा सुमीसमोर पकडत रावी म्हणाली.

"रावी..  हा डबा तर विराजच्या बॅगमध्ये होता ना? इथे कसा आला?"  आश्चर्याने सुमी.

"हो, तिथेच होता पण मग मी आधीच काढून ठेवला होता. जर तू अशी परत येशील आणि तिकडे जाण्यास नकार देशील तर मग सगळे लाडू विराजने संपवले असते ना, म्हणून."  तिच्या हातात डबा ठेवत रावी म्हणाली.

"का? खाऊ द्यायचेस ना.आपल्या घरीसुद्धा तू त्याला लाडू खाऊ दिले नाहीस."  ती.

"का म्हणून काय विचारतेस? तुझ्या बेसनाच्या लाडूचा पहिला मान तुझ्या अनीचा होता हे माहीत नाही का मला? पहिल्यांदा त्याच्या वाढदिवसालाच लाडू वळले होतेस ना? आजही त्याचा वाढदिवस आहे, मग पहिला मान त्याचाच की नाही?"
तिच्या डोळ्यात बघत ती म्हणाली.

सुमी स्तिमित होऊन तिच्याकडे पाहत होती, आपले बोट पकडून चालायला शिकलेली ही किती लवकर मोठी झाली. विचाराने ओठांवर एक हलके हसू उमलले.

"काय गं अशी का बघतेस?" एकटक बघणाऱ्या तिला रावीने विचारलेच.

"मोठया झालेल्या माझ्या लेकीला बघतेय."  आपल्या डोळ्यांचे काजळ तिच्या कानामागे लावत ती म्हणाली. " माझ्या बच्चूला कधी कुणाची नजर ना लागो."

रावी हसायला लागली, " मॉम, मी मोठी झाले म्हणतेस नी परत बच्चू पण म्हणतेस. नेमकी मी केवढी आहे ते तरी सांग. "

" गप गं. मुलं कितीही मोठी झाली तरी ते आपल्या आईसाठी बच्चूच असतात, कळलं?"  तिचे नाक खेचत ती.

"हो, कळलं तर. निघायचं ना आता?"  रावी.

तिच्या प्रश्नाला सुमीने मान हलवून होकार दिला. तिचा होकार ऐकून रावीच्या आनंदाला पारावर उरला नाही.  ही आनंदाची बातमी विराजला सांगायची म्हणून तिने मोबाईल हातात घेतला, तोच सुमीने तिच्या हातून मोबाईल काढून घेतला.

"बच्चा, न कळवता जाऊया ना. मी आलेले बघून अनीच्या चेहऱ्यावरचा आनंद मला परत अनुभवायचा आहे."
ती हळुवारपणे म्हणाली.

रावीला तर हे अनपेक्षित होतं.
"आपली आज्ञा शिरसावंद्य, माते!"  म्हणून तिने मोबाईल बंद करून पर्समध्ये ठेवला."सरप्राssईज!"
विराजने दार उघडल्याबरोबर रावी जोरात ओरडली.

"कसलं सरप्राईज? तुम्ही येणार आहात हे मला माहीत होतं." तो हसून म्हणाला.

"काहीपण हं! मी तर तुला कॉल केला नव्हता, मग कसं कळलं?"  रावी.

"अँड द क्रेडिट गोज टू मी!" तो आपली कॉलर टाईट करत म्हणाला. दोघी त्याच्याकडे आश्चर्याने बघत होत्या.

"असे का बघताय? अरे, मामाला मीच पाठवले ना तुमच्याकडे. तुम्हाला सरप्राईज मिळावे म्हणून कॉल नव्हता केला. पण काय गं, तुम्ही आत आलात, माझा मामा कुठे आहे?"  तो.

"एक मिनिट, तुला काय म्हणायचेय की तू सरांना पाठवलेस म्हणून आम्ही आलोय?"  रावी.

"एक्झॅक्टली!"  तो.

"पण सर तर आलेच नाहीत. इनफॅक्ट आम्ही दोघीच त्यांना लाडू द्यायला म्हणून आलोय."  ती.

