Mar 01, 2024
प्रेम

पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -39

Read Later
पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग -39


आपण वाचत आहात गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित कथामालिका,

पारिजात.. गंध प्रेमाचा..!


(मागील भागात -

सुमीच्या काळजीने रावी तिच्याकडे तातडीने येते पण सुमीला मात्र काहीही झालेले नसते. दुसऱ्या दिवशी अचानक तिथे येऊन विराज तिला सरप्राईज देतो.
त्यावर ती कशी रिऍक्ट होईल, कळण्यासाठी वाचा हा भाग.)


**************


"रावी.."    सुमीने तिच्याकडे असं बघितलं की मग त्यावर काही न बोलता ती त्याची लगेज बॅग आपल्या खोलीच्या दिशेने ओढत घेऊन गेली. तिच्यापाठोपाठ तोसुद्धा गेला.


"हं, ही बघ तुझी रूम. राहा आता हवे तेवढे दिवस. "
त्याचे सामान ठेवत रावी तिरसटपणे म्हणाली.


ती अजूनही रागात आहे, हे त्याला कळत होतं.

"असं का बोलतेस अगं?"    तो.

" आता काय बाबा, तू बाळ झालाहेस माझ्या मॉमचा. आल्या आल्या तिच्यावर आणि माझ्या रूमवर कब्जा केला. मग काय म्हणू मी? "   ती.

"पार्टनर, तू ना जळकुकडी आहेस, आणि मी मॉमचा बाळ झालो असेल ना तरी तू लाडोबा आहेस हे विसरू नकोस."


"आणि काय गं, मी आल्याचा आनंद नाही का झाला तुला? मला वाटलं, मी दिसल्याबरोबर मला मिठी वगैरे मारशील पण तू तर सारखी भांडते आहेस."   तो.

" आनंद? राग आलाय मला तुझा. मी जळकुकडी, मी भांडकुदळ, होय ना? मला न कळवता आला आहेस नी वरून मलाच किती रे बोलतोस? "    बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आले.

"आणि माझ्या बालेकिल्ल्याला भेदून माझी खोलीदेखील बळकावलीस ना?"    डोळ्यातील थेंब पुसत ती म्हणाली.


"अगदीच बावळट आहेस यार तू. तुला सरप्राईज देण्यासाठी एवढया लांबून आलो त्याचं काहीच नाही, शक्कल लढवून तुला इथे बोलावून घेतलं तर त्याचं साधं कौतुकदेखील नाही. उद्या मामाचा वाढदिवस आहे, माहीतीय ना तुला? त्या दोघांना उद्याच्या मुहूर्तावर भेटवण्याची प्लॅनिंग चाललीय माझ्या डोक्यात."
तो तिला समजावू लागला.


"जास्त अक्कल नको पाजळू, मी ऑलरेडी मॉमला उद्यासाठी तयार केलेय, सो तो प्लॅन माझा आहे."     नाक फुगवून ती.


"माझा आहे."       तो.

"नाही माझा."      ती.

"खरंच भांडकुदळ आहेस तू."     तो.

"हो आहेच,  सुमी माझी मॉम आहे, तेव्हा मी म्हणेल तसं होईल."     ती.

"अनी माझा मामा आहे, विसरू नकोस मुलाकडचा आहे मी. " तिला चिडवत तो म्हणाला.

"तुझा मामा भलेही असणार, पण माझे आवडते सर आहेत ते. सो हा प्लॅन.."      ती आपलं वाक्य अर्धवटच बोलू शकली.

"प्लॅन आपला आहे असं म्हण ना."    तिच्या ओठांवर बोट ठेवत तो .
"तिथे असतांना मला आणि इथे तुलादेखील सेम हेच सुचलं, सो, हा आपला प्लॅन.  ओके?"
तिच्या डोळ्यात बघत तो हळुवारपणे म्हणाला.


तो काय बोलतोय, तिच्या डोक्यात जात नव्हतं. त्याच्या काळ्या डोळ्यांनी तिला भुरळ घातली आणि तिदेखील त्यात अलगद अडकली.


"लाडोबा, मी काय म्हणतोय हे कळतंय ना तुला?"
तिचे नाक हलकेच खेचत तो म्हणाला, तशी ती भानावर आली.


"मॉमसोबत लगेच बरंच गुळपीठ जमलंय रे तुझं."    बाजूला होत ती.

"हं, आता मॉम आहेच एवढी गोड, तर जमेलच ना."    तो गोड हसला.

