Feb 29, 2024
प्रेम

पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -24.

Read Later
पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -24.


आपण वाचत आहात… एक सुगंधित कथामालिका…
पारिजात… गंध प्रेमाचा..!( मागील भागात आपण सैर केली रावी आणि विराज सोबत "व्हिलेज वॉक " मध्ये..


आपल्या आयुष्याचा भूतकाळ सांगता सांगता विराज हळवा झाला होता. तेव्हा रावी त्याला समजावते. त्याचवेळी नकळतपणे ती तिच्या मॉमचा भूतकाळ त्याला सांगून टाकते. घरी पोहचल्यावर तिला ते अयोग्य वाटल्याने ती विराजशी फोनवर त्याबद्दल बोलाते. तो तिला समजावतो… आता पुढे.)

**********"...डोन्ट वरी पार्टनर. आता मी आहे ना होईल सगळं नीट. " तो म्हणाला.

" झोप आता.. गुडनाईट!"


गुडनाईट म्हणून तिनं कॉल कट केला..

डोक्यातले विचार शांत झाले होते.
तरी ह्याला एवढ्या विश्वासाने कसं काय सांगू शकले एवढं हा प्रश्न डोक्यात फिरत होताच.
हळूहळू झोप डोळ्यांवर यायला लागली …

उदया पुन्हा नव्याने सुरुवात..!

.
.
.
.

" काय तू परत डेटवर गेली होतीस..?
श्रुती हिरमुसून बोलत होती.

" डेट नव्हे गं. माझ्यावर ड्यू होता ना म्हणून. रावी किसी का उधार नही रखती. "

रावी हॉस्पिटलसाठी तयार होत होती.

" हम्म. तरीही तो डेटचाच प्रकार झाला . बाय द वे.. नेचर नी कसा आहे तो ..?

चौकसपणे तिने विचारलं.

" बरा आहे.शुद्ध एकदम निर्मळ वाटला मला ! "
-रावी.

" ओहो..! एवढं कौतुक..? मग तर अजिबात सोडू नकोस त्याला. "
-श्रुती.

" काय बोलतेस तू श्रु? "

" सिरीयसली बोलतेय यार. असा मुलगा सहसा गावत नाही कुणाला.पण तूला सापडलाय तो. देन डोण्ट लिव्ह हिम. "
-श्रुती.

रावी तिच्याकडे बघत होती.

" लेट मी एक्सप्लेन.. म्हणजे हे बघ मी आता एंगेज आहे. एवढी मुलं बघितली. तेव्हा मुलांबद्दल एवढं कळतं मला. तू सांगितलेली निर्मळतेची क्वालिटी सहसा सापडत नाही आजकाल. He is a different guy.. मला आता कसलंच टेन्शन नाही.. माझी रावी योग्य मुलाला डेट करतेय. "
श्रुतीच्या डोक्यात भलताच किडा वळवळायला लागला.

" माते प्रणाम! "
तिला हात जोडत रावी म्हणाली.
" तुम्ही तुमच्या डोक्यातील विचारांना ज्या प्रवाहात वाहत न्यायचेय तिकडे न्या. बट आय हॅव टू गो नॉव. तुझ्याशी बोलत बसले तर उशीर होईल मला."
ती हॉस्पिटलला जवळजवळ पळालीच .

" कुछ कुछ होता हैं तुम नही समझोगी रावी."

श्रुतीचं मनात सुरूच होतं.
.
.
.
.

