Feb 25, 2024
प्रेम

पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -14

Read Later
पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग -14

आपण वाचत आहात कथामालिका...

पारिजात... गंध प्रेमाचा...!

गंधाळलेल्या प्रेमाची एक  (... की दोन..?? )  सुगंधित कहाणी.. पारिजातकाच्या गंधासारखी..!!( मागील भागात आपण पाहिलं.. रावी आणि मिस्ट्री मॅनची अनपेक्षित भेट..

आज वाचा त्यांची पहिलीवहिली डेट..)


          ***************************


" अरे एक राहिलंच... "
जाता जाता परत फिरली ती.

" काय..? "

नजरेनं रावी विचारती झाली.

.
" तूला हवं ते आहे यात..! "

तिच्या हातात एक चिट्ठी कोंबत ती.

" खूप प्रयत्न केले पण नाव आणि शहराशिवाय दुसरं काही कळलं नाही यार..."

" मला नकोय काहीच.. "

टीव्ही वरची नजर न हटवता रावी .

स्माईल करत श्रुती दाराबाहेर पडली .

ती गेल्याची खात्री करत रावीनं हळूच ती चिठ्ठी उघडली...

आणि...

त्याचं नाव वाचलं…

" विराज कुलकर्णी… "

.
.
.

तिच्या ओठांवर स्फूट हसू आलं.

" वेडी श्रुती उगाच म्हणत असते…
व्हॉट इज इन द नेम.. व्हॉट इज इन द नेम..? म्हणून.

वेडे नावातच तर सारं काही असतं.
ज्या शेक्स्पियर नी म्हटलं नावात काय आहे त्याचंच तर नाव अजरामर झालेय माहित नाहीय का हिला…??"

ती एकटीच बडबडायला लागली.

परत एकदा ती चिट तिनं डोळ्याखालून फिरवली.

" विराज कुलकर्णी…!

नाम ही काफी हैं.."

चेहऱ्यावरची स्माईल तशीच होती तिच्या…

" भेटू परत केव्हातरी… असंच ऍज युज्युअल.. ऍक्सीडेन्टली.

पण तेव्हा मात्र सोडणार नाही तूला..!

तुझ्यामुळे दोनदा ओरडा खाल्लाय साठे सरांचा..
अब हिसाब बराबर करना तो मंगता हैं स्मार्टी..!! "

ती कागदाची घडी घालत म्हणाली.

" स्मार्टी..??

ईss य..! असं कसं म्हणू शकते मी त्याला..?? श्रुती गेली की काय डोक्यात माझ्या..??

रिमेम्बर डॉक्टर रावी , ही इज यौर दुश्मन...
और दुश्मन की कभी तारीफ नहीं किया करते..! "

" वाह! काय मस्त डायलॉग मारलाय मी..? "

स्वतःलाच शाबाशी देत ती परत टीव्ही पाहू लागली …
.
.
.
.
.
.
.
.

… पंधरा वीस दिवस असेच रुटीन मध्ये निघून गेले.
एखादंवेळेस वाटायचं तो उगवेल कधीतरी म्हणून…
पण तसं काही झालं नाही. आणि आता तिलाही त्याचा विसर पडायला लागला.
हॉस्पिटल लाईफ एन्जॉय करणं चालू होतं तिचं.


आणि..
परत एकदा पुन्हा गाठ पडली त्याच्याशी..

तब्बल दोन महिन्यानंतर…
.
.
.

… सकाळी साडेनऊ दहाची वेळ..
रस्त्यावर तोबा गर्दी होती. एक कार हॉर्न देत तिथे आली.
हॉर्न देऊनही गर्दी पांगत नव्हती हे बघून एक तरुण कारमधून बाहेर आला.
काय झालं हे बघायला तो त्या गर्दीत सामील झाला..

" हां बाळा.. घाबरू नकोस हं.. काही नाही होणार तूला.. मी पट्टी बांधते हं.."

एक धीर देणारा आवाज त्याच्या कानावर आला.

