एक भन्नाट प्रेमकथा... गंधाळलेल्या प्रेमाची... पारिजातकाच्या सुगन्धासारखी....
(... मागील भागात आपण बघीतले रावी आणि सुमतीचा डे आऊट.... आता पुढे.... )
---------------------------------------------------------------------------
" थँक्यू रावी.. ! यू मेड माय डे.. !! "
" थँक्स मॉम... ! यू मेड माय लाईफ.... !"
तिला हग करत रावी म्हणाली...
आता त्यांची कार घराकडे निघाली......
एफ एम वर गाणं वाजत होतं...
" ये शाम मस्तानी... मदहोश किये जाय..."
.
.
.
...दोघी घरी परतल्या..
आजचा दिवस दोघींसाठीही अविस्मरनिय असा होता..
" मॉम.. हँगओव्हर झाल्यासारखं वाटतय... " - रावी.
" मला पण.. ! " -सुमती.
फ्रेश व्हायला ती आत गेली.. एकवार स्वतःकडे बघितलं...
" हम्म नॉट bad.. जीन्स सूट होतेय मला.. !" एकटीच ती पुटपुटली.
" मघा तूला मी हेच बोलत होते... "
आत येत रावी म्हणाली.
" आता चेंज करणारेस का हेच कपडे घालणारेस...?? " - रावी.
" करते गं चेंज... एक लुक बघत होते... "
- ती.
" हा घे नाईट सूट स्पेशल तूझ्यासाठी... " - रावी.
" aaw.. ! सो स्वीट ऑफ यू... !... लेकिन आपकी नियत कुछ साफ नहीं लग रही डॉक्टर साहिबा.... ! लग रहा है कुछ चाहिये आपको... !" -सुमती.
" हो पाहिजे ना.. " खुश होत रावी म्हणाली.
" काय..?? " भूवया उंचावत तिने विचारलं.
" तूझ्या हातची तेलमालीश..! किती मिस केलं यार..
मॉम आज आपण एकमेकांची चंपी करून देऊया का?? "
रावीन प्रस्ताव ठेवला.
" हो चालेल.. ! "
तिनेही तो स्वीकारला..
मग त्यांचं साग्रसंगीत सुरु झालं.. सुमतीने वाटीमध्ये तेल गरम करून आणलं..
" मम्मा.. आधी मी तुझी चंपी करते मग तू माझी करून दे... "
" का गं... "
" मग मला तूझ्या मांडीवर डोकं ठेऊन झोपायला मिळेल ना.. " - रावी.
रावी ने तिला तेल लावून दिले. तिचे मऊशार बोटे सुमतीच्या केसांत हळूवार फिरत होती.. आधीच दिवसभराच्या हुंदळन्याने अंगात एक नशा चढली होती... आता हळूहळू डोळे मिटावेसे वाटत होते..
" मॉम.. एक विचारू..?? " - रावी.
" हुं... " - ती पेंगत.
" तूला माहिती होतं ना मी येणार होते ते...?"
-रावी.
" हुं... " - ती.
" म्हणून तू हाफ डे टाकलेला..? "
" हुं... " - ती.
"म्हणून तू शेवयांची खीर बनवलेली...?? "
" हुं...... " - ती.
"तूला कसं गं सगळं कळतं..? "
" हुं..... " - ती.
" हां...?? हुं.. हुं.. काय गं प्रत्येक गोष्टीला..?? " तीला वाकून बघत रावी म्हणाली.
"मॉम ss... मॉम तू झोपते आहेस?? किती इम्पॉर्टन्ट टॉपिक वर मी बोलत होते माहितीय तूला..?? " तिला ती हलवू लागली.
" कुठे झोपतेय गं...?? हम तो अभी नशे मे थे.. हलवाके पुरा नशा उतार दिया.. कहा फेडेगी ये पाप..?? "
ती आपल्याच तालात.
" मै कुठेभी फेडेगी.. आधी सांग मी काय म्हणत होते..?? नाहीतर अपना सर फोडेगी इधरच... " - रावी.
सुमती हसली.. तेलाची वाटी हातात घेत तिला खाली बसवत म्हणाली.
".. हो गं माझे राणी... माहित होतं मला तू येणार होते ते. म्हणूनच मी हाफ डे टाकला आणि तुझी आवडती खीर पण बनवली..
खुश...?? "
" हे मॉम... कसली भारी आहेस गं तू..?? सगळं कसं कळतं तूला माझ्या मनातलं...?? - रावी.
" त्यात काय एवढं...?? आई आहे तुझी तेवढं तर कळायलाच पाहिजे ना... ! "
तिची हळुवार चंपी करत सुमती म्हणाली.