... हास्पिटलच्या कामात इतक्या दिवसांत रावी बऱ्यापैकी एक्स्पर्ट झाली होती.ओपीडी चे पेशंट, नार्मल डिलिव्हरीज एकटी सांभाळू शकत होती. हुशार ती होतीच , आणि कॉन्फिडन्स..??  तो तर कुटून कुटून भरला होता अंगात. डॉ. साठ्यांनी तिला आपल्यासोबत ओटीमध्ये प्रवेश करवून घेतला होता. आजपर्यंत त्यांच्यासोबत बरेच सिझेरीयन सेक्शन असिस्ट केले होते, पण अजूनतरी एकटीने सर्व करायचा योग जुळून आला नव्हता.दोघांच्या नात्यातही बराच फरक पडला होता. डॉक्टर रावी म्हणता म्हणता कधी ते तिला एकेरी संबोधू लागले होते. त्यांच्या बद्दल तिच्या मनात आधीच नितांत आदर होता. आता हळूहळू प्रेमाचा ओलावा निर्माण होत होता. येवढया वर्षांत मॉम मुळे कधी वडिलांची गरज जाणवलीच नव्हती तिला.मात्र आताशा डॉ. साठेंमध्ये नकळत एक फादर्ली फिगर ती फील करायला लागली होती. डॉक्टर होतीच ती त्यामुळे जेव्हा ते तिला डॉक्टर म्हणायचे तेव्हा प्रोफेशनल वाटायचं सगळं. पण इतक्यात जेव्हा ते तिला रावी म्हणायचे.. एक हक्काचं आपलेपणा जाणवयचा तिला.कधीकधी वाटायचं खुप जवळचं नातं आहे यांच्याशी.. असं का वाटतेय शोधावंस नाही वाटलं कधी.

आणि डॉक्टर साठे..?

त्यांचेही काहीसे असेच झाले होते. आजवर ते कोणत्याच स्टुडंटमध्ये एवढे पर्सनली इन्व्हॉल्व्ह झाले नव्हते.नावापूर्वी डॉक्टर लावल्याशिवाय ते कधी कोणाशी बोलत नसत. पण रावीशी बोलतांना ते एकेरीवरती केव्हा आले त्यांनाही नाही समजलं. आवडायचं त्यांना तिच्याशी बोलत राहायला. तिच्या डोळ्यात त्यांच्याबद्दल असणारे आदरयुक्त प्रेम त्यांच्या अनुभवी नजरेतून सुटले नाही. पण असं का हे त्यांनाही नाही कळले कधी...

हे सगळं तिच्याबद्दल वाटणं केवळ तिच्या नावामुळे होते की त्या नावाशी निगडित असणाऱ्या एखाद्या आठवणीमुळे…??जे चाललंय ते बऱ्यापैकी ठीक चाललं होतं.. पण लवकरच एक रात्र अशी उजाडणार होती की आयुष्यातील गणिताची चुकलेली प्रमेय सुधारण्याची संधी प्रत्येकाला मिळणार होती…

दोन दिवसांपूर्वीच इव्हीनिंग शिफ्ट संपून रावीची नाईट शिफ्ट सुरु झाली होती.
नेहमीप्रमाणे आजही ती ड्युटीवर आलेली. हास्यविनोद, गप्पा टप्पा. दोन तासांत झालेल्या तीन डिलेव्हरीज..!
आजची रात्र सगळ्यांना जागून काढावी लागेल हे पक्के होते . त्यात साठे सर नव्हते आज सोबतीला. ते आज का आले नाहीत याचे उत्तर कुणाकडेच नव्हते.

रात्रीचे अकरा वाजत आलेले. त्याच वेळी एक पेशंट दाखल झाली. इमरजन्सी केस. पंचवीशीची एक पहिलटकरीण…
नुकताच नववा महिना लागलेला…
हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा रक्ताने माखून होती अक्षरशः!आतासुद्धा रक्ताची धार लागलेली.रावीनं त्वरित तिला बेडवर घेतलं.तिची फाईल पहिल्याबरोबर रावीच्या ध्यानात आले की बाळाची वळ खाली असल्यामुळे तिला रक्तस्त्राव सुरु होता. कंम्प्लिट बेड रेस्ट सांगूनही सासूने तिला कामाला लावले होते… आणि हे सगळे घडले.
रावीने एक जळजळीत कटाक्ष नातेवाईकांकडे टाकून तिला इमरजन्सी ओटी मध्ये घेण्याची सिस्टरला ऑर्डर दिली.

"सिस्टर त्वरित साठे सरांना कॉल करा. "

रावी सीमा सिस्टरला म्हणाली.

"मॅडम सरांना फोन केलाय लागत नाहीये."
सीमा.
" सिस्टर कॉल क्वीकली टू अनेस्थेसियॉलॉजिस्ट.अरेंज द ब्लड फ्रॉम ब्लड बँक.. आता लगेच तिला ओटीमध्ये घ्या.बालतज्ञाना बोलवा… "

रावी पटापटा ऑर्डर सोडत होती.

