पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग - 16

सुमी आणि अनी.. परत एकदा..!

आपण वाचत आहात... पारिजात.. गंध प्रेमाचा..!

एक भन्नाट प्रेमकथा..!

गंधाळलेल्या प्रेमाची.. पारिजातकाच्या सुगंधाप्रमाणे..!!


( मागील भागात आपण वाचलं..

रावी आणि विराजची भेट. रावीच्या मनातील प्रश्न..

आणि बरंच काही..

आता पुढे..)



     *******************************





… ओटी मध्ये एका निष्णात डॉक्टरांना ती असिस्ट करत होती..
त्यांची शिकवण्याची पद्धत…
आणि तिची आत्मसात करण्याची वृत्ती…

ती गुरुशिष्याची जोडी.. एकमेकांना अगदी पूरक होती…!

काही वेळापूर्वी सुरु असलेली चर्चा दोघांच्याही डोक्यातून केव्हाच निघून गेली…


.
.
.
.
.
.
.

"... मॉम…
श्रु म्हणते तशी मी खरंच डोक्यावर पडलीय कां गं..??

साठे सर आणि विराज यांच्यात नक्कीच काहीतरी आहे असं सारखं वाटतं मला..

… नाहीतर माझ्याच मनाचे खेळ आहेत कां गं सारे..??"


रावी आणि सुमतीचा विडिओ कॉल सुरु होता..


" नाही रे राजा..! श्रुतीला काय जातं काही बोलायला..?
पण तूला तसं वाटतंय ना मग नक्कीच असेल काहीतरी..!"


सुमतीला ठाऊक होतं, श्रुती काही बोलली की हिचं डोकं नेमकं उलटं चालणार. आणि मग अशा वेळेस तिला पॅम्परिंग ची जास्त आवश्यकता असते नाहीतर उगाच चिडचिड होते हिची..

म्हणून ती तिच्या हो ला हो मिसळत होती.


" आय नो मॉम की तूच माझी सगळ्यात बेस्टी आहेस..!
लव्ह यू..! "


तिच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन बघून सुमती गालात हसत होती.


" बरं.. ते सोड.
हॉस्पिटल काय म्हणतंय ते सांग. "


कॉफीचा घोट घेत ती म्हणाली.



" मॉम मस्त चाललंय.

माहितीय सिजेरियन असिस्ट केलं मी आज..
सर एवढे खुश होते ना माझे स्टीचेस बघून..
म्हणाले..
डॉक्टर.. एकदम परफेक्शनीस्ट आहात तुम्ही..! "


साठ्यांची नक्कल करत तिनं सांगितलं.


" मग आहेच माझी मुलगी परफेक्शनीस्ट..!
पण काय रे बच्चा..?? सरांकडून कॉम्प्लिमेंट मिळवण्यासाठी परफेक्ट असतेस कां..? "


सुमतीनं विचारलं.



" नो मॉम..! तूला तर माहितीये ना जोवर मला आतून फीलिन्ग येत नाही तोवर मलाच चैन पडत नाही..
बट यू नो मॉम..? जेव्हा साठे सर कॉम्प्लिमेंट देतात ना तेव्हा खूप भारी वाटतं..
एकदम मन उडू उडू झाल्याटाईप..!! "


सांगताना तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह जाणवत होता.


" बरं.. माझं जावू दे..! तू सांग तुझं कुठवर आलंय अनीपुराण..?? "


उत्साहाच्या भरात तिनं एक खडा मारलाचं सुमतीच्या शांत मनात..!


" रावी..? "

कॉफीचा घोट घेता घेता क्षणभर गोंधळली ती.


" रावी.. काय बोलतेस बच्चा? "

ती म्हणाली.


" अरे मम्मा डोन्ट बी हायपर..! मी अगदी सहज बोलले गं..
काय ना तुझा हा आवडता पारिजात..
सोबतीला भरून असणारा कॉफी फ्लास्क..
म्हणून विचारलं गं..

आता बऱ्या बोलाणं सांगशील कां कितवा कॉफीचा मग आहे ते..?? "

रावीनं धमकीवजा विचारलं.

" तिसरा.. "

सुमती खाली बघत म्हणाली.


" ओ गॉड..!
साठे सर आणि तू दोघे सारखेच आहात कां गं??
आज त्यांना मी हेच सांगत होते जास्त कॉफी पिवू नका म्हणून..
आणि इकडे तू देखील तेच करते आहेस..! "

काहीशा नाराजीच्या सुरात ती म्हणाली.


" बच्चा..! सॉरी ना. "

आपले कान पकडत सुमती म्हणाली.

" पण काय गं..?? सारखी सारखी साठे सरांशी कंम्पेअर करत असतेस मला ..!
माझ्यापेक्षा ते जास्त आवडायला लागलेत कां आता..?? "

सुमती तक्रार करायला लागली.


आता हिला खरी गरज आहे पॅम्परिंगची हे रावीनं हेरलं..