आवाजात काहीशी ओळख जाणवली त्याला तसा त्याने पुन्हा समोर जाऊन बघितले..

ती रावी होती.

एका सात आठ वर्षाच्या छोटया मुलीचं डोकं तिच्या मांडीवर होतं.. त्यातून रक्त येत होतं आणि रावी तिला धीर देत मलमपट्टी करत होती.

त्या गर्दीतून मात्र तिच्या मदतीला कोणीही आलं नाही हे बघून त्याला खूप राग आला पण ही वेळ राग व्यक्त करण्याची नव्हती. तो पटकन पुढे सरसावला.

" आय थिंक शी नीड्स हॉस्पिटलायझेशन… "

तिला पट्टी बांधायला मदत करत तो म्हणाला.

"येस.. विल यू हेल्प मी..??

वर नजर करत ती म्हणाली.


दोघांची नजरानजर झाली.. आणि तिच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन बदलले.

".. हा??
पुन्हा एकदा..??
नको.. "

" थँक्स फॉर हेल्प. बट आय थिंक आय विल मॅनेज मयसेल्फ.. "

ती त्याला म्हणाली.

" बाळा.. चल माझ्या गाडीवर बस. आपण हॉस्पिटल ला जाऊया.. "

ती त्या लहानगीला उभी करत म्हणाली.
उभे होता होता त्या मुलीचा तोल जात होता.

" प्लीज डॉक्टर.. आपल्यातले वाद नंतर मिटवता येतील. पण आता मला मदत करू दे. स्कुटीवर बसण्याची ताकद नाहीये हिच्यात. माझी कार आहे.. त्यात तिला नेणं सोपं होईल. "


तिच्या उत्तराची वाट नं बघता त्यानं आपल्या स्लीव्ज फोल्ड केल्या नी तिला दोन्ही हातावर उचलून कारकडे निघाला.

काही नं बोलता तिही आपली स्कुटी बाजूला पार्क करून त्याच्या मागे गेली.


… ड्राईव्ह करताना मधेच तो आरशातून मागे बघत होता. रावी त्या मुलीचं डोकं मांडीवरच घेऊन होती.

" रडू नकोस.. मी आहे नं.? काही होणार नाही बघ.
हॉस्पिटलला गेल्यावर मी तूला एक मोठ्ठ चॉकलेट देईन हं..! "

तिचे डोळे पुसत रावी समजूत घालत होती.

रावीचं हे रूप त्याला नवे होते. आजवर त्यानं तिला केवळ भांडतानाच पाहिलं होतं. आज मात्र तिचं असं सॉफ्ट हार्टेड वागणं बघून त्याच्या ओठांवर एक स्मित फुलले…

काज्युलटी मध्ये गेल्यावर तिथे त्या छोटीवर उपचार सुरु झाले.
नर्स इंजेक्शन दयायला आली तसं तिनं भोकाड पसरलं.
रावीनं तिच्यापुढं कॅडबरी ठेवली.

चॉकलेट सोबत तिनं रावीचा देखील हात घट्ट पकडला..

" किती वेळ लागेल इथे..?? "
तो.

" कदाचित तासभर.. का? "
ती.

" मी माझं काम आटोपून येतो तोवर.."

" नको येवूस.. खरंच. आम्ही जावू रिक्षाने. "

" येतोय मी छोटी.. "

छोटीच्या गालावर हलकी थाप देत तो निघून गेला..


पुढल्या एका तासानंतर ते तिघे कारमध्ये होते…

" माहित आहे..?? मी पहिल्यांदा अशी कार मध्ये बसलीय. खूप छान वाटत आहे."

ती छोटी आता आनंदाने बोलत होती.

तिचा आनंद पाहून त्याच्याही चेहऱ्यावर स्माईल आली.

" कुठे सोडायचं गं तूला..? "
त्यानं विचारलं.

" तिथंच रस्त्यावर.. "
छोटी.

" म्हणजे.. घर कुठे आहे तुझं.?? "
रावी.

" रस्त्याच्या पलीकडे पालं टाकून तंबू आहेत ना तिथंच आहे माझे घर."