"मॅम बट साठे सर यायचे आहेत अजून. आणि ती पेशंटदेखील आपल्या हॉस्पिटलची नाहीये. पहिल्यांदा आलीय आपल्याकडे."
सीमा सिस्टर.

" व्हॉट द हेल दिस इज? तुमच्या हॉस्पिटलची पेशंट नाहीये म्हणून तुम्ही उपचार नाही करणार? सरांना कॉल करत रहा. पण त्यांची वाट पाहत थांबणे अशक्य आहे सिस्टर.ती पेशंट मृत्युच्या दारात आहे आपल्याला क्विक स्टेप उचलावी लागेल."
रावी चिडली होती.

"पण काही झाले तर..? "
सीमा सिस्टर.

" त्याची जबाबदारी माझी. पण सरांची वाट बघत थांबलो नी काही झालं तर ती रिस्क मी घेणार नाही."

अंगात ऍप्रॉन चढवत तिनं ओटीत प्रवेश केला.

रक्ताच्या सड्यात पडलेल्या त्या पेशन्टचे रावीने स्वतःच्या जबाबदारीवर ऑपरेशन करून चिमण्या बाळाला बाहेर काढलं तेव्हा तिच्या डोळ्यातून दोन थेंब गालावर ओघळले.बालतज्ञानी बाळ ठीक आहे म्हणून सांगितले तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडला.
एक जीव वाचला होता तर दुसरा जीव अजूनही मृत्युच्या दारात हेलकावत होता...
अतीरक्तस्त्रावामुळे पेशन्टचे ऑक्सिजन लेवल कमी होवू लागले होते. तोपर्यंत अरेंज केलेले ब्लड तिला लावण्यात आले. तिची पूर्ण कंडिशन मॉनिटर करण्यात येत होती. अर्ध्याएक तासाने जेव्हा तिचे बीपी आणि पल्स रेट नार्मल येऊ लागले तेव्हा रावी थोडी रिलॅक्स झाली.

" डॉक्टर.. नॉव शी इज आऊट ऑफ डेंजर बट स्टील वि हॅव टु मॉनीटरेट  ट्वेंटी फोर अवर्स फरदर.. "

भुलतज्ञ तिला सांगत होते.

"... नॉव शी इज आऊट ऑफ डेंजर.."
हेच ऐकायला तिचे कान केव्हाचे आसूसले होते. डॉक्टरांचे हे वाक्य कानावर पडले आणि तिने डोळे मिटून एवढा वेळ अडवलेल्या अश्रुंना मोकळं होवू दिलं.
त्या पेशन्टचे प्राण तिच्या एकटीमुळे नव्हते वाचले. दयाट वाज अ टीमवर्क. पण तिने नेमक्या वेळेला घेतलेला निर्णय.. तेही स्वतःच्या जबाबदारीवर..! त्या वेळेला तीच खरी देवदूत ठरली होती त्या दोन जिवांसाठी.

काहीवेळात डॉ. साठे तिथे पोहचले.त्यांना अपडेटस कळले होते.

" डॉक्टर.. रिलॅक्स नॉव. एव्हरीथिंग इज अलराईट!"

तिच्या पाठीवर हात ठेवून साठे सर म्हणाले.
त्या आश्वासक स्पर्शाने ती वळली… आणि सरांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडायला लागली.
" व्हेअर  वेअर  यू  सर?  कुठे होतात सर तुम्ही..?? खुप गरज होती मला तुमची. पेशंटला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते."

तिचं रडणं सुरूच होतं.

" रिलॅक्स रावी.. ती आणि बाळ दोघेही ठीक आहेत आता. "

ते तिला आश्वस्त करत म्हणाले.

" आय प्राऊड ऑफ यू डॉक्टर. यू सेव बोथ लाईवस सेफली..! अँड लिसन.. मी प्रत्येक वेळेस तूझ्या सोबत असेन नसेन.. पण तुझ्यातला आत्मविश्वास असाच कायम ठेव बेटा.. आयुष्याच्या प्रत्येक सिचूएशन मध्ये तारुन जायला तेच कामी येतं. नॉव कम विथ मी इन केबिन. "

बोलतांना त्यांचा आवाज काहीसा घोगरा झाला होता.

