पारिजात.. गंध प्रेमाचा..! भाग - 23

Ravi And Viraj.. ❤


आपण वाचत आहात एक गंधाळलेल्या प्रेमाची सुगंधित प्रेमकथा…
पारिजात… गंध प्रेमाचा..!

( मागील भागात आपण वाचलंत…
रावी आणि विराज बाहेर गेलेत. तेथे त्यानं तिला त्याच्या आयुष्यातील एका दुःखद प्रसंगबद्दल सांगितलं. तिनेही आपल्या घरच्यांबद्दल सांगितलं.
आणि हे सांगितलं की आपलं दुःख कुरवाळत बसण्यापेक्षा आपल्या समोरचा पेला भरला आहे हे जर कळलं तर जीवन नक्कीच सुखकर होईल…
आता पुढे.)

************


मला माझा पेला अर्धा भरलेला वाटतो… आणि तूला तुझा पेला अर्धा रिकामा..!

चेंज युअर वे ऑफ थिंकिंग पार्टनर…
मग तुलाही तुझा पेला अर्धा का होईना पण भरलेला दिसेल..!"
त्याच्या हातावर हात ठेवत ती म्हणाली.

त्याचा डोळ्यातून एक टपोरं थेंब तिच्या हातावर पडलं…

" सॉरी..
भावनेच्या भरात वाहून गेलो अगं..!"
डोळे पुसुन स्माईल करत तो म्हणाला.

" अरे सॉरी काय त्यात.
रडण्याचा मक्ता काय फक्त स्त्री जातीनेच घेतला आहे का..?
तूला रडावं वाटतं ना मग रड की बिनधास्त..!
रडणं हे कमकुवतेच लक्षण नाहीये विराज.कधीकधी ते देखील आवश्यक असतं.
आपल्या भावनांना असं मनात दाबून ठेवण्यापेक्षा एकदाचं रडून मोकळं होऊन जावं.. या मताची आहे मी. "

ती म्हणाली.

" तू ना वेगळीच आहेस. म्हणजे अगदी युनिक वाटायला लागलीस मला. एखाद्या मुलीनं मला रडताना बघितलं असतं तर तिनं वेगळंच काही सांगितलं असतं.. तू तर मला रडायला सांगतेस. "

तो हसत म्हणाला.


" तसं नव्हे रे वेड्या.
हसायला आलं तर हसतोच ना आपण मग कधी रडावंस वाटलं तर का रडू नये..?
आपल्या मनाची कुचंबणा नं होता जगता यायला हवं आपल्याला. त्याआधी मनाला काय हवंय ते कळता यायला हवं आपल्याला. "

त्याला समजावत ती म्हणाली.

" किती छान सांगतेस गं तू! वाटतं ऐकतच राहावं. असं कधी कोणी बोललंच नाही गं माझ्याशी. "
-तो.

रावीनं बघितलं त्याच्याकडे..

"तूला माहितीय.. तू ना अगदी माझ्या मॉमसारखाच आहेस. ती देखील अशी एखाद्या गोष्टीत अडकली की बाहेर पडणं कठीण होऊन जातं.
तुही अडकलाहेस विराज तूझ्या भूतकाळात..! त्यातून बाहेर निघता येत नाहीये तूला. मी मॉमला तिच्या पास्टमधनं बाहेर पडायला हेल्प करतेय.. तसंच तुझ्याही आयुष्यात असेल ना कुणीतरी तुझ्यावर प्रेम करणारी एखादी व्यक्ती?
एकदा मनापासून डोळे मिटून त्या वक्तीला आठवून बघ.. मनातले सर्व क्लेश बाजूला सार.. मग तुलाही सर्व सोप्प होईल अरे."

ती बोलत होती.

"तू सायकोलॉजिस्ट आहेस का गं..?"

भुवया उंचावून त्यानं विचारलं.

" गप रे. पण तूला सांगू..?
आयुष्य एकदाच भेटतं.. ते भरभरून जगता यायला. हवं..
आणि आता खुप भूक लागलीय तेव्हा जेवायला हवं.
जावूया? "

उठत ती म्हणाली.


" चल "

तोही उठला.

उठतांना तिला जाणवलं कितीतरी वेळापासून तिचा हात त्याच्या हातावरच होता..
आता ओशाळून तिनं तो झटक्यानं ओढून घेतला तसं तोल गेला तिचा..