हम्म, तू ये फ्रेश होऊन, तोवर मॉमला बघते मी."    ती बाहेर जात म्हणाली.

पाठमोऱ्या जाणाऱ्या तिला विराज एकटक बघत राहिला.

`त्यादिवशी का सोडून गेलास? म्हणून रडणारी ही, आज मला बघून साधी हसली देखील नाही.´   याचं त्याला नवल वाटलं.

`मॉमच्या लाडाने खरंच लाडोबा झालीय ही. त्यांच्यापुढे स्वतःचे प्रेम पण विसरलीय. पार्टनर, अजीब रसायन आहेस बाबा तू,  तुझ्यापुढे माझा कसा निभाव लागेल कुणास ठाऊक?´
स्वतःशी विचार करत तो बाथरूममध्ये शिरला."भारीच जुळलंय गं त्याच्याशी तुझं? त्याचे लाड काय करतेस? त्याच्या कटात सामील काय होतेस ?"
जेवणाचे पानं टेबलावर ठेवत असणाऱ्या सुमीला रावीने खवचटपणे विचारले.

" आवडला गं तो मला, गोड मुलगा आहे. तुला सांगू?  अनी आणि मी ठरवलं होतं, मुलगा होईल तर त्याचे नाव विराज ठेवायचे. ते काही झालं नाही, पण इतक्या वर्षांनी मला मॉम म्हणणारा हा गोड विराज मात्र मिळाला. "

वाटीमध्ये लाडू घेत अगदी सहजपणे सुमी म्हणाली, जणू काही किती वर्षांची त्याला ओळखते, जन्मोजन्मीचे नाते असल्यासारखे!

रावी गप्प झाली. `मॉमच्या मनात तिचा अनी कसा प्रत्येक क्षणी रुंजी घालत असतो ना?´ मनात आलेल्या विचाराने तिच्या ओठांवर हलके स्मित उमटले.


विराज फ्रेश होऊन आला नी सुमीने पानं वाढायला घेतली. तो येतोय म्हणून तिने आज शांताकाकूला सुट्टी दिली होती. सगळा स्वयंपाक स्वतः केला,  खास त्याच्यासाठी.

" मज्जा आहे बाबा आता एकाजणाची. लाडक्या बाळासाठी काय काय बनवलंय? "   त्याच्याकडे बघून चिडवत रावी म्हणाली.

"मॉम, माझ्यासाठी एवढ्या निगुतीने कधी स्वयंपाक नाही केलास गं?"


"जळकू, जेव गुमान. "     पाठीवर एक धपाटा देऊन सुमीने वाटीतील लाडू वाढायला घेतले.


"मॉम, काय करतेस? लाडू नको वाढू."     तिच्या हातातील वाटी स्वतःकडे घेत ती म्हणाली.

" काय झालं आता? "     सुमी.

"तुम्ही दोघांनी मिळून चीटिंग केलीत माझ्याशी, तेव्हा हे लाडू कोणालाच मिळणार नाहीत. "      रावी.


"वेडी आहेस का? असं तोंडाजवळचा घास काढून घ्यायचा नसतो. दे बरं ते लाडू."


"नो मिन्स नो! " वाटीतील लाडू रावीने अलगद डब्यात ठेवले.

"ही तुम्हा दोघांना मिळालेली सजा आहे, उद्या हवे तेवढे खा पण आज ह्यांना स्पर्शसुद्धा करायचा नाही."
ती निर्वाणीचे बोलली, तसं दोघे काही न बोलता बोलता शांतपणे जेवू लागली. त्या दोघांना तसे बघून तिला हसू आले, पण ते लपवत तिदेखील त्यांच्यात सामील झाली.


"मॉम, सॉरी गं. पण तुझ्या या बेसनाच्या लाडूचा पहिला मान फक्त तुझ्या अनीचाच!"    सुमीकडे एक नजर टाकून ती मनात म्हणाली.
काही वेळ आराम केल्यानंतर गरमागरम वाफाळलेली कॉफी घेऊन त्यांचं त्रिकुट परत एकत्र आलं.

"बच्चा, मी काय म्हणते, विराज पहिल्यांदा आलाय ना इकडे, त्याला जरा फिरवून आण, जरा भटकून या बाहेर. आपण मागे एका लेक साईडला गेलो होतो, तिकडे घेऊन जा. घरात राहण्यापेक्षा या जरा हुंदडून."     सुमी.

"वॉव! लेकसाईड, आय जस्ट लव्ह इट!"     तो एक्साईट होतं म्हणाला.