" सिस्टर प्लीज सेंड अ फ्लास्क ऑफ कॉफी फॉर अस. "
जाता जाता सिस्टर ला ऑर्डर देऊन ते निघाले..


" आय एम सॉरी सर. मी जरा जास्तच रिऍक्ट झाले होते... "
कॉफीचा घोट घेत रावी म्हणाली.

" इट्स ओके रावी. खरं तर मोबाईल सायलेंट मोडवर असल्याकारणाने मला कळलेच नाही इकडे काय सिचूएशन होती ते.कधी कधी आपला कस लागतो अशा परिस्थितीत. त्यातून तू तावूनसुलाखून निघालीस बाहेर. खरंच खुप कौतुक वाटतंय मला तुझे. "

सरांच्या डोळयात अभिमान होता तिच्यावषयीचा.

" खरं तर सर हे तुमच्यामुळेच शक्य झालं. तुम्हीच शिकवलं होतं मला पेशन्टच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघ आणि मग त्यांना ट्रीट कर. मीही तेच केलं. त्या एका क्षणापुरतं मी स्वतःलाच इमॅजिन केलं तिच्याठिकाणी. आणि मग मरणाच्या वाटेत असतांनाही बाळासाठी सुरु असलेली तिची तगमग अनुभवली मी. त्याचमुळे क्षणात निर्णय घेता आला मला. "

ती सांगत होती. तेव्हाच सरांच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब गालावर ओघळताना दिसला तिला.

" सॉरी सर. तुम्ही एवढे हळवे आहात.. माहिती नव्हतं मला. "

त्यांना तसं बघून तिला चुकल्यासारखं वाटलं.

" व्हाय आर यू सेईंग सॉरी? पेशंटची वेदना अनुभवणे काय असते मला माहितीये. तू विचारलंस ना मघा की कुठे होतो मी म्हणून..?? वर्षातली ही एक रात्र नसतोच मी इथे. खुप दूर.. एकटाच अलिप्त असतो मी."

डोळे पुसत ते म्हणाले.

" म्हणजे..? मला काही कळले नाही सर.?"
डोळ्यात आश्चर्य होतं तिच्या.

" ज्याला कळायचं त्यालाच कधी कळलं नाही.. तूला कसं समजावू..? "

त्यांनी कॉफीचा दुसरा मग ओठाला लावला.

तिची नजर त्यांच्यावरून हलत नव्हती.
" सर काही गोष्टी कुणाशी शेअर केल्याने मन हलके होत असेल तर I\"m always here to hear you.
तुम्हाला सांगावंस वाटत असेल तर प्लीज सांगा मला."

ती काकूळतीला आली.

चेहऱ्यावर स्मित आलं त्यांच्या.

" यू नो? दिवसातले पंधरा सोळा तास मी हॉस्पिटलला असतो.सगळ्यांना वाटतं मी वेडा आहे का की मला घर नाहीये..? पण कुणासाठी जावू मी घरी..? माझी वाट बघणारं अस कुणीच नसतं तिथे. हे हॉस्पिटलच मला माझे हक्काचे घर वाटते. अस असतांना आजच्या दिवशीची रात्र मी कधीच इथे राहत नाही. "

बोलता बोलता थांबले ते.

" का? "

तिनं प्रश्न केला.

" का..? कारण आजच्याच रात्री मी माझ्या आयुष्यातील सर्व नाती हरवून बसलो होतो.. इथेच. "

त्यांचा स्वर कातर झाला होता.

तिनं पाण्याचा ग्लास समोर केला.

त्यांनी पुढ्यातला कॉफीचा मग ओठांना लावला.

" तू आज जे अनुभवलंस ना. मीदेखील ते अनुभवलंय.
... रॅदर आजच्यापेक्षा जास्तच भयंकर आणि वाईट अनुभव…
बाविस वर्षांपूर्वी..!
फरक एवढाच आजची पेशंट अनोळखी होती तुझ्यासाठी. ती पेशंट ओळखीची होती माझ्या …
रक्ताच्या नात्यातील..!

.

.

.


क्रमश :


         **************************


कोणाबद्दल बोलत होते डॉक्टर साठे..? कोणतं सत्य उलगडणार होतं रावीपुढे..??  कळण्यासाठी वाचा पुढील भाग.


आणि हा भाग कसा वाटला... प्लीज सांगा मला.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//