पारिजात... गंध प्रेमाचा..! भाग - 15

रावी आणि विराज..!

... आपण वाचत आहात.. पारिजात... गंध प्रेमाचा..!

 एक ( की दोन..?)  भन्नाट प्रेमकथा..

पारिजातकाच्या सुगंधाने गंधाळलेली...!!


( मागील भागात आपण वाचली रावी आणि विराज ची पहिलीवहिली डेट..

अनुभवली त्यांच्यातील प्रेमळ नोकझोक.. आणि बरंच काही...


आता पुढे...)


              *********************





पलीकडच्या टेबलवरून हे सारं कुणीतरी न्याहाळत होतं..

...त्यांचे एकमेकांच्या हातातील हात..

ते बघून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं..
.
.
.
.

… परत निघतांना रावीचं लक्ष त्या टेबलाकडे गेलं . आणि त्या ओळखीच्या नजरेशी नजरानजर झाली.तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि उत्सुकता दोन्ही भाव एकाच वेळी उमटले.

" गुड इव्हनिंग सर..! "
तिनं प्रसन्नचित्तानं त्यांना ग्रीट केलं.


होय ..!


ते तेच होते.. डॉ. साठे.



" अरे.. डॉक्टर रावी..?? फॉर डिनर पार्टी.. राईट..? "

तिच्याकडे बघत त्यांनी
विचारलं.

तिनं गोडंसं हसून मान डोलावली.

" यू अल्सो फॉर डिनर राईट सर..?? पण एकटेच?? का..? "

-ती.

" आपली माणसं नसली घरी की खायला उठतं घर..
मग मीही येत असतो अधेमध्ये एकटाच.. "

ते बोलले.

बोलता बोलता त्यांचा लक्ष बाहेर दुरवर बघणाऱ्या विराजकडे गेलं.

" हॅलो यंग मॅन. हाऊ आर यू नॉव?? "

त्यांनी त्याच्याकडे बघत विचारलं..

तो हसला.. बळेच!

" फाईन.. "
तो उत्तरला.

" आपण निघूया..? "
त्यानं रावीकडे एक प्रश्नार्थक नजर टाकली.

" गुड नाईट सर.. एन्जॉय यौर डिनर.. "

ती परत एक स्माईल देऊन म्हणाली आणि त्याच्यासोबत बाहेर आली.

" गुड नाईट डॉ. रावी.. एन्जॉय यौर लाईफ डिअर…. "

ते मनात म्हणाले.
.
.
.
.
.

" …. आतापर्यंत तर ठीक होतास तू आता का अचानक मूड गेल्यासारखा आहेस..??"

आपल्या क्लचमधून चावी काढत रावी म्हणाली.

" नथिंग..! "

नकारार्थी मान हलवून तो म्हणाला.


" इफ यू डोन्ट माईंड.. एक विचारू? "
ती.


" व्हॉट..? "
-तो.


" तू ज्या डॉक्टरांना हेट करतोस ते डॉ. साठे तर नाहीत ना..?? "


तिच्या अनपेक्षित प्रश्नावर हसला फक्त तो..


"... आणि तूला असं का वाटलं..?? "
-तो.


" त्यांच्याशी बोलतांना एक रूडनेस जाणवला तुझ्यात.. सो आय थिंक.. "


त्यानं तिच्याकडे असं पाहिलं की तिलाही वाटलं कुठेतरी चुकली ती..


" सॉरी.. म्हणजे मला असं नको बोलायला..
बट यू नो..?? डॉ. साठे इज माय आयडॉल..
सो.. त्यांना कुणी काही चुकीचं बोललेलं खपणार नाही मला. "


ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.


" अगं पण मी काही बोललेलोच नाही ना.. "

-तो.


" हो रे.. म्हणून तर तूला पहिलेच सॉरी म्हंटलं ना मी.



डोन्ट नो व्हाय.. बट आय फील आय एम बिकमिंग स्लाईटली पजेसिव्ह अबाऊट हिम.

असं वाटतं काही तरी नातं असावं आमचं..! "


तो हसला.. तसं तिलाही हसायला आलं.


मुळात त्याला का सांगतेय हे सगळं हेच तिला कळत नव्हतं.



" विराज..


एक विचारू..?? "


कारकडे वळणाऱ्या त्याला तिनं पुन्हा थांबवलं.