"कधीपासून तुला आवडायला लागलं रे हे सगळं? मला तर जाम कंटाळा येतोय. "     रावी.

"उगाच भाव खाऊ नकोस. तो म्हणतोय तर आण त्याला फिरवून."      तिचा कान ओढत सुमीने फर्मान सोडले.

"आँs, कानामागून आला आणि तिखट झाला."     ती पुटपुटत उठली.

"पहिल्यांदा आलाय तो आपल्याकडे, जरा नीट कपडे घालून जा. तू पण तयार हो रे."    सुमी.

रावीने सुमीकडे पाहीले, `ही अशी कधीकधी आजी झाल्यासारखी का वागते ना कळत नाही.´     बडबडतच ती आत गेली.


एक सुंदरसा गाजरी लाल रंगाचा घेरदार अनारकली, आणि त्यावर मॅचिंग कानातले झुमके, हलकासा मेकअप, ओठांवर फिरवलेली लिपस्टिक!
तो तिच्याकडे पाहतच राहिला. एवढ्याशा नटण्याने देखील किती सुंदर दिसते ही.

"लूकिंग सो ब्युटीफुल!"
नजर न हटवता तो म्हणाला. 

" थँक यू!  तू देखील छानच दिसतो आहेस. निघायचं? "
कार सुरु करत ती.

"हो "   तो नजर बाजूला करत म्हणाला.


"तुला माहीतीय विराज, मला खूप आकवर्ड होतेय. हा असा ड्रेस घालून कोणी तलाव बघायला जातो का? एवढं नटायला लावलं. काय गरज होती? खूप हट्टी आहे ना मॉम,  म्हणून मी तयार झाले."
ड्रेस नीट सावरत, कारमधून उतरत ती म्हणाली.  बाहेर पाय ठेवला, नी मग मात्र सर्वच विसरली.

निसर्गाच्या उधळण्याने तो परिसर कितीतरी सुंदर दिसत होता. मागच्या वेळेस मॉमसोबत आली तेव्हा किती धमाल केली होती? एकमेकींच्या अंगावर पाणी उडवणे काय, फोटो काढणे काय!


 
आजही सूर्य मावळतीकडे झुकत आला होता,  त्याच्या चंदेरी सोनेरी किरणांनी चमचमणारे पाणी,  पक्षांचा किलबिलाट! विराज तर अगदी मंत्रमुग्ध झाला.


"पार्टनर,  किती सुंदर ठिकाण आहे हे, अगदी तुझ्यासारखं!"
पाण्यात पाय सोडून बसत तो म्हणाला.

"मी सुंदर की नाही,  ते माहीत नाही,  पण ही जागा खरंच खूप छान आहे. मला तर खूप मस्त वाटतं इथे. चार भिंतीसारखं कसलं बंधन नाही की कुणाची भीती नाही. सगळं कसं मोकळं मोकळं ना! असं वाटतं आपल्या भावनांना असेच मुक्त विहरू द्यावं नभातल्या त्या पक्षाप्रमाणे,   वाहू द्यावं इथल्या पाण्याप्रमाणे.

विराज, बघ किती नितळ आहे ना हे पाणी. ह्यासारखे आपले मनही नितळ असेल तर किती छान झाले असते ना?  तुझ्या मनात काय चाललंय ते मला कळले असते नी माझ्या मनातलं तुला. "
त्याच्याकडे बघून ती म्हणाली.


"पार्टनर,   माझ्या मनात काय चाललंय ते तुला कळतेय की नाही माहीत नाही,   पण तुझ्या मनात काय चाललंय ते मात्र मला कळते बरं का."
तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.
त्याच्या त्या नजरेने तिच्या काळजात कालवाकालव झाली. ती तिथून उठून बाजूला जायला वळणार, तोच त्याने तिचा हात पकडला. ती शहारली, तो स्पर्श तिला नेहमीपेक्षा जरासा वेगळा भासला.


"पार्टनर "   तिचा हात हातात घेत त्याने साद दिली.
" पार्टनर तर आहेसच तू, पण माझी लाईफ पार्टनर होशील का? "  तिचा हात पकडून तो म्हणाला.


"तुझ्या त्या डॉक्टर गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याची प्रॅक्टिस करतो आहेस ना ? "
तिने विचारलं.


"हो,  हवं तर तसेच समज."
तिच्यासमोर गुडघ्यावर बसत तो म्हणाला.