" माझी ममुडी.. तूला खरंच असं वाटतं कां गं..??
साठे सर माझ्या आयुष्यात चार महिन्यापासून आहेत..!
आणि तू..??
तू तर माझं आयुष्य सुरु व्हायच्या आधीपासून सोबत आहेस..!!
तूला कशी कुणाशी कंप्येअर करू शकेन मॉम मी..??

सारी दुनिया एकतरफ और रावी की मॉम एकतरफ..! "


तिला फ्लाईंग किस देत रावी म्हणाली.


" माझी गं गोडुली..! "

कित्ती छान बोलतेस. माझीच दृष्ट नको लागायला..! "

दोन्ही हातांची बोटं कानामागे मोडत सुमती म्हणाली.


रावी हसली… गोड.


"... पण मॉम.. खरं सांगू..??
मला असं वाटतं तू मूव्ह ऑन करायला हवंस यार..
किती दिवस अशी घुसमटत राहशील..?? "

ती म्हणाली.


" माझी घुसमट होतेय असं कोण म्हणतंय गं..?
आय एम हॅपी इन माय लाईफ.
आणि अनीबद्दल म्हणशील तर तो चॅप्टर कधीच क्लोज नं होणारा आहे रावी..
त्या विषयावर नकोच आपण बोलायला..! "

एक उसासा सोडत सुमती बोलली..


" ओके..! राहिलं..!! "

तिच्या मनात टोचलेली सल जाणवली रावीला.

"... बट मॉम.. आय प्रॉमिस यू.. तूला यातून बाहेर काढण्याचा नक्की प्रयत्न करेल."

ती मनात म्हणाली.

.
.
.
.
.

…. थोड्यावेळाने त्यांचं बोलणं आटोपलं..

पण रावीचं बोलणं कुठेतरी मनात घर करून होतं सुमतीच्या…


" वेडी.. मूव्ह ऑन करायचं म्हणते.
माझ्या रोमारोमात भिनलाय अनी..! तूला कसं कळणार गं ..??
दिवसातनं किती वेळा बोलतो आपण.
रोज कितीदा तुझं नाव घेत असते..
अगं बच्चा.. कसं सांगू तूला..?
रावी हे तुझं जे नाव आहे ना.. , ते सुद्धा अनीचीच देण आहे गं...!
कसं विसरू मी त्याला..??


सुमती मनात एकटीच बोलत होती..


एक मंद वाऱ्याचा झोत आला..!
तिच्या आवडत्या पारिजातकाची पानं हळुवार हलायला लागली..
आणि ती झुळूक अलगद मोरपीसाच्या स्पर्शाने पुन्हा तिला भूतकाळात घेऊन गेली.…!!


.
.
.
.
.
.
.

अनिकेतचे मेडिकल कॉलेज सुरु झाले. सुमीही ज्युनिअर कॉलेज ला जावू लागली.
अधेमध्ये येत राहायचा तो दिवेकर काकूंकडे..
तिला भेटण्यासाठी…!

दोन वर्षांचा काळ भुर्रर्कन उडून गेला.. कळलंही नाही.


" … सुमी.. बारावी झालंय ना.
आता तू मेडिकलला ऍडमिशन घे..! माझ्याच कॉलेजला.. "

अनिकेत तिला सांगत होता.


" मेडिकल..?? नको रे बाबा..! "

सुमीनं कानावर हात ठेवला.


" का गं..?? का नको? "
त्यानं विचारलं.


" ते रक्त वगैरे बघितलं की घेरी येते रे मला अनी.
त्यापेक्षा मी आपली बी. एस्सी. ला घेते ऍडमिशन. "

ती म्हणाली.


" काय गं सुमी..? सगळी माझ्या प्लॅनिंगची वाट लावलीस. "

तो काहीसा खट्टू झाला.


" कसली रे प्लॅनिंग..? "

-ती.


" अगं मी मस्त प्लॅन केला होता..
तू पण डॉक्टर आणि मीदेखील.
आपला एक मोठ्ठं हॉस्पिटल असेल..

\" पारिजात..! \"

डॉ. अनिकेत आणि डॉ. सुमती अशा आपल्या नावाच्या पाट्या असतील..!

पण आता हा प्लॅन नाकामयाब होणार दिसतेय."

तो भरभरून बोलत होता.


" अनी..! मी डॉक्टर नाही झाले तर..
तर तुझं प्रेम कमी होईल का रे माझ्यावरचं..?? "

ती त्याला भिजल्या डोळ्यांनी विचारत होती.


" नाही गं नकटु..! "


तिचं नाक खेचत तो म्हणाला.

"... सुमी..!
तू माझं प्रेम आहेस खरंखूर..!
पहिलं आणि शेवटचं.! ते असं कशानेही नाही कमी व्हायचं गं. "

तिच्या टपोऱ्या डोळ्यात डोळे घालून तो बोलत होता.

त्याच्या त्या काळ्याभोर डोळ्यातील आभाळभर विश्वास बघून तिची कळी एकदम खुलली.