तिनं मारलेली ती हाक… कुठेतरी हृदयाच्या तारांना छेडून गेली.

आपल्या दोन्ही हातांना फोल्ड करत तो आता कारला रेलून उभा होता..


" विचारा मॅडम.. "



" म्हणजे… बघ हं तूला सांगावंस वाटेल तर..
मला सांगू शकतोस का..
की एखाद्या डॉक्टरांचा एवढा राग किंवा द्वेष करण्यासारखं नक्की काय घडलंय तूझ्या आयुष्यात..??"


ती शब्दांची जुळवाजूळव करत म्हणाली.



तिचा तो प्रश्न…!
सरकन काटा रुतावा तसा रुतला त्याच्या हृदयात..

पण चेहऱ्यावरचे भाव नं बदलता तो तिच्याजवळ आला..

त्याचे दोन्ही हात त्याच्या जीन्सच्या खिशात होते..
नी नजर… थेट तिच्या डोळ्यात..!



" डॉक्टर.. माझ्यात इंटरेस्ट घ्यायला लागलात की काय..?? "


तो अजूनही तिच्या डोळ्यात पाहत होता.



" मिस्टर विराज कुलकर्णी.. आज माझ्या आयुष्यातला तुझा चॅप्टर क्लोज करायलाच आले होते मी..
इंटरेस्ट तर बाजूलाच राहिलं.."


त्याच्या अशा जवळ येण्याने बावरली ती..
पण आतला गोंधळ चेहऱ्यावर नं आणता अगदी शांतपणे ती उत्तरली ..



" आय सी!
म्हणजे तूझ्या आयुष्यात होतो म्हणायचा मी..? "



" गप रे.. पुरे झालं तुझं फ्लर्ट करणं..
नसेल सांगायचं तर तसं बोल स्पष्ट.. "
ती बाजूला होत म्हणाली.


तिच्या मनातला गोंधळ त्याला कळला होता..

" मिस गोंधळेकर…स्मार्ट आहेस हां.
पण काय गं पहिल्याच भेटीत सारंच जाणायचंय तूला..
मग नेक्स्ट मीटिंगमध्ये कशावर बोलू आपण..?? "

-विराज.


" हां..?? नेक्स्ट मिटिंग..??
ती केव्हा ठरली..?? आणि कुणी ठरवली..?"


ती गोंधळून म्हणाली.


" ही काय आत्ताच ठरलीये..
आणि मीच ठरवलीय.
त्याचं काय ना उधारी ठेवत नाही मी कुणावर..
आजची ट्रीट माझ्याकडून होती.. तर पुढली तुझ्याकडून हवीच ना. "


ती त्याच्याकडे बघतच राहिली..


" चिल यार.. जस्ट खेचत होतो.. मी..
चल बाय.. निघूया. "
तो म्हणाला.


तिनं हसून स्कुटी स्टार्ट केली आणि निघाली.
पुढे जाऊन थांबली पुन्हा.



" विराज.."



पुन्हा तीच हाक..
पुन्हा तेच हृदयाच्या तारांचं छेडणं..
थबकला तो..


" आता काय..?? "


त्यानं ईशाऱ्यानचं विचारलं..


" वाटलं तेवढा वाईट नाहीयेस तू…
मला आवडेल तूला पुन्हा भेटायला.."

ती हसून म्हणाली आणि निघून गेली…

.
.
.

… विराजनेही कार ला चावी लावली..
आणि निघणार तोच त्याचं लक्ष गेलं.. डॉ. साठेंकडे..

तो मिरर मध्ये बघत होता.. साठेंची कार काही केल्या सुरु होत नव्हती.
ते कोणालातरी कॉल करत होते.

आपली कार एक रिव्हर्स घेत विराज त्यांच्यापर्यंत आला.

" एनी प्रॉब्लम..?? "

बाहेर येत त्यानं विचारलं.


" हम्म. कार स्टार्ट होत नाहीये. तसा केलाय मी मेकॅनिकला फोन पण तो आता यायला तयार नाहीये.."

ते म्हणाले.

" इट्स ओके..! मी ड्रॉप करतो तुम्हाला.. चला. "

-विराज.

" नको.. मी करेल काहीतरी मॅनेज. "

-डॉ. साठे.