"सो, मिस गोंधळेकर, आय मिन, डॉ. रावी, विल यू मॅरी विथ मी? लग्न करशील माझ्याशी?"
खिशातून काढलेली अंगठी तिच्यासमोर धरत त्याने अगदी फिल्मी अंदाजात तिला विचारलं.

डोळे फाडून ती त्याच्याकडे बघू लागली.

"अशी केवळ बघू नकोस गं.  बोल ना पार्टनर, आयुष्यभरासाठी माझी लाईफ पार्टनर होशील का? तू आवडतेस मला,  खूप जास्त आवडतेस. तुझा अवखळपणा, तुझा उडणारा गोंधळ, भरभरून देण्याची वृत्ती. सगळ्यांच्या प्रेमात केव्हाचा पडलोय मी. माझं हे प्रेम तू ऍक्सेप्ट करशील? माझी होशील?"

ती काहीच बोलली नाही,  तिच्या डोळ्यातून एक मोती निखळून त्याच्या हातावर पडला.

"अगं, का रडतेस तू? प्लीज रडू नको ना. मी काही चुकीचं बोललो असेल तर माफ कर मला."

तिच्या दोन्ही हातांना पकडून तो तिच्या समोर उभा झाला.


"नाही रे, मला वाटलं मीच तुझ्या प्रेमात पडलेय, पण तू तर मला प्रपोज करून सरप्राईजच दिलेस."
डोळ्यातील पाणी वाहतच होतं.

"सॉरी गं. तुला रडवण्याचा माझा हेतू नव्हता, हवं तर मी माझे प्रपोजल मागे घेतो."
तिचे डोळे पुसत तो म्हणाला.


"वेड्या आनंदाश्रू आहेत हे, मी नाही केव्हा म्हणाले?"
त्याला टपली मारत ती म्हणाली.

"पण मग हो तरी केव्हा म्हणालीस?"       तिला शब्दांच्या जाळ्यात त्यानं बरोबर पकडलं.

तो तिच्याकडे एकटक पाहत होता, त्याच्या बघण्याने तिच्या चेहऱ्यावर लालिमा पसरली होती.


" हो!  आपली ही पार्टनरशिप लाईफटाइम कंटिन्यू करायला आवडेल मला."    त्याच्या काळ्याभोर डोळ्यात बघत ती हळुवार म्हणाली.

"तरी मला आवाज नाही आलेला, एकदा जरा मोठ्याने सांग ना. " त्यानेही तिच्या डोळ्यातील नजर तशीच ठेवत म्हटलं.

" खरंच ऐकायचं आहे तुला?"    ती.

"हम्म!"      तो.

त्याचा हात सोडून तिने मान वळवली.

"हेय, एव्हरीवन, लिसन टू मी!  डॉ. रावी इज ईन लव्ह! आय लव्ह विराज! आय वॉन्ट टू लिव्ह एव्हरी मोमेंट ऑफ माय लाईफ विथ हिम!"
दोन्ही हात तोंडाजवळ नेऊन ती मोठयाने ओरडली.

"विराज, मला खूप भारी वाटत आहे, एकदम हलकं झाल्यासारखं. खूप मोकळं मोकळं, अगदी इथल्या वातावरणासारखं. तू पण असा ओरडून बघ ना, मस्त वाटेल."

तिची अखंड बडबड परत सुरु झाली.त्याने तिला पुन्हा स्वतःकडे ओढलं. गालावर आलेली केसांची अल्लड लट कानामागे करत तिच्या मस्तकावर ओठ टेकवले.

"माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे,  इवन मॉम आणि माझ्या मामाला सुद्धा! पण या क्षणी ही सुंदर भावना मला फक्त तुला सांगायची आहे.


रावी आय लव्ह यू..! आय लव्ह यू अ लॉट! खूप मिस केलं मी तुला, प्रत्येकक्षणी. पण जेव्हा वाटलं आता नाहीच जगू शकत तुझ्याविना, तेव्हा सगळं सोडून इथे आलोय, तुझ्याकडे."     तो बोलत होता.


"विराज, आय लव्ह यू टू!"

ती त्याच्या मिठीत केव्हा विरघळली, तिलाही कळले नाही.


.

.

.

क्रमश :

************


नाही म्हणता म्हणता बराच मोठा झाला हा part. आवडला ना तुम्हाला?   आवडल्यास एक लाईक नक्की करा.

रावी आणि विराजचे तर जुळले. अनी आणि सुमीचे काय? कळण्यासाठी वाचा पुढील भाग! 
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//