"व्हाट? अगं तो तर दोन तासांपूर्वीच इथून तुमच्याकडे निघाला होता." तो.

"अरे, पण तो तर आलाच नाही. मला खूप भीती वाटत आहे बच्चा, त्याला काही झाले तर नसेल ना?"  सुमीच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट पसरले.

"डोन्ट बी पॅनिक मॉम! सर आपल्याकडे नाही आले म्हणजे नक्कीच हॉस्पिटलमध्ये असणार. विराज तिकडे एक कॉल करून बघ ना."  सुमीच्या खांद्यावर हात ठेऊन ती म्हणाली.

विराजने रिसेप्शनवर कॉल केला तर त्यांना कळले की दोन तासांपासून सर ओटीमध्येच आहेत. त्याने रावीकडे बघितले.

"दोन वर्षापासून त्यांच्यासोबत मी काम करतेय, त्यांची प्रॉयारिटी काय असेल ते कळते मला."  त्याच्याकडे बघून मंद हास्य करत ती म्हणाली." ओके गाईज, आय हॅव अ प्लॅन! मामा घरी येईपर्यंत आपण आपल्या चौघांसाठी एक मस्त पार्टी अरेंज करूया, काय म्हणता? "
सुमीकडे बघून त्याने विचारले.

त्याच्या बोलण्यावर दोघींनीही टाळी दिली.

सगळे जोमाने कामाला लागले. विराज आणि रावीने मिळून घर सजवायचे हाती घेतले. फुगे फुगवता फुगवता एकमेकांच्या अंगावर त्यातील हवा सोड, कधी फुलं फेकून मार, असे त्यांचे अधेमधे सुरु होते. सुमीने स्वयंपाकघराचा ताबा घेतला. तिच्या अनीला आवडणाऱ्या जेवणाचा तिने घाट घातला होता. मधेमध्ये रावी व विराज तिकडे डोकावत होती, तर कधीकधी ती बाहेर येऊन त्यांच्या सजावटीत काही सूचना देऊन जात होती.
काम, गोंधळ, मजा मस्ती..! खूप वर्षाने त्या बंगल्याला आज घरपण आले होते.
दोनेक तासांच्या सजावटीने तो प्रशस्त हॉल अगदी प्रसन्न दिसत होता. सुमीचे स्वयंपाकाचेही आवरत आले होते.


"अर्ध्या तासामध्ये येतोच." म्हणून विराज घराबाहेर पडला.


रावी स्वयंपाकघरात येऊन सुमीला न्याहाळत होती. एवढा सगळा स्वयंपाक एकटीने केलाय तरी चेहऱ्यावर कुठेच थकवा जाणवत नव्हता, उलट तिचा चेहरा टवटवीत दिसत होता.
"तिचा हा आनंद असाच कायम राहू दे." तिने मनोमन देवाला मागणे मागितले.

"झाले एकदाचे!"  ओट्यावरून शेवटचा हात फिरवून सुमी म्हणाली.

"अरेच्चा! तू इथे काय करतेस? विराजला एकट्यालाच कामाला लावलेस का?"  रावीकडे येत तिने विचारलं.

"आमचे केव्हाच आटोपले गं. तुला बोलवायला आले होते तर तू तुझ्या कामात इतकी मग्न होतीस की मला डिस्टर्ब करावंस वाटलं नाही."  तिला बाहेर घेऊन येत रावी म्हणाली.

"वॉव! किती सुरेख सजावट केलीय. खुपच सुंदर! पण पार्टनर कुठेय तुझा?"   सुमी.

" हे काय, आलोच मी."  हातातील पिशव्या सांभाळत विराज आत येत म्हणाला.

"कुठे गेला होता? आणि हे काय आणलेस? "  रावी.

"अगं, बड्डेबॉय साठी शॉपिंग करायला गेलो होतो, मग विचार आला त्याला एकट्यालाच का? तो एकटाच सुंदर दिसेल म्हणून मग आपल्या सगळ्यांसाठी पण खरेदी केली."  तो.