" अगं.. अगं! सांभाळून.
त्यानं तेवढ्याच तत्परतेनं तिला स्वतःकडे खेचलं.
ती धाडकन त्याच्या छातीवर आदळली.
हृदयाची स्पंदनं जुळतच होती की पटकन ती बाजूला झाली.

नजर चोरत तो पुढं निघाला.


" विराज..!"

तिच्या हाकेने पाय थांबले त्याचे.

" तूझ्या शर्टवर.. "

ती चाचरत म्हणाली.

" काय? काय झालं शर्टला.."

"डोन्ट बी पॅनिक. लिपस्टिकचे डाग लागलेत.. पण थांब मी पुसते.."

ती आपल्या रुमालानं ते मिटवायचा प्रयत्न करू लागली.

" अगं अगं.. काय करतेस?
तो डाग आणखी पसरतोय ना..? "
" काय करू मी आता? पाण्याने पुसू का? "
ती.
" खरंच असं करणारेस तू..?"
त्याच्या डोक्यावर आठी आली.
" नाही म्हणजे नको. एक कामं कर मला ना तुझा शर्ट दे , मी तूला उदया धुवून परत करते. "

तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ त्याला स्पष्ट दिसत होता.

" आतापर्यंत मारे फिलॉसॉफर बनली होती पण वेंधळी ती वेंधळीच राहणार.."

तो मनात म्हणाला.

" असू दे गं. माझ्याघरी देखील आहे वॉशिंग मशीन. मी टाकेन धुवायला. "

त्याच्या ओठांवर एक मिश्किल हसू होतं.

" तूला राग नाही ना आला विराज? मी ना तूला सेम शर्ट गिफ्ट करेन. "

ती आपलं डोकं चालवत म्हणाली.

" हम्म तसा आला होता राग पण तू दुसरा शर्ट गिफ्ट करायचं म्हणतेस तर गेला आता. "
तो थोडा गंभीर होत म्हणाला.

" किती गं तूझ्या पिटुकल्या डोक्यात विचार येतात. राग बिग नाही आलेला. चल जाऊयात आता? "
तिच्या डोक्यावर टपली मारत तो.
तीही रिलॅक्स होत निघाली त्याच्याबरोबर.

वांग्याचं भरीत , भाकरी , सोबतीला मिरची आणि लसणाचा ठेचा..!
अगदी सगळा गावरान मेनू होता जेवणात.
तिला हे आवडायचं सगळं. पण तो पहिल्यांदा अशी चव चाखत होता. जास्त काही नं बोलता मन भरून तो खाण्यात गुंगला.
त्याला असं खाताना बघून तिला मनात हसू येत होतं.. पण शिताफिने ते ओठापर्यंत आणायचं टाळलं तिने.
काही वेळाने तृप्त होऊन दोघे निघाले तिथून.

" आता मी करणार हं ड्राईव्ह! "

विराज म्हणाला.

" ok बॉस! कार तुझीच आहे. "

ती.

" बॉस काय गं? आपण पार्टनरच बरे. "

तो हसला तशी तीही हसली.

" तूला सांगू. आयुष्यातले खुप सुंदर क्षण जगलोय मी आज.
थँक्स फॉर दिस!"

तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

" हमारी दावत में आके आप खुश हुए.. इसके लिये शुक्रिया जनाब!"

ती.

" एक विचारू?? तूला जास्त मित्र नाहीत का? नी ती तुझी गर्लफ्रेंड हनी? तिच्याबद्दल नाही सांगितलंस काही? "

तिनं पुन्हा त्याला त्याच्या हनीची आठवण करून दिली.

" मित्र खुप आहेत गं मला पण क्लोज असं कोणी नाहीये.
अँड लिसन हनी इज नॉट माय गर्लफ्रेंड. "


" हां खरंच? मग हनी हनी का म्हणत होतास तिला? "


" हो गं बाई खरंच नाहीये ती माझी गर्लफ्रेंड!"

तो हात जोडत म्हणाला.

"... आणि मी एकटाच नाही तर सगळेच हनी म्हणतात तिला. तिचं नावच ते आहे यार. "

त्यानं कंटिन्यू केलं.

" एवढा चिडतोस काय रे? "

ती लहानसा चेहरा करून म्हणाली.