ती निरागसपणे उत्तरली.

" तिथे राहतेस तू? "
-तो.

" हो.. गरीब आहे नं म्हणून तर ह्या ताईशिवाय कोणी नाही आलं मदतीला. "

ती खट्टू होत म्हणाली.

" तसं नसतं गं. मी पण आलो की नाही? "

तो म्हणाला.

" हो दादा.. तू पण खूप छान आहेस. "

ती परत प्रसन्न वदनाने म्हणाली.

त्यांनी तिला तिच्या ठिकाणी सोडलं..
नी जायला वळले..

" ताईs दादाs
थांबा.. "
ती त्यांच्याकडे परत येत म्हणाली.

" काय? "
त्यानं भुवई उंचावून विचारलं.

हॉस्पिटलपासून इतका वेळ सांभाळून ठेवलेल्या कॅडबरीचे तिनं दोन पीस दोघांना दिले..

" थांकु "

ती डोळे मिचकावत म्हणाली.

" आँ हाऊ स्वीट..! "

रावीनं ते हातात घेत म्हटलं. आणि तिला पुन्हा दुसरी कॅडबरी दिली .

ती छोटी आनंदाने गोड हसली आणि हात हलवत आपल्या झोपडीमध्ये गेली..


" किती निरागस आहे ना..? "

-तो.

" हम्म.. "

-ती.

" छोटया छोटया गोष्टीतही किती आनंद शोधतात काहीजण..

आणि काही लोकं क्षुल्लक कारणांवरून देखील भांडत असतात.."

तो बोलून गेला.

" ये.. काय म्हणला तू..?? टॉन्ट मारतोस मला..?? "

रावी रागात.

" अरे..? मी तूला काय बोललो..?? इन जनरल म्हणालो मी ते..!
हं आता तू असशील भांडकुदळ तर तूला लागेल ते.. "

तो हसून म्हणाला.

तिनं त्याला खाऊ की गिळू असं बघितलं.

बोलता बोलता दोघे तिच्या स्कुटीजवळ पोहचले.

" डॉक्टर.. खरं तर मला बोलायचं होतं.. "
-तो.

" आता वेळ नाहीय माझ्याकडे. "

ती स्कुटी स्टार्ट करत निघाली.


" मग हिशोब चुकता करायचा राहील तुझा..! "

मिश्किल हसत तो.


तसा तिनं ब्रेक मारला.

" त्या दिवशी माझ्या हाताच्या बँडेजवर तूच लिहिलंस हे माहितीय मला.. "

तिच्या जवळ येत तो.


" कशावरून..?? "

ती मी नव्हेच च्या अविर्भावात रावी.


" कारण तुझ्याशिवाय अजून तरी दुसरा दुश्मन नाहीय माझा.."

तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला.


" दुश्मन..?? माझ्या डोक्यातले विचार याला कसे कळतात..?? "

गोंधळली ती.

तिचा गोंधळलेला चेहरा बघून हसू आलं त्याला.

" आज रात्री भेटूया..?? "

तिचा गोंधळ बघून तो म्हणाला.

" ऑलरेडी नाईट शिफ्ट होती माझी..थकलेय मी आज..
आणखी परत दोन दिवस तेच.. "

ती बोलून गेली.

" मग शनिवारी रात्री शार्प आठ वाजता.. होटल लोटस..?? "

तो.

" चालेल..! "

ती.

" नक्की ?? विसरणार नाही ना??"

तो.


" एवढी मेमरी शार्प आहे. एकदा वाचलेलं बोललेलं लक्षात असते माझ्या..! "

स्कुटीला स्टार्ट करत निघाली ती.
पाठमोऱ्या तिला बघून तोही आपल्या कारकडे वळला…

.
.
.
.
.
.
.

" … व्हॉट..??
यू आर गोइंग ऑन डेट..??
यू चिटेड मी रावी. मला न सांगता कशी जावू शकतेस तू..??"

श्रुती बिच्चारा चेहरा करून म्हणाली.