"ते सगळे ठीक आहे रे, पण बड्डेबॉय आहे तरी कुठे? आता सायंकाळ होत आलीय."  सुमी.


" डोन्ट वरी, येईलच थोडया वेळात. तोपर्यंत आपण तयार होऊया. " तो म्हणाला.`आता एकच मिशन.. माझी सुमी.´ डोक्यात फक्त हाच विचार घेऊन डॉक्टर भरधाव निघाले. पुढच्या पंधरा मिनिटात ते रावीच्या फ्लॅटसमोर उभे होते. मनात एक हुरहूर आणि चेहऱ्यावर मुलखाची घाई!
त्यांनी डोअरबेल वाजवली.

"आले, आले. वेट!" म्हणत तिने दरवाजा उघडला.

"अरे, सर तुम्ही? गुड इव्हनिंग! व्हॉट अ प्लिजन्ट सरप्राईज! प्लीज कम ईन."

"गुड इव्हनिंग डॉक्टर श्रुती! कॅन यू कॉल डॉक्टर रावी? प्लीज." ते म्हणाले.

"रावी? ती तर घरात नाहीये सर. इनफॅक्ट मी येऊन तास उलटलाय. तिची बॅग दिसतेय, पण ती नाहीये. आणि तिचा मोबाईलदेखील बंद आहे."  श्रुती.

"ओह! आणि तिची मॉम?" अधिरतेने त्यांनी पुढचा प्रश्न विचारला.

"काय? आँटी आल्यात? मला तर काहीच कल्पना नाहीये. घरात माझ्याव्यतिरिक्त कुणीच नाहीये." ती आश्चर्याने म्हणाली.

"ओके!" म्हणून ते आल्यापावली परत वळले. डोक्यात असंख्य प्रश्न, कुठे गेल्यात ह्या दोघी? त्यांनी किमान दहावेळा तरी रावीला कॉल केला, पण तिचा मोबाईल बंदच येत होता.

`सुमी मला सोडून गेली असेल का?´ मनात आलेल्या प्रश्नाने त्यांचा सगळा उत्साह मावळला. ` तिला का थांबवले नाही मी? का जाऊ दिले? एकदा नको जाऊ म्हटले असते तर ती आता माझ्या सोबत असती.´ स्वतःला दोष देत ते कारमध्ये बसले.
एक शेवटचा मार्ग म्हणून त्यांनी विराजचा नंबर डायल केला.


शॉपिंगच्या पिशव्या सोफ्यावर ठेवत असतानाच विराजचा मोबाईल वाजला.

" शूss! सायलेंट प्लीज, मामाचा कॉल आहे."  तो.
" अरे घे ना मग लवकर, आणि कुठे आहे ते आधी विचार. " सुमी घाईत म्हणाली.

"हो,हो. मी कॉल स्पीकरवर टाकतोय, तुम्ही शांत व्हा!"  असे म्हणून त्याने कॉल उचलला.

"हॅलो विराज, अरे रावी आपल्याकडे आलीय का रे?"  त्याने हॅलो म्हणायच्या आत सरांनी प्रश्न केला. आवाजात अस्वस्थता होती.

" नाही रे, मी तर सध्या बाहेर आलोय. पण काय रे, तूच तर तिकडे जाणार होता ना? काय झाले?"  तो शक्य तेवढ्या शांत स्वरात म्हणाला.

"अरे, मी हॉस्पिटलमध्ये अडकलो होतो. आता आलोय इकडे, तर इथे कोणीच नाहीयेत." हताश होऊन ते.

"हे बघ, तू उगाच टेन्शन घेऊ नकोस. मी दहा मिनिटात घरी पोहोचतोय, तूही लगेच ये मग आपण निवांत बोलूया."
त्याने कॉल कट करून एक लांब श्वास घेतला.

"विराज, सरांशी का खोटं बोललास यार? ते किती टेंशनमध्ये वाटत होते?" त्याला पाठीवर धपाटा मारत रावी म्हणाली.

"जस्ट चिल यार! दहा मिनिटांनी सगळे टेंशन रफुचक्कर होणारच आहे की."  तो हसून.

"हो रे, तरीही.." सुमी.