" मग तू काय सारखी तिच्या नावाचं टूमणं घेवून मागे लागलीहेस. तूला वाटतं का मी त्या टाईपचा मुलगा असेल म्हणून. "
तो.

" आता मला कसं माहित? एवढा हँडसम आहेस तर असतीलच ना तूला गर्लफ्रेंडस? "

" काय म्हणालीस हँडसम? "

त्यानं हसून विचारलं.


" म्हणजे मी नाही.. माझी रूममेट म्हणते तसं. "
ती म्हणाली.

" म्हणजे तूला नाही मी हँडसम वाटत?"

तिची खेचायचा मूड झाला त्याचा.

" तसं नाही रे म्हणजे आहेस जरा ठीक. "
ती म्हणाली.

" केवळ ठीक? "
तो.

" हां.. म्हणजे बरा..!"
ती गालात हसत म्हणाली.

आता तिची नजर बाहेर होती.

वाऱ्याने भुरूभुरू उडणारे केस उगाच गालावर येत होते.
कार चालवता चालवता एक कटाक्ष तिच्यावर पडत होताच त्याचा.

" कसली गोड दिसतेय यार ही..! आवडायला लागली का मला..? "
मनातल्याच प्रश्नानं चमकला तो.


केस जास्तच उडायला लागले तसं तिनं क्लचरने केस बांधायला घेतले.

" राहू दे ना छान दिसताहेत."
अचानक त्याच्या तोंडून निघून गेलं.

" काय? "

त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत ती म्हणाली.

" काही नाही गं. सोड ते.. "


तिनं केस बांधता बांधता हात खाली आणला. आणि त्याच्याकडे पाहायला लागली.

" सोड ते म्हणजे.. मघा तू तुझ्या मॉमबद्दल सांगत होतीस ना त्यावर बोलू असं म्हणायचं होतं मला. "

स्वतःला सावरत तो म्हणाला.

" एवढी गोड मुलगी असतांना भूतकाळात कुठे अडकली म्हणालीस तू?"

त्यानं विषयात हात घातला.

" ते होय.. अरे तिचा लहानपणीचा एक बॉयफ्रेंड होता.. "

केस बांधत ती म्हणाली.

" बचपन का प्यार हं..? "
तो.

" हम्म! खरंखूर प्रेम होतं यार त्यांचं."
ती.

" वॉव! इंटरेस्टिंग..!"
तो मजा घेत म्हणाला.

" इट इज नॉट इंटरेस्टिंग ऍट आल..! रॅदर इट्स व्हेरी पेनफूल!
सारखा एक गिल्ट असतो माहितीय माझ्या मनात. तो अपघात नसता ना झाला तर कदाचित तिचं लग्न लावून दिलं असतं आजोबांनी. माझ्या जबाबदारीमुळे तिचं सगळं आयुष्यच उध्वस्त झाल्याचं फील येतो कधीकधी मला. असं वाटतं आता आपणच लावून द्यावं तिचं लग्न."
ती खिन्नपणे म्हणाली.


"ठीक आहे ना मग लावून देवूया लग्न. "
तो.

" एवढं सोपं नाहीये रे ते. तो मुलगा मिन्स ते अंकल अजूनही अविवाहित आहेत का नाही मला कुठे माहितीय."

ती त्याच्याकडे बघून म्हणाली.

" अगं सोपंच तर आहे हे. त्यांच नाव सांग आपण शोधूया फबी किंवा इतर सोशल मीडियावर. "

तो काहीतरी मोठं सुचल्यासारखा म्हणाला.


" तूला मंद वाटते का रे मी? म्हणजे मला नसेल का सुचलं हे?
पण त्यांचं खरंखूरं नाव नाही माहितेय मला. "

ती थोडी चिडून म्हणाली.

" कठीण आहे पार्टनर . बट नॉट इम्पॉसीबल!नेक्स्ट मिटिंग मध्ये भेटेन ना आंटीला तेव्हा मी नक्की विचारेन बघ नाव."
चेहऱ्यावर वेगळीच चमक होती त्याच्या.

" स्वतःला खुप स्मार्ट समजतोस का? "
ती.

" आहेच मी. तूला काही डाउट आहे का? "

आपल्या केसांवरून हात फिरवत तो म्हणाला.


" कुठून येतो एवढा ओव्हर कॉन्फिडन्स… गॉड नोज."

एकटीच बडबडत ती सिटला डोकं टेकून बसली. सोबत डोळेही मिटून घेतले.