" पारिजात..!

काय मस्त नाव शोधलंस रे अनी. मी नसेलही तूझ्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टर तरी आपण हेच नाव ठेवायचं..

पारिजात..! तूझ्या माझ्या प्रेमाचं प्रतीक..!! "

ती आनंदाने म्हणाली.


… तिचा बारावीचा निकाल आला . आणि म्हणून अनिकेत खास तिच्यासाठी दिवेकर काकूंकडे आला होता.

रात्रीचं गच्चीवर चंद्राच्या शीतल चांदण्यात दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या..


" नावावरून सुचलं..!
आपण ना आपल्या मुलांची नावं पण ठरवून ठेवूया. मग उगाच वेळेवर घोळ नको. "

तो म्हणाला.

" अनी..! काहीही हां तूझं..?? "

त्याच्या बोलण्याने तिला लाजायला झालं.


" अगं हो.. खरंच...!
बघ जर मुलगी झाली ना…
तर..?
तर नाव ठेऊया… रावी..!
कसं वाटलं नाव..?? "

त्यानं प्रश्नार्थक नजरेनं विचारलं.

" हे भारी आहे रे. आवडलं मला नाव. एकदम फिक्स.
… आणि मग मुलाच्या नावाचं काय..??
त्याचं नाव ना वीर ठेवूया. नाहीतर विराज..?
कसं वाटतंय..?? "

तीनही एकदम उत्साहात विचारलं.


तो हसला..

" सुमी.. मी एका मुलीवरच थांबणार होतो..! तू तर माझ्याही पुढे निघालीस. "


त्याच्या बोलण्याचा रोख तिला कळला.

" चल चावट..! मेडिकल चे मुलं निर्लज्ज असतात असं म्हणतात ते काय उगाच नाही.! "

तिनं त्याच्या पाठीत धपाटा टाकला.



" अरे..? मी काय केलं??
उगाचच बदनाम करून ठेवलं हं मेडिकल खात्याला. "

तो म्हणाला.



" काय चाललंय रे तुमचं..??
बराच वेळ झालाय ना?? "

मालती ताई गच्चीवर येत म्हणाली.


" अगं ताई उदया निघतोय ना मी. मग थोडं आज बोलू दे ना. "

-तो.


" हो का? नी मग खाली मी काय उत्तरं द्यायची..? "

तिनं प्रश्न केला.


" तूला माहितीय अनी.. ताईचं लग्न जुळतंय… बहुतेक पुढल्या उन्हाळ्यातच..! "

सुमी हळूच म्हणाली.

" सुमा..? "
ताईनं डोळे वटारले.


" तू गप गं ताई. अनी आपल्यातलाच आहे. तो नाही सांगणार इतक्यात कोणाला.
काय रे? "


त्याला टपली मारत सुमी.


तो मात्र आपल्याच विचारात..!


" ताई.. मी नक्की येईन हं लग्नाला..! आणि मग डायरेक्ट सासऱ्यांपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवेल… "


तो म्हणाला.


" कोणाच्या..?? "

दोघींनी एकासुरात विचारलं.


" कोणाच्या काय? माझ्याच होणाऱ्या  सासऱ्यांबद्दल बोलतोय मी.
मला माझं नी सुमीचं नातं सर्वांसमोर आणायचंय.
असं लपूनछपून.. खूप झालं आता. "

दोघींकडे बघत तो म्हणाला.

तशी सुमी लाजली.. रात्रीच्या त्या शीतल चांदण्यातही तिचे आरक्त गाल उठून दिसत होते..

" हुं हुं..! "
घसा खाकरत ताई म्हणाली.

" अजून लहान आहात तुम्ही..! आधी शिक्षणाकडे लक्ष द्या..
आता चला खाली..! "

दोघांना कान पकडून ती घेऊन गेली…


.
.
.
.
.
.
.


…वाऱ्याचा ओघ चांगलाच मंदावला.
ती गॅलरीतून आत आली..


नकळत पाय कपाटाकडे वळले...
कपाट उघडलं.


कितीतरी आठवणींचं गाठोडं होतं त्यात..


तिनं अलगद एकेक वस्तू बाजूला केली. आणि हवा असणारा अल्बम बाहेर काढला..


तिथेच बसून ती एकेक पान पलटवत होती.


आई.. बाबा.. ताई..! सर्वच भेटले तिला तिथे...


सगळ्यांचे हसरे चेहेरे… आनंदाच्या क्षणांची उधळण…


आणि...

त्याबरोबरच एका स्वप्नभंगाच्या दुःखाची लकेर…!


साऱ्यांचा साक्षीदार.. म्हणजे तो फोटो अल्बम..


मालतीताईच्या लग्नातला…!

.

.

.

.

क्रमश :


      *********************************


काय घडेल पुढे.. कळण्यासाठी वाचा पुढील भाग.


आणि हा भाग कसा वाटला कळवा तुमच्या कमेंट आणि लाईक द्वारे.

🎭 Series Post

View all