" मॉम तू फक्त आईच नाहीस माझी.. खूप खूप काही आहेस.. ! सगळ्या नात्यांची भरपाई केली आहेस तू..
माझी मैत्रीण.. माझी मम्मा... मावशी.. एवढंच काय कधी कधी आजीही होतेस तू...! "
" आज्जी...? " ती हसायला लागली.
रावीही हसली. नंतर म्हणाली.
" एक विचारू...? "
" हुं... " -ती.
" म्हणूनच माय मरो पण मावशी जगो.. असं म्हणत असतील का गं..? "
तिचा स्वर कातर झाला होता.
" रावी ss.. "
तिच्या डोळ्यात टचकण पाणी आलं.
" मला थोडंफार आठवते ना... ! कदाचित तेव्हा मी तिन चार वर्षांची असेल... हो ना मॉम? आज्जी , आजोबा , मम्मी , पप्पा.. तू आणि मी.. आपण सर्वच गेलो होतो देवीला... आणि परतताना झालेला आपला मोठ्ठा अपघात...
आज्जी.. आजोबा, मम्मी... पप्पा सर्व जागेवरच गेले.. आणि तू...? तू मला आपल्या हातात गच्च पकडून ठेवलंस.. साधं खरंचटलं सुद्धा नाही गं मला.. तुझी शुद्ध गेलेली.. पण तूझ्या ओंजळीत मी अगदी सेफ होते... !
देवीनं सर्व हिरावल गं आपलं.. परंतु तुझ्या रूपात सारंच परत दिले मला...
माझ्या मावशी ची तू माझी मॉम केव्हा झालीस... कळलेच नाही..थँक यू मॉम.. थँक यू फॉर एव्हरीथिंग..... ! "
तिच्या मांडीवर डोकं ठेऊन रावी बोलत होती.
" बच्चा... "
आपले डोळे पुसत ती म्हणाली , " आता नको ना तो विषय.. आपण आहोत ना एकमेकांसाठी. कायम.. ! "
तिच्या केसातून हळुवार हात फिरवत ती म्हणाली.
"... आणि रावी तू सर्वस्व आहेस माझं.. ! तू जर नसतीस तर मी तरी असते का..??
सो नो मोअर डिस्कशन नॉव..... कळलं..?? "
तिचं नाक खेचत ती म्हणाली..
" तुझा सगळा मूड घालवला ना मी..?? सॉरी मॉम.. ! "
आपले कान पकडून निरागसपणे रावी म्हणाली.
" नाही रे बच्चा... ! आजच्या दिवसाची जादू काहीतरी वेगळीच होती.. आताही मी त्या नशेत तरंगतेय असंच वाटत आहे.. " -ती.
" तू केलीयेस कधी नशा..?? " तिला कोंडीत पकडत रावीने विचारलं.
" नाही गं काहीतरी काय भलतंच.. " - ती.
".. मग आज एक एक्सपेरियन्स घेऊन बघूया...?? "
डोळ्यांच्या कोपऱ्यातुन तिच्याकडे बघत तिने विचारलं..
" रावी.. जरा अती होतंय हां तुझं.. "
-तिचे कान ओढत सुमती...
" आंss.. मॉम, चिल.. चिल
म्हणजे.. माझ्याकडे एक इंपोर्टेड ब्रँड आहे.. म्हणून म्हटलं..
म्हणजे ते सेफ आहे अगं.. आणि छान असतं हेल्थ साठी....
आणि मेन म्हणजे नो साईड इफेक्ट...
काही उलट्या बिलट्या होणार नाहीत आपल्याला.. "
ती जरा बीचकत बीचकत... एका दमात बोलून गेली.
" रावी.. असलं काही चालणार नाही हं मला... "
तिने बोलण्यासाठी तोंड उघडलं तोच रावीने तिच्या तोंडात एक दहा ml ची छोटी बॉटल रिकामी केली...
"इssइ... काय आहे हे.. काही चव देखील नाहीये.. !"
काही क्षणासाठी काय घडलं तिला कळलंच नाही. कसानुसा चेहरा करीत ती म्हणाली.
" प्यूअर ब्रँड आहे ना.. त्यामुळे टेस्टलेस आहे..
नो साईड इफेक्ट... "
तिच्याकडे खट्याळ बघत ती म्हणाली.
"... means रावी.. यू चीटेड मी...?? "
आपले मोठे डोळे तिच्यावर रोखत सुमती म्हणाली.
".. नो मॉम इट्स नॉट चीटिंग..! हे बघ मी देखील घेते.. जो होगा साथ मे होगा.. "
असं म्हणत रावीनेही दोन कुप्या घशात ओतल्या..