थोड्यावेळाने त्यानं कारला ब्रेक लावला.

" आता काय झालं विराज?"
डोळे मिटूनच तिनं विचारलं.


" सॉरी यार.. उतरावं लागेल तूला. "
तो नाराजीच्या सुरात म्हणाला.

" काय झालं रे?कशी कार तुझी? घरी कशी जाणारे मी?? "

तिच्या प्रश्नांचा भडीमार सुरु झाला.

" मिस गोंधळेकर .. आलंय घर तुझं. म्हणून उतर म्हणतोय. "
तिच्या डोक्याला टपली मारत तो म्हणाला.

" असं सांगायचंस ना. केव्हाची बसलेय मी इथे? "

बाहेर निघत ती म्हणाली.

" गूड नाईट पार्टनर.. "
त्यानं हात हलवला.

" गूड नाईट. "
ती प्रसन्न मनाने आत गेली.


.
.


..चेंज करतांना शर्टवर तेच लिपस्टिक चे डाग त्याला दिसले.अनं ओठावर अलगद हसू उमटले.
एव्हाना असं कधी चुकूनही झालं असतं तर किती ओरडला असता तो. हा व्हाईट शर्ट त्याचा खास आवडता होता. पण आज मुळात राग आलाच नव्हता त्याला.
दिवसभरातील तिचे वेगवेगळे रूप तो आठवू लागला.
कधी फ्रेंड… कधी गाईड.. कधी बनलेली फिलॉसॉफर. आणि कधी कधी अगदीच वेंधळी झालेली ती.
त्याला हसूच आलं परत.
" मिस गोंधळेकर.. आय थिंक आयम फॉलन इन लव्ह विद यू.."
तो स्वतःशीच म्हणाला.

हातातील शर्ट धुवायला न टाकता नीट घडी करून आलमारीत ठेवून दिला त्याने.
बेडवर पडल्या पडल्या तिचेच शब्द कानात फिरत होते.
" तुझ्याही आयुष्यात असेल ना तुझ्यावर प्रेम करणारी एखादी व्यक्ती?
एकदा मनापासून डोळे मिटून त्या वक्तीला आठवून बघ.. मनातले सर्व क्लेश बाजूला सार.. मग तुलाही सर्व सोप्प होईल.. "
त्यानं खरंच डोळे मिटले..

त्या व्यक्तीचा चेहरा आपोआपच नजरेसमोर आला. आजही जीवापाड प्रेम करतो हे ठाऊक होतं त्याला.. पण माफ करण्याचं धारिष्ट नव्हतं त्याच्यात..
त्यानं आपली कूस बदलली..!


" खरंच किती मूर्ख आहे ना मी? मॉमबद्दल सगळं त्याच्याशी शेअर करण्याची काय गरज होती…
काय विचार करेल तो माझ्या मॉमचा? "
विचारानं झोपच उडाली..

श्रुती नव्हती आज घरी.. ती हातात मोबाईल घेवून उठून बसली.

" मी सांगितलेलं सगळं विसरून जा म्हणून मॅसेज करू का याला? "
तिनं मोबाईल बघितला.. तो ऑनलाईन होता.

" hi"
"झोपला का? "

मोबाईलच्या टुक टुक आवाजानं त्यानं पाहिलं.. पार्टनरचे मेसेज.

त्याच्या रिप्लाय ची ती वाट बघत बसली.

हातातला मोबाईल व्हायब्रेट झाला..
मोटूचं नाव झळकलं स्क्रीनवर.

" हॅलो.. "
" हा बोल ना "
" अरे मी मॉमबद्दल बोलले ना.. "

" डोन्ट वरी पार्टनर. आता मी आहे ना होईल सगळं नीट. " तो म्हणाला.

" झोप आता.. गुडनाईट!"


गुडनाईट म्हणून तिनं कॉल कट केला..
डोक्यातले विचार शांत झाले होते.
हळूहळू झोप डोळ्यांवर यायला लागली ...



          क्रमश :


  ***********************************

तर कसा होता आजचा part..?

नक्की सांगा. आपल्या अभिप्रायाची मलाही ओढ असतेच.

पुढील भाग लवकरच...


आणि हो...

प्रेम हे.. बावरे..! ही लघुकथा लिहिलीय. जमलीय का ते वाचून नक्कीच सांगा.

🎭 Series Post

View all