"मॉम, रिलॅक्स!  एव्हरीथिंग इज फेअर ईन लव्ह अँड वॉर! आणि केवळ दहा मिनिटांचा तर प्रश्न आहे, चला पटापट आपण आपले आवरून घेऊयात."
त्याच्या बोलण्याला दुजोरा देत रावी सुमीला आत घेऊन गेली. विराजही तयारीला लागला.दहा मिनिटांनी उद्विग्न मनाने डॉक्टर साठे बंगल्याचे प्रवेशद्वार लोटून आत आले. तीनदा डोअरबेल वाजवूनही विराज दार उघडेना म्हणून मग त्यांनीच आपल्या जवळील चावीने लॉक उघडले. घरात सगळीकडे अंधार होता.

"विराज!" त्यांनी हाक दिली.
"काय मुलगा आहे, लाईट्स सुद्धा लावले नाहीत." असे म्हणून त्यांनी लाईटची बटन चालू केली.
त्या प्रकाशात सजलेला हॉल उजळून निघाला होता. ते बघतच राहिले.

"हॅपी बर्थडेss!"

तेवढ्यात रावी आणि विराज त्यांच्या पुढ्यात भलमोठा पुष्पगुच्छ घेऊन उभे होते.
रावीला बघून त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले.

" तू इथे? मग सुमी कुठे आहे?"  आश्चर्याने ते.

" म्हणजे आम्ही दोघे इथे एवढे तयार होऊन शुभेच्छा देतोय त्याचे काहीच नाही आणि यांचे आपले सुमी - सुमीच चाललेय." खोटे खोटे रुसत रावी म्हणाली.

"तसे नाही अगं. तुम्हाला खूप खूप धन्यवाद! पण आता तरी सांगा, कुठे आहे माझी सुमी?"
ते उतावीळ झाले होते.

" हो रे मामा, तुझी सुमी इथेच आहे बरं. तू आधी फ्रेश हो आणि मग भेट हं!"  त्यांना आत घेऊन जात विराज म्हणाला.

"हे घे आणि हे घालून लगेच खाली ये."  मघाशी त्यांच्यासाठी आणलेली शेरवानी त्यांच्यासामोर पकडत विराज बोलला.


"अरे, हे कशाला? मी काय लहान बाळ आहे का? खाली एवढी सजावट, हे कपडे?" ते.

"तू लहान बाळ नसलास तरी तुझा हा बर्थडे मात्र खूप स्पेशल आहे. माझ्यासाठी, रावीसाठी, तुझ्यासाठी आणि तुझ्या सुमीसाठी सुद्धा! सो, तयार हो आणि पटकन ये, आम्ही तुझी वाट बघतोय."  त्यांना सांगून तो हॉलमध्ये आला.


थोड्याचवेळात तयार होऊन ते खाली आले. पिस्ता कलरची शेरवानी घातलेले.. अगदी राजबिंडे रूप! सगळे त्यांचीच वाट बघत होते. त्यांची नजर मात्र सुमीला शोधत होती.


"वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!"  लाडूंनी भरलेली प्लेट त्यांच्यासमोर धरत सुमी म्हणाली.


आणि ते तिच्याकडे बघतच राहिले.. पुन्हा एकदा!

.

.

.

क्रमश :

शेवटचा भाग लिहायला म्हणून हाती घेतला, पण एवढं लिहूनही शेवट होईना म्हणून हा शेवटापूर्वीचा भाग.. अंतिमपूर्व भाग!

कथेच्या आधीच्या भागाप्रमाणे  तुम्हाला हा भागदेखील नक्कीच आवडेल. आवडला भाग तर कमेंट करून सांगा. लाईक करा. फेसबुक  पेजवर सुद्धा लाईकचा आकडा वाढू द्या.

 साहित्यचोरी हा गुन्हा आहे. त्यामुळे लेखकांच्या मर्जीशिवाय त्यांचे साहित्य इतरत्र प्रकाशित  किंवा शेअर करू नये. करायचे झाल्यास फबी लिंक शेअर करावी. धन्यवाद!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//