तो काही नं बोलता कारच्या आत जाऊन बसला.. आणि बाजूच्या सिटचा दरवाजा उघडा ठेवला…

पाचेक मिनिटांनी काहीच पर्याय नाही हे कळून साठे आत बसले.

दोघांचा प्रवास सुरु झाला…

… काही अंतर पार केल्यावर त्यांनी रावीला क्रॉस केलं..
तिचं लक्ष गेलं…


" विराज आणि डॉ. साठे एकत्र..?? काहीतरी गडबड नक्कीच आहे.. "


तिच्या पिटुकल्या डोक्यात विचार आला..
.
.

" यंग मॅन.. यू लाईक हर..? "

त्यांनी विराजला प्रश्न केला.

" कोण?? मिस गोंधळेकर"

तो.


" डॉ. रावीबद्दल विचारतोय मी. "

साठे म्हणाले.


" तीच ती..! सारखा गोंधळ घालत असते म्हणून मिस गोंधळेकर..! "

विराज हसून म्हणाला.


" शी इज वन ऑफ माय फेवरेट स्टुडन्ट..
तिला हर्ट केलेलं चालणार नाही मला..! "

-डॉ. साठे.


" कमाल आहे. यांना काही म्हटलं तर तिला राग येतो.. आणि तिला काही म्हंटल तर यांना..!
अजब केमिस्ट्री आहे दोघांची..!! "


तो मनात म्हणाला. ओठांवरचं हास्य तसंच होतं..



" व्हाय आर यू स्मायलिंग यंग मॅन..?? "


त्यांनी प्रश्न केला.

काही नं बोलता त्यानं कारचा ब्रेक लावला.

" यौर डेस्टिनेशन डॉ. साठे..!"

त्याची नजर समोरच होती.


" थँक्स.. यंग मॅन! "

ते खाली उतरत म्हणाले…

.
.
.
.
.
.

"... काय करतो तो? कुठे असतो..?? घरी कोण कोण आहेत त्याच्या..?? "

श्रुतीच्या प्रश्नांचा मारा सुरु झाला होता..


" अगं हो हो..! आधी आंघोळ तर करून ये. मग सांगतेच सगळं..! "

-रावी.

रविवारची सकाळ.. श्रुती नाईट शिफ्ट आटोपून परतली होती.. नी आल्या आल्याचं तिनं रावीला गळ घातली.

" नो वे.. मला आत्ताच ऐकायचं सगळं. काल रात्रीपासून स्वतःला कसं कन्ट्रोल करतेय तूला काय माहित गं.. "

ती आत जायचं नाव घेईना.


" श्रु.. इतका वेळ आवरलंस ना स्वतःला..?? मग आणखी दहा मिनिटं..
प्लीज जा. नी पटकन फ्रेश होऊन ये.. मी तूझ्या आवडीचे पोहे करते तोवर.. "


रावी तिला जवळजवळ आत ढकलत म्हणाली.


" रावी यार.. इट इज नॉट फेअर..! "

श्रुती पाय आपटतच बाथरूम मध्ये घुसली.

.
.
.


"आहाहा..! काय मस्त झालेत पोहे. "

चमचाभर पोहे तोंडात कोंबत ती म्हणाली.

" येs.. पण पोह्यावर गंडवू नकोस हां मला..
चल काल काय काय झालं ते सांग पटापट. "
-श्रुती.


" विराज कुलकर्णी.. "

रावी म्हणाली.

" काय..? "

तोंडातला चमचा बाहेर काढत श्रुती.

" अगं.. नाव आहे त्याचं. "

-रावी.

" रावी.. डोन्ट मेक मी फुल.. ओके?
ही माहिती मी तूला दोन महिन्यापूर्वीच दिली होती.. "

कपाळावर आठ्या आणत श्रुती म्हणाली.


" हम्म. आणि काल मी कन्फर्म केलं. "

रावी शांतपणे.

" व्हॉट..?? तुझा माझ्यावर विश्वास नव्हता रावी..??
जावू दे..! पुढचं सांग. "


ती पोहे खात म्हणाली.


"आता आणखी काय..? "

रावीनं विचारलं.

" म्हणजे तो करतो काय..?? घरी कोण कोण आहेत वगैरे.. "
-श्रुती.


" मी नाही विचारलं..? "
-रावी.

" काय..?? अगं मग दोन दोन तास काय करत होतीस.?? "

आश्चर्याने श्रुती.

" जनरल गप्पा मारत होतो.."

-रावी.

" कठीण आहे रावी यार तुझं..! दोन तास सोबत राहून साधी बेसिक माहिती नाही मिळवली..? "

डोक्यावर हात मारत श्रुती म्हणाली.

" श्रु..! तूला माहित्ये..? साठे सर भेटले होते तिथे.. आणि मेन म्हणजे जाताना विराज आणि सर सोबत गेले.. "
रावी सांगत होती.

" तर…?? "
श्रुतीने विचारलं.


"... मला असं वाटतं.. दोघांत काहीतरी नातं असावं यार..!
पण काय ते कळत नाहीये. "

ती विचार करत म्हणाली.

" स्वतःच्या नात्याचं अजून पत्ता नाही आणि चालली दुसऱ्यांचा विचार करायला.."

प्लेट्स आत घेऊन जात श्रुती पुटपुटली…

.
.
.
.
.


… ओपीडी अर्ध्यावर आली.. तसं सरांनी कॉफी ब्रेक घेतला..


" सर.. शनिवारी रात्री विराजने सोडलं तुम्हाला..??"


कॉफीचा घोट घेत रावीनं विचारलं.

" हम्म..! माझी कार अचानक बंद पडली. तर त्यानं लिफ्ट दिली मला..! "

ते म्हणाले.

ती त्यांचे हावभाव टिपत होती.

"... सर..!
तुम्ही ओळखता त्याला..?? "

तिनं मनातला प्रश्न ओठांवर आणला.

" डॉक्टर..
माणसं ओळखतो मी..!
मागेच तर बोललो होतो ना.."


ओठावर हसू ठेवून कॉफीचा दुसरा कप रिचवत ते म्हणाले.


"... सर..
त्याच्यामुळे काही टेन्शन आहे का तुम्हाला..?? "

तिची नजर त्यांच्या चेहऱ्यावरून हटली नव्हती..

" असं का वाटतं तुम्हाला डॉक्टर.?? "

त्यांनी तिसरा कप ओठाला लावत विचारलं.


"... कारण ही तुमची कॉफी..! "

त्यांच्या हातातील कप बाजूला ठेवत ती म्हणाली.


" यू नो सर? माय मॉम इज अल्सो कॉफीलव्हर ऍज लाईक यू..!
आणि जेव्हा ती टेन्शन मध्ये असते ना.. ती असेच वरचेवर कॉफी पिते..

जास्त कॉफी आरोग्याला घातक असते सर..
तुम्हाला कसलं टेंशन खातंय..?? "

शेवटचं वाक्य बोलतांना ती त्यांच्या डोळ्यांचा वेध घेत होती..

तिचं ते काळजीचं वागणं.. त्यांना कुठेतरी आपलेपणाचं वाटत होतं.. आवडायला लागलं होतं.

.
.

" … सर..
सीझरसाठी पेशंटला घेतलंय..! "

सीमा सिस्टर आत येत म्हणाली.


" डॉक्टर रावी.. लेट्स गो..! आज असिस्ट करा मला.
स्टीचेस कसे लावायचे ते शिकूया आज. "

डॉ. साठे म्हणाले.

.
.

… ओटी मध्ये एका निष्णात डॉक्टरांना ती असिस्ट करत होती..
त्यांची शिकवण्याची पद्धत…
आणि तिची आत्मसात करण्याची वृत्ती…

ती गुरुशिष्याची जोडी.. एकमेकांना अगदी पूरक होती…!

काही वेळापूर्वी सुरु असलेली चर्चा दोघांच्याही डोक्यातून केव्हाच निघून गेली..

.

.

.

. क्रमश :


     **********************************


कसा वाटला मग आजचा भाग..??

आवडलाय ना..?? आवडायलाच पाहिजे.. येवढया मेहनतीने जो लिहितेय मी..

आवडला तर कमेंट लाईक आणि share करा..

आणि हो..


रावीला पडलेला प्रश्न प्रश्नच आहे की रास्त आहे..?

डॉक्टर साठे आणि विराज यांच्यात खरंच काही नातं आहे का रावीच्या मनातील पोकळ शंका..??

कळण्यासाठी वाचत राहा..

पारिजात... गंध प्रेमाचा..!

🎭 Series Post

View all