" स्टुपिड..! डेटवर नाही त्याच्यात नी माझ्यात आजवर जे झालंय ना ते सॉर्ट आऊट करायला जातेय मी.
त्यानंतर चॅप्टर क्लोज.. फॉरेव्हर... "

तिचे कान ओढत रावी म्हणाली.

" तरी एकटी जाणारेस..?? मला सोडून..?? "

-श्रुती.

" तूला ऑफ आहे सॅटर्डे नाईट..?? "

रावीचा खोचक प्रश्न.

" नाही.. पण मी ऑफ करू शकते ना स्मार्टी साठी.. "

-श्रुती.

" हो..??
चल मग..! "

-रावी.

" नको असू दे बाबा..!
उगाच कबाब में हड्डी… "

-श्रुती.

" अच्छा!
मग आता तर चलंच तू. अक्खा कबाब तूला खाऊ घालते.. "

ती तिला गुदगुल्या करत म्हणाली.

" रावीs.. सॉरी नं यार. मी भंकस करत होते... "

श्रुती हसत हसत म्हणाली.

.
.
.
.
.
.


… बरोबर आठच्या ठोक्याला ती डोअर उघडून आत आली.

तो आधीच येऊन बसलेला.
तिचं लक्ष गेलं..

" कबाब.. "

ती मनात म्हणाली नी तिच्याच ओठांवर एक स्मित उमललं..

" हॅलो.. "

त्याच्या पुढ्यात येत ती म्हणाली.

त्यानं नजर वर केली.. अनं तो खिळलाचं क्षणभर तिच्यावर..


ब्लु जीन्स आणि वरती नीलेन्थ हलक्या येलो कलरचा टॉप. गळ्याच्या भोवती गुंडाळलेला स्कार्फ.. खांद्यावर रूळणारे केस… डोळ्यात काजळ आणि ओठांवर हलकीच लिपस्टिक..

तरीही ती त्याला आज खूप सुंदर दिसत होती.

" येवढया साध्याशा तयारीतही कोणी एवढं सुंदर कसं दिसू शकतं..?? "

तो मनात म्हणाला.

" मी बसू..?? "

तिच्या प्रश्नानं तो भानावर आला.

" येस प्लिज.. "

काहीसा ओशाळल्यागत तो.


" जेव्हाही भेटलो.. जवळपास अशाच अवतारात भेटली ही..
आज का जास्त सुंदर वाटतेय..??
ठरवलेली भेट आहे म्हणून..?? "


तो डोळे मिटून तिच्याशी झालेल्या भेटी आठवत होता..

मॉलमध्ये धडकलेली..
हॉस्पिटलच्या आवारात..
ऍडमिट असतांना..
आणि आत्ताच झालेली परवाची भेट..

काहीशी ह्याच रूपात भेटली ती.. पण आज जरा जास्तच वेगळी भासत आहे.." आर यू ओके..?? "

त्याला तसं डोळे मिटून बघून तिनं चुटकी वाजवून विचारलं.


" सॉरी.. "

डोळे उघडून एका दमात त्यानं ग्लासभर पाणी गळ्यात रिचवलं..

" काय घेणार..?? "
तो.

" चिकन कबाब..! चालेल तूला..??"

तिच्या तोंडून लगेच बाहेर पडलं.

गळ्यातलं पाणी बाहेर येता येता राहिलं त्याच्या..

" मी शुद्ध वेजेटेरियन आहे. "
तो.

" तो तुझा प्रश्न आहे..! मला नॉनव्हेज चालतं..
ते कबाब.. ती बिर्याणी.. तो तांबडा पांढरा रस्सा..!
खाण्यातलं स्वर्गसूख म्हणजे हेच. "

ती वर्णन करून सांगत होती.


" मळमळतंय मला ऐकूनच.. "

तो कसनुसा चेहरा करून म्हणाला.

" चिल..!
गंमत केली रे. तू इनवाईट केलंस ना.. मग तू कर ऑर्डर तूला हवं ते.
चालेल मला. "

ती हसून म्हणाली.