" रावी काय सुरु आहे हे..?? "
ती आताही शॉकमध्ये होती.
".. रिलॅक्स मॉम.. का ss ही होणार नाही. मी आहे न..
बाय द वे मला मस्त वाटतंय.. ! तूला कसं वाटतंय..?? "
- रावी.
" फारसे काही वेगळे नाही.. " - ती.
" इट मीन्स यू निड मोअर.. " असं म्हणत तिने पुन्हा दोन कुप्या तिच्या घशात रिकाम्या केल्या..
" हां.. ss??? " काय घडतंय तिला कळतच नव्हतं.
" how u feel now...हवेत तरंगल्यासारखं वाटतेय...?? "
हळूवार पणे रावीने विचारलं..
"हुं.. काहीसे.. " -ती.
" आता अगदी अलगद डोळे मिट... मीही मिटलेत... " - रावी.
" हंम.." - ती.
" आता कसं शां ss त वाटतंय ना...? " - रावी.
" हुं... " - ती.
" खूप मस्त.. "
" हम्म.. " -ती
" खू s प आनंदी... "
" हम्म... "
" हॅपी.. हॅपी... "
"हम्म... " - ती
" मी पण हैप्पी.... ! तू आणि मी... किती छोटूशी.. छान फॅमिली आहे ना आपली...." - रावी डोळे मिटून.
" हम्म... " - ती.
" सुमी... अशा या आनंदाच्या क्षणी कुणाची तरी आठवण येतेय..?? " - रावी.
" अहं.. " - ती.
"... तुझ्या त्या लहानपणीच्या बॉयफ्रेंडची....? "
रावीने खडा टाकला.
" उहुं.. "
" खरंच कधीच येत नाही त्याची आठवण..?? " तिने विचारलं.
" नाही.. आणि बॉयफ्रेंड नव्हता तो.. आम्ही लग्न करणार होतो... " - ती.
" तरीही तूला खरंच येत नाही त्याची आठवण..? "
रावीने परत विचारलं.
दोन क्षण शांततेत गेले.
".. सांग ना मॉम... " परत रावी.
" एक लांब श्वास घे... " - ती.
" घेतला.. " - रावी.
" काही जाणवलं......??? " - ती.
" हम्म्म्म... पारिजात फुललाय अंगणात.. त्याचा सुगन्ध दरवळतोय.. ! " -रावी.
" जेव्हा जेव्हा हा गन्ध पसरतो ना.. वाटतं तो आहे इथेच माझ्या आजूबाजूला... ! " - ती.
" एवढं प्रेम होतं तर लग्न का नाही केलंस..? माझ्या जबाबदारी मुळे...? " - रावी.
" नाही गं राणी.. बाबांना जातीतील मुलगा हवा होता.. आणि मला तो.. मग राहील ते.
त्यानंतर तुझ्याच मुळे मी जगू तरी शकले."
- सुमती.
" आपण शोधू त्याला..?? " - रावी.
" कोणाला?? अनिss?? कशाला..? " - ती.
" तुझं त्याच्याशी लग्न लावून देईन.. " - रावी.
".. आणि मी तुझ्या कानाखाली एक ठेऊन देईन..
मघापासून काय चाललय तुझं... " - ती.
" सिरिअसली मॉम.. ! तुझं एकटं जगणं खूप झालं.. माझी पण काही रिस्पॉन्सीबिलीटी आहे की नाही..? " - रावी.
" हो गं माझे आई.. ! पण त्यानं लग्न केलं केव्हाच... ! म्हणजे कळलं तसं मला मागे.
आणि मी एकटी नाहीच आहे... तू आहेस की सोबतीला. " -ती.
थोडावेळ कुणीच बोललं नाही.. दोघीही खाली चटईवर पहुडल्या होत्या..
" आणि काय गं.. मला एवढी खोदून खोदून विचारतेस.. तुला येत आहे का कुणाचीतरी आठवण या कुंद वातावरणात...?? "
आता रावीची खेचायची तिला हुक्की आली.
" नाही गं मला कोणाची आठवण येणार... "
रावी म्हणाली. आणि क्षणातच उठून बसली.
" मम्मा... तूला काहीतरी सांगायचं आहे आत्ताच आठवलं..."
" काय गं...?? "
तीही खाडकण उठून बसली.
" काल ना शॉपिंग मॉल मध्ये एक विचित्र मुलगा भेटला मला.. mr. Xyz. मला म्हणाला की तो dgo डॉक्टर्स ना हेट करतो.. असं कुणी म्हणतं का गं? "
तिच्या गळ्यात पडून रावी रडायला लागली.