" ओह! तूला गंमतही करता येते तर.."

मेनुकार्ड हातात घेत तो म्हणाला.

" व्हॉट डू यू मिन..?? "

गाल फुगवून ती.

" त्यावरच बोलायला भेटलो आपण..
सारखी भांडत का असतेस गं तू..?? "

खाता खाता तो म्हणाला.

" त्या दिवशी मॉलमध्ये मी नाही तू धडकलीस मला.
हॉस्पिटलच्या आवारात योगायोगानेचं भेटलो… आणि ऍडमिट असतांनाही.
तरी तूला कसला बदला घ्यायचाय माझ्याशी..?? "

त्यानं सरळ मुद्द्याला हात घातला.

" हॉस्पिटलच्या पहिल्याच दिवशी मला लेट झालं… तुझ्यामुळे.
डॉक्टर साठ्यांचा ओरडा खाल्ला.. एकदा नाही दोनदा. केवळ तुझ्यामुळे.
आणि तू काय म्हंटलं होतंस..??
आय हेट डॉक्टर्स.. ते पण डीजीओ.. मग काय समजू मी.??
मला वाटलं स्टॉक करतोयस तू मला.
म्हणून गोंधळ झाला सारा. "

ती एका दमात बोलून गेली.

" बापरे..! एवढा गोंधळ..!
मिस गोंधळेकर.. मॉलमध्ये बोललेलं खरंय पण ते तूझ्या बाबतीत नव्हतं.
तू डॉक्टर आहेस हेच नव्हतं मला माहित..
बाय द वे सॉरी.
नकळत का होईना चूक झाली माझी."

बाउल मध्ये हात धूत तो म्हणाला.

" सॉरी मी सुद्धा…!
माझ्याही मुळे तूला त्रास झालाच. "

आपले कान पकडत ती.

" इट्स ओके गं.. पण आता झालं ना सगळं सॉर्ट आऊट..??

आणि हो ते मोटू काय होतं..? "

त्यानं मिश्किल हसत विचारलं.

तिनं पटकन जीभ चावली. आणि परत कान पकडले.

तो हसला.

" यू नो डॉक्टर..?? माय मॉम वाज लाईकड टू कॉल मी मोटू.. "

" म्हणजे..?? "

-रावी.

" ती नाहीये आता…
कितीतरी वर्षांनी मी ती हाक ऐकली.. परत. "

त्याचा स्वर कातर झाला.

" हेय.. एम रिअली सॉरी यार. मला हर्ट नव्हतं करायचं तूला..!"

तिच्याही डोळ्यात पाणी तराळलं.

" एम नॉट हर्टेड ..! आय मिस माय मॉम एव्हरीटाइम. "

तो म्हणाला.

काय बोलावं तिला कळेना.

" फ्रेंड्स..?? "

त्यानं अचानक तिच्यासमोर हात केला.

तिनं पाहिलं त्याच्या डोळ्यात..

श्रुती म्हणते तसं काही कातिल बितील नाही वाटलं तिला.

पण त्या काळ्याभोर डोळ्यांचा डोह तिला खेचतोय त्याचाकडे असं वाटलं.

त्या डोळ्यात हरवली ती.. पाहिल्यांदा...

तिच्याही नकळत तिचा हात पुढे आला..

" विराज.. विराज कुलकर्णी.. "
तो तिचा हात हलवत म्हणाला.

" डॉक्टर रावी.. "

हलकेच हात सोडवत ती म्हणाली.

पलीकडच्या टेबलवरून हे सारं कुणीतरी न्याहाळत होतं..

...त्यांचे एकमेकांच्या हातातील हात..

ते बघून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं..

.

.

.

. क्रमश :


   ***********************************


बराच लांबला आजचा पार्ट.

पण तुम्हाला कशी वाटली रावी आणि विराजची डेट.. सॉरी ठरवलेली पहिली भेट..??

नक्की सांगा..

ऑफ कॉर्स कमेंट करून..( ते काय सांगावं लागतं..?)

लाईक करा आणि share देखील..

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//