" वेडाच आहे तो.. माझ्या शहाण्या बाळाला रडवल...उगी हं बच्चा.."
तिला शांत करीत सुमती म्हणाली.
" हो ना..? श्रुतीपण माझ्यावर ओरडली.. "
तिने पुन्हा एक हुंदका दिला.
" ती श्रुतीपण वेडी.. तू शांत हो हां.. झोप बघू... "
तिने रावीला थोपटलं.. लगेच ती झोपली.. निरागस छोटया बाळाप्रमाणे.... !
"जरा जास्तीच चढली की काय हिला.. "
ती मनात म्हणाली.
काय म्हणाली मघाशी.. " सुमी... " किती दिवसांनी ही साद ऐकली मी. अनि सुमीच तर म्हणायचा मला..
वेडी पोर.. त्याला शोधायचं म्हणते.. !
ती मनातच हसली. प्राजक्ताचा सुगंध तिला मोहवत होता... तिलाही त्या नशेतुन बाहेर पडायचं नव्हतं... ती तिथेच निजली , रावी शेजारीच....
.
.
.
...टिंग.. टॉंग....
...टिंग... टॉंग...
मॅडम ओ सुमती मॅडम...
शांताकाकूच्या आवाजाने तिला सकाळी जाग आली...
खिडकीतुन बाहेर नजर गेली. चांगलेच उजाडले होते... दोघी मायलेकी खालीच झोपल्या होत्या.
तिने दार उघडले.
" काय हो मॅडम.... एवढया उशीरा उठलात? आन हे काय ह्या मॅडम इथंच खाली का म्हणून झोपल्या?? "
बडबडत ती आत आली.
" ओ मॅडम उठा... आवरायचे आहे.. " रावी ला उठवत ती म्हणाली.
" शांताकाकू झोपू दे ना गं थोडं... फक्त पाच मिनिट... " रावी.
" रावी उठ बघू... आणि हे बघ रात्रीच्या तूझ्या पराक्रमाच्या ह्या छोट्या बाटल्या... त्यांची विल्हेवाट लाव तूच... "
तिला उठवत ती हळू आवाजात म्हणाली.
"मॉम.. तूच लाव ना विल्हेवाट... साध्या डिस्टिल्ड वॉटर च्या कुप्या आहेत त्या... ! "
ती झोपेत म्हणाली.
" काय म्हणजे आपण रात्री केवळ डिस्टिल्ड वॉटर पीत होतो..?? "
सुमतीने आश्चर्याने विचारलं.
" हो s.. " - रावी.
" हां ss?? मग ती नशा... ते हवेत तरंगने.. , ती हॅपी हॅपी फीलिंग.. , तुझं रडणं.. हे सगळं काय होतं...?? " - ती.
" आपल्या मनाचे खेळ.. ! "
उठून बसत रावी म्हणाली.
" म्हणजे आपल्या मेंदूला सिग्नल मिळाला की आपण ड्रिंक केलेलं... ते पण अगदी इंपोर्टेड.... ! मग काय तेच इम्पल्स आपल्या माईंडला मिळाले.. आणि आपण तरंगायला लागलो हवेत... ! " ती हसत म्हणाली.
" रावी तू.. ना ! थांब सोडणार नाही तूला.. "
तिला उशी फेकून मारत ती म्हणाली... दोघींच्या पुन्हा मस्त्या सुरु झाल्या... शांताकाकूने पसारा पाहून डोक्याला हात लावला..
" कधी आवरू मी हे सगळं..? " ती म्हणाली.
" चिल शांताकाकू... तुझ्यासाठी मी एक औषध आणलंय डोकं एकदम शांत होईल बघ.. " असं म्हणून तिला रावीने पाजून दिले.
" आता कसं शांत वाटतेय ना...? "
दोन मिनिटांनी तिला विचारलं.
" हो मॅडम... खरंच खूप बरं वाटतेय आता.." - शांता.
" बघितलं..? इट्स कॉल्ड प्लासिबो इफेक्ट... जसा सिग्नल मिळेल तसं होतं... "
सुमती ला टाळी देत ती म्हणाली. दोघी पुन्हा हसायला लागल्या.
शांता आनंदाने कामाला लागली...
आज रावी परत जाणार होती.. उद्यापासून तिच्या नव्या आयुष्याची सुरवात होणार होती..
क्रमश : ...
**************************************
आवडला का आजचा भाग..?? कंमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास share करा आणि मला follow करा.
ही कथामालिका शेवटपर्यंत फ्री आहे... तेव्हा subscription ची गरज नाहीय.
पुढील भागात वाचा आपल्या रावीच्या आयुष्याचा नवा प्रवास...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा